Maharashtra State Textbook (युवकभारती) Class 12 PDF
Document Details
Uploaded by Deleted User
2020
Tags
Summary
This document is a textbook for class 12 in Maharashtra, India, focusing on the Marathi language. It covers various aspects of the language, including grammar, composition, and literature. The textbook was published in 2020 and is intended for secondary school students in India.
Full Transcript
104.00 भारताचछे संविधान भाग ४ क नागररकांची मूलभूत कत्तव्छे अनुच्छेद ५१ क मूलभूत कत्तव्छे – प्रत्छेक भारती् नागररकाचछे हछे कत्तव् असछेल की त्ानछे – (क) प्रत्येक नागरिकानये संविधानाचये पालन किािये. संविधानातील आदराांचा, िाष्ट्रधि...
104.00 भारताचछे संविधान भाग ४ क नागररकांची मूलभूत कत्तव्छे अनुच्छेद ५१ क मूलभूत कत्तव्छे – प्रत्छेक भारती् नागररकाचछे हछे कत्तव् असछेल की त्ानछे – (क) प्रत्येक नागरिकानये संविधानाचये पालन किािये. संविधानातील आदराांचा, िाष्ट्रधिज ि िाष्ट्रगीताचा आदि किािा. (ख) सिातंत््ाच्ा चळिळीला प्रयेिणा दयेणाऱ्ा आदराांचये पालन किािये. (ग) दयेराचये साि्वभौमति, एकता ि अखंडति सुिवषित ठयेिण्ासाठी प्र्तनरील असािये. (घ) आपल्ा दयेराचये िषिण किािये, दयेराची सयेिा किािी. (ङ) सि्व प्रकािचये भयेद विसरून एकोपा िाढिािा ि बंधुतिाची भािना जोपासािी. स्सरि्ांच्ा प्रवतष्येला कमीपणा आणतील अरा प्रथांचा त्ाग किािा. (च) आपल्ा संवमश्र संसककृतीच्ा िािराचये जतन किािये. (छ) नैसवग्वक प्ा्वििणाचये जतन किािये. सजीि प्राण्ांबद्दल द्ाबुद्ी बाळगािी. (ज) िैज्ावनक दृष्ी, मानितािाद आवण वजज्ासूिृतती अंगी बाळगािी. (झ) साि्वजवनक मालमततयेचये जतन किािये. विंसयेचा त्ाग किािा. (ञ) दयेराची उततिोतति प्रगती िोण्ासाठी व्स्तिगत ि सामूविक का्ा्वत उच्चतिाची पातळी गाठण्ाचा प्र्तन किािा. (ट) ६ तये १४ ि्ोगटातील आपल्ा पाल्ांना पालकांनी वरषिणाच्ा संधी उपलबध करून द्ाव्ात. शासन निर्णय क्रमांक : अभ्यास-२११६/(प्र.क्र.४३/१६) एसडी-४ दिनांक २५.४.२०१६ अन्वये स्थापन करण्यात आलेल्या समन्वय समितीच्या दि. ३०.०१.२०२० रोजीच्या बैठकीमध्ये हे पाठ्यपुस्तक सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून निर्धारित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. मराठी युवकभारती इयत्ता बारावी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे ४. आपल्या स्मार्टफोनवरील DIKSHA APP द्वारे पाठ्यपुस्तकाच्या पहिल्या पृष्ठावरील Q. R. Code द्वारे डिजिटल पाठ्यपुस्तक व त्या पाठासंबधं ित अध्ययन- अध्यापनासाठी उपयुक्त दृकश्राव्य साहित्य उपलब्ध होईल. प्रथमावृत्ती ः २०२० © महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, दुसरे पुनर्मुद्रण ः २०२२ पुणे - ४११ ००४. या पुस्तकाचे सर्व हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाकडे राहतील. या पुस्तकातील कोणताही भाग संचालक, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ यांच्या लेखी परवानगीशिवाय उद्धृत करता येणार नाही. मराठी भाषा तज्ज्ञ समिती मराठी भाषा अभ्यासगट सदस्य श्री. शिवाजी तांबे (अध्यक्ष) श्री. प्रवीण खैरे श्रीमती सुचेता नलावडे फादर फ्रान्सिस दिब्रिटो (सदस्य) श्रीमती वैदेही तारे श्री. जगदीश भोईर डॉ. स्नेहा जोशी (सदस्य) श्रीमती प्रांजली जोशी डॉ. पांडुरंग कंद डॉ. माधुरी जोशी (सदस्य) डॉ. नंदा भोर श्री. ललित पाटील श्रीमती स्वाती ताडफळे (सदस्य) श्री. विजय राठोड डॉ. सुजाता शेणई श्री. ज्योतिराम कदम (सदस्य) डॉ. सुहास सदाव्रते श्रीमती रेणू तारे श्री. हरी नारलावार (सदस्य) डॉ. महादेव डिसले डॉ. विनोद राठोड श्री. प्रकाश बोकील (सदस्य) डॉ. माधुरी काळे श्रीमती आरती देशपांडे श्रीमती सविता अनिल वायळ श्रीमती शीतल सामंत डॉ. जगदीश पाटील (सदस्य-सचिव) संयोजन ः चित्रकार ः श्रीमती सविता अनिल वायळ अक्षरजुळणी ः राजेंद्र गिरधारी विशेषाधिकारी, मराठी भाषा विभाग, पाठ्यपुस्तक मंडळ, पुणे. मुखपृष्ठ ः पाठ्यपुस्तक मंडळ, पुणे. विवेकानंद पाटील मुद्रक ः निर्मिती ः सच्चिदानंद आफळे, मुख्य निर्मिती अधिकारी राजेंद्र चिंदरकर, निर्मिती अधिकारी मुद्रणादेश ः राजेंद्र पांडलोसकर, सहायक निर्मिती अधिकारी कागद ः प्रकाशक 70 Or. Eg. E‘. H«$s‘dmoìh विवेक उत्तम गोसावी नियंत्रक पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ, प्रभादेवी, मुंबई - २५. H C C प्रस्तावना प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आता बारावीत आलात! तुमचे मन:पूर्वक स्वागत! मराठी ‘युवकभारती’ हे पाठ्यपुस्तक तुमच्या हाती सोपवताना अतिशय आनंद होत आहे. आपल्या जीवनात भाषेला विशेष महत्त्वाचे स्थान आहे. मराठी आपली राजभाषा आहे. त्यामुळे वैयक्तिक अाणि सार्वजनिक जीवनात मराठीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मराठी भाषेवर तुम्ही जितके चांगले प्रभुत्व मिळवाल तितके जीवनात यशस्वी होण्याच्या अधिकाधिक संधी तुम्हांला मिळत राहतील. त्या दृष्टीने उपयुक्त ठरू शकेल अशा प्रकारे या पाठ्यपुस्तकाची रचना केलेली आहे. या पाठ्यपुस्तकात सहा विभाग आहेत. पहिल्या दोन विभागातील गद्य-पद्य पाठांच्या माध्यमातून नामवंत साहित्यिकांच्या साहित्यिक कृतींचा परिचय करून घेता घेता त्या साहित्यांमधील संस्काराने तुमची भाषा ही उत्तरोत्तर समृद्ध