XI Marathi Textbook PDF

Summary

इयत्ता अकरावीचे हे मराठी युवकभारती पाठ्यपुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ यांनी प्रकाशित केले आहे. हे पुस्तक भाषा आणि साहित्याच्या विविध पैलूंचा परिचय करून देते, ज्यात गद्य, पद्य, व्याकरण आणि लेखन कौशल्ये यांचा समावेश आहे. या पाठ्यपुस्तकात विद्यार्थ्यांना भाषेच्या विविध क्षमता विकसित करता येतील.

Full Transcript

शासन निर्णय क्रमांक : अभ्यास-२११६/(प्र.क्र.४३/१६) एसडी-४ दिनांक २५.४.२०१६ अन्वये स्थापन करण्यात आलेल्या समन्वय समितीच्या दि. २०.०६.२०१९ रोजीच्या बैठकीमध्ये हे पाठ्यपुस्तक सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षापासून निर्धारित करण्यास मान्यता देण्यात आली आहे....

शासन निर्णय क्रमांक : अभ्यास-२११६/(प्र.क्र.४३/१६) एसडी-४ दिनांक २५.४.२०१६ अन्वये स्थापन करण्यात आलेल्या समन्वय समितीच्या दि. २०.०६.२०१९ रोजीच्या बैठकीमध्ये हे पाठ्यपुस्तक सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षापासून निर्धारित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. मराठी युवकभारती इयत्ता अकरावी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे ४. आपल्या स्मार्टफोनवरील DIKSHA APP द्वारे पाठ्यपुस्तकाच्या पहिल्या पृष्ठावरील Q. R. Code द्वारे डिजिटल पाठ्यपुस्तक व त्या पाठासंबधं ित अध्ययन- अध्यापनासाठी उपयुक्त दृक्‌-श्राव्य साहित्य उपलब्ध होईल. l l प्रथमावृत्ती ः २०१९ © महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पहिले पुनर्मुद्रण ः २०२० पुणे - ४११ ००४. या पुस्तकाचे सर्व हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाकडे राहतील. या पुस्तकातील कोणताही भाग संचालक, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ यांच्या लेखी परवानगीशिवाय उद्धृत करता येणार नाही. मराठी भाषा अभ्यासगट सदस्य मराठी भाषा तज्ज्ञ समिती श्री. हरी नारलावार श्रीमती शीतल सामंत श्री. शिवाजी तांबे (अध्यक्ष) श्री. प्रवीण खैरे श्रीमती सुचेता नलावडे फादर फ्रान्सिस दिब्रिटो (सदस्य) श्रीमती वैदेही तारे श्री. जगदीश भोईर डॉ. स्नेहा जोशी (सदस्य) श्रीमती प्रांजली जोशी डॉ. पांडुरंग कंद डॉ. माधुरी जोशी (सदस्य) डॉ. नंदा भोर श्री. ललित पाटील श्रीमती स्वाती ताडफळे (सदस्य) श्री. विजय राठोड डॉ. सुजाता शेणई श्री. ज्योतिराम कदम (सदस्य) डॉ. सुहास सदाव्रते श्रीमती रेणू तारे श्रीमती संध्या विनय उपासनी डॉ. विनोद राठोड डॉ. महादेव डिसले श्रीमती सविता अनिल वायळ (सदस्य-सचिव) डॉ. माधुरी काळे श्रीमती आरती देशपांडे संयोजन ः श्रीमती सविता अनिल वायळ विशेषाधिकारी, मराठी मुख्य समन्वयक श्रीमती संध्या विनय उपासनी श्रीमती प्राची रविंद्र साठे सहायक विशेषाधिकारी, हिंदी चित्रकार ः राजेंद्र गिरधारी मुखपृष्ठ ः विवेकानंद पाटील अक्षरजुळणी ः भाषा विभाग, पाठ्यपुस्तक मंडळ, पुणे. निर्मिती ः सच्चिदानंद आफळे, मुख्य निर्मिती अधिकारी प्रकाशक राजेंद्र चिंदरकर, निर्मिती अधिकारी विवेक उत्तम गोसावी राजेंद्र पांडलोसकर, सहायक निर्मिती अधिकारी नियंत्रक पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ, कागद ः ७० जी.एस.एम. क्रीमवोव्ह प्रभादेवी, मुंबई - २५. मुद्रणादेश ः N/PB/2020-21/(1.0) मुद्रक ः More and Company, Kolhapur l l प्रस्तावना प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तुमचे इयत्ता अकरावीच्या वर्गात मन:पूर्वक स्वागत! मराठी ‘युवकभारती’ हे पाठ्यपुस्तक तुमच्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. भाषा आणि जीवन यांचा संबंध अतूट आहे. महाराष्ट्राची राजभाषा म्हणून मराठी भाषा आपल्याला अधिक जवळची आहे. तुम्हांला भाषेचे चांगले व्यावहारिक उपयोजन करता यायला हवे, यासाठी मराठी विषयाकडे ‘भाषा’ म्हणून पाहा. भाषिक कौशल्यांच्या दृष्टीने समृद्ध होण्यासाठी हे पाठ्यपुस्तक तुमच्यासाठी महत्त्वाचे साधन ठरणार आहे. या पाठ्यपुस्तकाची रचना पाच भागांत केली आहे. अध्ययन-अध्यापनाच्या दृष्टीने ही रचना उपयुक्त ठरेल. जीवनातील आव्हाने पेलण्याची, प्रेरणा देण्याची ताकद साहित्यात असते. या पाठ्यपुस्तकातून तुम्हांला विविध साहित्यप्रकारांची ओळख तर होणार आहेच, शिवाय अनेक जुन्या-नव्या साहित्यिकांची लेखनशैली तुम्हांला अभ्यासता येणार आहे. यांमधून तुम्ही मराठी साहित्याची आणि भाषेची श्रीमंती अनुभवू शकाल. साहित्यप्रकार म्हणून ‘नाटक’ या साहित्यप्रकाराचा थोडक्यात परिचय आणि तीन नाट्यउतारे पाठ्यपुस्तकात दिले आहेत. ‘दृक्‌-श्राव्य साहित्यप्रकार’ म्हणून तुम्ही याचा अभ्यास करणार आहात. या अभ्यासातून तुम्हांला छंद वा व्यवसाय म्हणून नाटकाकडे वळता येईल अथवा चांगले रसिक प्रेक्षक म्हणून तुम्ही अशा कलाकृतींचा आस्वाद घेऊ शकाल. पुस्तकात व्याकरण घटकांची मांडणी कार्यात्मक पद्धतीने केली आहे. त्यामुळे व्याकरण शिकणे अधिक सोपे होईल. उपयोजित लेखन विभागात अंतर्भूत केलेले घटक हे कालसुसंगत असून, या घटकांच्या अध्ययनातून अनेक व्यावसायिक संधी तुमच्या दृष्टिक्षेपात येऊ शकतील. विचारशक्ती, कल्पनाशक्ती, सर्जनशीलता यांच्या विकासाची संधी देणाऱ्या अनेक कृती पाठ्यपुस्तकात दिल्या आहेत. त्यात तुम्हीही अनेक नव्या कृतींची भर घालू शकाल. या कृतींमुळे पाठ, कविता वा संबधं ित घटकांचे तुम्हांला उत्तम प्रकारे आकलन होण्यास मदत होईल आणि भाषिक कौशल्यांचा अधिक चांगल्या प्रकारे विकास होण्यासाठी त्या उपयुक्त ठरतील. पाठ्यघटकांशी संबधं ित अनेक उपयुक्त संदर्भ क्यू. आर. कोडच्या माध्यमातून तुम्हांला अभ्यासता येणार आहेत. उच्च माध्यमिक स्तरावर इयत्ता अकरावीमध्ये कृतिपत्रिकेच्या माध्यमातून तुमचे मराठी भाषा विषयाचे मूल्यमापन होणार आहे. त्यासाठी आकलन, उपयोजन, स्वमत आणि अभिव्यक्ती यांकडे तुम्हांला अधिक लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. त्या दृष्टीने पाठांखाली दिलेल्या कृती तुम्हांला मार्गदर्शक ठरतील. ‘वाचत राहा, व्यक्त व्हा, लिहिते व्हा.’ उज्ज्वल यशासाठी तुम्हां सर्वांना शुभेच्छा! (डॉ. सुनिल मगर) पुणे संचालक दिनांक : २० जून, २०१९ महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व भारतीय सौर दिनांक : ३० ज्येष्ठ, १९४१ अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे. भाषाविषयक क्षमता ः प्रथम भाषा मराठी इयत्ता अकरावीच्या अखेरीस विद्यार्थ्यांमध्ये भाषाविषयक पुढील क्षमता विकसित व्हाव्यात, अशी अपेक्षा आहे. क्षेत्र क्षमता l श्राव्य माध्यमांतील चर्चा, परिसंवाद, निवेदन, जाहिरात, बातम्या, सूत्रसंचालन, रेडिओजॉकीचे कार्यक्रम इत्यादींमधील भाषिक वैशिष्ट्ये लक्षात घेऊन त्यांतील विचार समजून घेणे. l सार्वजनिक ठिकाणी दिल्या जाणाऱ्या सूचनांमधील शब्दयोजना समजून त्याला योग्य प्रतिसाद देणे. श्रवण l औपचारिक व अनौपचारिक ठिकाणी होणारी व्याख्याने, संवाद-संभाषणे यांतील संदर्भांचा चिकित्सकपणे अर्थ लावता येणे. l भाषिक कौशल्यांच्या विकासासाठी विविध श्राव्य माध्यमांचा उदा., आकाशवाणी व ध्वनिफिती यांचा माहितीचे स्रोत म्हणून उपयोग करणे. l आंतरजालावरून लिंक्स, क्यू. आर. कोड, व्हिडिओज, यू ट्यूब व प्रसारमाध्यमे, इत्यादी दृक्‌-श्राव्य माध्यमांतून अपेक्षित व अध्ययनपूरक संदर्भ विकसित करता येणे. l विविध साहित्यकृतींवर आधारित चर्चेत सहभागी होताना साधक-बाधक विचारांच्या मांडणीसाठी विषयानुरूप भाषा वापरता येणे. l साहित्यप्रकारांची सर्वसाधारण वैशिष्ट्ये सांगता येणे. भाषण- l सूत्रसंचालन, रेडिओजॉकी या घटकांचे सादरीकरण करता येणे. संभाषण l विषयाला अनुसरून स्वत:चे स्वतंत्र विचार संदर्भासहित मांडता येणे. l भाषण-संभाषण कौशल्याची वैशिष्ट्ये आत्मसात करून त्याचा व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीने आत्मविश्वासपूर्वक वापर करता येणे. l नाटक, कथा, काव्य व अन्य साहित्यकृतींचे अभिवाचन करता येणे. l संकेतस्थळावरील ई-बुक्स, ई-न्यूज आणि ई-साहित्य शोधून वाचन करता येणे. वाचन l स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने मराठी भाषाविषयाशी संबधं ित उपयुक्त घटकांचे अभ्यासपूर्ण वाचन करणे. l पाठ व पाठाशी संबंधित मूळ साहित्यकृतीचे व संदर्भ साहित्याचे वाचन करणे. l साहित्याच्या आस्वादासाठी वाचन करणे. l पाठाचा आशय व त्या पाठातील विचार यांबाबत स्वत:चे मत, स्वत:च्या भाषेत समर्पक शब्दांत लिहिणे. l जे अनुभव घेतले, जे निरीक्षण केले त्यांवर केलेला विचार यांबाबत लिखित स्वरूपात लेखन अभिव्यक्त होणे. l स्वत:चा ब्लॉग लिहिता येणे. l अनुवाद करण्याचे तंत्र प्राप्त करणे. l संदर्भांसाठी कोशवाङ्‌मय अभ्यासता येणे. l अनुभवलेल्या विविध घटनांसंदर्भात व्यापक अर्थाने अभिव्यक्त होता येणे. l आंतरजालाचा वापर करून व्यवहार करता येणे. l संगणकावर उपलब्ध असणाऱ्या विविध शैक्षणिक ॲप्लिकेशन्सचा उत्तमरीत्या कृतियुक्त वापर करता येणे. l प्रसारमाध्यमांतून समोर येणाऱ्या घटकांचे सांगोपांग आकलन करून त्याविषयी चिकित्सक अध्ययन मांडणी करता येणे. कौशल्य l विविध सामाजिक अडसरांचे आकलन करून घेऊन, त्यांच्या निर्मूलनासाठी स्पष्टपणे विचारांची मांडणी करता येणे. l बहुभाषा परिचय करून घेण्याची जिज्ञासा निर्माण होणे. l वाङ्‌मयीन उपक्रमांद्वारे अभिरुची घडवणे व सहभागातून ती वृद्‌धिंगत करणे. l तंत्रज्ञान आणि आंतरजाल यांचा योग्य वापर करून ‘स्व’ला अभिव्यक्त करून विकसित करता येणे. l लेखननियमांनुसार मुद्रितशोधनाचे कौशल्य प्राप्त करता येणे. l भाषाभ्यास-वाक्यसंश्लेषण, काळाचे उपप्रकार, शब्दभेद, वाक्प्रचार व म्हणी, गटात न बसणारा शब्द, पारिभाषिक शब्द, इंग्रजी आणि मराठी म्हणी, काही साहित्यिकांची टोपण भाषाभ्यास नावे व पूर्ण नावे, काही साहित्यिक व त्यांच्या प्रसिद्ध रचना, ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त मराठी साहित्यिक. l भाषासौंदर्य- शब्दशक्ती, काव्यगुण, अर्थच्छटा या सर्व संकल्पनांचे आकलन करून घेऊन स्वत:च्या भाषेत त्याचे उपयोजन कौशल्यपूर्ण रीतीने करता येणे. पाठ्यपुस्तकाच्या अंतरंगाविषयी... मराठी युवकभारती हे इयत्ता अकरावीचे पाठ्यपुस्तक अध्ययन-अध्यापनासाठी आपल्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. इयत्ता अकरावीसाठी मराठी भाषा विषयाची उद्‌दिष्टे समोर ठेवून नेमकेपणाने क्षमता विधाने निश्चित केली आहेत. आपल्या संदर्भासाठी पाठ्यपुस्तकाच्या सुरुवातीलाच ही क्षमता विधाने दिली आहेत. श्रवण, भाषण-संभाषण, वाचन, लेखन, अध्ययन कौशल्ये व भाषाभ्यास या क्षेत्रांमध्ये या क्षमता विधानांचे वर्गीकरण केले आहे. ही क्षमता विधाने चिकित्सकपणे अभ्यासावीत, पाठ्यघटकांशी आणि स्वाध्यायांमधील कृतींशी पडताळून पाहून