Psychology - Textbook Std 12 PDF
Document Details
Uploaded by RestfulArgon
2020
Maharashtra State Board
Tags
Related
Summary
This textbook is for 12th-grade psychology students in Maharashtra. It covers the study of the human mind, behavior, and related concepts. It also includes discussions of various theories, treatments, and research methods.
Full Transcript
शासन निर्णय क्रमांक ः अभ्यास - २११६/(प्र.क्र.४३/१६) एसडी-४ दिनांक २५.४.२०१६ अन्वये स्थापन करण्यात आलेल्या समन्वय समितीच्या दिनांक दि. ३०.०१.२०२० रोजीच्या बैठकीमध्ये हे पाठ्यपुस्तक सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून निर्धारीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे....
शासन निर्णय क्रमांक ः अभ्यास - २११६/(प्र.क्र.४३/१६) एसडी-४ दिनांक २५.४.२०१६ अन्वये स्थापन करण्यात आलेल्या समन्वय समितीच्या दिनांक दि. ३०.०१.२०२० रोजीच्या बैठकीमध्ये हे पाठ्यपुस्तक सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून निर्धारीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. मानसशास्त्र इयत्ता बारावी आपल्या स्मार्टफोनवरील DIKSHA App द्वारे पाठ्यपुस्तकाच्या पहिल्या पृष्ठावरील Q.R. Code द्वारे डिजिटल पाठ्यपुस्तक व पाठासंबंधित अध्ययन अध्यापनासाठी उपयुक्त दृक्- श्राव्य साहित्य उपलब्ध होईल. २०२० ‘hmamîQ´> amÁ¶ nmR>çnwñVH$ {Z{‘©Vr d Aä¶mgH«$‘ g§emoYZ ‘§S>i, nwUo. प्रथमावृत्ती : © महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे ४११००४. २०२० महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाकडे या पुस्तकाचे सर्व हक्क राहतील. या पुस्तकातील कोणताही भाग संचालक, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ यांच्या लेखी परवानगीशिवाय उद्ध तृ करता येणार नाही. मानसशास्त्र विषय समिती : चित्र व मुखपृष्ठ : श्रीमती मधुरा पेंडसे डॉ. शिरीषा साठे (अध्यक्ष) डॉ. बडगुजार जितेंद्र प्रल्हाद, सदस्य अक्षरजुळणी : मुद्रा विभाग, पाठ्यपुस्तक मंडळ, श्रीमती. किरण रविकिरण जाधव, सदस्य पुणे. श्रीमती. परागणी किल्लावाला, सदस्य संयोजक ः श्री. रविकिरण जाधव, डॉ. अनिता पाटील, सदस्य विशेषाधिकारी, भूगोल डॉ. मनिषा रमेश नाईक, सदस्य कागद : ७० जी.एस.एम. क्रीमवोव्ह श्री. प्रितमकुमार चंद्रकांत बेदरकर, सदस्य डॉ. सुजीत धनराज कुमावत, सदस्य मुद्रणादेश : श्रीमती. अश्विनी सुभाष बापट, सदस्य मुद्रक : श्री. र.ज.जाधव, सदस्य-सचिव मानसशास्त्र अभ्यास गट : निर्मिती : श्री.शिशिर लिलाधर लेले श्री. सच्चितानंद आफळे श्रीमती. पुजा प्रकाश प्रभावळकर श्रीमती. शिल्पा सुहास वाघ मुख्य निर्मिती अधिकारी श्रीमती. गीता काळे श्री. लिलाधर अा ाम श्रीमती दाभोलकर अनिता रमाकांत निर्मिती अधिकारी श्री. पुनवतकर अनिल यशवंत श्री. मल्लाडे शांतीनाथ नेमिनाथ श्री. शिंपी रामप्रसाद सुकदेव श्री. देशमुख आनंदराव शशिकांत प्रकाशक श्रीमती शेख नफिसा बेगम गुलाम जिलानी श्री. विवेक उत्तम गोसावी श्री. परदेशी सुरेश ब्रिजलाल नियंत्रक श्रीमती जाधव स्नेहा संतोष पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ, श्री. जोशी जीवन धोंडीराम प्रभादेवी, मुंबई-२५. श्री. अभंग लालासाहेब महादेव प्रस्तावना विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता बारावीच्या वर्गात तुम्हां सर्वांचे स्वागत आहे. मानसशास्त्र या विषयाचे पाठ्यपुस्तक तुमच्या हाती देताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. मानवी मनाचा, मेंदूचा आणि मुख्यतः मानवी वर्तनाचा अभ्यास मानसशास्त्र या विषयात केला जातो. कुठलीही कृती, विचार करताना नक्की मानवी मेंदूत काय घडते? व कोणत्या कारणांच्या आधारे प्रत्येक व्यक्ती ही इतर व्यक्ती पेक्षा भिन्न वर्तन करते? भावना व विचार हे मानवी वर्तनावर कसा परिणाम करतात? मानसिक समस्या व आजार कसे उद्भवतात? त्यामागची कारणे व उपचारपद्धती यांचा समावेश या विषयात होतो. प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात काही टप्प्यांवर सल्ल्याची, मार्गदर्शनाची, समजून घेण्याची, गरज भासते. तसेच या ताणजन्य व असुरक्षित जीवनपद्धतीमुळे तिला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, अशा वेळी मानसतज्ज्ञ, समुपदेशक व मार्गदर्शक हा त्या व्यक्तीला एक सक्षम व्यक्ती म्हणून उभे करण्यास मदत करतो. करिअरच्या विविध संधी असणारे हे क्षेत्र आहे. सामाजिक शास्त्रामध्ये जरी हा विषय मोडला जात असला तरी, मुलभूत शास्त्रासारखाच हा विषय आहे. मुख्यत्वे व्यक्ती अभ्यास व सर्वेक्षणावर यात भर दिला जातो. कारण प्रत्येक व्यक्तीनुसार समस्या, समस्येचे स्वरूप, उपचार, समुपदेशन पद्धती ही वेगळी ठरत असते. त्यामुळे तितकेच जबाबदारीचे हे क्षेत्र आहे कारण इथे प्रयोग, प्रयोगाचे साधन व माध्यम ही थेट व्यक्ती आणि तिचे वर्तन असते. या अभ्यासात सैद्धांतिक तसेच प्रात्यक्षिकावर