Marathi Kumar Bharati (Class 10) Marathi Textbook PDF
Document Details
Uploaded by WellBredBallad
2018
Tags
Summary
This Marathi language textbook for class 10 introduces different literary forms and language skills. It includes exercises and illustrations to enhance understanding and learning.
Full Transcript
‘amR>r B¶ËVm Xhmdr शासन निर्णय क्रमांक : अभ्यास-२११६/(प्र.क्र.४३/१६) एसडी-४ दिनांक २५.४.२०१६ अन्वये स्थापन करण्यात आलेल्या समन्वय समितीच्या दि. २९.१२.२०१७ रोजीच्या बैठकीमध्ये हे पाठ्यपुस्तक सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून निर्धारित करण्यास मान्यता देण्यात आली आहे....
‘amR>r B¶ËVm Xhmdr शासन निर्णय क्रमांक : अभ्यास-२११६/(प्र.क्र.४३/१६) एसडी-४ दिनांक २५.४.२०१६ अन्वये स्थापन करण्यात आलेल्या समन्वय समितीच्या दि. २९.१२.२०१७ रोजीच्या बैठकीमध्ये हे पाठ्यपुस्तक सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून निर्धारित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. मराठी इयत्ता दहावी (प्रथम भाषा) महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे ४. आपल्या स्मार्टफोनवरील DIKSHA APP द्व ारे पाठ्यपुस्तकाच्या पहिल्या पृष्ठावरील Q. R. Code द्व ारे डिजिटल पाठ्यपुस्तक व प्रत्येक पाठामध्ये असलेल्या Q. R. Code द्वारे त्या पाठासंबंधित अध्ययन अध्यापनासाठी उपयुक्त दृक्श्राव्य साहित्य उपलब्ध होईल. प्रथमावृत्ती ः २०१८ © महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे - ४११ ००४. या पुस्तकाचे सर्व हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाकडे राहतील. या पुस्तकातील कोणताही भाग संचालक, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ यांच्या लेखी परवानगीशिवाय उद्धृत करता येणार नाही. मराठी भाषा अभ्यासगट सदस्य मराठी भाषा तज्ज्ञ समिती श्रीमती स्वाती ताडफळे प्रा. विजय राठोड श्रीमती नेहा रावते डॉ. नंदा भोर श्री. देविदास तारू श्रीमती अन्वया काणे फादर फ्रान्सिस दिब्रिटो (सदस्य) डॉ. शारदा निवाते श्रीमती प्रांजली जोशी श्रीमती सुप्रिया खाडिलकर डॉ. स्नेहा जोशी (सदस्य) श्रीमती अनुजा चव्हाण श्रीमती वैदेही तारे श्री. सुनिल बनसोडे श्रीमती माधुरी जोशी (सदस्य) श्री. मोहन शिरसाट डाॅ. सुभाष राठोड डॉ. जगदीश पाटील श्री. शिवाजी तांबे (सदस्य) श्री. प्रवीण खैरे श्री. नाना लहाने श्री. रमाकांत देशपांडे डॉ. सुजाता महाजन (सदस्य) श्री. प्रमोद डाेंबे श्रीमती प्रतिभा लोखंडे श्री. नामदेव एडके श्रीमती सविता अनिल वायळ श्री. समाधान शिकेतोड श्रीमती जयमाला मुळीक श्री. रविंद्रदादा डोंगरदेव (सदस्य-सचिव) श्री. बापू शिरसाठ डॉ. मंजूषा सावरकर श्री. दिलीप देशपांडे श्री. मयुर लहाने श्रीमती स्मिता जोशी संयोजन ः श्रीमती सविता अनिल वायळ विशेषाधिकारी, मराठी चित्रकार ः फारुख नदाफ प्रकाशक मुखपृष्ठ ः विवेकानंद पाटील विवेक उत्तम गोसावी नियंत्रक अक्षरजुळणी ः भाषा विभाग, पाठ्यपुस्तक मंडळ, पुणे. पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ, निर्मिती ः सच्चिदानंद आफळे, मुख्य निर्मिती अधिकारी प्रभादेवी, मुंबई - २५. राजेंद्र चिंदरकर, निर्मिती अधिकारी राजेंद्र पांडलोसकर, सहायक निर्मिती अधिकारी कागद ः ७० जी.एस.