होत जाईल. हे साहित्य तुमच्या वैचारिक आणि कल्पनाशक्तीच्या विकासासाठी उपयुक्त ठरेल. या साहित्यामधील आशय तुम्हांला आजच्या जीवनातील समस्यांची जाणीव करून देईल तसेच साहित्यिक कृतींमधील सौंदर्याचा आनंद घेत आपले जीवन अनुभवसमृद्ध करण्याचा वस्तुपाठही तुम्हांला मिळेल. चित्रांमुळे पाठ्यपुस्तकाचे स्वरूप अधिक अाकर्षक झाले अाहे. त्यामुळे आशयाचे आकलन अर्थपूर्ण आणि सुलभ होण्यास मदत होईल. बारावीमध्ये तुम्हांला ‘कथा’ हा साहित्यप्रकार अभ्यासण्याची संधी मिळत आहे. या साहित्यप्रकाराची ओळख करून घेताना तुम्हांला या साहित्यप्रकाराच्या वैशिष्ट्यांनी युक्त दोन नामवंत कथाकारांच्या कथांचाही आस्वाद घेता येईल. मराठी भाषेच्या उपयोजनाचे क्षितिज दिवसेंदिवस विस्तारत आहे. त्यामधून अनेक व्यावसायिक संधी निर्माण होत आहेत. त्या दृष्टीने उपयुक्त ठरू शकतील अशा चार घटकांचा समावेश ‘उपयोजित मराठी’ या विभागात केला आहे. गद्य- पद्य पाठ आणि त्यांच्या स्वाध्यायकृतींमधून विकसित झालेल्या भाषिक कौशल्यांचे वेगळ्या प्रकारे उपयोजन करण्याची संधी या विभागात उपलब्ध करून दिली आहे. ‘व्याकरण आणि लेखन’ या भागांतील व्याकरणाच्या घटकांची मांडणी कार्यात्मक पद्धतीने केल्यामुळे ते अधिक आकलनसुलभ झाले असल्याचे तुमच्या लक्षात येईल. हे व्याकरण घटक तुम्हांला भाषा अभ्यासासाठी आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठीही मार्गदर्शक ठरतील. याच भागात तुम्हांला तुमचा परिचित निबंधही भेटेल. उत्तम निबंध कसा लिहावा याचे अगदी नेमके मार्गदर्शन येथे तुम्हांला मिळू शकेल. ‘परिशिष्ट’ आणि ‘शब्दार्थ’ तुम्हांला भाषिक समृद्धीची दिशा दाखवतील. ‘पाठ्यपुस्तकाच्या अंतरंगाविषयी’ या पृष्ठांमधील मार्गदर्शनामुळे तुमच्या अभ्यासास नेमकी दिशा मिळण्यास मदत होईल. पाठ्यपुस्तकातील साहित्याचा आणि भाषेचा बारकाईने केलेला अभ्यास तुम्हांला स्वमत, अभिव्यक्ती आणि उपयोजन यांच्या विकासाच्या दृष्टीने अधिक समर्थ करू शकेल, असा विश्वास वाटतो. (विवेक गोसावी) पुणे संचालक दिनांक : २१ फेब्रुवारी, २०२० महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व भारतीय सौर दिनांक ः २ फाल्गुन, १९४१ अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे. भाषाविषयक क्षमता ः प्रथम भाषा मराठी इयत्ता बारावीच्या अखेरीस विद्यार्थ्यांमध्ये भाषाविषयक पुढील क्षमता विकसित व्हाव्यात अशी अपेक्षा आहे. क्षेत्र क्षमता l श्राव्य, दृकश्राव्य माध्यमांतील व्याख्याने, चर्चा, परिसंवाद, मुलाखती, कथाकथन, काव्यवाचन कार्यक्रम, अभिवाचन इत्यादींमधील भाषिक वैशिष्ट्ये आणि वैचारिक मांडणी चिकित्सकपणे समजून घेणे. l सार्वजनिक ठिकाणच्या सूचना, आवाहने, निवेदने यांची यथार्थता विचारात घेऊन योग्य तो प्रतिसाद देणे. l औपचारिक व अनौपचारिक ठिकाणी होणारी व्याख्याने, संवाद-संभाषणे, परिसंवाद, श्रवण कार्यशाळा यांमधील संदर्भांचा चिकित्सकपणे अर्थ लावता येणे व स्वत:ची भाषा अधिकाधिक विकसित करण्याचा प्रयत्न करणे. l भाषिक कौशल्यांच्या समृदध् ीसाठी विविध श्राव्य, दृकश्राव्य माध्यमांचा माहितीचे स्रोत म्हणून जाणीवपूर्वक उपयोग करणे. l आंतरजालावरून लिंक्स, क्यू. आर. कोड, व्हिडिओज, यू-ट्यूब व प्रसारमाध्यमे इत्यादी दृकश्राव्य माध्यमांतून अपेक्षित व अध्ययनपूरक संदर्भांचा शोध घेऊन ते वापरणे. विविध साहित्यकृतींवर आधारित चर्चेत सहभागी होताना साधक-बाधक विचारांच्या l मांडणीसाठी विषयानुरूप भाषा परिणामकारकतेने वापरणे. l अभ्यासलेल्या साहित्यप्रकारांच्या सर्वसाधारण वैशिष्ट्यांबाबत चर्चा करणे. l वाचलेल्या पुस्तकाची माहिती वा एखाद्या कथेचा, कवितेचा सारांश, कवितेतील ओळींचा भाषण- अर्थ सांगणे; तसेच गीत, कविता, भाषण सादर करणे. संभाषण l ‘उपयोजित मराठी’ या भागात अंतर्भूत असलेल्या घटकांवर आधारित कृतींवर चर्चा करता येणे. l दिलेल्या विषयाला अनुसरून स्वत:चे स्वतंत्र विचार संदर्भासह मुद्देसूदपणे मांडता येणे. l भाषण-संभाषण कौशल्यांची वैशिष्ट्ये आत्मसात करून त्याचा व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीने आत्मविश्वासपूर्वक वापर करता येणे. l विविध साहित्यकृतींचे अभिवाचन करणे तसेच साहित्याच्या आस्वादासाठी वाचन करणे. l संकते स्थळांवरील ई-बुक्स, ई-न्यूज आणि ई-साहित्य शोधून वाचन करता येणे व त्याचा वाचन योग्य ठिकाणी वापर करता येणे. l स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने मराठी भाषाविषयाशी संबंधित उपयुक्त घटकांचे अभ्यासपूर्ण वाचन करणे. l स्वत:चे भाषाविषयक ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी संबंधित उपयुक्त घटकांचे अभ्यासपूर्ण वाचन करणे. उदा., विविध नियतकालिके, संदर्भ ग्रंथ, कोशवाङ्मय इत्यादी. l पाठांचे आणि पाठांशी संबंधित मूळ साहित्यकृतीचे व संदर्भ साहित्याचे समजपूर्वक वाचन करणे. l पाठाच्या आशयाचे व त्या पाठातील विचारांचे आकलन करून घेऊन त्याबाबत स्पष्टीकरणासह आपले मत स्वत:च्या भाषेत समर्पक शब्दांत लिहिणे. l काव्यपंक्तींतील काव्यसौंदर्य स्पष्ट करणे व पाठांतील भाषिक सौंदर्यस्थळे शोधून लिहिणे. लेखन l आपले अनुभव, निरीक्षण आणि त्या अनुषंगाने केलेला विचार लेखनातून अभिव्यक्त करणे. l दिलेल्या विषयावर मुदद ् ेसूद लेखन करता येणे. l ‘उपयोजित मराठी’ या भागातील संबंधित घटकांवर आधारित कृती सोडवणे. l संदर्भासाठी कोशवाङ्मय अभ्यासता