आधारित शिक्षण दिले जाते. तसेच विषयानुसार क्षेत्र अभ्यास ही करावा लागतो. काही काळ कार्यानुभव (इंटर्नशिप), संशोधन प्रकल्प करावे लागतात. मानसशास्त्रीय चाचण्या, सिद्धांत, आजार, उपचारपद्धती व संशोधनपद्धती यांचा अभ्यास करावा लागतो. अकरावीमध्ये या विषयाशी तुमची तोंडओळख झाली आहे. या वर्षी पाठ्यपुस्तकाची रचना ही मानसशास्त्राबद्दल अधिक स्पष्टता येण्याच्या उद्देश्याने करण्यात आली आहे. अनेक कृतींतून तुम्ही हा विषय शिकणार आहात. या सर्व कृती तुम्ही आवर्जून करा. या कृती तुमच्या विचारप्रक्रियेला चालना देतील. पाठ्यपुस्तकात अनेक छोट्या छोट्या उपक्रमांचा समावेश केलेला आहे. त्या उपक्रमांतून तुम्ही बरेच काही शिकणार आहात. दिलेला प्रकल्प, त्यांची कार्यवाही व त्या दरम्यान आवश्यक असणारी कृती तुम्ही स्वत: काळजीपूर्वक करा. तसेच आवश्यक तेथे तुमच्या प्राध्यापकांची, पालकांची व वर्गातील सहकाऱ्यांची मदत घ्या. आजच्या तंत्रज्ञानाच्या वेगवान युगात संगणक, स्मार्टफोन हे तर तुमच्या परिचयाचे आहेतच. पाठ्यपुस्तकात दिलेले बार कोड तसेच ऑनलाईन उपलब्ध असलेल्या माहितीचा तुम्ही पुस्तकाला पूरक म्हणून उपयोग केल्यास अध्ययन सुकर होईल. पाठ्यपुस्तक वाचताना, अभ्यासताना आणि समजून घेताना तुम्हांला त्यातील आवडलेला भाग तसेच अभ्यास करताना येणाऱ्या अडचणी, पडणारे प्रश्न आम्हांला जरूर कळवा. तुम्हांला तुमच्या शैक्षणिक प्रगतीसाठी हार्दिक शुभेच्छा ! (विवेक गोसावी) पुणे संचालक दिनांक : २१ फेब्रुवारी, २०२० महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती भारतीय सौर ः २ फाल्गुन, १९४१ अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे. मानसशास्त्र - Aܶ¶Z CX²XrîQ>ço अ.क्र. घटक अध्ययन उद्दीष्ट्ये 1. मानसशास्त्र ः l विज्ञान म्हणून मानसशास्त्राचा इतिहास समजून घेणे. एक l मानसशास्त्रातील विविध संशोधन पद्धतींची माहिती व त्यांची वैशिष्ट्ये जाणून घेणे. विज्ञानशाखा l मानसशास्त्र एक विज्ञान म्हणून प्रस्थपित करण्यात येणारी आव्हाने समजून घेणे. l तर्कसंगती ही संकल्पना आणि तर्कसंगत व्यक्तीची वैशिष्ट्ये समजून घेणे. 2. बुद्धिमत्ता l बुद्धिमत्ता विषयक विविध दृष्टीकोन सारांशित करणे व त्यांचे वर्णन करणे व बुद्धिमापनाचा इतिहास प्रात्यक्षिकाद्वारे समजून घेणे. l बुद्धिमापन चाचण्यांचे विविध प्रकारांत वर्गीकरण करणे. l बुद्धिमापन चाचण्यांचे विविध प्रकारांचे फायदे वव विविध क्षेत्रांतील उपयोग समजून घेणे. l बुद्धीमत्तेतील सामाजिक बुद्धिमता, भावनिक बुद्धिमता आणि कृत्रिम बुद्धिमता या नवीन संकल्पनाचे मूल्यमापन करणे व त्यांचे दैनदं िन जीवनातील महत्त्व जाणून घेणे. 3. व्यक्तिमत्व l व्यक्तिमत्त्व संकल्पना समजून घेणे. l व्यक्तिमत्त्वावर परिणाम करणाऱ्या विविध घटकांचे वर्णन व मूल्यमापन करणे. l व्यक्तिमत्त्वाच्या अभ्यासाचे विविध दृष्टीकोनांचे विश्लेषण व स्पष्टीकरण करणे. l व्यक्तिमत्त्व मापनाच्या विविध तंत्रांचे स्पष्टीकरण आणि मूल्यमापन करणे. 4. बोधात्मक l अवधानाचे विविध पैलू स्वतःची उदाहरणे विकसित करून करून समजून घेणे. प्रक्रिया l संवदे न प्रक्रियेशी संबधं ित पैलू सविस्तर समजून घेणे. l समस्या परिहार आणि सर्जनशील विचार यांतील पायऱ्या समजून घेणे. l अध्ययन प्रक्रियेतील विविध पैलू स्पष्ट करणे आणि सारांशित करणे. 5. भावना l भावनांसंबधीच्या सिद्धांतांचा ऐतिहासिक आधार समजून घेणे आणि त्यासाठी स्वतःची उदाहरणे तयार करणे. l प्लुटचिक प्रारुपाच्या आधारे मुलभूत भावना जाणून घेणे व स्वतःची भावनिक वाढ समजून घेणे. l भावना अनुभवांत होणारे शारीरिक बदल समजून घेणे आणि भावनिक सुस्थितीचे दैनदं िन जीवनातील महत्त्व समजून घेणे. l भावना व्यवस्थापन व राग नियंत्रणाची विविध तंत्रे समजून घेणे व त्यांचा दैनदं िन जीवनात वापर करणे. 6. मानसिक l मानसिक विकारांचे स्वरूप समजून घेणे व त्यांचे मूल्यमापन करणे. विकृती l मानसिक सुस्थिती ही संकल्पना जॉन ट्रॅव्हिस यांनी दिलेल्या आजारपण आणि निरोगीपण प्रारुपाद्वारे समजून घेणे व त्याचा तपशीलवार अभ्यास करणे. l मानसिक विकारांचे वर्गीकरण करणे व डी.एस.एम. प्रणालीनुसार त्यांची लक्षणे समजून घेणे. l मानसिक विकार ओळखण्यासाठी व त्यांवर उपचार करण्यासाठी मानसिक विकारांची लक्षणे समजून घेणे. 7. मानसिक l विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांविषयी संवेदनशील करणे. आरोग्यासाठी l विद्यार्थ्यांना मानसिक विकारांच्या लक्षणांची जाणीव करून देणे. प्रथमोपचार l मानसिक विकारांवरील प्रथमोपचार तंत्रांची विद्यार्थ्यांना ओळख करून देणे. l मानसिक स्वास्थ्य व्यावसायिकांच्या म्हत्त्वाबद्दल जागरूकता वाढवणे. 8. सकारात्मक l नव्याने उदयास येणारी मानसशास्त्राची शाखा म्हणून सकारात्मक मानसशास्त्र समजून घेण.े मानसशास्त्र l सकारात्मक भावना समजून घेणे व त्यांचे दैनदं िन जीवनातील उपयोजन जाणून घेण.