एम. क्रिमवोव्ह मुद्रणादेश ः मुद्रक ः प्रस्तावना प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तुम्हां सर्वांचे इयत्ता दहावीच्या वर्गात स्वागत आहे. ‘कुमारभारती’ मराठी हे तुमच्या आवडीचे भाषेचे पुस्तक! इयत्ता दहावीचे ‘कुमारभारती’ मराठी हे पाठ्यपुस्तक तुमच्या हाती देताना आनंद होत आहे. मित्रांनो, आपण एकमेकांशी संवाद साधण्यासाठी मराठी भाषेचा वापर करतो. मराठी ही आपल्या राज्याची राजभाषा आहे. आपले विचार, मते, कल्पना, भावभावना समोरील व्यक्तीसमोर योग्यप्रकारे आणि प्रभावीपणे मांडायच्या असतील तर भाषेवर प्रभुत्व हवे. या पुस्तकाचा अभ्यास केल्यामुळे तुमचे भाषेवरील प्रभुत्व वाढावे, भाषेचा विविध प्रकारे वापर करणे तुम्हांला सहज जमावे असे आम्हांला वाटते. पाठ्यपुस्तकाच्या सुरुवातीला क्षमतांची यादी दिलेली आहे. त्यावरून कोणती भाषिक कौशल्ये आत्मसात करायची आहेत याची तुम्हांला कल्पना येऊ शकेल. या पाठ्यपुस्तकाच्या अंतरंगात डोकावल्यावर तुमच्या लक्षात येईल, की त्यामध्ये विविध साहित्यप्रकारांचा समावेश केलेला आहे. या सर्व साहित्यप्रकारांतील आशय आणि भाषा यांमधील वैविध्य तुम्हांला नक्कीच आवडेल. या अभ्यासातून तुम्हांला मराठी भाषेचे शब्दवैभव विविधांगी आहे हे लक्षात येईल. या पाठ्यपुस्तकाचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक पाठाखालील स्वाध्यायांचे स्वरूप आणि रचना वैविध्य. हे स्वाध्याय तुम्हांला पाठांचे अंतरंग समजून घेण्यास मदत करतील. तुमची आकलनशक्ती, विचारशक्ती, कल्पनाशक्ती आणि सृजनशीलता विकसित करण्याच्या हेतूने स्वाध्यायांतील कृतींची रचना जाणीवपूर्वक केली आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि तुमचे स्वयंअध्ययन यांमधून भाषा शिकताना तुम्हांला अभ्यासाचे ओझे वाटणार नाही. पाठांतराचे दडपणही राहणार नाही. दैनंदिन व्यवहारात आपणाला पावलोपावली मराठी भाषेचा वापर करावा लागतो. त्या दृष्टीने तुमची उत्तम तयारी व्हावी यासाठी या पाठ्यपुस्तकातील उपयोजित लेखनाचा सराव उपयुक्त ठरेल. त्याचबरोबर रोजच्या व्यवहारांमध्ये तुम्हांला तंत्रज्ञानाचा वापर करायचा आहे. त्यासाठी पाठ्यघटकांशी संबधं ित अधिक माहिती मिळवण्यासाठी संकेतस्थळांची यादीही दिलेली आहे. प्रत्येक पाठासंबधं ी अधिक माहिती मिळवण्यासाठी ॲपच्या माध्यमातून क्यू. आर. कोडद्वारे उपयुक्त दृक्श्राव्य साहित्य आपणांस उपलब्ध होईल. त्याचा तुम्हांला अभ्यासासाठी निश्चितच उपयोग होईल. भाषिक विकासाबरोबरच विचारक्षमता, अभिव्यक्ती कौशल्ये आणि सृजनशीलता यांच्या विकासासाठी उपयुक्त ठरू शकणारे हे पाठ्यपुस्तक तुम्हांला आवडेल, असा विश्वास आहे. (डॉ. सुनिल मगर) संचालक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे. भाषाविषयक क्षमता ः प्रथम भाषा मराठी इयत्ता दहावीच्या अखेरीस विद्यार्थ्यांमध्ये भाषाविषयक पुढील क्षमता विकसित व्हाव्यात, अशी अपेक्षा आहे. क्षेत्र क्षमता १. विविध प्रसारमाध्यमांद्वारे प्रसारित होणाऱ्या चर्चा, संवाद ऐकून त्यांमधील सत्यता पडताळून पाहून त्याबाबत स्वत:चे मत निश्चित करता येणे. २. सार्वजनिक ठिकाणी ऐकलेल्या सूचनांनुसार आपल्याशी संबधं ित असलेल्या सूचना लक्षात घेणे. ३. औपचारिक व अनौपचारिक संवाद व संभाषण ऐकून चिकित्सक विचारासह त्यात सहभागी होता येणे. श्रवण ४. विविध साहित्यांतील भावार्थ समजून घेता येणे. ५. विविध साहित्यप्रकारांच्या ध्वनिफिती ऐकून त्यातील स्वराघात, आरोह-अवरोह या वैशिष्ट्यांची जाण होणे. ६. परिसरात बोलल्या जाणाऱ्या विविध बोलीभाषा ऐकून त्यांच्या वैशिष्ट्यांनुसार तुलना करता येणे. १. विविध पद्यप्रकारांना चाली लावून त्यांचे सादरीकरण करता येणे. २. विविध साहित्यप्रकारांच्या मूल्यमापनाचे निकष ठरवून ते सांगता येणे. ३. विषयानुरूप स्वत:चे स्वतंत्र विचार परखडपणे मांडता येणे. भाषण- ४. विविध उपक्रमांचे नियोजन, आयोजन करून त्यात सक्रिय सहभाग घेता येणे. संभाषण ५. प्रभावी भाषण-संभाषण कौशल्याची वैशिष्ट्ये समजून घेऊन त्यांचा योग्य वापर करता येणे. ६. साहित्याची समीक्षा करून त्याबाबत आपले मत मांडता येणे. १. योग्य गतीने व विरामचिन्हांची दखल घेऊन अर्थपूर्ण प्रकट वाचन करता येणे. २. विविध साहित्यप्रकारांचे समजपूर्वक