येणे. l अनुभवलेल्या विविध घटनांसंदर्भांत व्यापक अर्थाने अभिव्यक्त होता येणे. l आंतरजालाचा वापर करून व्यवहार करता येणे. l संगणकावर उपलब्ध असणाऱ्या विविध शैक्षणिक ॲप्लिकेशन्सचा उत्तमरीत्या कृतियुक्त वापर करता येणे. अध्ययन l प्रसारमाध्यमांतून समोर येणाऱ्या घटकांचे सांगोपांग आकलन करून चिकित्सक मांडणी करता कौशल्य येणे. l विविध सामाजिक अडसरांचे आकलन करून घेऊन त्यांच्या निर्मूलनासाठी स्पष्टपणे विचारांची मांडणी करणे. l बहुभाषा परिचय करून घेण्याची जिज्ञासा निर्माण होणे. l वाङ्म यीन उपक्रमांद्वारे अभिरुची घडवणे व सहभागातून वृद्धिंगत करणे. l तंत्रज्ञान आणि आंतरजाल यांच्या योग्य वापरातून ‘स्व’ला अभिव्यक्त करून विकसित करता येणे. l भाषाभ्यास- वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार ओळखता येणे व त्यांचा भाषाभ्यास लेखनात उपयोग करता येणे. व लेखन l निबंधलेखन- सुचवलेल्या विषयावर निबंधलेखन करणे. पाठ्यपुस्तकाच्या अंतरंगाविषयी... बारावीचे ‘मराठी युवकभारती’ हे पाठ्यपुस्तक अध्ययन-अध्यापनासाठी आपल्या हाती देताना आनंद होत आहे. इयत्ता बारावीमधील मराठी भाषा विषयाच्या अध्ययन-अध्यापनाची उद्दिष्टे विचारात घेऊन क्षमता विधाने निश्चित केली आहेत आणि ती पाठ्यपुस्तकाच्या आरंभी दिली आहेत. क्षमता विधाने श्रवण, भाषण-संभाषण, वाचन, लेखन, अध्ययन कौशल्य आणि भाषाभ्यास व लेखन या सहा क्षेत्रांमध्ये विभागलेली आहेत. क्षमता विधानांचा संबंध पाठ्यघटकांशी आणि कृतींशी आहे. त्यामुळे पाठ्यपुस्तकाचा चिकित्सक अभ्यास करताना क्षमता विधाने पाठ्यघटकांशी आणि कृतींशी पडताळून पाहावीत. त्यामुळे कोणकोणत्या घटकांमधून कोणकोणत्या क्षमता कशाप्रकारे विकसित होतील हे समजण्यास मदत होईल. तसेच क्षमतांचा अर्थ आणि व्याप्ती स्पष्ट होऊन पाठ्यपुस्तकातील घटक अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत होईल. शिवाय पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे जाऊन पाठ्यघटकातील आशय आणि भाषा जीवनव्यवहाराशी कुठे आणि कशी जोडता येईल हेही समजू शकेल. पाठ्यपुस्तकाच्या अनुक्रमणिकेत एकूण सहा भागांचा समावेश आहे. पहिल्या आणि दुसऱ्या भागात गद्य, पद्य घटक दिले आहेत. पाठ्यक्रमानुसार अपेक्षित भाषिक कौशल्यांचा विकास, साहित्यप्रकार, वयोगटानुरूप द्यावयाचे अनुभव आणि मूल्यमापनविषयक अपेक्षा विचारात घेऊन मराठीमधील नामवंत साहित्यिकांच्या दर्जेदार रचनांचा समावेश या पाठ्यपुस्तकामध्ये केला आहे. त्यामधून अपेक्षित भाषिक कौशल्यांचा विकास साधताना विद्यार्थ्यांवर सर्जनाचे संस्कार व्हावेत, अशी अपेक्षा आहे. या पाठांमधून गाभाघटक, जीवनकौशल्ये आणि मूल्यांचा परिपोष होईल. गद्य पाठांमध्ये वैचारिक, ललित आणि विनोदी लेखांबरोबरच चिंतनशील, अनुभवकथनपर आणि चरित्रात्मक पाठांचा समावेश केला आहे. वेगाच्या आहारी जाण्याच्या अतिरेकावर भाष्य करताना ‘वेगवशता’ हा पाठ आजच्या तरुणाईला संयमाने जगण्याचा उपयुक्त कानमंत्र देतो. सध्याच्या व्यस्त आणि तणावग्रस्त जीवनात साध्यासुध्या दैनदि ं न प्रसंगांतून आनंद मिळवत आनंदी राहणे हा स्वभाव कसा बनवावा, हे ‘आयुष्य... आनंदाचा उत्सव’ या पाठामधून उमगते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सीमेवर कर्तव्य बजावणारे सैनिक आणि भारतीय नागरिक यांमधील घट्ट भावबंध ‘वीरांना सलामी’ या पाठात अधोरेखित झाले आहेत. हा पाठ वाचल्यानंतर सैनिकांच्या समर्पण वृत्तीविषयी आपल्या मनात अभिमानाची आणि आदराची भावना नक्की निर्माण होईल. पहाटेच्या प्रहरी समेवर आलेले मन आणि त्यावेळी उलगडणारे सभोवतालच्या चराचर सृष्टीशी असणारे मानवाचे आदिम नाते ललितरम्य शैलीत उलगडून दाखवणारा ‘रेशीमबंध’ हा पाठ मनावर प्रसन्नतेचा शिडकावा करतो. दैनदि ं न प्रसंग आणि अनुरूप शैलीतून अप्रतिम विनोदनिर्मिती साधताना ‘दंतकथा’ या ललितरम्य विनोदी लेखातून समृद्ध भाषेचे दर्शन लेखकाने घडवले आहे. योग्य वेळी जाणकारांचे मार्गदर्शन घेऊन, अखंड चिंतनशील आणि अध्ययनशील राहून कलेच्या क्षेत्रात यशस्वी कसे होता येते याचा प्रत्यय ‘रंगरेषा व्यंगरेषा’ या पाठातून आपल्याला येतो. हे सर्वच पाठ आशयाच्या दृष्टीने समृद्ध असून ते भाषाशैलीचे आणि भाषासमृद्धीचे उत्तमोत्तम नमुने समोर ठेवणारे आहेत. पद्य पाठांमध्ये ‘बहु असोत सुंदर...’ या लोकप्रिय महाराष्ट्र गीताचा समावेश काव्यानंदासाठी केलेला आहे. भारतीय कृषी समृदध् ीमधील स्त्रियांचे योगदान ‘रोज मातीत’ या लयबद्ध रचनेतून स्पष्ट होते. ‘रे थांब जरा आषाढघना’ ही रचना म्हणजे पावसाळी निसर्गसौंदर्याचे अप्रतिम काव्यरूप. कवितेमधील काही संस्कृत आणि बोलीभाषेतील शब्दांचे अर्थ उलगडल्यावर काव्यसौंदर्याने मन भरून जाते. ‘रंग माझा वेगळा’ ही सुप्रसिद्ध गझल व्यावहारिक जगात वावरताना आणि दु:खे सोसतानाही हटके जगून माणसांवर प्रेम करणाऱ्या गझलकाराच्या कलंदर वृत्तीचे दर्शन घडवते. वारकरी भजनांपासून ते शाळा- महाविद्यालयामधील स्नेहसंमेलनांपर्यंत सर्वत्र अत्यंत नाट्यमय पद्धतीने सादर होणारे ‘विंचू चावला’ हे लोकप्रिय भारूड दुर्गुणांपासून दूर राहण्याची शिकवण देते. तसेच सज्जनांची संगत अंगीकारली तर विंचवाच्या विषासारखे दारुण दु:खही दूर ठेवता येते हे वास्तवही आपल्या मनावर ठसते. व्यस्त आणि बंदिस्त महानगरी जीवनात आक्रसून गेलेल्या त्रस्त बाल्याविषयीची पीडा ‘समुद्र कोंडून पडलाय’ या कवितेतून व्यक्त