े l आनंद ठरवणारे घटक जाणून घेणे व त्यांचा दैनदं िन जीवनात वापर करणे. l तद्भनु तू ी, सजगता, सजग ध्यान आणि 7c’s-लवचिकतेचे घटक जाणून घेणे व त्यांचा दैनदं िन जीवनात वापर करणे. शिक्षकांसाठी मित्रहो, ‘मानसशास्त्र’ या विषयाची अकरावीच्या विद्यार्थ्यांना ओळख करून देण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. अकरावी आणि बारावी या दोन वर्षात मानसशास्त्राचा अभ्यास करून विद्यार्थ्यांना काय मिळालं पाहिजे या विषयी काही उद्दिष्टे समोर ठेऊन या पुस्तकाची रचना केली आहे.ती उद्दिष्टे खालीलप्रमाणे : १. मानसशास्त्र ही शास्त्र शाखा का मानली जाते हे विद्यार्थ्यांना समजावे. २. आपल्या रोजच्या आयुष्याशी निगडीत बाबींचा त्यात कशा प्रकारे अभ्यास केला जाईल ते कळावे. ३. स्वतःचं व्यक्तिमत्त्व कसं आहे, ते कसे घडवता येईल ते समजून घेता यावे. ४. शिकलेल्या काही तंत्रांचा वापर दैनंदिन जीवनात करता यावा जसे कि मानसिक प्रथमोपचारातील तंत्रे. ५. मानसशास्त्रामध्ये पुढील शिक्षण घेऊन त्यातील करिअरचे पुढचे मार्ग निवडता येतील यासाठी प्रेरित करणे. आपल्या सर्वाना या पुस्तकाचा वरील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी एक माध्यम म्हणून उपयोग करता यावा यासाठी काही मुद्दे मांडले आहेत : संपूर्ण पुस्तकाचा आपण स्वतः परिचय करून घ्यावा आणि अभ्यास करावा. अकरावी आणि बारावी या दोनही वर्षाच्या पुस्तकाचे उद्दिष्ट मानसशास्त्राची ओळख असाच आहे त्यामुळे चार प्रमुख सूत्रे समोर ठेऊन पाठांची रचना केली आहे. १. मानसशास्त्राचा इतिहास आणि व्याप्ती २. ‘स्व’ ची संकल्पना ३. मानसिक स्वास्थ्य ४. मेंदू आणि मज्जासंस्था - रचना, कार्य आणि दैनंदिन जीवनाशी त्याचा असलेला संबधं अकरावीच्या पुस्तकात प्राथमिक माहिती आणि बारावीच्या पुस्तकात अधिक संकल्पना आणि थोडी सखोल माहिती अशी योजना आहे, मूळ सूत्र वरीलप्रमाणेच असतील. बारावीच्या पुस्तकामध्ये अवधान, संवेदन, विचार प्रक्रिया आणि अध्ययन या संकल्पनांची मांडणी केली आहे. तसेच सकारात्मक मानसशास्त्र आणि मानसिक आरोग्यासाठी प्रथमोपचार हे नव्याने उदयाला आलेले विषय देखिल मांडले आहेत. हे पाठ तुम्हांला अधिक सखोल अभ्यास करून विद्यार्थ्यांसमोर मांडावे लागतील. ‘भावना’ या पाठामध्ये उपयोजित्वावर अधिक भर देण्यात आला आहे. कारण मानसशास्त्र हा फक्त शिकण्याचा विषय नाही तर दैनंदिन आयुष्यात त्याचा वापर अपेक्षित आहे. अर्थात आपला विद्यार्थी बारावीच्या परीक्षेचे पेपर लिहणार आहेत त्यामुळे त्यातील सिद्धांत शिक्षकांनी विस्ताराने शिकविणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांना असलेल्या सुविधा, अनुभवामध्ये असलेलं वैविध्य, आकलनाच्या क्षमता, तसेच शिक्षकांना उपलब्ध असलेली साधने याचा विचार करून पुस्तकाची काठीण्य पातळी आणि त्यातील कृती दिल्या आहेत तरीदेखील काही मुद्दे किंवा मांडणी काही विद्यार्थ्यांना अतिशय प्राथमिक आणि सोपी वाटू शकते तर काही माहिती विद्यार्थ्यांना कठीण वाटू शकते त्यामुळे या बाबतीत शिक्षकाची भूमिका महत्वाची आहे. कठीण माहितीचे सुलभीकरण करणे आणि सोप्या मुद्यांबाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी, त्याचे सादरीकरण करण्याचे आव्हान विद्यार्थ्यांसमोर ठेवावे लागेल. पुस्तकामध्ये उदाहरणादाखल सांगितलेल्या कविता, चित्रपट किंवा प्रात्यक्षिकांसाठी सांगितलेल्या कृती यासंदर्भात विद्यार्थी आणि शिक्षकांनी चर्चा करून इतर साहित्याच्या निवडीचे स्वातंत्र्य घ्यावे परंतु त्या साहित्याचा वापर करून मांडलेल्या मुद्द्याचे आकलन होत आहे याची खात्री करून घ्यावी. पुस्तकामध्ये दिलेल्या QR code चा वापर जिथे शक्य आहे तिथे करावा. त्याव्यतिरिक्त देखील तंत्रज्ञानामुळे उपलब्ध असलेल्या माहितीचा वापर शिक्षकांनी विषय मांडणीसाठी आवर्जून करावा. मानसशास्त्र या विषयाचा विस्तार आपण सर्व जाणतोच, त्या अर्थाने कुठलेही पुस्तक परिपूर्ण नसते तर ते केवळ एक माध्यम असते हे आपणा सर्वांना माहीत आहेच. मानसशास्त्र या विषयाचे अध्ययन-अध्यापन तुमच्यासाठी आनंददायी व्हावे तसेच विद्यार्थ्यांना देखील हे ज्ञान अर्थपूर्ण, आव्हानात्मक आणि आनंददायी वाटावे यासाठी शुभेच्छा! अनुक्रमणिका अ. क्र. पाठाचे नाव पान क्र. 1. मानसशास्त्र : एक विज्ञानशाखा.......................................... १-११ 2. बुद्धिमत्ता............................................................. १२-२२ 3. व्यक्तिमत्व............................................................ २३-३१ 4. बोधात्मक प्रक्रिया...................................................... ३२-४२ 5. भावना.................................................................. ४३-६२ 6. मानसिक विकृती....................................................... ६३-७७ 7. मानसिक आरोग्यासाठी प्रथमोपचार................................... ७८-९४ 8. सकारात्मक मानसशास्त्र..............................................