या क्षमता कोणकोणत्या पाठ्यघटकांमधून विकसित होऊ शकतात हे विचारात घ्यावे. इयत्ता अकरावीच्या अखेरीस विद्यार्थ्यांमध्ये या भाषाविषयक क्षमता विकसित व्हाव्यात यासाठी नियोजनपूर्वक प्रयत्नशील राहावे अशी अपेक्षा आहे. पाठ्यपुस्तकाची रचना पाच भागांत करण्यात आली आहे. भाग एक व दोन मध्ये गद्य-पद्य घटकांची योजना केली आहे. अध्ययन-अध्यापनाचे नियोजन करण्याच्या दृष्टीने ही योजना उपयुक्त ठरेल. मराठी भाषा आणि साहित्याला वैभवशाली परंपरा आहे. जुन्या-नव्या साहित्यिकांची लेखनशैली, त्यांतील भाषासौंदर्य, चपखल शब्दयोजना, शब्दांत लपलेला गर्भितार्थ यांचा अभ्यास करताना विद्यार्थी आनंद घेऊ शकतील. या प्रत्येक गद्य-पद्य पाठाच्या निवडीमागे प्राधान्याने भाषिक कौशल्यांच्या विकासाचा विचार केला आहे. तसेच गाभा घटक, नैतिक मूल्ये, जीवनकौशल्ये यांचा जाणीवपूर्वक विचार केला आहे. पाठ्यपुस्तकातील भागांचा आणि पाठांचा क्रम निश्चित करताना आशयाचे स्वरूप तसेच मूल्यमापन आराखडा विचारात घेतला आहे. गद्य पाठांमध्ये व्यक्तिचित्रणपर, वैचारिक, प्रस्तावना, चिंतनपर, विनोदी कथा, चरित्रपर असे विविध साहित्यप्रकार समाविष्ट केले आहेत. ‘मामू’ या पाठामधून मामूचे व्यक्तिचित्र प्रत्यक्ष डोळ्यांसमोर उभे राहते. पुस्तके वैचारिक व भावनिक सोबत कशी करतात हा विचार ‘अशी पुस्तकं’ या पाठामध्ये आला आहे. ‘परिमळ’ या पाठामधून प्रस्तावना लेखनाचा वेगळा परिपाठ आपल्यासमोर येतो. माणसा-माणसांतील संवादाचा अभाव ‘माणूस बांधूया’ या चिंतनपर पाठामधून अधोरेखित होतो. ‘वहिनींचा सुसाट सल्ला’ या कथेमधून होणारी विनोद निर्मिती आपल्या चेहऱ्यावर हास्य फुलवते. कोणत्याही सर्वोत्कृष्ट कार्यासाठी कल्पकतेची आणि परिश्रमाची किती परिसीमा गाठावी लागते याचे दर्शन ‘वाङ्मयीन लेण्याचा शिल्पकार’ या चरित्रपर पाठातून होते. हे सर्व पाठ भाषा आणि आशयाच्या दृष्टीने समृद्ध आणि वैविध्यपूर्ण आहेत. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे ‘स्वतंत्रतेचें स्तोत्र’ हे राष्ट्रभक्तीपर पद्य काव्यानंदासाठी दिलेले आहे. पद्य घटकांमध्ये निसर्गकविता, प्रेमकविता, संतकाव्य, विद्रोही कविता, स्त्रीवादी कविता असे विषयांमधील वैविध्य जपण्याचा प्रयत्न केला आहे. घनावळीशी नाते जोडणारी ‘प्राणसई’, निसर्गाशी एकरूप होण्याची आस बाळगणारी ‘झाडांच्या मनात जाऊ’ ही सहजसुंदर रचना, प्रेयसीच्या दृष्टिभेटीचे तरल वर्णन करणारी ‘दवांत आलिस भल्या पहाटीं’ ही प्रेमकविता, अमृताशी पैजां जिंकणाऱ्या मराठी भाषेचे महत्त्व सांगणारी संत ज्ञानेश्वरांची ‘ऐसीं अक्षरें रसिकें’ ही ओवीबद्ध रचना, जीवनातल्या अंधारात प्रकाशवाटा दाखवणारी ‘शब्द’ ही कविता आणि स्त्री स्वातंत्र्याचे टप्पे प्रतीकांच्या माध्यमांतून उलगडून दाखवणारी ‘पैंजण’ अशा कवितांची मालिका आपल्यासमोर उलगडत जाते. गेयता, लयबद्धता आणि अलंकार वैभव ही या पाठ्यपुस्तकातील कवितांची काही वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे कवितांमधील काव्यानुभव मनात पोहोचतो. आशय, विचार, भावना, शब्दसौंदर्य, अर्थसौंदर्य, विचारसौंदर्य या सर्व दृष्टीने यांकडे पाहायला हवे. पद्य घटकांत ‘रसग्रहण’ कृतीचा समावेश आहे. पद्य रचनेतून निर्माण होणारी स्थायीभाव जागृती व त्यांतून निर्माण होणारी रसनिर्मिती व्यक्त करणे रसग्रहणात अपेक्षित आहे. त्यासाठी त्या रचनेतील आशयसौंदर्य, विचारसौंदर्य, भावसौंदर्य उलगडून दाखवणे, त्या रचनेची वैशिष्ट्ये स्पष्ट करणे, रचनेतील प्रतिमा व प्रतीके समजून घेऊन त्यांची दखल घेणे आवश्यक आहे. रसग्रहणासंबधं ी स्वतंत्र माहिती दिली असून कवितेचे रसग्रहण करताना ती मार्गदर्शक ठरेल. बहुतेक गद्य-पद्य पाठांमध्ये चित्रांचा समावेश केला आहे. त्यामुळे मजकुराला आकर्षकता लाभून आशय उलगडायला मदत होते. ‘नाटक’ हा साहित्यप्रकार पाठ्यपुस्तकात स्वतंत्रपणे अंतर्भूत केला आहे. त्याच्या अभ्यासातून या साहित्यप्रकाराकडे पाहण्याची सजग दृष्टी विकसित होणे अपेक्षित आहे. या साहित्यप्रकाराची व्याप्ती मोठी आहे. इयत्ता अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा भाषिक आवाका लक्षात घेऊन, त्यांना समजेल-रुचेल अशा पद्धतीने नाटकाचा परिचय करून देण्यात आला आहे. नाटक म्हणजे काय? नाट्य म्हणजे काय? त्याचबरोबर संगीत नाटक, प्रायोगिक नाटक व व्यावसायिक नाटक यांविषयीची ओळख करून देण्यात आली आहे. सोबत तीन नाट्य उतारेही देण्यात आले आहेत. तीन नाट्यउताऱ्यांचे स्वरूप वेगळे आहे. आशय, भाषाशैली, काळ या दृष्टीने ते ‘वेगळे’ आहेत. स्वत:मधील ‘अभिनेत्याला’ वाव मिळावा म्हणून नटाने रचलेली ‘हसवाफसवी’ ही संहिता प्रेक्षकांना हसवता-हसवता अंतर्मुख करणारी आहे. या नाटकातील उतारा या दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण आहे. ‘ध्यानीमनी’ या नाटकातील आई व तिचे ‘काल्पनिक मूल’ यांच्या नात्यातील भावनिक बंध विचार करायला प्रवृत्त करणारा आहे. या नाटकाचे अनेक पदर अर्थपूर्ण आहेत. या नाट्यउताऱ्यातील आशय अगदी वेगळा विचार देणारा आहे. दोन पिढ्यांतील अंतर अधोरेखित करणाऱ्या, इतिहास काळातील सामाजिक स्थितीचे दर्शन घडवणाऱ्या ‘सुंदर मी होणार’ या नाट्यउताऱ्यामधील आशय आणि संवाद यांमधून नाटकाचे स्वरूप स्पष्ट व्हायला मदत होते. ‘नाटक’ या साहित्यप्रकाराच्या अभ्यासामुळे विद्यार्थ्यांना नाटकाशी संबंधित व्यावसायिक संधीची