झाली आहे. ‘आरशातली स्त्री’ ही कविता स्त्रीजीवनातील स्थित्यंतराचा नेमका वेध घेताना तिला नव्या उमेदीने जगण्याचे नवे भान देते. भाग एक आणि भाग दोनच्या शेवटी विद्यार्थ्यांच्या सरावासाठी नमुना गद्य आकलन उतारे दिलेले आहेत. गद्य आणि पद्य पाठांतील आशय आणि भाषाशैली यांचे अध्ययन-अध्यापन करण्याच्या दिशा जशा क्षमता विधानांमधून स्पष्ट होतात तशाच त्या पाठपरिचयातूनही दृष्टिपथात येतात. वर्गातील चर्चांमधून अध्यांपकांकडून पाठातील आशय आणि भाषा यांचा संबधं वर्तमान जीवनाशी जोडणे अपेक्षित आहे. गद्य, पद्य पाठांमध्ये समाविष्ट असलेल्या चित्रांमुळे मजकूरपृष्ठांना आकर्षकता लाभली आहे. चित्रांमुळे आशयाचे अंतरंग उलगडण्यास अधिक मदत होणार आहे. बारावीमध्ये ‘कथा’ हा साहित्यप्रकार स्वतंत्रपणे समाविष्ट केला आहे. भारतीय आणि जागतिक साहित्यात ‘कथा’ या साहित्यप्रकाराला मोठी परंपरा आहे. आजही ‘कथा’ तेवढीच आवडीने ऐकली जाते, वाचली जाते. त्यामुळे कथेचे स्वरूप, कथेची रचना, कथेची वैशिष्ट्ये यासंबंधीची माहिती एका स्वतंत्र प्रकरणात दिली आहे. तसेच त्याला जोडून प्रातिनिधिक स्वरूपात नामवंत कथाकारांच्या दोन कथा दिलेल्या आहेत. ‘शोध’ या कथेत कथारचनेच्या तंत्राची अनेक वैशिष्ट्ये दिसून येतात. जिज्ञासा आणि उत्कंठा वाढवत नेत श्रोत्याला किंवा वाचकाला कथेशी खिळवून कसे ठेवता येते याचा उत्तम नमुना म्हणजे ‘शोध’ ही कथा होय. तर बोलीभाषेच्या माध्यमातून तयार झालेल्या वातावरणातून कथेमधील घटना, प्रसंग आणि पात्रे सजीवपणे वाचकांसमोर कशाप्रकारे उभी करता येतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘गढी’ ही कथा होय. ‘कथा साहित्यप्रकार परिचय’ हे प्रकरण आणि त्यासोबतच्या ‘शोध’ आणि ‘गढी’ या कथा यांचा एकत्रित अभ्यास केल्यानंतर कथेचे स्वरूप आणि रचना स्पष्ट होण्यास मदत होईल. ‘उपयोजित मराठी’ या भागामध्ये ‘मुलाखत’, ‘माहितीपत्रक’, ‘अहवाल’ आणि ‘वृत्तलेख’ या घटकांचा समावेश केला आहे. विद्यार्थ्यांनी गद्य, पद्य पाठ आणि त्याखालील कृती यांमधून काही भाषिक कौशल्ये आत्मसात केली आहेत. या भाषिक विकासाचे उपयोजन करण्याची संधी त्यांना ‘उपयोजित मराठी’ मधील उपरोक्त घटकांमधून मिळणार आहे. व्यवसाय वा नोकरीमधील भूमिकेच्या दृष्टीने हे चारही घटक उपयुक्त ठरणार आहेत. या घटकांचा विद्यार्थ्यांना चांगला परिचय व्हावा अशी अपेक्षा अाहे. त्यादृष्टीने मुलाखत, माहितीपत्रक, अहवाल आणि वृत्तलेख यांचे नमुने उदाहरणादाखल पाठ्यपुस्तकात दिले आहेत. भाग पाचमध्ये ‘व्याकरण व लेखन’ हा भाग समाविष्ट केला आहे. त्यामध्ये स्पर्धापरीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त असलेल्या वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार यांचा समावेश केला आहे. व्याकरणासंबंधीच्या कृती पाठांखाली दिलेल्या आहेत. त्या सोडवण्यापूर्वी टप्प्याटप्प्याने संबंधित व्याकरण घटकांचे अध्ययन-अध्यापन पूर्ण व्हावे अशी अपेक्षा आहे. लेखन या भागामध्ये ‘निबंधलेखन’ या घटकाचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना इयत्ता बारावीमध्ये, महाविद्यालयीन शिक्षणामध्ये आणि स्पर्धापरीक्षांसाठी उपयुक्त ठरू शकेल अशा तपशिलाचा समावेश त्यामध्ये केला आहे. मात्र परीक्षेचे वातावरण आणि उपलब्ध वेळ यांचा विचार करता बारावीमधील विद्यार्थ्यांच्या निबंधलेखनाचे मूल्यमापन या तपशिलामधील निकषानुसार करणे अपेक्षित नाही. त्यासाठी कृतिपत्रिकेतील निकष विचारात घ्यावेत. पाठ्यपुस्तकातील पाचही भागातील घटकांवर आधारित विविध स्वरूपाच्या कृती दिलेल्या आहेत. घटकांचे आकलन आणि सर्वांगीण अभ्यास यादृष्टीने या कृती उपयुक्त ठरतील. मात्र परीक्षेमधील मूल्यमापन हे मूल्यमापन आराखड्यानुसार राहील. त्यादृष्टीनेही उपयुक्त कृती पाठ्यपुस्तकात दिल्या आहेत. तसेच तोंडी परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त ठरू शकतील अशा कृतींचाही समावेश पाठ्यपुस्तकात केला आहे. परिशिष्टांमध्ये पारिभाषिक शब्द, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिकांची नावे व त्यांच्या साहित्यकृती, शब्दार्थ व वाक्प्रचार यांचा समावेश केला आहे. त्यांचा उपयोग सामान्यज्ञान, भाषाविकास आणि पाठांचे आकलन यांसाठी होईल. नऊ भारतीय भाषांमधील बारावीच्या ‘युवकभारती’च्या पाठ्यपुस्तकांसाठी एकच मुखपृष्ठ योजले आहे. त्यामध्ये मध्यभागी ज्ञानपीठ पुरस्कारासाठी दिल्या जाणाऱ्या ‘वाग्देवतेची प्रतिमा’ ठळकपणे नजरेत भरते. ज्ञानपीठ हा साहित्याच्या क्षेत्रातील सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार आहे. युवकभारतीच्या मुखपृष्ठावर त्या त्या भाषेतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेल्या साहित्यिकांची छायाचित्रे दिलेली आहेत. तसेच भाषेच्या उपयोजनाच्या आधुनिक संधींचेही प्रतीकात्मक दर्शन मुखपृष्ठावर होताना दिसते. प्राचीन काळापासून आजपर्यंत झालेल्या भाषिक विकासाच्या टप्प्यांचे ओझरते दर्शनही मलपृष्ठावर होते. विद्यार्थ्यांनी आपल्या मातृभाषेशिवाय अन्य भारतीय भाषांचा अभ्यास करावा. तसेच त्या भाषांमधील अनुवादित साहित्याचा आस्वाद घ्यावा अशी अपेक्षा आहे. विद्यार्थ्यांनी उत्तमोत्तम साहित्यकृतींचा आस्वाद घेऊन अपेक्षित भाषाविकास साधावा आणि जीवनव्यवहारात त्याचे समर्थपणे उपयोजन करावे यासाठी, हे पाठ्यपुस्तक महत्त्वाचे साधन ठरेल असा विश्वास आहे. अनुक्रमणिका भाग - १ भाग - २ अ. क्र. पाठ, कविता पृ. क्र. अ. क्र. पाठ, कविता पृ. क्र. बहु असोत सुंदर... (काव्यानंद) १ ७. विंचू चावला... (भारूड) ३२ - श्री. कृ. कोल्हटकर - संत एकनाथ १. वेगवशता ३ ८. रेशीमबंध ३५ - प्राचार्य शिवाजीराव भोसले - डॉ. यू. म. पठाण २. रोज मातीत (कविता) ७ ९. समुद्र कोंडून पडलाय (कविता) ४० - कल्पना दुधाळ - वसंत आबाजी डहाके ३. आयुष्य... आनंदाचा उत्सव १० १०. दंतकथा ४३ - शिवराज गोर्ले - वसंत सबनीस ४. रे थांब जरा आषाढघना (कविता) १७ ११. आरशातली स्त्री (कविता) ५० - बा. भ. बोरकर - हिरा बनसोडे ५. वीरांना सलामी २० १२. रंगरेषा व्यंगरेषा ५४ - अनुराधा प्रभुदेसाई - मंगेश तेंडुलकर ६. रंग माझा वेगळा (कविता) २८ * जयपूर फूटचे जनक ६१ - सुरेश भट (नमुना गद्य आकलन) * आत्मविश्वासासारखी शक्ती नाही ३१ - डॉ. बाळ फोंडके (नमुना गद्य आकलन) - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाग -४ भाग -३ अ. क्र. उपयोजित मराठी पृ. क्र. अ. क्र. साहित्यप्रकार पृ. क्र. १. मुलाखत ८७ कथा- साहित्यप्रकार-परिचय ६२ २. माहितीपत्रक ९४ १. शोध - व. पु. काळे ७० ३. अहवाल १०० २. गढी - डॉ. प्रतिमा इंगोले ७९ ४. वृत्तलेख (फिचर रायटिंग) १०५ भाग -५ भाग -६ अ. क्र. व्याकरण व लेखन पृ. क्र. अ. क्र. परिशिष्टे पृ. क्र. l व्याकरण- ११२ l पारिभाषिक शब्द, साहित्य अकादमी १३६ वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, पुरस्कारप्राप्त साहित्यिकांची नावे ते प्रयोग, अलंकार व साहित्यकृती, शब्दार्थ व वाक्प्रचार १४२ l लेखन : निबंधलेखन १३१ भाग - १ C C बहु असोत सुंदर... (काव्यानंद) n श्री. कृ. कोल्हटकर (१८७१ ते १९३४) : समीक्षक, लेखक, कवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार. महाविद्यालयात शिकत असतानाच ते समीक्षेकडे वळले. विविध वाङ्मयप्रकारांचे लेखन करत असताना त्यांचे समीक्षणात्मक लेखन सुरूच होते. कोल्हटकर यांची प्रतिभा बहुमुखी होती. त्यांनी मराठी नाटकाला नवे, स्वतंत्र रंगरूप दिले व त्याबरोबरच रूढींच्या नावाखाली चालणाऱ्या हास्यास्पद गोष्टींविषयी विनोदी लेखही लिहिले. विनोदाचा शस्त्राप्रमाणे वापर व कालातीत असा शुद्ध विनोद ही त्यांच्या विनोदाची वैशिष्ट्ये. ‘दुटप्पी की दुहेरी’, ‘शामसुंदर’ या कादंबऱ्या, ‘गीतोपायन’ हा काव्यसंग्रह, आत्मवृत्त, काही कथा इत्यादी वाङ्मय निर्मिती. ‘बहु असोत सुंदर संपन्न कीं महा’ ही त्यांची काव्यरचना ‘महाराष्ट्र गीत’ म्हणून अतिशय लोकप्रिय आहे. द्वितीय महाराष्ट्र कविसंमेलन, पुणे तसेच बारावे महाराष्ट्र साहित्य संमेलन, पुणे यांचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. कवीने या गीतात महाराष्ट्र भूमीच्या अनेकविध वैशिष्ट्यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. उत्तुंग पर्वतरांगांमध्ये वसलेला, गगनाला गवसणी घालणाऱ्या आकांक्षा बाळगणारा महाराष्ट्र आम्हांला सर्वांत प्रिय आहे, असे गौरवपूर्ण उद्ग ार या गीतात काढले आहेत. अंत:करणाचे औदार्य, सद्ग ुणांची संपदा आणि नररत्नांची खाण असणारा महाराष्ट्र आम्हांला अभिमानास्पद आहे, हे कवीने अतिशय ओजस्वी वाणीत नमूद केले आहे. पराक्रम, भक्ती आणि वैराग्य या गोष्टी एकाच ठिकाणी आढळणारा प्रदेश ही महाराष्ट्राची वेगळी ओळख या गीतातून करून दिली आहे. अशा प्रिय महाराष्ट्रात मराठी भाषेला लोकव्यवहारात गौरवाचे स्थान प्राप्त व्हावे; तसेच महाराष्ट्राच्या थोरवीचे मर्म सर्वांच्या मनात ठसावे अशी अपेक्षा कवीने व्यक्त केली आहे. बहु असोत सुंदर संपन्न कीं महा प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ।।धृ.।। गगनभेदि गिरिविण अणु नच जिथें उणें आकांक्षांपुढति जिथें गगन ठेंगणें अटकेवरि जेथील तुरंगिं जल पिणें तेथ अडे काय जलाशयनदांविणें? पौरुषासि अटक गमे जेथ दु:सहा ।।१।। प्रासाद कशास जेथ हृदयमंदिरें सद्भावांचींच भव्य दिव्य आगरें रत्नां वा मौक्तिकांहि मूल्य मुळिं नुरे रमणीची कूस जिथें नृमणिखनि ठरे शुद्ध तिचें शीलहि उजळवि गृहा गृहा ।।२।। नग्न खड्ग करिं, उघडे बघुनि मावळे चतुरंग चमूचेंही शौर्य मावळे दौडत चहुंकडुनि जवें स्वार जेथले भासति शतगुणित जरी असति एकले यन्नामा परिसुनि रिपु शमितबल अहा ।।३।। LLLLLLL 1 LLLLLLL विक्रम वैराग्य एक जागिं नांदती जरिपटका भगवा झेंडाहि डोलती धर्म-राजकारण समवेत चालती शक्तियुक्ति एकवटुनि कार्य साधिती पसरे यत्कीर्ति अशी विस्मयावहा ।।४।। गीत मराठ्यांचे श्रवणीं मुखीं असो स्फूर्ति दीप्ति धृतिहि देत अंतरी ठसो वचनि लेखनीहि मराठी गिरा दिसो सतत महाराष्ट्रधर्ममर्म मनिं वसो देह पडो तत्कारणिं ही असे स्पृहा ।।