९५-१०८ सूची................................................................१०९-१११ संदर्भ....................................................................... ११२ प्रकरण १ - मानसशास्त्र ः एक विज्ञानशाखा १.१ प्रस्तावना १.४.३ निरीक्षण पध्दत १.२ शास्त्राची प्रमुख वैशिष्ट्ये १.४.४ वृत्तेतिहास पध्दत १.३ मानसशास्त्राचा शास्त्र म्हणून इतिहास १.४.५ सहसंबंध पध्दत १.४ मानसशास्त्राच्या अभ्यासपध्दती १.५ मानसशास्त्राची शास्त्र म्हणून १.४.१ प्रायोगिक पध्दत उभारणी करताना येणारी आव्हाने १.४.२ सर्वेक्षण पध्दत १.६ तर्कसगत ं ीचे महत्त्व अध्ययन उद्दिष्ट्ये : (१) विज्ञानाची प्रमुख वैशिष्ट्ये समजून घेणे आणि स्पष्ट करणे. (२) विज्ञान म्हणून मानसशास्त्राचा इतिहास समजून घेणे आणि स्पष्ट करणे. (३) मानसशास्त्रातील विविध संशोधन पद्धतींची माहिती व त्यांची वैशिष्ट्ये जाणून घेणे व भविष्यात संबधित ं ज्ञानाचा वापर करणे. (४) मानसशास्त्र एक विज्ञान म्हणून प्रस्थपित करण्यात येणारी आव्हाने समजून घेणे व त्यांचे स्पष्टीकरण देणे. (५) तर्कसंगती ही संकल्पना आणि तर्कसंगत व्यक्तीची वैशिष्ट्ये समजून घेणे व संबंधित ज्ञानाचा दैनंदिन जीवनात वापर करणे. कृती १ पुढील विधाने वाचा व ती मानसशास्त्राविषयीची तथ्ये ४. मानसशास्त्र केवळ औषधोपचाराची गरज आहेत की दंतकथा व गैरसमज आहेत याबाबत विचार असणाऱ्या मनोरूग्णांच्या अभ्यासाशी संबधित ं करा व चर्चा करा - आहे. १. मानसशास्त्र हे खऱ्या अर्थाने शास्त्र नसून केवळ ५. मानसशास्त्रज्ञ, मनोचिकित्सक आणि समुपदेशक सामान्य व्यवहारज्ञान आहे. यांची व्यावसायिक पात्रता आणि कामकाज २. मानसशास्त्र हे केवळ एक छद्मविज्ञान (थोतांड) जवळपास सारख्याच स्वरूपाचे असते. आहे. ६. मानसशास्त्राची पदवी घेतलेल्या कोणत्याही ३. मानसशास्त्रज्ञ हे केवळ मनकवडे असतात किंवा व्यक्तीला गरजू व्यक्तीस समुपदेशन करता येते. चेहरा वाचणारे असतात. 1 १.१ प्रस्तावना ः आधारे माहितीचा अभ्यास करून तिचा अर्थ लावला आपण विज्ञानयुगात राहतो. आपल्या जीवनातील जातो. प्रत्यक्ष निरीक्षणाद्वारे किंवा प्रयोगाद्वारे जवळपास सर्वच क्षेत्रांत विज्ञानाचा प्रभाव आढळतो. आलेल्या अनुभवांतून केलेले माहितीचे संकलन, मनुष्यजातीच्या जगण्याचा अंतःप्रेरणेमुळे होमो सेपियन्स या म्हणजे ‘सप्रमाण पुरावा’ होय. शास्त्रोक्त ज्ञान सप्रमाण त्याच्या अवस्थेपासून मानवाने सभोवतालच्या जगातील पुराव्यांवर आधारित असते. दुसरा कोणताही संशोधक घडामोडींचा वेध घेण्यास सुरूवात केली व त्यातूनच संशोधनाची पुनरावृत्ती करून शास्त्रोक्त ज्ञानाच्या कालांतराने विविध प्रकारची शास्त्रे विकसित झाली. सत्यतेची भविष्यात पडताळणी करून शकतो. २. वस्तुनिष्ठता - शास्त्र एखाद्या घटकाचा वस्तुनिष्ठ आज, शास्त्रांचे प्रामुख्याने नैसर्गिक पध्दतीने अभ्यास करते. तथ्यांकडे स्वतःच्या शास्त्रे(भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, भूशास्त्र) जैविक शास्त्रे अपेक्षांप्रमाणे न पाहता तटस्थपणे पाहून त्यांचा स्वीकार (प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, शरीरशास्त्र) व सामाजिक करता येणे, म्हणजे ‘वस्तुनिष्ठता’ होय. पक्षपातीपणा, शास्त्रे(मानसशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र) या तीन पूर्वग्रह, विश्वास, इच्छा, मूल्य, पसंती इत्यादी बाबी प्रकारांत वर्गीकरण केले जाते. बाजूला ठेवून एखाद्या घटकाचे वास्तववादी दृष्टीने काही लोकांना मानसशास्त्र हे खऱ्या अर्थाने शास्त्र संशोधन करणे, म्हणजे ‘वस्तुनिष्ठता’ होय. आहे किंवा नाही? असा प्रश्न पडतो. या प्रश्नाचे उत्तर ३. शास्त्रोक्त कार्यकारणभाव - परिवर्तकामधील देण्यासाठी आपल्याला प्रथम विज्ञान म्हणजे काय? आणि कार्यकारणभाव शोधणे हा शास्त्राचा हेतू असतो. मानसशास्त्र म्हणजे काय? या दोन प्रश्नांची उत्तरे माहित शास्त्रोक्त अभ्यासात संशोधक सर्व बाह्य परिवर्तकांवर असणे आवश्यक आहे. नियंत्रण ठेवून स्वतंत्र परिवर्तकाचा (कारण) परतंत्र प्रस्तुत प्रकरणात या दोन जटील प्रश्नांची उत्तरे परिवर्तकावर (परिणाम) होणारा परिणाम अभ्यासतो. देण्याच्या अनुषंगाने शास्त्राची प्रमुख वैशिष्ट्ये, ४. पध्दतशीर विश्लेषण - शास्त्रात एखाद्या घटकाचा मानसशास्त्राचा शास्त्र म्हणून इतिहास, मानसशास्त्राच्या अभ्यास करण्यासाठी क्रमवार प्रक्रियेचा अवलंब केला अभ्यासपध्दती, मानसशास्त्राची शास्त्र म्हणून उभारणी जातो. क्रमवार प्रक्रियेत संशोधनासाठीची समस्या करताना येणारी आव्हाने आणि तर्कसंगतीचे महत्त्व या निश्चित करणे, गृहीतक मांडणे, माहितीचे संकलन पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला आहे. करणे, माहितीचे विश्लेषण करणे, सार्वत्रिक नियम १.