वाचन करून त्याचा आस्वाद घेता येणे. ३. संकेतस्थळावर उपलब्ध असणाऱ्या इ-साहित्याचे वाचन करून आस्वाद घेता येणे. वाचन ४. आंतरजालावर उपलब्ध असलेल्या संकेतस्थळावरील माहितीचे वाचन करून, त्या माहितीचा स्वयंअध्ययनासाठी उपयोग करता येणे. ५. सार्वजनिक ठिकाणच्या सूचना व माहिती चिकित्सकपणे वाचून पडताळून पाहता येणे. १. लेखन करताना शुद्धलेखनाच्या नियमांचे पालन करता येणे. २. वाचलेल्या साहित्याच्या आशयातील मध्यवर्ती विचारांचा, कल्पनांचा विस्तार करता येणे. ३. दिलेल्या विषयामध्ये स्वत:च्या विचारांची, कल्पनांची भर घालून पुनर्लेखन करता येणे. ४. म्हणी, वाक्प्रचार, शब्दसमूह, सुभाषिते यांचा लेखनात प्रभावीपणे वापर करता येणे. लेखन ५. सामाजिक प्रश्नांवर अभ्यासपूर्ण वैचारिक लेखन करता येणे. ६. घटना, प्रसंग, स्वानुभव यांचे लेखन करता येणे. ७. ऐकलेल्या, अनुभवलेल्या माहितीचे व घेतलेल्या मुलाखतीचे शब्दांकन करून अहवाल लिहिता येणे. ८. पाठ्यपुस्तकात समाविष्ट असलेल्या उपयोजित लेखन घटकांवर लेखन करता येणे. १. संदर्भासाठी शब्दकोश पाहता येणे. २. दिलेल्या विषयावर चिकित्सक विचार करून स्वमत मांडता येणे. ३. घटना, प्रसंग, कार्यक्रम यांबाबत अभिप्राय देता येणे. ४. आंतरजालाचा वापर करून ऑनलाइन व्यवहार करता येणे, सोशल मीडियाचा योग्य वापर करता येणे. अध्ययन ५. संगणकावर उपलब्ध असणाऱ्या विविध शैक्षणिक ॲप्लिकेशन्सचा अभ्यासासाठी वापर करता येणे. कौशल्य ६. प्रसारमाध्यमांद्वारे उपलब्ध होणाऱ्या विविध कलाकृतींचा आस्वाद घेता येणे, त्याबाबत चिकित्सक विचार करता येणे. अध्ययन ७. विविध सामाजिक समस्यांबाबत चिकित्सक विचार करून आपले मत परखडपणे मांडता येणे. कौशल्य ८. विविध साहित्यप्रकारांच्या माध्यमातून स्वत:चे विचार मांडण्याचा प्रयत्न करणे. १. इयत्ता नववीपर्यंत अभ्यासलेल्या व्याकरण घटकांची उजळणी करणे. - समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसंपत्ती, वाक्प्रचार, प्रत्यय व उपसर्ग, शब्दांच्या जाती, भाषाभ्यास विरामचिन्हे, सामान्यरूप, शब्दसिद्धी, समास- अव्ययीभाव, तत्पुरुष, द्वंद्व, द्विगू, अलंकार- रूपक, व्यतिरेक, दृष्टान्त, चेतनगुणोक्ती, वृत्त-भुजंगप्रयात, मालिनी, वसंततिलका, लेखनविषयक नियम. शिक्षकांसाठी मराठी कुमारभारती (प्रथम भाषा) इयत्ता दहावीचे हे पाठ्यपुस्तक अध्ययन-अध्यापनासाठी आपणांस देताना अतिशय आनंद होत आहे. विद्यार्थ्यांमधील भाषिक कौशल्ये अधिकाधिक विकसित होण्याच्या दृष्टीने पाठ्यपुस्तकामध्ये विद्यार्थ्यांच्या भावविश्वाशी संबंधित पाठ, कविता, गीत, कृती (स्वाध्याय) व आशयानुरूप चित्रे यांसारख्या अनेक घटकांचा समावेश केलेला आहे. शिक्षकांनी पाठ्यपुस्तकात समाविष्ट असणाऱ्या भाषाविषयक क्षमतांचा विचार करून विद्यार्थ्यांमधील भाषिक क्षमता विकसित होण्यासाठी पाठ्यपुस्तकातील कृतींबरोबरच इतर विविध कृती व उपक्रम योजून ते विद्यार्थ्यांकडून करवून घ्यावेत. क्षमता क्षेत्रातील भाषाभ्यास या शीर्षकाखाली दिलेल्या सर्व व्याकरण घटकांची उजळणी शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून करून घेणे अपेक्षित आहे. पाठ्यपुस्तकामध्ये इयत्ता नववीपर्यंत अभ्यासलेल्या व्याकरण घटकांची उजळणी होण्यासाठी विविध कृती योजलेल्या आहेत. व्याकरण घटकांची व कृतींची मांडणी मनोरंजक व सोप्या पद्धतीने केली आहे. कृतिपत्रिकेमध्ये या व्याकरण घटकांवर आधारित कृतींचा समावेश केला जाणार आहे. शिक्षकांनी स्वत: या व्याकरण घटकांच्या सरावासाठी विविध कृती योजाव्यात व त्या विद्यार्थ्यांकडून सोडवून घ्याव्यात. उपयोजित लेखन या विभागामध्ये विद्यार्थ्यांच्या लेखन कौशल्य विकासासाठी घटकनिहाय विविध कृती व त्यांचे नमुने दिलेले आहेत. या वैविध्यपूर्ण कृतींमधून विद्यार्थ्यांमधील भाषिक कौशल्ये