५।। (आठवणीतल्या कविता, भाग-१) l तोंडी परीक्षा. प्रस्तुत गीत तालासुरात सादर करा. LLLLLLL 2 LLLLLLL C C १. वेगवशता n प्राचार्य शिवाजीराव भोसले (१९२७ ते २०१०) : नामवंत वक्ते, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विचारवंत आणि व्यासंगी लेखक. देशात आणि विदेशांत अनेक विषयांवर व्याख्यानमाला गाजवल्या. पुणे येथील वसंत व्याख्यानमालेत सलग २८ वर्षे व्याख्याने दिली. ‘कथा वक्तृत्वाची’, ‘जागर (खंड १ व २)’, ‘जीवनवेध’, ‘दीपस्तंभ’, ‘देशाेदेशींचे दार्शनिक’, ‘मुक्तिगाथा महामानवाची’, ‘यक्षप्रश्न’, ‘हितगोष्टी’ इत्यादी ग्रंथ प्रकाशित. औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू. ‘राजर्षी शाहूमहाराज पुरस्कार’ (कोल्हापूर), ‘श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्कार’ (फलटण) अशा पुरस्कारांनी सन्मानित. या वैचारिक पाठात लेखकाने अतिवेगाच्या आहारी गेलेल्या माणसांच्या विकृतीवर नेमकेपणाने बोट ठेवले आहे. वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी वाहनाची गरज लेखकालाही पटते. मात्र गरज नसताना खोट्या प्रतिष्ठेपायी कर्ज काढून वाहन खरेदी करण्याच्या वर्तमानकालीन मानसिकतेवर लेखकाने प्रकाश टाकला आहे. महानगरात, शहरात ठरावीक वेळेत अनेक ठिकाणी पोहोचून कामे करावी लागतात हे खरे असले, तरी नको तितक्या वेगाने वाहने चालवून लोक अपघातांना निमंत्रण देताना दिसतात, याचे लेखकाला वैषम्य वाटते. वेळ वाचवण्यासाठी माणसे वाहने वापरतात; परंतु माणसे वाचलेला वेळ पुन्हा वाहन चालवण्यात वाया घालवतात, तेव्हा ‘वाहने माणसांवर स्वार होतात’, अशी मार्मिक टिपणी लेखक करतात. अफाट वेगाने वाहने चालवण्याच्या प्रवृत्तीमुळे वाहनचालकाच्या शरीर-मनावर अनावश्यक ताण निर्माण होताे. त्यामुळे स्वत्व आणि स्वास्थ्य हिरावून घेणारा अनैसर्गिक वेग कमी करण्याबाबत लेखक शेवटी कशाप्रकारे स्पष्ट इशारा देतात, ते या पाठातून पाहूया. वेग हे गतीचे एक रूप आहे. आपले जीवनही स्थिती अहोरात्र भरारणारी आणि थरारणारी वाहने पाहिली आणि गती यांत विभागलेले आहे. थांबणे, चालणे, धावणे म्हणजे आश्चर्य वाटते. ही आली कोठून? आली कशी असे हे जीवनचक्र फिरतच असते. आपल्या विचारांनाही आणि कशासाठी? पूर्वी देशोदेशींचा इतिहास घडला. गती असते, िजला आपण प्रगती म्हणतो. ती विचारांची लोकांनी जगप्रवासही केला; पण आजच्या एवढी अवखळ गती असते. गतीला जेव्हा दिशा असते तेव्हाच ती प्रगती या वाहने कोठे दिसत नसत. संज्ञेला पात्र ठरते. दिशाविहीन गती ही अधोगती ठरते. आता माणूस घरातून दारात आला, की वाहनावर आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते. रस्ते आरूढ होतो. वेळ थोडा असतो. कामे बरीच असतात. वाहनांनी व्यापलेले असतात. माणसे घरांत राहतात म्हणूनच पायी चालत ती उरकता येत नाहीत. जीवन हे दशदिशांना अल्पकाळ तरी स्थिर राहतात. एरवी गतीपायी अगतिक विभागलेले आहे. मुलांची शाळा एका टोकाला, आपले होतात. कार्यालय दुसऱ्या टोकाला, मंडई एका बाजूला तर दवाखाना LLLLLLL 3 LLLLLLL दूर, कुठल्या तरी दिशेला. जीवनाची ही टोके सांधणार घडते ते वेगळे. इतरांशी मानसिक स्पर्धा करण्यासाठी, कशी? जोडणार कशी? शेवटी गती ही घ्यावीच लागते. आपल्या ऐश्वर्याचे प्रदर्शन घडवण्यासाठी, गरज नसताना यथाप्रमाण गती ही गरज आहे; पण अप्रमाण, अवास्तव कर्ज काढून वाहने खरेदी करणारी माणसे समाजात आणि अनावश्यक गती ही एक विकृती आहे. आपली कामे आढळतात. कोणतेही महत्त्वाचे काम नसताना पत्नीला यथासांग पार पाडावीत, एवढा वेग जीवनाला असावा. मागच्या बाजूला बसवून आधुनिक दुचाकीने सहज त्यापेक्षा अधिक वेग म्हणजे अक्षम्य आवेग म्हणावा फेरफटका मारून आले म्हणजे अनेकांना बरे वाटते; पण लागेल. तो आत्मघातकी ठरतो. अमेरिकेसारख्या विकसित आहेच वाहन तर चार-सहा मैलांवरचे एखादे निसर्गरम्य देशात माणसे वेगाने जीवन जगतात. घरोघर आणि दरडोई स्थान किंवा मंदिर पाहाण्यासाठी ही माणसे का जात नाहीत? वाहन उपलब्ध असते. रस्ते रुंद, सरळ, निर्विघ्न आणि एखादा लक्ष्मी रोड, महात्मा गांधी मार्ग किंवा जंगली एकमार्गी असतात. घरे, कार्यालये, बाजारपेठा यांत निदान महाराज रस्ताच का पसंत केला जातो? देहू, आळंदी, शंभर मैलांचे किमान अंतर असते. जवळच्या जवळ सगळे सिंहगड, बनेश्वर, विठ्ठलवाडीकडचे रस्ते का दिसत असे सहसा नसते. अंतरावरच्या गोष्टींशी जवळीक नाहीत? साधण्यासाठी दूरवर जावे लागते. यातून माणसामाणसांत वाई, सातारा, फलटण, कराड अशा गावी वाहनांची दुरावा निर्माण होतो. तो जाचदायक आणि असह्य होऊ नये एवढी निकड आहे का? शेतमळ्यात जायचे असेल, तर म्हणून वेगाचा आश्रय घेतला जातो. वेगामुळे माणसे बेभान तातडीचा भाग म्हणून कधी तरी वाहन लागेल. आपले होतात. भान हरपले म्हणजे अस्वस्थता विरून जाते. वेगात राहणे गावाबाहेर होत असेल, तर वाहनाचा उपयोग होईल; एक बेहोषी असते. पण सहज आणि सुखाने येणे-जाणे सोडून वेगाने येरझारा भारतीयांनी अमेरिकन जीवनशैली पत्करण्याचे कारण कशासाठी घालावयाच्या? आहेच गाडी तर मारूया नाही. आपल्याकडे अंतरे कमी आहेत. माणसे खूप आहेत. चक्कर, अशी भावना बाळगून रस्त्यावर अडचणी निर्माण कामे फारशी नाहीत. जीवनाची टोके सहज सांधता येतात. करणारे रसिक संख्येने वाढत चालले आहेत. थोडी त्वरा करावी लागते; पण भरधाव वेगाने अंतर काटावे वाहन हे वेळ वाचवण्यासाठी असते. ते वेळ अशी स्थिती नसते. मुंबईसारखे विस्तीर्ण नगर गाड्यांनी घालवण्यासाठी नसते. त्याचा वेग बेताचा असणे अगत्याचे सांधलेले असते. गाड्या रूळावरून चालतात. त्यात असते. माणसे चालू आणि पळूही शकतात; पण रस्त्याने भरकटणे फारसे नसते. गाडीत चढले म्हणजे माणसांचे कोणी चालण्याऐवजी पळू लागला तर त्याचे कौतुक करावे धावणे थांबते. का? अपेक्षित स्थळी वेळेवर पोहोचता येईल, अशा बेताने खरी अडचण असते ती रस्त्यावरून येणाऱ्या- वाहने चालवण्याऐवजी उगाचच भरधाव वेगाने चालवण्यात जाणाऱ्या दोन आणि चारचाकी वाहनांची. त्यांचा वेग औचित्य ते कोणते? मर्यादित ठेवला तर ती साधने म्हणून उपयोगी पडतात. वेळ वाहनाचा वेग वाढला म्हणजे त्याच्यावरचा ताबा आणि श्रम वाचवण्यासाठी त्यांचा उपयोग होतो; पण कमी होतो. पुढचे