२ शास्त्राची प्रमुख वैशिष्ट्येः शोधणे आणि पूर्वकथन करणे या शास्त्रोक्त पायऱ्यांचा समावेश होतो. ‘Science’(शास्त्र) सायन्स या इंग्रजी शब्दाची‘Scientia’ (सायन्शिया) या लॅटीन शब्दापासून ५. पडताळा - दिलेल्या परिस्थितीत शास्त्रीय माहितीची उत्पत्ती झाली आहे. ‘सायन्शिया’ या शब्दाचा अर्थ ‘ज्ञान’ कोणत्याही काळात व कोणत्याही ठिकाणी प्रचीती असा होतो. घेता येणे, म्हणजे ‘पडताळा’ होय. पडताळ्यामुळे शास्त्रोक्त माहितीच्या विश्वसनीयतेची खात्री पटते व ज्ञान संपादन करणे व ज्ञानाचे उपयोजन करणे आणि त्याद्वारे शास्त्रोक्त सिद्धांत मांडणे शक्य होते. नैसर्गिक व सामाजिक विश्वाला तथ्याधारित पध्दतशीर कार्यप्रणालींच्या आधारे समजून घेणे, म्हणजे ‘शास्त्र’ होय. ६. पूर्वकथन - शास्त्राद्वारे पूर्वकथन करता येते. संशोधक एखाद्या घटकाचे केवळ वर्णन करत नाहीत, तर शास्त्राची प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेतः घटकाचे स्पष्टीकरण व त्या अनुषंगाने पूर्वकथनही १. सप्रमाण पुरावा - शास्त्रात सप्रमाण पुराव्यांच्या करतात. 2 कृती २ पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा सुरू केली. या घटनेकडे मानसशास्त्राची स्वतंत्र शाखा म्हणून उदय या पुढील विधाने वाचा व त्याबाबत वर्गात चर्चा करा. दृष्टीने पाहिले जाते. १. मानसशास्त्र हे शास्त्र आहे कारण ते शास्त्राच्या ३. रचनावादाचा उदय - रचनावाद हा मानसशास्त्रातील अनेक कसोट्यांवर खरे ठरते. सर्वसाधारणपणे पहिला विचारप्रवाह मानला जातो. २. मानसशास्त्र हे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र यांप्रमाणे विल्हेम वुंट आणि त्यांचा विद्यार्थी एडवर्ड बी. टिचनेर नैसर्गिक शास्त्र नाही. यांनी रचनावादाचा पुरस्कार केला. विल्हेम वुंट यांनी ३. मानसशास्त्र हे मानवी (व प्राणी) वर्तनाचा व मानसिक वेदन, संवेदन इत्यादी बोधात्मक अनुभवांचा अभ्यास प्रक्रियांचा अभ्यास करणारे सामाजिक शास्त्र आहे. करण्यासाठी आत्मनिरीक्षण पध्दतीचा अवलंब केला. ४. मानसशास्त्र वस्तुनिष्ठ संशोधन पध्दतींचा वापर ४. कार्यवादाचा उगम - विल्यम जेम्स यांनी कार्यवादाचा करते. मानसशास्त्राच्या संशोधनात मानवी वर्तन विचारप्रवाह मांडला. त्यांना ‘अमेरिकन मानसशास्त्राचा निर्धारीत करणाऱ्या घटकांमध्ये कार्यकारणभाव जनक’ म्हणून ओळखले जाते. त्यांनी बोधात्मक, प्रस्थापित केला जातो व या संशोधनांची पडताळणी अनुभवाच्या अभ्यासावर भर दिला. करता येते. ५. मनोविश्लेषणवादाचा उदय - मानसशास्त्रातील ५. मानसशास्त्रीय सिद्धांतांस सप्रमाण पुरावे सुरूवातीच्या विचारप्रवाहांच्या विरोधात ऑस्ट्रीयन असल्यामुळे मानसशास्त्र हे छद्मविज्ञान आणि शरीरशास्त्रज्ञ डॉ. सिग्मंड फ्रॉईड यांनी १८९० च्या सामान्य व्यवहारज्ञान यांपासून वेगळे करता येते. दशकात मनोविश्लेषणाचा सिध्दांत मांडून अबोध ६. मानसशास्त्राचा अभ्यासविषय गुता ं गुंतीचा आहे, मनाच्या अभ्यासावर भर देण्यास सुरूवात केली. कारण मानवी वर्तनाचे स्वरूप गतिमान असते आणि ६. वर्तनवादाचा उदय - २० व्या शतकाच्या सुरूवातीच्या मानसिक प्रक्रियंाचे स्वरूप अमूर्त असते. त्यामुळेच कालावधीत अमेरिकन मानसशास्त्रज्ञ जॉन बी वॅटसन भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या शास्त्रांतील यांनी वर्तनवाद हा नवीन विचारप्रवाह मांडला. सिध्दांतांप्रमाणे मानसशास्त्रातील सिध्दांत सार्वत्रिक स्वरूपाचे व तंतोतंत अचूक असू शकत नाहीत. वर्तनवादात बोधात्मक अनुभव आणि अबोध मन या दोन्ही बाबींच्या अभ्यासास विरोध करून केवळ १.३. मानसशास्त्राचा शास्त्र म्हणून इतिहास ः निरीक्षणक्षम वर्तनाच्या अभ्यासावर भर देऊन १. तत्त्वज्ञानाची शाखा म्हणून मानसशास्त्राची सुरूवात मानसशास्त्राच्या अभ्यासास अधिक शास्त्रीय स्वरूप - मानसशास्त्राचे मूळ प्राचीन ग्रीक संस्कृतीत देण्यात आले. आढळते. सुरूवातीच्या काळात मानसशास्त्र हे स्वतंत्र ७. मानवतावादाचा उदय - २० व्या शतकाच्या पूर्वार्धात शास्त्र म्हणून उदयास आले नाही. १८७० च्या मनोविश्लेषणवाद आणि वर्तनवाद या विचारप्रवाहांचे दशकापर्यंत मानसशास्त्र हे तत्त्वज्ञानाची शाखा होते. वर्चस्व होते. २० व्या शतकाच्या उत्तरार्धात अमेरिकन २. १८७९ साली स्वतंत्र शास्त्र म्हणून मानसशास्त्राचा मानसशास्त्रज्ञ कार्ल रॉजर्स यांनी मानवतावाद हा नवीन उदय - जर्मन मानसशास्त्रज्ञ विल्हेम वंुट यांनी १८७९ विचारप्रवाह मांडला. मनोविश्लेषणवादातील साली जर्मनीतील लिपझिग विद्यापीठात जगातील अबोधावस्था आणि वर्तनवादातील निर्बंधता या दोन्ही 3 बाबी अमान्य करून मानवतावादाने स्व-इच्छा, स्व- कृती ४ नियंत्रण आणि अात्मवास्तविकीकरण या बाबींच्या दिलेल्या उदाहरणाच्या आधारे प्रायोगिक अभ्यासावर भर दिला. पध्दतीतील पुढील संज्ञा अभ्यासाः ८. बोधनिक उपपत्तीचा उदय - १९५० आणि १९६० च्या दशकात मनोविश्लेषणवादास आणि वर्तनवादास १. समस्या - शास्त्रोक्त संगीताचा रक्तदाबावर होणारा मागे टाकणाऱ्या बोधनिक उपपत्तीचा उदय झाला. परिणाम अभ्यासणे. अमेरिकन मानसशास्त्रज्ञ अलरिस नेसर यांना २. गृहीतक - शास्त्रोक्त संगीताद्व ारेे रक्तदाबाची सर्वसाधारणपणे बोधनिक उपपत्तीचा जनक मानले पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते. जाते. ३. स्वतंत्र