माहिती मिळू शकेल. ‘उपयोजित मराठी’ या भागात ‘सूत्रसंचालन’, ‘मुद्रितशोधन’, ‘अनुवाद’, ‘अनुदिनी (ब्लॉग) लेखन’, ‘रेडिओजॉकी’ या घटकांची माहिती दिली आहे. हे सर्व घटक भाषिक कौशल्यांच्या उपयोजनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहेतच; शिवाय त्या त्या क्षेत्रांतील व्यावसायिक संधींची माहिती देणारे आहेत. त्यांच्या अभ्यासातून प्राप्त केलेली भाषिक कौशल्ये ‘प्रकल्प’ व ‘सादरीकरण’ आणि ‘प्रात्यक्षिक’ यांच्या माध्यमांतून व्यक्त करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. भाग पाचमध्ये व्याकरण घटकांची रचना कार्यात्मक पद्धतीने केली आहे. शब्दशक्ती, काव्यगुण, वाक्यसंश्लेषण, काळ, शब्दभेद या व्याकरण घटकांतून भाषिक कौशल्यांच्या विकासाला शास्त्रशुद्ध पाया मिळेल. तसेच विद्यार्थ्यांची भाषा समृद्ध होण्यास अधिक मदत होईल. ‘परिशिष्टात’ भाषाविकासाच्या दृष्टीने उपयुक्त ‘पारिभाषिक शब्द’, ‘इंग्रजी आणि मराठी म्हणी’, ‘काही साहित्यिकांची टोपण नावे व पूर्ण नावे’, ‘काही साहित्यिक व त्यांच्या प्रसिद्ध रचना’, ‘ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त मराठी साहित्यिक’ अशा सामान्यज्ञानाच्या दृष्टीने उपयुक्त ठरणाऱ्या माहितीचा समावेश केला आहे. विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कृतिपत्रिकेच्या माध्यमातून होणार असल्यामुळे पाठातील प्रत्येक घटकाखाली कृतींच्या स्वरूपातील स्वाध्याय दिले आहेत. स्वाध्यायातील कृती आकलन, उपयोजन, विश्लेषण, संश्लेषण, तार्किक विचार, कार्यकारणभाव व सर्जनशीलता यांवर आधारित असून त्यांमधून भाषिक विकास, विचार-विकसन, कल्पनाशक्तीला चालना मिळण्यास व साहित्यिक जाण प्रगल्भ होण्यास मदत होणार आहे. सर्व स्वाध्यायांमधील कृतींमध्ये वैविध्य आहे; परंतु कृतींचे सर्व प्रकार प्रत्येक पाठाखाली देण्यास मर्यादा आहेत. पाठाचा आशय व भाषा विचारात घेऊन आपण योग्य त्या नावीन्यपूर्ण कृतींची भर घालावी. पूर्वज्ञानावर आधारित व्याकरणाच्या पायाभूत स्वरूपातील कृती त्या त्या पाठाखाली देण्यात आल्या आहेत. प्रथम, द्‌वितीय वा तृतीय स्तरावर भाषा शिकलेल्या विद्यार्थ्यांनाही या कृती सहज सोडवता येतील अशा आहेत. यामागे विद्यार्थ्यांचे व्याकरणाचे सर्वसामान्य ज्ञान ताजे राहावे, असा हेतू आहे. पाठ्यपुस्तकातील पहिल्या पानावर दिलेल्या क्यू. आर. कोडचा अध्यापनात अवश्य उपयोग करावा. त्यामुळे आपली आणि विद्यार्थ्यांची संदर्भ समृद्धी वाढेल. दैनदिं न जीवनाशी सांगड घालणारे मराठी भाषा विषयाचे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे, त्यांना साहित्याचा आस्वाद घेता यावा आणि या भाषाभ्यासातून ‘उद्याचे वाचक-लेखक-कवी-व्यावसायिक’ घडावेत यासाठी हे पाठ्यपुस्तक महत्त्वाचे साधन ठरेल, असा विश्वास आहे. अनुक्रमणिका भाग - १ भाग - २ अ. क्र. पाठ, कविता पृ. क्र. अ. क्र. पाठ, कविता पृ. क्र. स्वतंत्रतेचें स्तोत्र (काव्यानंद) १ ७. ‘माणूस’ बांधूया! २९ - स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर - प्रवीण दवणे १. मामू २ - शिवाजी सावंत ८. ऐसीं अक्षरें रसिकें (संतकाव्य) ३३ - संत ज्ञानेश्वर २. प्राणसई (कविता) ७ - इंदिरा संत ९. वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला ३६ - शोभा बांेद्रे ३. अशी पुस्तकं ११ - डॉ. निर्मलकुमार फडकुले १०. शब्द (कविता) ४४ - यशवंत मनोहर ४. झाडांच्या मनात जाऊ (कविता) १६ - नलेश पाटील ११. वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार ४७ - सुमती देवस्थळे ५. परिमळ १९ - प्रल्हाद केशव अत्रे १२. पैंजण (कविता) ५३ - नीलम माणगावे ६. दवांत आलिस भल्या पहाटीं (कविता) २५ - बा. सी. मर्ढेकर कवितेचे रसग्रहण ५८ भाग -३ भाग -४ अ. क्र. साहित्यप्रकार पृ. क्र. अ. क्र. उपयोजित मराठी पृ. क्र. नाटक- साहित्यप्रकार-परिचय ६१ १. सूत्रसंचालन ८८ १. हसवाफसवी - दिलीप प्रभावळकर ७० २. मुद्रितशोधन ९३ २. ध्यानीमनी - प्रशांत दळवी ७५ ३. अनुवाद १०१ ३. सुंदर मी होणार - पु. ल. देशपांडे ८० ४. अनुदिनी (ब्लॉग) लेखन १०८ ५. रेडिओजॉकी ११४ भाग -५ अ. क्र. व्याकरण पृ. क्र. १. शब्दशक्ती ११९ २. काव्यगुण १२३ ३. वाक्यसंश्लेषण १२६ ४. काळ १३० ५. शब्दभेद १३२ परिशिष्टे १३७ भाग - १ स्वतंत्रतेचें स्तोत्र (काव्यानंद) स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर (१८८३ ते १९६६) : कवी, कादंबरीकार, आत्मचरित्रकार, नाटककार, विचारवंत, निबंधकार. लहानपणापासूनच देशभक्ती आणि स्वातंत्र्याचा ध्यास. त्यातूनच मातृभूमीच्या सेवेची प्रतिज्ञा. ‘अभिनव भारत’ या संस्थेची स्थापना. ‘माझी जन्मठेप’ हा आत्मचरित्रात्मक ग्रंथ. वयाच्या अकराव्या वर्षी पहिले कवितालेखन. ‘गोमांतक’, ‘कमला’, ‘महासागर’, ‘विरहोच्छ्‌वास’ ही खंडकाव्ये; ‘मृत्युपत्र’, ‘स्वतंत्रतेचें स्तोत्र’, ‘जगन्नाथाचा रथ’, ‘सप्तर्षी’, ‘तारकांस पाहून’ इत्यादी कविता प्रसिद्ध. तरलता, कोमल भावना, भव्यतेची ओढ, ओज, आत्मसमर्पणाचा ध्यास, तत्त्वचिंतनात्मक वृत्ती ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये. ‘भाषाशुद्धी’ व ‘लिपिशुद्धी’ या वाङ्‌मयीन चळवळी. क्रांतिकारकत्व, प्रखर विज्ञाननिष्ठा, जहाल भूमिका, बुद्‌धिवादी विचारसरणी यांमुळे सर्वच लेखन प्रभावी. त्यांच्या साहित्यातून जाज्वल्य राष्ट्रभक्तीची भावना प्रकट होते. त्यांनी मराठीच्या साहित्यवैभवात फार मोठी भर घातली. प्रस्तुत देशभक्तीपर रचनेत कवीने स्वातंत्र्यदेवतेचे स्तोत्र गायले आहे. स्वातंत्र्य म्हणजे राष्ट्राचे चैतन्य आहे, श्वास आहे. राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी जगणे हीच देशवासीयांच्या जीवनाची सार्थकता आहे. आपली प्रत्येक कृती आणि त्या मागचा भाव हा राष्ट्रसमर्पणाचा, राष्ट्रहिताचा असावा असा संदेश कवी या कवितेतून देतात. जयोऽस्तु ते श्रीमहन्मंगले! शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवति! त्वामहं यशोयुतां वंदे ।।