वाहन मागे टाकून पुढे जाण्याच्या अनेकदा असे घडते, की वाचलेला वेळ घालवावा कसा हे हव्यासामुळे अनेक अपघात होतात. रात्रीच्या वेळी कळेनासे होते आणि मग तो घालवण्यासाठी पुन्हा माणसे विलक्षण वेगाने धावणारी गाडी ही रातराणी म्हटली जाते. वाहनांच्या आहारी जातात. आरंभी माणसे वाहनांवर स्वार रात्री भरघाव वेगाने प्रवास करून पार पाडावीत एवढी होतात. मग वाहने माणसांवर स्वार होतात. महत्त्वाची कामे दरवेळी असतात का? कामापुरते आणि कामासाठी वाहन आणि आटोक्यात वाहनाचा वेग अनिवार झाला, तर चित्ताची व्यग्रता राहील एवढाच वेग, हे तंत्र अनुसरले तर जीवन अर्थपूर्ण वाढते. डोळ्यांवर, मनावर, शरीरावर ताण पडतो. शरीरभर होईल. आपले जीवन अधिक प्रमाणात आपल्या वाट्याला अनावश्यक स्पंदने निर्माण होतात. हादरे बसून मज्जातंतू यावे, ते कृतार्थतेने जगता, अनुभवता यावे, त्यासाठी उसंत आणि मणके कमकुवत होतात. कमरेची आणि पाठीची लाभावी म्हणून वाहनांचा वापर करायला हवा. प्रत्यक्षात दुखणी ही वाहनधारकांची व्यथा असते. बसणे, उठणे, LLLLLLL 4 LLLLLLL चढणे, उतरणे, चालणे, वळणे, वर-खाली पाहणे या मुक्त ताण. जीवनातले ताणतणाव वाढवून पोहोचणार तरी कोठे? हालचालींचे संगीत विसरून स्वत:ला वाहनाशी जखडून आपले स्वत्व आणि स्वस्थता हिरावून घेणारा अस्वाभाविक ठेवणे आणि वाहनाचा वेग अंगीकारून आपल्या वेग कमी करणे, हे आपले कर्तव्य आहे. उगाच भावविवश शरीरव्यापारात अडथळे निर्माण करणे हे धोरण निसर्गविरोधी होऊन वेगवश होऊ नये. अनाठायी वेगामुळे पोचण्यापूर्वीच आहे. आरोग्याची हानी करणारे आहे. वाढता वेग म्हणजे अंत होण्याची शक्यता वाढते. (जागर, खंड २) टिपा- (१) लक्ष्मी रोड, महात्मा गांधी मार्ग, जंगली महाराज (२) देहू, आळंदी, सिंहगड, बनेश्वर, विठ्ठलवाडी- रस्ता- पुण्यातील रस्ते. पुण्यातील व पुण्याजवळील स्थळे. कृती (१) (अ) पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा. (१) जीवन विभागणारे घटक- (२) विचारांची गती म्हणजे- (३) अधोगती म्हणजे- (४) अक्षम्य आवेग म्हणजे- (अा) कृती करा. (१) गतीबाबतची लेखकाने (२) लेखकाच्या मते जीवन वर्णिलेली विकृती म्हणजे अर्थपूर्ण तेव्हा होते, जेव्हा (३) (४) लेखकाने सांगितलेली वाहन वाहनाचा वेग अनिवार खरेदी करण्याची कारणे झाला तर (इ) कारणे शोधा व लिहा. (१) अमेरिकेतील माणसांचे जीवन वेगवान असते, कारण............ (२) लेखकाच्या मते गरजेच्या वेळी वाहनांचा वापर करायला हवा, कारण............ (२) (अ) योग्य पर्याय निवडून उत्तर लिहा. (१) जीवन अर्थपूर्ण होईल, जर............ (अ) वाहन कामापुरतेच वापरले तर. (आ) वाहन आवश्यक कामासाठी वापरले तर. (इ) वाहनाचा वेग आटोक्यात ठेवला तर. (ई) वरील तिन्ही गोष्टींचा अवलंब केला तर. (२) निसर्गविरोधी वर्तन नसणे, म्हणजे............ (अ) स्वत:ला वाहनाशी सतत जखडून ठेवणे. LLLLLLL 5 LLLLLLL (आ) वाहनाचा अतिवेग अंगीकारणे. (इ) तातडीचा भाग म्हणून कधीतरी वाहन वापरणे. (ई) गरज नसताना वाहन वापरणे. (आ) वाहन वापरातील फरक स्पष्ट करा. अमेरिका भारत (३) खालील वाक्यांचा अर्थ सोदाहरण स्पष्ट करा. (अ) यथाप्रमाण गती ही गरज आहे; पण अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती ही एक विकृती आहे. (आ) आरंभी माणसे वाहनांवर स्वार होतात. मग वाहने माणसांवर स्वार होतात. (इ) उगाच भावविवश होऊन वेगवश होऊ नये. (४) व्याकरण. (अ) समानार्थी शब्द लिहा. (१) निकड- (२) उचित- (३) उसंत- (४) व्यग्र- (अा) खालील सामासिक शब्दांचा विग्रह करून समास ओळखा. (१) ताणतणाव- (२) दरडोई- (३) यथाप्रमाण- (४) जीवनशैली- (इ) कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा. (१) आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते. (उद्गारार्थी करा.) (२) आपल्याकडे कामाच्या ठिकाणाची अंतरे कमी आहेत. (नकारार्थी करा.) (३) निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी ही माणसे का जात नाहीत? (विधानार्थी करा.) (५) स्वमत. (अ) ‘वाहनांच्या अतिवापराने शरीर व्यापारात अडथळे निर्माण होतात’, तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा. (आ) ‘वाढता वेग म्हणजे ताण’, याविषयी तुमचे मत सविस्तर लिहा. (इ) ‘वाहन हे वेळ वाचवण्यासाठी असते. ते वेळ घालवण्यासाठी नसते’, हे विधान तुमच्या शब्दांत स्पष्ट करा. (ई) ‘वाहनाची अतिगती ही विकृती आहे’, स्पष्ट करा. (६) अभिव्यक्ती. (अ) रस्त्यावरील वाहतूक कोंडीत सापडल्यावर तुमची भूमिका काय असेल ते लिहा. (आ) वाहन चालवत असताना कोणती काळजी घ्यावी, ते तुमच्या शब्दांत लिहा. उपक्रम : ‘वाहतूक नियंत्रण पोलीस कर्मचारी’ यांची अभिरूप मुलाखत तुमच्या वर्गमित्राच्या/मैत्रिणीच्या मदतीने वर्गात सादर करा. l तोंडी परीक्षा. ‘वाहतूक सुरक्षेची गरज’ या विषयावर पाच मिनिटांचे भाषण द्या. LLLLLLL 6 LLLLLLL C C २. रोज मातीत n कल्पना दुधाळ (१९७८) : प्रसिद्ध कवयित्री. ‘सिझर कर म्हणतेय माती’, ‘धग असतेच आसपास’ हे कवितासंग्रह प्रकाशित. ‘सिझर कर म्हणतेय माती’ या पहिल्या कवितासंग्रहास महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ‘कवी कुसुमाग्रज’ पुरस्कारासह एकूण अठ्ठावीस पुरस्कारांनी व ‘धग असतेच आसपास’ या कवितासंग्रहास ‘महाराष्ट्र फाउंडेशन’च्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. रोज मातीत राब राब राबणाऱ्या शेतकरी महिलेचे मनोगत या कवितेतून