परिवर्तक - शास्त्रोक्त संगीत बोधनिक उपपत्तीचा अवलंब करणारे संशोधक स्मरण, निर्णय प्रक्रिया, समस्या परिहार, बुदि्धमत्ता, ४. परतंत्र परिवर्तक - रक्तदाबाची पातळी भाषा इत्यादी उच्च मानसिक प्रक्रियांचा चुंबकीय ५. बाह्य परिवर्तक- वय, लिंग, शास्त्रोक्त संगीत अनुस्पंद प्रतिमा MRI आणि पॉझिट्रॉन प्रतिमा (PET सोडून इतर सर्व आवाज इत्यादी. scan) या तंत्रांद्वारे अभ्यास करतात. ६. प्रयोगकर्ता - प्रयोग करणारी व्यक्ती. (उदा. तुम्ही/ कृती ३ तुमचे मानसशास्त्राचे शिक्षक) पुढे दिलेल्या वेबसाईटला भेट द्या व मानसशास्त्रातील प्रमुख विचारप्रवाहांची माहिती ७. प्रयुक्त - ज्या व्यक्तीवर प्रयोग केला जातो अशी मिळवा. व्यक्ती. (उदा. तुमच्या कुटुंबातील सदस्य/मित्र) https://www-verywellmind.com/ प्रायोगिक पध्दतीची महत्त्वाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे psychology-schools-of-thought-2795247 आहेत- १.४ मानसशास्त्राच्या अभ्यासपद्धती १. प्रायोगिक पध्दत ही माहिती संकलनाची सर्वाधिक १.४.१ प्रायोगिक पद्धत वस्तुनिष्ठ पध्दत आहे. प्रायोगिक पद्धत ही वर्तनाचा अभ्यास करणारी २. प्रायोगिक पध्दतीद्वारेे नियंत्रित परिस्थितीत अचूक सर्वाधिक शास्त्रोक्त पद्धत होय. प्रायोगिक पद्धतीमुळे निरीक्षण करता येते. मानसशास्त्राला शास्त्र म्हणून दर्जा मिळाला आहे. प्रायोगिक ३. प्रायोगिक पध्दतीद्व ारेे दोन किंवा त्यापेक्षा अधिक पद्धतीत प्रयोगकर्ता पुढील पायऱ्यांचा अवलंब करून प्रयोग परिवर्तकांमध्ये कार्यकारणभाव शोधणे शक्य होते. करतो. ४. प्रायोगिक पध्दतीद्वारेे केलेल्या संशोधनाचा पडताळा १. संशोधनासाठीची समस्या निश्चित करणे. घेणे शक्य होते. २. गृहीतक निश्चित करणे/मांडणे. ३. प्रयोगाची रचना व पद्धत निश्चित करणे. तुम्हांला माहीत आहे का? ४. प्रयोग करणे. नैतिक बंधने आणि संभाव्य धोके यांमुळे मानवी वर्तनाच्या काही पैलूंचा प्रायोगिक पध्दतीचा वापर ५. माहिती गोळा करणे व माहितीचे विश्लेषण करणे. करून अभ्यास करता येत नाही. ६. निष्कर्ष काढणे. 4 कृती ५ राजकीय मते, ग्राहकांची पसंती अशा विविध विषयांवर माहिती गोळा केली जाते. सर्वेक्षण पद्धतीत प्रश्नावली, पुढे दिलेल्या प्रयोग कल्पनांतून स्वतंत्र परिवर्तक व पडताळणी यादी, पदनिश्चयन श्रेणी, शोधिका, मुलाखत परतंत्र परिवर्तक शोधा. इत्यादी तंत्राच्या आधारे माहितीचे संकलन केले जाते. १. सरावाचा स्मृतीवरील परिणाम अभ्यासणे. सामाजिक मानसशास्त्रज्ञ, शैक्षणिक मानसशास्त्रज्ञ, २. मनोन्यासाचा समस्या परिहार प्रक्रियेवर होणारा औद्योगिक मानसशास्त्रज्ञ या पध्दतीचा मोठ्या प्रमाणावर परिणाम अभ्यासणे. वापर करतात. सर्वेक्षण पद्धत ही कमी खर्चिक पद्धत आहे. दूरध्वनीद्वारे, इमेलद्वारे किंवा प्रत्यक्ष भेट घेऊन सर्वेक्षण ३. गोंगाटाचा लिखाणाच्या वेगावरील परिणाम करता येते. अभ्यासणे. ४. रंगांचा संवेदन प्रक्रियेवर होणारा परिणाम अभ्यासणे. ५. प्रतिभरणाचा निर्णय प्रक्रियेवरील परिणाम अभ्यासणे. कृती ६ दिलेल्या पायऱ्यांच्या आधारे पुढे दिलेला प्रयोग करा आणि रंगांचा स्मृतीवर काही परिणाम होतो का याचा शोध घ्या. १. प्रयोगातील सहभागींना यादृच्छीक पध्दतीने दोन गटांत विभागा. (असे करत असताना दोन्ही गटांतील सहभागींच्या बाबतीत लिंग, वय, सांस्कृतिक सर्वेक्षणासाठी वापरण्यात येणाऱ्या पार्श्वभूमी इत्यादी बाबी स्थिर ठेवा.) प्रश्नावलीचा नमुना २. एका गटातील सहभागींना काळ्या शाईने लिहिलेल्या २० शब्दांची यादी ५ मिनिटांसाठी वाचण्यास द्या. कृती ७ ३. दुसऱ्या गटातील सहभागींनाही त्याच २० शब्दांची पुढीलपैकी कोणत्याही एका विषयाची सर्वेक्षण (परंतु हिरव्या शाईत लिहिलेली) यादी ५ मिनिटांसाठी पध्दतीचा वापर करून माहिती मिळवा. वाचण्यास द्या. १. कार्यसमाधानाचे निर्धारक घटक ४. ५ मिनिटांच्या कालावधीनंतर दोन्ही गटांतील सहभागींना कोऱ्या कागदावर त्यांना आठवतील २. नोकरी करणाऱ्या स्त्रियांच्या समस्या तेवढे शब्द लिहिण्यास सांगा. ३. व्यायाम व शारीरिक स्वास्थ्य ५. दोन्ही गटांतील सहभागींना आठवलेल्या एकूण ४. विद्यार्थ्यांच्या गैरहजेरीची कारणे शब्दांविषयीच्या आकडेवारीची तुलना करा आणि निष्कर्ष काढा. ५. व्यसनाधीनतेची कारणे १.४.२ सर्वेक्षण पध्दतः ६. व्हर्च्युअल (अाभासी) खेळांचे व्यसन सर्वेक्षण ही अशी संशोधन पध्दत आहे जिच्याद्वारे ७. समाजसंपर्क माध्यमे आणि सायबर गुन्हे निवडलेल्या प्रातिनिधिक गटाकडून (नमुना गटांकडून) ८. वयोवृध्द व्यक्तींच्या समस्या 5 १.४.