विकसित होणार आहेत. इयत्ता दहावीतील उपयोजित लेखन घटकांची मांडणी इयत्ता नववीतील उपयोजित लेखन घटकांचा विचार करून केली आहे, त्यामुळे शिक्षकांनी इयत्ता नववीतील उपयोजित लेखन घटकांचाही आढावा घ्यावा. शिक्षकांनी स्वत:च्या सृजनशीलतेने, कल्पकतेने विविध भाषिक कृतींची रचना करावी, त्याचबरोबर अशा विविध कृती तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांनाही प्रेरित करावे. त्यातून विद्यार्थ्यांची निरीक्षणक्षमता, विचारक्षमता व कृतिशीलता यांनाही संधी मिळणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या विविध माध्यमांचा वापर करून अध्यापनात अधिकाधिक संदर्भ देणे अपेक्षित आहे. पाठ्यपुस्तकातील गद्य व पद्य पाठांमधील कठीण शब्दांचे अर्थ पाठ्यपुस्तकात शेवटी दिलेले आहेत. शिक्षकांनी आवश्यकतेनुसार पाठांतील इतर शब्दांचे अर्थ समजून घेण्यासाठी शब्दकोशाचा वापर करावा, तसेच विद्यार्थ्यांना संदर्भ म्हणून शब्दकोश पाहण्यासाठी प्रेरित करावे. मराठी कुमारभारती (प्रथम भाषा) इयत्ता दहावीचे हे पाठ्यपुस्तक तुम्हांला नक्कीच आवडेल, अशी आशा आहे. अनुक्रमणिका भाग - १ भाग - २ अ. क्र. पाठ/कविता, लेखक/कवी पृ. क्र. अ. क्र. पाठ/कविता, लेखक/कवी पृ. क्र. १. जय जय हे भारत देशा (गीत) १ ६. वस्तू (कविता) २१ - मंगेश पाडगावकर - द. भा. धामणस्कर २. बोलतो मराठी... २ ७. गवताचे पाते २४ - डॉ. नीलिमा गुंडी - वि. स. खांडेकर ३. आजी : कुटुंबाचं आगळ ५ ८. वाट पाहताना २७ - महेंद्र कदम - अरुणा ढेरे ४. उत्तमलक्षण (संतकाव्य) ९ ९. आश्वासक चित्र (कविता) ३१ - संत रामदास - नीरजा ५. वसंतहृदय चैत्र ११ १०. आप्पांचे पत्र ३३ - दुर्गा भागवत - अरविंद जगताप | बालसाहित्यिका : गिरिजा कीर १६ | मनक्या पेरेन लागा (स्थूलवाचन) ३७ (स्थूलवाचन) - वीरा राठोड - डॉ. विजया वाड भाग -३ भाग -४ अ. क्र. पाठ/कविता, लेखक/कवी पृ. क्र. अ. क्र. पाठ/कविता, लेखक/कवी पृ. क्र. ११. गोष्ट अरुणिमाची ३९ १६. आकाशी झेप घे रे (कविता) ६५ - सुप्रिया खोत - जगदीश खेबुडकर १२. भरतवाक्य (कविता) ४५ १७. सोनाली ६७ - मोरोपंत - डॉ. वा. ग. पूर्णपात्रे १३. कर्ते सुधारक कर्वे ४८ १८. निर्णय ७४ - डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे - डॉ. सुनील विभुते १४. काळे केस ५२ १९. तू झालास मूक समाजाचा नायक (कविता) ८० - ना. सी. फडके - ज. वि. पवार १५. खोद आणखी थोडेसे (कविता) ५७ २०. सर्व विश्वचि व्हावे सुखी ८२ - आसावरी काकडे - डॉ. यशवंत पाठक | वीरांगना (स्थूलवाचन) ५९ | व्युत्पत्ती कोश (स्थूलवाचन) ८७ · उपयोजित लेखन ९८ भाग - १ १. जय जय हे भारत देशा मंगेश पाडगावकर (१९२९ ते २०१५) : प्रथितयश कवी. वृत्तबद्ध रचना, शब्दप्रभुत्व, गेयता ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत. त्यांचे ‘धारानृत्य’, ‘जिप्सी’, ‘छोरी’, ‘उत्सव’, ‘विदूषक’, ‘सलाम’, ‘गझल’, ‘भटके पक्षी’, ‘बोलगाणी’ हे कवितासंग्रह; संत मीराबाई, संत कबीर आणि संत तुलसीदास यांच्या काव्याचे भावानुवाद; ‘बोरकरांची कविता’ व ‘संहिता’ ही महत्त्वपूर्ण संपादने; ‘निंबोणीच्या झाडामागे’ हा ललित निबंधसंग्रह; ‘भोलानाथ’, ‘बबलगम’, ‘चांदोमामा’ हे बालगीतसंग्रह इत्यादी लेखन प्रसिद्ध आहे. ‘वात्रटिका’ हा संग्रह त्यांच्या वाङ्म यीन व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक पैलू दाखवणारा आहे. प्रस्तुत गीतात देशप्रेम आणि एकात्मता यांचा आविष्कार झालेला दिसतो. तू नव्या जगाची आशा जय जय हे भारत देशा तपोवनातुन तुझ्या उजळली उपनिषदांची वाणी मातीमधुनी तुझ्या जन्मल्या नररत्नांच्या खाणी जय युगधैर्याच्या देशा जय नवसूर्याच्या देशा तू नव्या जगाची आशा, जय जय हे भारत देशा बळापुढे वा छळापुढे नच इथे वाकल्या माना अन्यायाला भरे कापरे बघुनि शूर अभिमाना जय आत्मशक्तिच्या