व्यक्त झाले आहे. आपला स्वत:चा जीवच जणू मातीत रुजवावा इतक्या मन:पूर्वकतेने शेतकरी स्त्री जेव्हा शेतात लावणीसारखी कष्टाची कामे करते, तेव्हा कुठे शेतात गोंदणाच्या नक्षीसारखी हिरवाई फुलू लागते. आपल्या ओढगस्त संसाराला हातभार लावण्यासाठी उन्हातान्हाची पर्वा न करता शेतकरी महिला कांद्याच्या लावणीसारखी वा उसाच्या लागवडीसारखी अत्यंत कष्टाची कामे करत राहते. हिरवीगार दिसणारी शेती काही उगीच पिकत नाही, तर जेव्हा शेतकरी स्त्री रोज श्रम करून, मर मर मरून, सर्वस्व अर्पण करते, तेव्हा कुठे शेतात हिरवेगार पीक डोलू लागते. साध्या सरळ शब्दांतील ही गेय कविता ओळी-ओळींतून पुढे जाताना अंत:स्थ वेदनेमळ ु े काळजाला अधिकाधिक कशी भिडत जाते ते अनुभवूया. सरी-वाफ्यात, कांदं लावते बाई लावते नाही कांदं ग, जीव लावते बाई लावते काळ्या आईला, हिरवं गोंदते बाई गांेदते रोज मातीत, मी ग नांदते बाई नांदते फुलं सोन्याची, झेंडू तोडते बाई तोडते नाही फुलं ग, देह तोडते बाई तोडते घरादाराला, तोरण बांधते बाई बांधते रोज मातीत, मी ग नांदते बाई नांदते LLLLLLL 7 LLLLLLL ऊस लावते, बेणं दाबते बाई दाबते नाही बेणं ग, मन दाबते बाई दाबते कांड्या-कांड्यांनी, संसार सांधते बाई सांधते रोज मातीत, मी ग नांदते बाई नांदते उन्हातान्हात, रोज मरते बाई मरते हिरवी होऊन, मागं उरते बाई उरते खोल विहिरीचं, पाणी शेंदते बाई शेंदते रोज मातीत, मी ग नांदते बाई नांदते (सिझर कर म्हणतेय माती) कृती (१) (अ) कृती करा. कवितेतील स्त्री करत असलेली विविध कामे LLLLLLL 8 LLLLLLL (आ) संदर्भानुसार योग्य जोड्या लावा. ‘अ’ गट ‘ब’ गट (१) नाही कांदं ग, जीव लावते. (अ) गोंदणाच्या हिरव्या नक्षीप्रमाणे शेत पिकाने सजवते. (२) काळ्या आईला, हिरवं गोंदते. (आ) अतोनात कष्टानंतर हिरव्या समृदध् ीच्या स्वरूपात (३) हिरवी होऊन, मागं उरते शिल्लक राहते. (इ) स्वत:चा जीवच जणू कांद्याच्या रोपाच्या रूपात लावते. (२) खालील ओळींचा अर्थ लिहा. सरी-वाफ्यात, कांदं लावते बाई लावते नाही कांदं ग, जीव लावते बाई लावते (३) काव्यसौंदर्य. (अ) ‘काळ्या आईला, हिरवं गोंदते बाई गोंदते’ या ओळींतील भावसौंदर्य स्पष्ट करा. (आ) ‘नाही बेणं ग, मन दाबते बाई दाबते कांड्या-कांड्यांनी, संसार सांधते बाई सांधते’ या ओळींतील विचारसौंदर्य स्पष्ट करा. (४) रसग्रहण. खालील ओळींचे रसग्रहण करा. उन्हातान्हात, रोज मरते बाई मरते हिरवी होऊन, मागं उरते बाई उरते खोल विहिरीचं, पाणी शेंदते बाई शेंदते रोज मातीत, मी ग नांदते बाई नांदते (५) अभिव्यक्ती. (अ) शेतकरी स्त्रियांच्या कष्टमय जीवनाचे वर्णन कवितेच्या आधारे लिहा. (आ) तुमच्या परिसरातील कष्टकरी स्त्रियांचे कुटुंबाच्या उदरनिर्वाहातील योगदान स्पष्ट करा. उपक्रम : (अ) शेतकरी महिलेची मुलाखत घेण्यासाठी प्रश्नावली तयार करा. (अा) यू-ट्यूबवरील कवी विठ्ठल वाघ यांची ‘तिफण’ ही कविता ऐका. l तोंडी परीक्षा. (अ) प्रस्तुत कवितेचे तालासुरात सादरीकरण करा. (आ) प्रस्तुत कवितेचा सारांश तुमच्या शब्दांत सांगा. LLLLLLL 9 LLLLLLL C C ३. आयुष्य... आनंदाचा उत्सव n शिवराज गोर्ले (१९५१) : सुप्रसिद्ध लेखक. नाटक, चित्रपट, दूरदर्शन मालिका, कथा, व्यक्तिचित्र, कादंबरी, ललितलेख, वृत्तपत्रीय स्तंभ इत्यादी माध्यमांतून विपुल लेखन प्रसिद्ध. ‘कुर्यात् सदा टिंगलम्’, ‘गोलमाल’ इत्यादी गाजलेल्या नाटकांसाठी तसेच ‘थरथराट’, ‘चिमणी पाखरं’ इत्यादी लोकप्रिय चित्रपटांसाठी पटकथा, संवाद लेखन त्यांनी केले आहे. त्यांनी मराठीत प्रेरक साहित्याचे दालन समृद्ध केले. ‘मजेत जगावं कसं?’ या त्यांच्या गाजलेल्या पुस्तकाला ‘महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचा’ पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय त्यांची ‘माणसं जोडावी कशी?’, ‘मस्त राहावं कसं?’, ‘यशस्वी व्हावं कसं?’, ‘तुम्ही बदलू शकता’ अशी अनेक प्रेरक पुस्तके प्रसिद्ध आहेत. ‘सर्वस्व’, ‘शोधार्थ’, ‘एका कल्पनेची आत्मकथा’ या कादंबऱ्या प्रसिद्ध. त्यांच्या ‘नग आणि नमुने’ या विनोदी पुस्तकाला महाराष्ट्र राज्य शासनाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. प्रत्येकाला आनंद हवा असतो; परंतु बऱ्याचदा आनंद म्हणजे काय आणि तो कसा मिळवावा हे उमगत नाही. खरेतर आनंद बाहेर नसून अंतरंगात असतो; पण त्यासाठी आनंदाचे भान जागे असावे लागते, हे या पाठात लेखकाने हलक्याफुलक्या शैलीत उलगडले आहे. आनंद नेमका कशात असतो, तो कसा अनुभवायचा असतो, छोट्या छोट्या गोष्टीतही आनंद कसा भरून राहिलेला असतो, आनंदी राहण्याची सवय कशी लावून घ्यावी यासंबंधी विविध उदाहरणांमधून केलेले विवेचन आनंदी राहण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन करणारे आहे. निसर्गाची सोबत, संगीताची साथ आणि पुस्तकांचा सहवास आनंदी राहण्यासाठी कसे उपयुक्त ठरतात, यासंबंधीच्या पाठातील विवेचनामुळे आपणास जीवनात आनंदी राहण्याचा राजमार्ग गवसतो. आनंद सगळ्यांनाच हवा असतो... पण आपला येतो. आपल्या आयुष्यासोबत ज्याचं अस्तित्व असतं, तो आनंद नेमका कशात आहे, हे अनेकांना कळत नसतं. म्हणजे अस्तित्वाचा आनंद. आपलं अस्तित्व आपण आनंद म्हणजे नेमकं काय हेही उलगडलेलं नसतं. कुठे नेहमीच गृहीत धरून चालतो आणि अस्तित्वाच्या असतो हा आनंद? कुठे नसतो हा आनंद? आनंदी आनंद आनंदाला मुकतो. आपल्या अस्तित्वाची साक्ष देत असतो, गडे, जिकडे तिकडे चोहीकडे! ही फक