३ निरीक्षण पद्धत संशोधनांना अभ्युपगम पुरवते, त्यामुळे या पध्दतीकडे मानवी वर्तनाच्या ज्या पैलूंचा प्रायोगिक पद्धतीचा शास्त्रीय पद्धत म्हणून पाहता येते. अवलंब करून अभ्यास करणे शक्य नसते, अशा पैलूंचा वृत्तेतिहास पद्ध तीत संशोधक एखाद्या व्यक्तीच्या अभ्यास करण्यासाठी निरीक्षण पद्ध त अत्यंत उपयुक्त ठरते. सद्यस्थितीतील मानसिक स्थितीचा अभ्यास करण्यासाठी निरीक्षण पद्धतीत नैसर्गिक परिस्थितीत किंवा नियंत्रित कुटुंबातील सदस्य, मित्रपरिवार, सहकारी इत्यादी अनेक परिस्थितीत घडून येणाऱ्या वर्तनाचा हेतुपूर्वक अभ्यास केला स्रोतांकडून संबधितं व्यक्तीची सखोल माहिती मिळवतो. जातो. नैसर्गिक परिस्थितीत घडून येणाऱ्या वर्तनाच्या संशोधक प्रत्यक्ष निरीक्षण, मुलाखत, मानसशास्त्रीय चाचण्या निरीक्षणास नैसर्गिक निरीक्षण म्हणतात. नियंत्रित परिस्थितीत घडून येणाऱ्या वर्तनाच्या निरीक्षणास नियंत्रित निरीक्षण इत्यादी तंत्रांचा वापर करून संबंधित व्यक्तीची माहिती म्हणतात. मिळवतो. बालमानसशास्त्रज्ञ, चिकित्सा मानसशास्त्रज्ञ, कृती ९ सामाजिक मानसशास्त्रज्ञ निरीक्षण पध्दतीचा मोठ्या पुढे दिलेला सर्वपचित व्यक्तीअभ्यास वाचा. प्रमाणावार वापर करतात. सुस्पष्ट हेतूने व सुनियोजित पद्धतीने वापर केला असता, निरीक्षण पद्धत ही शास्त्रोक्त ॲना ओ” चा व्यक्तिअभ्यास संशोधन पद्धत मानता येते. “ॲना ओ” (खरे नाव ः बेर्त्था पापेन्हाइम) ही कृती ८ तरूणी अनेक विचित्र शारीरिक व मानसिक समस्यांनी त्रस्त होती. त्यांपैकी एक समस्या म्हणजे तिला पुढीलपैकी कोणत्याही एका विषयाची निरीक्षण कोणताही द्रवपदार्थ पिणे शक्य होत नव्हते. पद्धतीचा वापर करून माहिती मिळवा. “ॲना ओ” पाणी पिण्यासाठी पाण्याचा पेला घेत १. पौगंडावस्थेत दर्शवली जाणारी आक्रमक प्रवृत्ती असे, परंतु तो पेला ओठांपर्यंत नेला की जणू काही २. वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांच्या प्रतिक्रिया पाण्याचा भयगंड असल्याप्रमाणे ती तो पाण्याचा पेला ३. वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतलेल्या स्पर्धकाची देहबोली ढकलून देत असे. ती तिची तहान भागविण्यासाठी ४. सार्वजनिक ठिकाणी दाखवण्यात येणारी सभ्यता कलिंगडासारखी फळे खात असे. संमोहनाच्या अवस्थेत “ॲना ओ” हिने तिला ५. पुस्तक प्रदर्शनाच्या ठिकाणी विद्यार्थ्याचे वर्तन जिच्याविषयी अजिबात पर्वा नव्हती अशा तिच्या १.४.४ वृत्तेतिहास पद्धत घरातील नोकराणीविषयी तक्रार करण्यास सुरूवात केली. चेहऱ्यावर तिरस्काराचे काही भाव आणून “ॲना वृत्तेतिहास पद्धत ही प्रामुख्याने चिकित्सा ओ” पुढे वर्णन करत राहिली की एके दिवशी ती तिच्या मानसशास्त्रज्ञांद्वारे वापरण्यात येणारी एक महत्त्वाची घरातील नोकराणीच्या खोलीत गेली व तिने त्या वर्णनात्मक संशोधन पद्धत आहे. डॉ. सिग्मंड फ्रॉईड आणि खोलीत घरातील नोकराणीचा छोटासा कुत्रा पाणी जीन पियाजे यांनी वृत्तेतिहास पद्ध तीचा मोठ्या प्रमाणावर पिण्याच्या पेल्यातून पाणी पीत असल्याचे पाहिले. वापर केला. एखाद्या व्यक्तीची, समुहाची किंवा घटनेची संमोहनाच्या अवस्थेत असताना “ॲना ओ” ने सर्वंकष माहिती देणारी पद्धत म्हणजे वृत्तेतिहास पद्ध त पिण्यासाठी काहीतरी मागितले आणि कोणत्याही होय. या पद्धतीतील उपयुक्त वर्णनात्मक माहिती पुढील 6 १.४.५ सहसंबंध अभ्यास ः त्रासाशिवाय भरपूर पाणी प्यायले. जेव्हा ती संमोहनाच्या काही शास्त्रशुद्ध अभ्यासांमध्ये दोन किंवा अधिक अवस्थेतून बाहेर आली तेव्हा पाण्याचा पेला तिच्या चलांमधील संबंध समजावून घेण्यासाठी ‘सहसंबंध’ हे ओठांजवळच होता. त्या क्षणापासून तिची समस्या संख्याशास्त्रीय साधन वापरले जाते. अशा अभ्यासास (कोणताही द्रवपदार्थ पिणे शक्य न होणे) पुन्हा कधीही सहसंबंध अभ्यास म्हणतात. न उद्भवण्यासाठी दिसेनाशी झाली. दोन चलांमधील संबंध मोजण्यासाठी वापरण्यात येणारी फ्रॉईड यांनी या सर्व प्रकारचा असा अर्थ लावला संख्याशास्त्रीय पध्दत म्हणजे सहसंबंध होय. जेव्हा एका की, “ॲना ओ” ने त्या घटनेचे (छोटासा कुत्रा पाणी चलातील बदल हा दुसऱ्या चलातील बदलास कारणीभूत पिण्याच्या पेल्यातून पाणी प्यायला.) आणि तेव्हा ठरतो तेव्हा त्या दोन चलांमध्ये परस्परावलंबन असल्याचे निर्माण झालेल्या भावनांचे दमन केले होते व त्यामुळे म्हटले जाते व या परस्परावलंबनाला सहसंबंध म्हटले जाते. तिला कोणताही द्रवपदार्थ पिणे शक्य होत नव्हते. दोन चलांमधील संबंधाचे प्रमाण सहसंबंध गुणकाद्वारे त्याचप्रमाणे संमोहनाच्या अवस्थेत तिला ही घटना व मोजले जाते. सहसंबंध गुणकाचे मूल्य -१.०० ते + १.०० घटनेशी संबधित ं दमन केलेल्या भावना पुन्हा यांदरम्यान असते. (- किंवा +) चिन्ह या दोन चलांमधील सहसंबंधाचे सामर्थ्य स्पष्ट करते. आठवल्यामुळे तिची समस्या सुटली. सहसंबंधाचे पुढील तीन प्रकार पडतात- डॉ. सिग्मंड फ्राईड १. धन सहसंबंध - जेव्हा दोन चलांमध्ये एकाच दिशेने यांनी स्पष्ट केलले ्या (दोन्ही चलांत वाढ किंवा दोन्ही चलांत घट) बदल मनोविश्लेषणवादाच्या होतो, तेव्हा त्या दोन चलांमध्ये धन सहसंबंध असल्याचे निर्मीतीत व विकासात म्हटले जाते. धन सहसंबंधात सहसंबंध गुणकाचे मूल्य “ॲना ओ” च्या ०.०० ते + १.०० या दरम्यान असते. उदा. सराव व डॉ. सिग्मंड फ्राईड व ्य क् ती अ भ ्या स ा ने प्रत्यावाहन गुणांक. उल्लेखनीय भूमिका निभावली. २. ॠण सहसंबंध - जेव्हा दोन चलांमध्ये विरूध्द दिशेने (एका चलात वाढ व दुसऱ्या चलात घट किंवा एका चलात घट व दुसऱ्या चलात वाढ) बदल होतो, तेव्हा कृती १० त्या दोन चलांमध्ये ॠण सहसंबंध असल्याचे म्हटले जाते. ॠण सहसंबंधात सहसंबंध गुणकाचे मूल्य ०.