देशा जय त्यागभक्तिच्या देशा तू नव्या जगाची आशा, जय जय हे भारत देशा श्रमांतुनी पिकलेली शेते पहा डोलती धुंद घामाच्या थेंबांतुन सांडे हृदयातिल आनंद जय हरित क्रांतिच्या देशा जय विश्वशांतिच्या देशा तू नव्या जगाची आशा, जय जय हे भारत देशा पहा झोपड्या कंगालांच्या थरारल्या भवताली अंधाराला जाळित उठल्या झळकत लाख मशाली जय लोकशक्तिच्या देशा जय दलितमुक्तिच्या देशा तू नव्या जगाची आशा, जय जय हे भारत देशा (गीतपुष्पांचा फुलोरा या संपादित पुस्तकातून) (प्रस्तुत गीत हे काव्यानंदासाठी घेतले असून, ते विद्यार्थ्यांकडून तालासुरांत म्हणवून घ्यावे.) 1 २. बोलतो मराठी... डॉ. नीलिमा गुंडी (१९५२) : मराठीच्या प्राध्यापिका, भाषातज्ज्ञ आणि लेखिका. त्यांची ‘अक्षरांचा देव’, ‘निरागस’ हे बालसाहित्य; ‘देठ जगण्याचा’, ‘रंगांचा थवा’ हे ललित लेखसंग्रह; ‘भाषाप्रकाश’, ‘भाषाभान’, ‘शब्दांची पहाट’ हे भाषाविषयक लेखसंग्रह इत्यादी ३५ पुस्तके प्रकाशित आहेत. २०११ साली बेळगाव येथे झालेल्या मंथन महिला साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे शाखेकडून प्रसिद्ध होणाऱ्या ‘संवेदना’ या २०११ आणि २०१२ सालच्या दिवाळी अंकांसाठी मुख्य संपादक म्हणून त्यांनी काम केले आहे. मराठी भाषेतील विविध शब्दप्रयोगांमुळे विनोदाची निर्मिती कशी होते, याचे वर्णन प्रस्तुत पाठात आले आहे. व्युत्पत्ती कोशात शब्दांची व्युत्पत्ती शोधल्याने आपल्याला खूप नवीन माहिती कळते, आनंदही मिळतो. आपल्या जीवनात भाषेला महत्त्व दिल्यास, मनातल्या भावभावनांचे सूक्ष्म अर्थसौंदर्य उलगडण्यास मदत होते, हे या पाठातून स्पष्ट होते. परवा वर्तमानपत्रात एक विनोद आला होता. बायको : ‘‘तुम्हांला, मी उत्तप्पा बनवू का?’’ नवरा : ‘‘नको. मी माणूसच ठीक आहे. आली मोठी जादूगार!’’ आता इथे विनोद निर्माण झाला आहे. कारण ‘बनवणे’ हे क्रियापद तिथे शोभणारे नाही. ते हल्ली हिंदी भाषेतून आपल्या स्वयंपाकघरात नको इतकं घुसलं आहे. मराठीत पोळ्या लाटणे, भाजी फोडणीस टाकणे, कढी करणे, भात रांधणे, कुकर लावणे अशा वेगवेगळ्या क्रियांसाठी वेगवेगळे शब्दप्रयोग आहेत; पण हल्ली सगळे पदार्थ फक्त ‘बनवले’ जातात. मराठीत ‘बनवणे’ म्हणजे ‘फसवणे’ असा अर्थ खरं तर रूढ आहे, त्यामुळे माणसाचं माकड आणि पुन्हा माकडाचा माणूस ‘बनवणारा’ जादूगार, विनोद करणाऱ्या नवऱ्याला आठवला, तर आश्चर्य नाही. मराठी ढंगाचे शब्दप्रयोग ही आपल्या भाषेची श्रीमंती आहे. मराठीत ‘मारणे’ हे एक क्रियापद घेतले तर ते किती वेगवेगळ्या प्रकारे वापरले जाते, हे लक्षात घेण्याजोगे आहे. जसे, गप्पा मारणे, उड्या मारणे, थापा मारणे, टिचकी मारणे, शिट्टी मारणे, पाकीट मारणे, जेवणावर ताव मारणे, (पोहताना) हातपाय मारणे, माश्या मारणे इत्यादी. ‘मारणे’ म्हणजे ‘मार देणे’ हा अर्थ यात कोठेही आलेला नाही. हीच तर भाषेची गंमत असते. शब्दप्रयोगाप्रमाणे वाक्प्रचार ही देखील भाषेची खास शैली असते. ‘खस्ता खाणे’ मध्ये खस्ता हा खाद्यपदार्थ नाही, हे माहीत आहे ना? तसेच ‘कंठस्नान घालणे’ हा वाक्प्रचार युद्धाविषयीच्या बातम्यांमध्ये असतो. कंठस्नान घालणे म्हणजे गळ्याखालून ‘अंघोळ घालणे’, असा शब्दश: अर्थ नाही. ‘खांद्याला खांदा लावणे’ (सहकार्य करणे) आणि ‘खांदा देणे’ (प्रेताला खांदा देणे) यांतला फरकही लक्षात घ्यायला हवा. एकाऐवजी दुसरे क्रियापद वापरले, तर अर्थाचा अनर्थ होईल. अशी अनेक उदाहरणे देता येतील. त्यासाठी शब्दकोश वापरण्याची सवय करायला हवी. ‘अक्कलवान’ म्हणजे हुशार; पण ‘अकलेचा कांदा’ म्हणजे ‘अतिशहाणा’ हे माहीत नसेल, तर कोण आपले खरे कौतुक करतोय की फिरकी घेतोय, हेच आपल्याला कळणार नाही. क्रियापद वापरताना त्यापूर्वी नामाला कोणता प्रत्यय लावायचा असतो, हे नीट माहीत नसले तरीदेखील अर्थाचा गोंधळ होतो. उदा., अंगाला