धृ.।। राष्ट्राचें चैतन्य मूर्त तूं नीति-संपदांची स्वतंत्रते भगवति! श्रीमती राज्ञी तूं त्यांची परवशतेच्या नभांत तूंची आकाशीं होशी स्वतंत्रते भगवती! चांदणी चमचम लखलखशी गालावरच्या कुसुमीं किंवा कुसुमांच्या गालीं स्वतंत्रते भगवती! तूच जी विलसतसे लाली तूं सूर्याचें तेज उदधिचें गांभीर्यहि तूंची स्वतंत्रते भगवती! अन्यथा ग्रहण नष्ट तेंची मोक्ष मुक्ति हीं तुझींच रूपें तुलाच वेदांती स्वतंत्रते भगवती! योगिजन परब्रह्म वदती जें जें उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर तें तें स्वतंत्रते भगवती! सर्व तव सहचारी होतें हे अधम-रक्त-रंजिते । सुजन-पूजिते । श्रीस्वतंत्रते तुजसाठिं मरण तें जनन तुजवीण जनन तें मरण तुज सकल चराचर शरण भरतभूमिला दृढालिंगना कधिं देशिल वरदे सावरकरांची कविता स्वतंत्रते भगवति! त्वामहं यशोयुतां वंदे (संपादक : वासुदवे गोविंद मायदेव) 1 १. मामू शिवाजी सावंत (१९४० ते २००२) : सुप्रसिद्ध कादंबरीकार. ‘मृत्युंजय’ ही त्यांची कादंबरी म्हणजे त्यांच्या लेखनकर्तृत्वाचे शिखर आहे. चरित्रात्मक कादंबरीलेखन हे त्यांचे आवडते लेखनक्षेत्र. ‘छावा’, ‘युगंधर’, ‘लढत’ या प्रसिद्ध कादंबऱ्या. ‘अशी मने असे नमुने’, ‘मोरावळा’, ‘लाल माती रंगीत मने’ हे व्यक्तिचित्रण संग्रह प्रसिद्ध. ‘शेलका साज’, ‘कांचनकण’ हे ललितलेखन प्रसिद्ध. भारतीय ज्ञानपीठाचा ‘मूर्तिदेवी’ पुरस्कार, सर्वोत्कृष्ट वाङ्‌मयाच्या महाराष्ट्र राज्य पुरस्काराने पाच वेळा गौरवान्वित. ‘पूनमचंद भुतोडिया’ हा बंगाली पुरस्कार, पुणे विद्यापीठातर्फे ‘जीवनगौरव’ पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित. १९९० यावर्षी साहित्याच्या नोबेल पारितोषकासाठी नामांकन. ‘मामू’ हा व्यक्तिचित्रणात्मक पाठ असून मामूच्या स्वभावाच्या विविध पैलूंचे वर्णन पाठात केले आहे. प्रामाणिक, देशाभिमानी, नम्र, सेवाभावी व सहृदयी असलेला ‘मामू’ माणुसकीचे विलोभनीय दर्शन घडवतो. समर्पक शब्दरचना, चित्रदर्शी लेखनशैली यांमुळे ‘मामू’ हे व्यक्तिमत्त्व परिणामकारकतेने मनाला भिडते. ‘घण्‌घण्‌घण्‌ऽऽ!’ थोराड घंटेचे टोलांवर टोल पडत प्रार्थना संपते. ‘जनगणमन’ची इशारत मिळते. राहतात. चैतन्याचे छोटे कोंब उड्या घेत वाड्याच्या खांबाला रेललेला मामू पाय जोडून सावधानचा पवित्रा प्रार्थनामंदिराकडं एकवटू लागतात. समाधानी चर्येनं मामू घेऊन खडा होतो. स्टुलावरून खाली उतरतो. या शाळेचा मामू एक अवयव झालाय. गेली चाळीस रांगा धरून उभे राहिलेले अनघड, कोवळे कंठ वर्षे तो आपल्या अलिबाबाच्या हातानं घंटेचे टोल देत, जोडल्या हातांनी आणि मिटल्या डोळ्यांनी भावपूर्ण सुरात असे चैतन्याचे कोंब नाचवत आलाय. कोल्हापूर संस्थान प्रार्थनेतून अज्ञात शक्तीला आळवू लागतात. होतं तेव्हा राजाराम महाराजांच्या कारकिर्दीतील मामूची मामू एका दगडी खांबाला रेलून आपली चुनेवाणाची नेमणूक आहे. त्यानं दोन राज्यं बघितली. संस्थानाचं आणि सफेद दाढी कुरवाळत ती समूह प्रार्थना ऐकत राहतो. त्याचं लोकशाहीचं. कोल्हापूरकरांच्या कैक पिढ्या बघितल्या. मन कशात तरी गुंतून पडतं. 2 मामूच्या सफेद दाढीत जेवढे केस आहेत तेवढ्या असंच एकदा मामूच्या घरी त्याच्या दुसऱ्या नंबरच्या त्याच्या आठवणी असतील! खूप बघितलंय आणि भोगलंय मुलाचं ‘शादी मुबारक’ निघालं. ठरल्याप्रमाणं मामू मला त्यानं. महाराजांचा मुक्काम पन्हाळ्यावर पडला तर मामूला आमंत्रण द्यायला आला. ‘‘सर, पोराचं लग्न हाय. यायला भल्या पहाटे उठून साथीदारांसह चौदा मैलांची पायपीट पाहिजे.’’ करावी लागलीय; पण ही आठवण सांगताना कुठं वेदनेची ‘‘मामू, तुमच्या पोराचं लग्न आहे तर न येऊन कसं कळ त्याच्या दाढीधारी चर्येवर तरळत नाही. उलट एका चालेल? नक्की येईन.’’ मी उत्तर िदलं. सच्च्या सेवकाला शोभेल अशी अभिमानाची झालर एका मित्राला घेऊन संध्याकाळी शादीच्या मंडपात त्याच्या मुखड्यावर उतरते. डोळे किलकिले करत, भुवया गेलो. मंडप माणसांनी भरला होता. मामूनं पुढे येत मला आक्रसून त्याच्या बुढ्या देहातील उमदं मन बोलून जातं, हाताला धरून आघाडीला नेऊन बसवलं. ‘सर, फाटेचं धुक्यातनं पन्हाळ्यावर चढणं लई गमतीचं. त्या मंडपात आमदार होते, खासदार होते, बडे आता वाटतं पर न्हाई झेपत.’ व्यापारी होते, शिक्षक, प्राध्यापक होते. हयातभर अंगावर संस्थानं विलीन झाली आणि असा इमानी चाकरवर्ग पट्टा चढवून शिपाई म्हणून केलेल्या चाकरीचं चीज चौवाटा पांगला. त्यातच मामू या शाळेत रुजू झाला. एक झाल्याचं समाधान त्याच्या सफेद दाढीभर पसरलं होतं. शिपाई म्हणून. निका लागला. मामूनं जमलेल्या लोकांचे आभार डुईला अबोली रंगाचा फेटा, अंगात नेहरू शर्टावर गर्द मानण्यासाठी माईक हातात घेतला. निळं जाकीट, जाकिटाच्या खिशात चांदीच्या साखळीचं ‘‘आज माज्या मुलाच्या लग्नाला आमदारसाहेब एक जुनं पॉकेट वॉच, खाली घेराची आणि घोट्याजवळ आलेत, खासदार साहेब आलेत, मृत्युंजयकार आलेत- चुण्या असलेली तुमान, पायात जुनापुराणा पंपशू हा मामूचा माज्या गरिबाच्या...’’ मामूचा कंठ दाटून आला. त्याला पोशाख आहे. बोलता येईना. त्याची अनुभवानं पांढरी झालेली दाढी शाळेत तो शिपाई आहे; पण शाळेबाहेर तो बहुरूपी थरथरत राहिली. मामूनं कसेबसे आभार मानून हातातील आहे. कुठं फळांच्या मार्केटमध्ये एखाद्या बागवानाच्या माईक खाली ठेवला. दुकानावर घटकाभर बसून त्याचं दुकान चालव, तो हातावर ठेवेल ते अल्लाची खैर म्हणून आपलंसं कर; कुठं एखाद्या ‘धर्मापेक्षा माणूस मोठा आहे आणि माणसापेक्षा मुस्लिम अधिकाऱ्याच्या बच्चाबच्चीला उर्दूची शिकवण माणुसकी फार फार मोठी आहे!’ असे विचार घेऊनच त्या दे. एक ना दोन नानातऱ्हेचे उद्योग मामू करतो. दिवशी मी मंडपातून बाहेर पडलो. शाळेतील लोकांना तो शिपाई वाटतो. शाळेबाहेरच्या मामूचा शेवटचा बच्चा शाबू माझ्या हाताखाली लोकांना त्याची अनेक रूपं दिसतात. मौलवी, व्यापारी, शिकला. चांगल्या गुणांनी एस. एस. सी. पास झाला. तो उस्ताद या सगळ्यांचा अंतर्भाव करता येईल असं साऱ्यांनी पास होताच मामूचं माझ्यामागं लकडं लागलं, ‘‘सर, त्याला सुटसुटीत नाव देऊन टाकलंय-मामू! शाबूला कुठंतरी चिकटवा.’’ दहा वर्षांपूर्वी मी या शाळेत रुजू झालो तेव्हापासून या ‘‘मामू, हा शेवटचा बच्चा. तुमच्यात कुणीच माणसाला जवळून पारखत आलोय. गरीब माणसानं किती पदवीधर नाही. याला शिकू द्या. याला नोकरीत आणि कसं हुशार असावं याचा मामू एवढा मासला मला अडकवलात, की हा संपला. जरा नेट धरा. काही अडलं काही बघायला मिळालेला नाही. नडलं मला सांगा.’’ मी मामूला दिलासा देत होतो. मी मामूच्या घरी गृहप्रवेशाच्या कार्यक्रमाला गेलो. बदलत्या काळाची पावलं ओळखून मामूनं निर्धार त्याची कर्तबगारी बघून खूप समाधान वाटलं. मामूनं बांधला. पोराला कॉलेजात दाखल केलं. केलेल्या कष्टमय चाकरीचं फळ म्हणून असेल; पण त्याची परवा परवा मामूची बुढी आई अल्लाला प्यारी झाली. सगळीच मुलं गुणवान निघालीत. पैसा कमावतात म्हणून तिच्या आठवणी सांगताना मामूच्या डोळ्यांत पाणी माज नाही. बापाचा शब्द त्यांच्या लेखी शेवटचा शब्द तरळलं. ‘दुनियेत सारं मिळेल सर; पण आईची माया आहे. तो कधी खाली पडत नाही. कुणाकडनं न्हाई मिळायची’, हे त्याचे बोल ऐकताना 3 नातवंडं असलेला मामू मला त्याच्या शाबूसारखा पोर- विचारतो. मी उत्तर देतो, ‘‘ऐतिहासिक काळात वावरतो वयाचा वाटला. त्याची आई वारली त्या दिवशी शाळेला ना सध्या! नुसती इशारतीबरहुकूम कामं हाेतात आमची!’’ सुट्टी मिळाली. एकदा मी आणि मामू शाळेच्या व्हरांड्यात बाकावर हे हायस्कूल शंभर वर्षांवर जुनं आहे. इथलं रेकॉर्ड गप्पा मारत बसलो. त्या दिवशी मामू खुलला होता. त्यामुळं अवाढव्य आहे. कुणी माजी विद्यार्थी येतो. संस्थानिकांच्या काळच्या, वाड्यावरच्या एक-एक अजब १९२०-२२ सालातील आपल्या नावाचा दाखला मागतो. गमती सांगत होता. तीन तास केव्हा मागं पडले होते मामू ते रजिस्टर अचूक शोधून त्याचं नाव धुंडून काढतो. दोघांनाही कळलं नाही. हाती दाखला पडलेला, बाप्या झालेला विद्यार्थी मामूचा प्रसंगी मामू एखाद्या कार्यक्रमाच्या वेळी हात हातात घेऊन म्हणतो, ‘‘चलो मामू, चाय लेंगे.’’ मुलांच्यासमोर दहा-वीस मिनिटे एखाद्या विषयावर बोलू ‘‘कशाला? नगं आत्ताच घेतलाय. कुठं हाय आता शकतो. त्याला जसं उर्दूचं ज्ञान आहे तसंच त्याला तुम्ही?’’, मामू त्याचा चहा नाकारण्याचा प्रयत्न करतो. वैद्यकाचंही ज्ञान आहे. लहानसर चण असलेल्या मनात जुन्या आठवणी रेंगाळणारा विद्यार्थी त्याचा हात शिक्षकाला तो म्हणतो, ‘‘काय पवार सर, काय ही तब्येत? खेचून त्याला आग्रहानं चहाला नेतो. मग चहा पिता पिता पैसं काय कोन उरावर बांधून नेणार जाताना? जरा अंग त्याच्या वेळच्या शिक्षकांच्या आठवणींना उजाळा मिळतो. धरीसारकं कायतरी खावा. मी सांगतो तुमाला. साखरेच्या ‘एम. आर. सर भारी माणूस. केवढा आब होता त्या पाकात तूप घालून त्यात शेरभर साफ धुतलेल्या खारका वक्ताला हायस्कूलचा.’ मामू हरवलेल्या काळाला मुठीत बिया काढून पंधरा दिस मुरतीला घाला. रोज सकाळी पकडण्याचा प्रयत्न करतो. अनोशा पोटी दोन-दोन खावा. म्हयन्याभरात तुमाला कुनी ही शाळा सरकारी आहे. इथं ड्रॉईंगच्या, कॉमर्सच्या वळखनार न्हाई!’’ सरकारी सर्टिफिकेटच्या परीक्षांचं केंद्र आहे. या परीक्षा कुणाच्या पायाला लागलं तर त्यावर कुठला पाला आल्या, की बुढा मामू पाखरागत हालचाली करू लागतो. वाटून लावावा याचा सल्ला द्यायला मामू विसरत नाही. नंबर टाकणं, बाकडी हालवून बैठकीची व्यवस्था करणं, कुणाचं पोट बिघडलं तर त्यावर कुठला काढा प्यावा याची पाणी देण्यासाठी गोरगरिबांची पोरं ऑफिसात आणून सूचना द्यायला तो चुकत नाही. दाखल करणं. पडेल ते काम मामू उत्साहानं करू लागतो. शाळेत एखादा कार्यक्रम निघाला, की त्याची कधी खेळताना, कधी प्रार्थनेच्या वेळेला एखादं पोरगं आखणी मामूच्या हातात येते. फ्लॉवरपॉटपासून चक्कर येऊन कोसळतं. रिक्षा आणून, त्यात त्या पोराला टेबलक्लॉथपर्यंत सारी जुपी जोडून देऊन पुन्हा कार्यक्रमाच्या घालून डॉक्टरकडं नेताना मामू त्याला आईच्या मायेने धीर वेळी एखादा कोपरा धरून, वक्ता काय काय बोलतो हे तो देत म्हणतो, ‘‘घाबरू नकोस. ताठ बस. काय झालं न्हाई नीट ध्यान देऊन ऐकतो. कार्यक्रम संपला, की मामूला तुला.’’ विचारावं, ‘कसा झाला कार्यक्रम?’ वक्त्यात काही खास सव्वीस जानेवारी, पंधरा ऑगस्ट या राष्ट्रीय दिवशी नसेल तर नाराजी प्रकट करण्याचीही त्याची एक ढब आहे. कधी कधी मामूच्या हातानं इथला राष्ट्रध्वज, दंडावर ‘बोललं चांगलं ते, पर म्हनावी तशी रंगत न्हाई भरली.’ सरसरत चढतो. शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरच्या माथ्यावर आणखी वर्षानंतर मामू या शाळेतून सेवानिवृत्त निकोप वाऱ्यावर फडफडत राहतो. फेट्याजवळ हाताचा होणार. रोजाना दिसणारा त्याचा अबोली रंगाचा फेटा पंजा भिडवून मामू राष्ट्रगीत संपेपर्यंत ध्वजाकडं मान उंचावून आणि सफेद दाढी आता दिसणार नाही. माणसाच्या बघत राहतो. आयुष्याला कुठं ना कुठं वळण असतं. टाळतो म्हटल्यानं ते माझ्याकडं कुणी बडा पाहुणा आला, की मामूकडं नाही टाळता येत. बघत नुसती मान डुलवली, की तिचा इशारा पकडत मामू सरकारी नियमच आहे. त्याप्रमाणे मामूला घरी जावं चहाची ऑर्डर देतो. पाहुणा बसेपर्यंत चहा दाखल होतो. लागणार; पण मला मात्र वाटत राहातं, की त्याच्या ‘‘राजे, चहा केव्हा सांगितलात?’’ पाहुणा आश्चर्यानं शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्या हातानं इथल्या थोराड घंटेचे 4 ‘घण्‌ घण्‌ घण्‌’ असे टोल पडत राहावेत. त्या टोलांच्या ऐकताना बुढा, पार बुढा झालेला मामू असा कसल्यातरी तालावर चैतन्याचे अगणित कोवळे कोंब नाचत राहावेत. विचारात कायमचा हरवलेला बघायला मिळावा. जोडल्या हातांनी अाणि िमटल्या डोळ्यांनी, कवळिकीच्या असंख्य अनघड कंठांतून प्रार्थनेचे धीरगंभीर बोल असेच (लाल माती रंगीत मने) उमटत राहावेत आणि दगडी खांबाला रेलून ते प्रार्थनाबोल ËËËËËËËËËËË कृती ËËËËËËËËËËË (१) (अ) कोण ते लिहा. (१) चैतन्याचे छोटे कोंब- (२) सफेद दाढीतील केसांएवढ्या आठवणी असणारा- (३) शाळेबाहेरचा बहुरूपी- (४) अनघड, कोवळे कंठ- (अा) कृती करा. (१) लेखकाने विद्यार्थ्यांचे वर्णन (२) करण्यासाठी वापरलेले मामूची शालाबाह्य रूपे शब्दसमूह (इ) खालील वाक्यांतून तुम्हांला समजलेले मामूचे गुण लिहा. (१) मामू सावधानचा पवित्रा घेऊन खडा होतो................ (२) आईच्या आठवणी सांगताना मामूच्या डोळ्यांत पाणी येते................ (३) मामू त्याला आईच्या मायेने धीर देत म्हणतो, ‘‘घाबरू नकोस. ताठ बस. काय झालं न्हाई तुला.’’  ........... (४) माझ्याकडं कुणी बडा पाहुणा आला, की मामूकडं बघत नुसती मान डुलवली, की तिचा इशारा पकडत मामू चहाची ऑर्डर देतो................ (५) मामू एखाद्या कार्यक्रमात मुलांच्यासमोर दहा-वीस मिनिटे एखाद्या विषयावर बोलू शकतो.  ........... (ई) खालील शब्दसमूहांचा अर्थ लिहा. (१) थोराड घंटा (२) अभिमानाची झालर (२) व्याकरण. (अ) खालील शब्दांतील अक्षरे निवडून अर्थपूर्ण शब्द तयार करा. (१) इशारतीबरहुकूम (२) आमदारसाहेब (३) समाधान (आ) खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा. (१) चौवाटा पांगणे- (२) कंठ दाटून येणे- (३) हरवलेला काळ मुठीत पकडणे- 5 (इ) खालील शब्दांचे दिलेल्या तक्त्यामध्ये वर्गीकरण करा. (१) अनुमती (४) घटकाभर (७) नानातऱ्हा (१०) अभिवाचन (२) जुनापुराणा (५) भरदिवसा (८) गुणवान (३) साथीदार (६) ओबडधोबड (९) अगणित उपसर्गघटित प्रत्ययघटित अभ्यस्त (३) स्वमत. (अ) ‘शाळेत तो शिपाई आहे; पण शाळेबाहेर तो बहुरूपी आहे’, या मामूसंबंधी केलेल्या विधानाचा अर्थ पाठाधारे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा. (आ) मामूच्या संवेदनशीलतेची दोन उदाहरणे तुमच्या शब्दांत लिहा. (इ) मामूच्या व्यक्तित्वाचे (राहणीमान, रूप) चित्रण तुमच्या शब्दांत करा. (४) अभिव्यक्ती. (अ) ‘मामू’ या पाठाची भाषिक वैशिष्ट्ये स्पष्ट करा. (आ) मामूच्या स्वभावातील विविध पैलंच ू े विश्लेषण करा. (इ) ‘माणसापेक्षा माणुसकी फार फार मोठी आहे!’, या विधानातील आशयसौंदर्य तुमच्या शब्दांत लिहा. प्रकल्प. तुमच्या परिसरातील ‘मामू’ सारख्या बहुगुणी व्यक्तीचा शोध घ्या. त्याच्या व्यक्तिविशेषाचे वर्णन तुमच्या शब्दांत करा. ||| * भाषाभ्यास * l उपसर्गघटित शब्द- शब्दांच्या पूर्वी उपसर्ग लागून जे शब्द तयार होतात त्यांना ‘उपसर्गघटित’ शब्द म्हणतात. उदा., अवघड, भरधाव, अतिशय, उपसंपादक, बेडर, नापसंत. l प्रत्ययघटित शब्द- शब्दाच्या किंवा धातूच्या पुढे एक किंवा अधिक प्रत्यय लागून काही शब्द तयार होतात, अशा शब्दांना ‘प्रत्ययघटित’ शब्द असे म्हणतात. उदा., दुकानदार, गुलामगिरी, खोदाई, टाकाऊ, झोपाळू, मानसिक, जडत्व, खोदाईसाठी. l अभ्यस्त शब्द- द्‌वित्व किंवा पुनरावृत्तीने तयार झालेले शब्द म्हणजे ‘अभ्यस्त’ शब्द होत. (अ) पूर्णाभ्यस्त शब्द- एक शब्द पुन: पुन्हा येऊन एक जोडशब्द तयार होतो. उदा., लाललाल, तिळतिळ, हालहाल (अा) अंशाभ्यस्त शब्द- काही वेळा शब्दात त्याच शब्दाची पूर्ण पुनरावृत्ती न होता एखादे अक्षर बदलून येते. अशा शब्दास अंशाभ्यस्त शब्द म्हणतात. उदा., आंबटचिंबट, भाजीबिजी, गोडधोड इत्यादी. (इ) अनुकरणवाचक शब्द- काही शब्दांत ध्वनिवाचक शब्दांची पुनरावृत्ती साधलेली असते, त्या शब्दांना ‘अनुकरणवाचक’ शब्द असे म्हणतात. उदा., गडगड, वटवट, किरकिर इत्यादी. 