०० वृत्तेतिहास पध्दतीचा वापर करून अभ्यास करता ते -१.०० यां दरम्यान असते. उदा. व्यायामाचे प्रमाण येऊ शकणाऱ्या पुढील विषयांची चर्चा कराः व शरीरातील मेदाचे प्रमाण. १. भयगंड समस्येने ग्रस्त व्यक्ती ३. शून्य सहसंबंध - जेव्हा एका चलातील वाढ किंवा घट २. वाचन अक्षमता असलेला विद्यार्थी दुसऱ्या चलात कोणताही लक्षणीय बदल घडवून आणत ३. आत्महत्येचा प्रयत्न केलेला शेतकरी नाही तेव्हा त्या दोन चलांमध्ये शून्य सहसंबंध असल्याचे ४. यशस्वी तरूण उद्योजक म्हटले जाते. शून्य सहसंबंधांत सहसंबंध गुणकाचे मूल्य ५. सुवर्णपदक विजेता खेळाडू ० असते. उदा. उंची व बुध्दिमत्ता. 7 कृती ११ मानसशास्त्रातील सर्व तज्ञांचे एकमत होईल असा सुस्पष्ट संकल्पनांच्या स्वरुपातील ज्ञानगाभा सुनिश्चित पुढील सारणीतील माहिती लक्षात ठेवाः करण्यात मानसशास्त्रास अजूनही यश आलेले नाही. सहसंबंध ‘क्ष’ चलातील ‘य’ चलातील प्रकार बदल बदल २. वस्तुनिष्ठता व विश्वसनीयता यांबाबतीत काही धन वाढ वाढ प्रमाणात कमतरता ः मानसशास्त्रातील व्यक्तिमत्व, सहसंबंध (+) घट घट नेतृत्वकौशल्य, सर्जनशीलता, अभिवृत्ती यांसारखे ॠण वाढ घट विषय सर्वेक्षण, प्रश्नावली इत्यादी वर्णनात्मक संशोधन सहसंबंध (-) घट वाढ पद्धतींद्वारे अभ्यासले जातात. याशिवाय शून्य वाढ लक्षणीय बदल मानसशास्त्रात वापरल्या जाणाऱ्या आत्मनिरीक्षण, सहसंबंध (०) घट नाही मनोविश्लेषण यांसारख्या अभ्यासपध्दती व्यक्तीनिष्ठ स्वरूपाच्या असतात. त्यामुळेचे नैसर्गिक शास्त्रांच्या कृती १२ तुलनेत वस्तुनिष्ठता व विश्वसनीयता या निकषांवर सहसंबंध अभ्यास पध्दतीचा वापर करून अभ्यास मानसशास्त्र काही प्रमाणात कमी पडते. करता येऊ शकणाऱ्या पुढील विषयांची चर्चा करा. ३. पूर्वकथन व प्रचीती यांबाबतीत काही प्रमाणात १. तासिका बुडवण्याचे प्रमाण व परीक्षेतील गुण कमतरता ः वर्तनाची कारणे शोधून वर्तनाचे पूर्वकथन २. वजन आणि बुध्दीमत्ता करता येणे ही मानसशास्त्राचे एक महत्त्वाचे ध्येय ३. पगार व कार्यसमाधान आहे. प्रत्यक्षात, सूक्ष्मकणांच्या आणि रासायनिक ४. सराव व विस्मरण संयुगांच्या अभ्यासापेक्षा मानवी वर्तनाचा अभ्यास ५. उंची व चित्रकलेतील अभिक्षमता करणे अधिक अवघड असते. मानव निरनिराळ्या ६. शहरीकरण व प्रदूषण परिस्थितीत निरनिराळ्या प्रकारे वर्तन दर्शवतो. त्यामुळे ७. वाहनाचा वेग व रस्त्यांवरील अपघात मानवी वर्तनाचे अचूक पूर्वकथन करणे अशक्य असते. १.५ मानसशास्त्राची शास्त्र म्हणून उभारणी करताना त्यामुळेच मानसशास्त्रीय अभ्यासाविषयीच्या निष्पत्ती येणारी आव्हाने ः विभिन्न व कमी नियंत्रणक्षम स्वरूपाच्या असतात व मानसशास्त्र जरी एक विज्ञानशाखा मानले जात असले, त्यांचा तंतोतंत पडताळा येणे अवघड असते. तरी त्याबाबत अनेक विवाद दिसून येतात. मानसशास्त्राबाबतचे ४. मानवाची अवहेलना ः मानसशास्त्र विषयातीलच विवाद व टीका सैदध् ांतिक, व्यावहारिक, नैतिक आणि अस्तित्ववादी आणि मानवतावादी मानसशास्त्रज्ञ अशी तात्विक स्वरुपाच्या आहेत. मानसशास्त्राबाबतचे पुढील टीका करतात, की मानवी वर्तनास प्रयोगक्षम बनवून विवाद आणि टीका मानसशास्त्राची शास्त्र म्हणून उभारणी मानसशास्त्रज्ञ मानवाकडे निर्जीव/अचेतन घटक म्हणून करताना आव्हानात्मक ठरतात. पाहतात. त्यांच्या मते माणसांवर प्रयोग करताना १. मानसशास्त्राची पूर्व प्रतिमान अवस्था ः भौतिकशास्त्र, माणसांकडे एखाद्या निर्जीव गोष्टीप्रमाणे किंवा रसायनशास्त्र यांसारख्या प्रगल्भ व नैसर्गिक शास्त्रांच्या वस्तूप्रमाणे पाहिले जाते. मानव म्हणून असण्याचे तुलनेत मानसशास्त्र हे नवखे व सामाजिक शास्त्र आहे. मानवाचे जे प्रमुख लक्षण आहे त्या लक्षणाचीच मानसशास्त्रास शास्त्र जरी मानले तरी तत्ववेत्ता थॉमस अवहेलना करणारे शास्त्र, अशा टीकात्मक दृष्टीने कुहन यांच्या मते मानसशास्त्र अजूनही पूर्व प्रतिमान अवस्थेत आहे. मानसशास्त्राकडे काही प्रसंगी पाहिले जाते. 8 १.६ तर्कसंगतीचे महत्त्व ः १. स्व-आवड आणि सामाजिक आवड समजून घेणे - तर्कसंगत भावनिक वर्तनोपचार पध्दतीनुसार ‘स्व- मानसशास्त्र हे एक शास्त्र असल्याने ते वर्तनाबाबतचे आवडी सांभाळा आणि इतरांंच्या आवडी ओळखा’ हे नियम व ठोकताळे तयार करण्याचा प्रयत्न करते आणि या उपचार पद्धतीचे ते जणू घोषवाक्य आहे. त्याचवेळी मानवी वर्तन हे बदलणारे आणि गुंतागुंतीचे आहे, तर्कसंगतीने विचार करणारे लोक स्वतःसाठी चांगले हेही मान्य करते. आपले काही वर्तन प्रकार सर्वत्र आढळतात काय आहे हे समजू शकतात आणि कशामुळे त्यांचा तर काही मात्र एकमेव असतात. विकास होऊ शकतो हे जाणतात. त्या निर्णयाची आनंद मिळविणे हे मानवाचे सर्वात महत्त्वाचे ध्येय जबाबदारी ते स्वीकारतात. पण त्याचवेळी इतर आहे. ते मिळविण्यासाठी प्रत्येक व्यक्ती विशिष्ट प्रकारे व्यक्तींचे अधिकार दुर्लक्षिले जाणार नाही