लावणे आणि अंगावर घेणे, तिला हसणे (तिची चेष्टा करणे या अर्थी) आणि तिच्याशी हसणे (सहजपणे हसणे) यांत प्रत्यय महत्त्वाचा आहे. हल्ली सार्वजनिक समारंभांमध्ये आणि वाहिन्यांवर प्रत्ययांची जागा अनेकदा चुकलेली असते. उदा., ‘तुझी मदत करणे’ याऐवजी ‘तुला मदत करणे’ हवे. ‘त्यांचे धन्यवाद’ याऐवजी ‘त्यांना धन्यवाद’ असे म्हणायला हवे. भाषेमध्ये अनेक शब्द सतत येत असतात, कारण ती नदीसारखी प्रवाही असते. आपणही संगणकासंबंधी अनेक नवे इंग्रजी शब्द सातत्याने आत्मसात केले आहेत. मराठीने आजवर संस्कृत, फारसी, अरबी, कन्नड, इंग्रजी अशा अनेक भाषांमधले शब्द आपले मानले आहेत. ‘टेबल’ हा शब्द आता आपल्याला परका वाटत नाही; पण गरज नसताना इतर भाषांमधले शब्द आणि तेही मराठी भाषेचे व्याकरण झुगारून वापरणे योग्य नाही. ‘मी स्टडी केली’ म्हणण्यातून काय नवीन अर्थ कळतो? त्याऐवजी ‘मी अभ्यास केला’ म्हणणं योग्य नाही का? 2 भाषेतली गंमत जाणून घेण्याचा एक मार्ग म्हणजे शब्दांची व्युत्पत्ती शोधणे. यातून आपल्याला खूप नवी माहिती मिळते. ‘मोरांबा’ या शब्दातल्या ‘मोरा’चा मयूराशी संबंध नसून मोरस म्हणजे साखरेशी (जुन्या काळी साखर मॉरिशसवरून यायची म्हणून मोरस) संबंध आहे. शब्दांची पाळेमुळे किती दूरवर पसरलेली असतात, ते त्यातून कळते. ‘कदर करणे’ असे आपण म्हणतो. ताे वाक्प्रचार आहे. ‘कद्र’ या अरबी शब्दापासून ‘कदर’ (म्हणजे गुणांची पारख) हा शब्द आपण घेतला आहे. शब्दांच्या मुळाकडे गेलो, की आपल्या चुकाही होत नाहीत. उदा., ‘अनुसया’ असे नाव नसून ते ‘अनसूया’ असे आहे. ‘अन्+ असूया’ अशी त्यातील संधी आहे. मनात असूया (मत्सर) नसलेली अशी ती ‘अनसूया’ हे कळल्यावर शब्द मनात पक्का रुजतो. तसेच ‘जराजर्जर’ या संस्कृतमधून आलेल्या शब्दाचा अर्थ आहे, ‘वार्धक्याने विकल झालेला!’ यातील ‘ज’चे उच्चार तालव्य (ज्य) आहेत. तर जरा (थोडे), जर (कलाबूत) या शब्दातील ‘ज’चे उच्चार दन्तमूलीय आहेत. (दन्तमूलीय म्हणजे जे ध्वनी उच्चारताना जिभेच्या टोकाचा वरच्या दाताच्या मुळांना स्पर्श होतो असे ध्वनी.) उच्चारावरही अर्थ अवलंबून असतो. भाषेत आपण शब्द कसे उच्चारतो, कोणत्या अक्षराशी शब्द तोडतो, या साऱ्यांना महत्त्व असते. ‘सूतकताई’ हा शब्द जर ‘सूतक ताई’ असा लिहिला तर कसं वाटेल? तसंच ‘अक्षरश:’ हा शब्द लिहिताना ‘अक्षर शहा’ असा कोणा मुलाचे नाव करून टाकणे बरोबर आहे का? ‘पुराणातली वांगी पुराणात’ या म्हणीचा अर्थ शोधण्यासाठी सगळ्या पुराणांमध्ये वांग्याशी संबंधित काय गोष्ट आली आहे, हा शोध म्हणजे फुकट उद्योग ठरेल! तिथे मूळ म्हण होती ‘पुराणातली वानगी पुराणात.’ वानगी म्हणजे उदाहरणे. पण ‘वानगी’ झाली ‘वांगी’ आणि आपण शोधत राहिलो वांग्याविषयीच्या गोष्टी! अशी फजिती होते. काही वेळा दोन शब्दरूपे सारखी असतात आणि ती चकवतात. उदाहरणार्थ, १. राजाचे ‘कलेवर’ प्रेम होते. २. अपघातस्थळी कडेला एक ‘कलेवर’ पडले होते. येथे पहिल्या वाक्यात ‘कलेवर’ हे शब्दरूप ‘कला’ या शब्दाचे सप्तमी विभक्तीचे रूप आहे तर दुसऱ्या वाक्यात ‘कलेवर’ हे नाम असून त्याचा अर्थ ‘शव’ असा आहे. आपण आपल्या भाषेवर प्रेम करायचं असेल तर भाषेतली अशी शक्तिस्थळे जाणून घ्यायला हवीत. भाषेचा योग्य सन्मान राखायला हवा. आपल्या घरीदारी बोलली जाणारी मराठी भाषा ही आपल्याला आईच्या ठिकाणी आहे. तिने आपल्या भावजीवनाला आकार दिला आहे. आपल्या भावना व्यक्त करायला आधार दिला आहे. तिच्याशी आपले खास जिव्हाळ्याचे नाते असायला हवे. त्यासाठी तिचे ज्ञानही आपण मिळवायला हवे. आपली भाषा ही हवेसारखी आपल्या आतबाहेर असते. तिचे जीवनातले महत्त्वाचे स्थान कायम ठेवायला हवे. उदा., आता पाऊस पडत आहे. ‘पाऊस पडणे’ या घटनेविषयी दोन वाक्यांतून कशी दोन प्रकारे प्रतिक्रिया देता येते ते पाहा. १. पावसाने स्वत: जातीने हजेरी लावून वनमहोत्सवाला दाद दिली. २. सकाळी सकाळी पाऊस आल्यामुळे माझ्या ‘मॉर्निंग वॉक’च्या बेतावर पाणी पडले. अशी अनेक वाक्ये तयार करता येतील. त्यातून भाव खुलत जातात. भाषा अशी आपल्या मनातले भाव सूक्ष्मपणे सांगायला मदत करत असते, त्यामुळे तिचे अर्थसौंदर्य कळल्यावरच आपण ‘लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी...’ असे कविवर्य सुरेश भटांचे शब्द उच्चारायला खऱ्या अर्थाने पात्र ठरू, हे विसरून चालणार नाही. (छात्र प्रबोधन, दीपावली विशेषांक २०१६) 3 कृती (१) आकृत्या पूर्ण करा. (अ) (आ) भाषा वापरताना अर्थाचा मराठी भाषेची श्रीमंती अनर्थ टाळण्यासाठी आवश्यक उपाय (२) शब्दांची व्युत्पत्ती शोधण्याचे फायदे लिहा. (३) पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा. (अ) मराठी भाषेची खास शैली (आ) मराठी भाषेला लेखिकेने दिलेली उपमा (इ) शब्दांचा अर्थ जाणून घेण्याचे साधन (४) गटात न बसणारा शब्द ओळखून चौकटी पूर्ण करा. (अ) ऐट, डौल, रुबाब, चैन (आ) कपाळ, हस्त, ललाट, भाल (इ) विनोद, नवल, आश्चर्य, विस्मय (ई) संपत्ती, संपदा, कांता, दौलत (उ) प्रख्यात, प्रज्ञा, नामांकित, प्रसिद्ध (५) खाली दिलेल्या अनेकवचनी नामांचे एकवचनी रूप लिहून त्यांचा वापर करून प्रत्येकी एक वाक्य तयार करा. (अ) रस्ते (आ) वेळा (इ) भिंती (ई) विहिरी (उ) घड्याळे (ऊ) माणसे (६) खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. (अ) पसरवलेली खोटी बातमी- (आ) ज्याला मरण नाही असा- (इ) समाजाची सेवा करणारा- (ई) संपादन करणारा- (७) स्वमत. (अ) ‘तुम्ही शहाणे आहात’ या वाक्यातील ‘शहाणे’ या शब्दाच्या अर्थच्छटा लिहा. (आ) ‘गरज नसताना इतर भाषांमधले शब्द वापरून बोलू नये’ या लेखिकेच्या मताबाबत तुमचे मत सोदाहरण लिहा. (इ) लेखिकेने मराठी भाषेचा केलेला सन्मान तुमच्या शब्दांत लिहा. ||| 4 ३. आजी : कुटुंबाचं आगळ महेंद्र कदम (१९७२) : मराठीचे अभ्यासक आणि लेखक. त्यांची ‘मराठीचे वर्णनात्मक भाषाविज्ञान’, ‘कवितेची शैली’ ही भाषाविषयक पुस्तके; ‘कादंबरी : सार आणि विस्तार’, ‘कवितेचे वर्तमान’ ही समीक्षेची पुस्तके; ‘धूळपावलं’ ही कादंबरी; ‘मेघवृष्टी : अभ्यासाच्या विविध दिशा’ हे संपादन; ‘तो भितो त्याची गोष्ट’ हा कथासंग्रह इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत. ‘कवितेची शैली’ या पुस्तकास २००७ साली महाराष्ट्र शासनाचा दादोबा पांडुरंग पुरस्कार मिळालेला आहे. ग्रामीण संस्कृतीतील एकत्र कुटुंबपद्धतीचे अनुपम दर्शन या पाठातून घडते. मानवी नातेसंबंध, त्यांतील सुरक्षितता, त्यांचे परस्परावलंबन आिण या सगळ्याचा आधार असणारी कुटुंबप्रमुख आजी. आजी म्हणजे जणू कुटुंबाचे आगळ. ग्रामीण घरांची रचना, ग्रामीण जीवनशैली यांवर पाठात प्रकाश टाकला आहे. कौटुबि ं क नातेसंबंध जपण्याचा संस्कार करणारा हा पाठ आहे. त्या काळातील मुलांचे खेळ, त्यांना मिळणारा रानमेवा अशा अलीकडील काळात दुर्मीळ झालेल्या गोष्टींचे वर्णन पाठात वाचायला मिळते. ‘ग्रामसंस्कृती’ हा भारतीय संस्कृतीचा पाया असल्यामुळे ग्रामसंस्कृतीचे महत्त्व जाणण्याचा संदेश प्रस्तुत पाठातून मिळतो. माझी आजी. जवळपास साडेपाच फूट उंचीची, रंगाने गोरी असूनही उन्हापावसाने रापलेल्या त्वचेची. नवऱ्यामागं सगळा संसार गळ्यात पडूनही तिसऱ्या-आमच्या-पिढीवर हुकूमत गाजवणाऱ्या आजीच्या हातात सत्तरी ओलांडली तरी काठी आली नव्हती. दात सगळे शाबूत तर होतेच; पण मोत्यासारखे चमकत राह्यचे. डोकीत एकही केस काळा नव्हता. विशाल कान, धारदार नाक, चेहऱ्यावर सुरकुत्या पडूनही तरुणपणाच्या सौंदर्याची जाणीव करून देणारी चेहऱ्याची ठेवण. ताठ कणा, पायांत जुन्या वळणाच्या नालाच्या वहाणा. अंगात चोळी आणि हिरवं व लाल अशी दोन रंगांची नऊवारी इरकल लुगडी. कपाळावरचं गांेदणं दिसू नये