6 २. प्राणसई इंदिरा संत (१९१४ ते २०००) : कवयित्री, कथाकार, ललित लेखिका. लहानवयापासून वाङ्‌मयाचे संस्कार. उत्कट, भावपूर्ण आणि प्रतिभासंपन्न काव्यशैली. ‘सहवास’ हा पहिला प्रकाशित काव्यसंग्रह. ‘शेला’, ‘मेंदी’, ‘मृगजळ’, ‘रंगबावरी’, ‘बाहुल्या’, ‘गर्भरेशीम’ इत्यादी कवितासंग्रह प्रसिद्ध. ‘श्यामली’, ‘चैतू’ हे कथासंग्रह व ‘मृदगं्‌ ध’, ‘मालनगाथा’ हे ललित लेखसंग्रह प्रसिद्ध. त्यांच्या ‘गर्भरेशीम’ या कवितासंग्रहास साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित केले आहे. उन्हाळा संपत आलेला असला तरी त्याचा ताप अजूनही असह्य आहे. पावसाळा सुरू होण्याची प्रतीक्षा आहे. घराघरांत, शेताशेतांवर आवश्यक पूर्वतयारी झाली आहे. अशा वेळी पावसाळ्यापूर्वीच्या स्थितीचे वर्णन करताना कवयित्रीने या कवितेतून मैत्रिणीच्या नात्याने घनावळीला म्हणजे मेघमालेला केलेले आवाहन, धाडलेला निरोप भावरम्य आहे. ग्रामीण भागातील घराघरांतून केल्या जाणाऱ्या पावसाळ्यापूर्वीच्या तयारीचे वर्णन समर्पक शब्दांत कवितेत आले आहे. ही तयारी झाल्यावर पावसाची आळवणी केली आहे. प्रस्तुत कविता अष्टाक्षरी छंदात असून दुसऱ्या व चौथ्या चरणात यमक साधलेले आहे. पीठ कांडते राक्षसी तसें कडाडतें ऊन : प्राणसई घनावळ कुठे राहिली गुंतून? दिला पाखरांच्या हातीं माझा सांगावा धाडून : ये ग ये ग घनावळी मैत्रपणा आठवून... पडवळा-भोपळ्यांचीं आळीं ठेविलीं भाजून, हुडा मोडून घरांत शेणी ठेविल्या रचून, बैल झाले ठाणबंदी, झाले मालक बेचैन, तोंडे कोमेलीं बाळांचीं झळा उन्हाच्या लागून, विहिरीच्या तळीं खोल दिसूं लागलें ग भिंग, मन लागेना घरांत : कधी येशील तू सांग? 7 ये ग दौडत धावत आधी माझ्या शेतावर : शेला हिरवा पांघर मालकांच्या स्वप्नांवर, तशी झुलत झुलत ये ग माझिया घराशीं : भाचे तुझे झोंबतील तुझ्या जरीच्या घोळाशीं, आळें वेलाचें भिजूं दे, भर विहीर तुडुंब : सारें घरदार माझें भिजूं दे ग चिंब चिंब; उभी राहून दारांत तुझ्या संगती बोलेन : सखा रमला शेतांत त्याचे कौतुक सांगेन... कां ग वाकुडेपणा हा, कां ग अशी पाठमोरी? ये ग ये ग प्राणसई वाऱ्यावरून भरारी. (समग्र इंदिरा संत) 8 टीप u अष्टाक्षरी छंद- कवितेच्या प्रत्येक चरणात आठ अक्षरे असतात त्यावेळी ‘अष्टाक्षरी छंद’ होतो. उदाहरणार्थ, तशी झुलत झुलतà आठ अक्षरे. भाचे तुझे झोंबतीलà आठ अक्षरे. ये ग माझिया घराशींà आठ अक्षरे. तुझ्या जरीच्या घोळाशींà आठ अक्षरे. ËËËËËËËËËËË कृती ËËËËËËËËËËË (१) (अ) चौकटी पूर्ण करा. (१) कवयित्रीने जिला विनंती केली ती- (२) कडाडत्या उन्हाला दिलेली उपमा- (३) कवयित्रीच्या मैत्रिणीला सांगावा पोहोचवणारी- (४) शेतात रमणारी व्यक्ती- (आ) कारणे लिहा. (१) बैलांचे मालक बेचैन झाले आहेत, कारण......... (२) बाळांची तोंडे कोमेजली, कारण......... (इ) कृती करा. कवयित्रीने प्राणसईच्या आगमनानंतर व्यक्त केलेल्या अपेक्षा (२) (अ) खालील काव्यपंक्तींचा अर्थ स्पष्ट करा. (१) ये ग दौडत धावत आधी माझ्या शेतावर (२) तशी झुलत झुलत ये ग माझिया घराशीं (३) वििहरीच्या तळीं खोल दिसूं लागलें ग भिंग (आ) खालील तक्त्यात सुचवल्यानुसार कवितेच्या ओळी लिहा. प्राणसईला कवयित्री प्राणसई न आल्याने प्राणसई हीच मालकाच्या विनंती करते त्या कवयित्रीच्या अस्वस्थ कवयित्रीची मैत्रीण स्वप्नपूर्तीसाठी ओळी मनाचे वर्णन आहे हे आवाहन करणाऱ्या ओळी दर्शवणाऱ्या ओळी करणाऱ्या ओळी 9 (३) काव्यसौंदर्य. (अ) खालील ओळींतील भावसौंदर्य स्पष्ट करा. (१) ‘कां ग वाकुडेपणा हा, कां ग अशी पाठमोरी? ये ग ये ग प्राणसई वाऱ्यावरून भरारी’ (२) ‘शेला हिरवा पांघर मालकांच्या स्वप्नांवर’ (आ) कवयित्रीने उन्हाळ्याच्या तीव्रतेचे वर्णन करताना योजलेली प्रतीके स्पष्ट करा. (इ) ‘कवयित्री आणि प्राणसई यांच्यातील नाते जिव्हाळ्याचे आहे’, स्पष्ट करा. (४) अभिव्यक्ती. (अ) तुमच्या परिसरातील पावसाळ्यापूर्वीच्या स्थितीचे वर्णन करा. (आ) पावसानंतर तुमच्या परिसरात होणाऱ्या बदलाचे वर्णन करा. (इ) पावसानंतर कोणाकोणाला कसाकसा आनंद होतो ते लिहा. (५) रसग्रहण. ‘प्राणसई’ या कवितेचे रसग्रहण करा. ||| * शब्दसंपत्ती. खालील शब्दांचे समानार्थी शब्द शोधून शब्दमनोरा पूर्ण करा. उदा., वात समुद्र वा रा अ नि ल स मी र ण विद्युत तलाव चंद्र अंधार 10 ३. अशी पुस्तकं डॉ. निर्मलकुमार फडकुले (१९३० ते २००६) : संत साहित्याचे अभ्यासक, समीक्षक, प्रसिद्ध वक्ते. त्यांनी लिहिलेली अनेक स्वतंत्र व संपादित पुस्तके प्रसिद्ध. ‘कल्लोळ अमृताचे’, ‘चिंतनाच्या वाटा’, ‘प्रिय आणि अप्रिय’, ‘सुखाचा परिमळ’ हे साहित्य. ‘संतकवी तुकाराम : एक चिंतन’, ‘संत चोखामेळा आणि समकालीन संतांच्या रचना’, ‘संतांचिया भेटी’, ‘संत वीणेचा झंकार’, ‘संत तुकारामांचा जीवनविचार’ ही संत साहित्याचा अभ्यास मांडणारी पुस्तके तसेच ‘समाजपरिवर्तनाची चळवळ : काल आणि आज’, ‘साहित्यातील प्रकाशधारा’ हे लेखसंग्रह प्रसिद्ध. संतसाहित्य हा त्यांच्या विशेष आस्थेचा विषय होता. ‘प्रबोधनातील पाऊलखुणा’ आणि ‘निवडक लोकहितवादी’ या संपादित पुस्तकांतून एकोणविसाव्या शतकातील सुधारणाविषयक चळवळीसंबंधीचा त्यांचा व्यासंग प्रकट होतो. ‘भैरू रतन दमाणी’ साहित्य पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे. प्रस्तुत पाठातून माणसाच्या जडणघडणीत असलेली पुस्तकांची भूमिका व्यक्त झाली आहे. पुस्तकांचे महत्त्व वर्णन करताना पुस्तक वाचनाचा व्यापक दृष्टिकोन लेखकाने व्यक्त केला आहे. जन्मभर भावनिक सोबत करणारी पुस्तके ही जगण्याची हिंमत वाढवतात आणि प्रेरणा देतात. पुस्तके ही मानवी

Use Quizgecko on...
Browser
Browser