म्हणून त्यावर लावलेला बुक्का. आजीच्या छत्रछायेखाली आमचे सर्व कुटुंब गुण्यागोविंदाने नांदत होते. आमच्या घरी एक गावरान गाय होती. तिला आम्ही कपिली म्हणायचो. एकाआड एक वेताला तरी खोंड ती नक्कीच द्यायची. त्यामुळं दावणीला कायम कपिलीचीच बैलं असायची. कपिली दूधही भरपूर द्यायची. आमचे वडील किंवा काका धार काढायला निघाले, की ग्लासं घेऊन आमचा मोर्चा गोठ्यात. गाईनं पान्हा सोडला, की वासरू आखडायचं न् चरवीतल्या दुधाच्या धारांचं संगीत ऐकत चरवी भरण्याची वाट बघायची. चरवी भरली, की पुन्हा वासरू सोडायचं न्ग्लास घेऊन लायनीत उभं राह्यचं. तिथंच मग ते धारोष्ण दूध आमच्या ग्लासात यायचं आणि ते उबदार दूध मिश्या येईपर्यंत पीत राह्यचं. तिथंच संपवून घरात यायचं. राहिलेली अर्धी चरवी घरात आली, की म्हातारी ढाळजंतनं सोप्यात अवतरायची. तिथंच बसून राह्यची. हातातील माळेचा एकेक मणी ओढत काहीतरी पुटपुटत राह्यची, कारण एकच, माझ्या आईने व धाकट्या चुलतीने चहा करून पिऊ नये म्हणनू सक्त पहारा द्यायची. चार घरच्या चार सुना नांदायला आल्या. त्यांचा कुणाचा भरवसा द्यायचा? कोण कुणाच्या लेकराला किती देईल खात्री नाही, म्हणून आम्हांला गोठ्यातच दूध मिळण्यावर आजीचा कटाक्ष असायचा. आजी तिथं बसण्याचं आणखी एक कारण होतं. आमची आई थोरलीही होती. आपण बसून जावांना कामं लावायची. खरं तर आजीनं सगळ्यांना कामाच्या वाटण्या करून दिलेल्या. कुणी किती दिवस भाकरी करायच्या, कुणी धुणं धुवायचं, कालवण कुणी करायचं, भांडी कुणी घासायची हे सगळं ठरलेलं असायचं आणि आठवड्यानं प्रत्येकीचं काम रोटेशनप्रमाणे बदललं जायचं. प्रत्येकीला प्रत्येक काम आलंच पाहिजे यावर आजीचा भारी कटाक्ष. येत नसेल तिला ती शिकवायची; पण कामातनं कुणाची सुटका नसायची. भाकरी करपल्या की करणारणीला लाखोली. सरपण नीट नसलं, की गड्यांची फजिती. स्वयंपाक झाला, की आधी आमची बाळगोपाळांची पंगत बसायची. आजी पुढं सरकायची न्आमची आई जेवायला वाढायची 5 किंवा कुणी काकीही; पण वाढतानाही आजीचा जागता पहारा. धपाटे घालू घालू खाऊ घालायचं. कुणाला खरकटं ठेवू द्यायचं नाही. आमच्या जेवणानंतर रानातल्या भाकरी बांधल्या जायच्या आणि नंतर सगळ्या बायका मिळून जेवायच्या. दहाच्या दरम्यान पोरांना शाळेत पिटाळून, दुपारच्या कामाचं नियोजन करून मग आजीची स्वारी ढाळजंत येणार. बसता बसता झोपी जाणार; पण झोप भारी सावध. कुठंही खुट्ट झालं, की आजी तट्ट जागी. कानोसा घेऊन पुन्हा डोळं झाकणार. झोप होता होता गल्लीतल्या बायका जमल्या की वाकळ शिवायचं असो, शेंगा फोडायचं असाे की धान्य निवडायचं असो, सगळ्या िमळून एकमेकींची कामं करायच्या. गल्लीतल्या बायका येतानाच कामं घेऊन यायच्या. गप्पा व्हायच्या. सासुरवास, जाच अशा सगळ्यांच्या चर्चा. आमची ढाळज म्हणजे गावाचं वर्तमानपत्र होतं आणि आजी त्याची संपादक होती. तर सगळ्या बातम्या तिथं यायच्या. त्यांची शहानिशा व्हायची न्मग त्या गावभर जायच्या. कडुसं पडायच्या आधी ही मैफिल मोडायची. माणसांची वेळ झाली, की म्हातारीची ढाळज सुटायची. माणसं ढाळजंत बसायची. रात्री आठच्या दरम्यान ढाळजंचा दरवाजा लागला आणि एकदा आतनं आगळ टाकली, की वाडा शांत व्हायचा. ही आगळ दरवाजाला लावणं किंवा ती काढणं म्हणजे आमच्यासाठी दिव्य असायचं. मुळात ही सहा फुटांची लांब आणि पाऊण फूट रुंद अशी सागवानी आगळ एका भिंतीतल्या देवळीत आरपार जायची. ती आरपार घालवून दरवाजा उघडणं किंवा तिच्या तोंडाला असणाऱ्या पितळी वाघाच्या जबड्यातील कडीला हात घालून ती बाहेर ओढणं व समोरच्या भिंतीतल्या देवळीत ढकलणं फार अवघड गणित होतं. ही आगळ म्हणजे दरवाजाचं, पर्यायाने वाड्याचं, भरभक्कम संरक्षक कवच होतं. दुपारीही एकदा आगळ टाकली की उन्हाचं, सुट्टीचं आम्हांला बाहेर पडायला संधी नसायची, तसाच रात्री त्या आगळीचा आधारही तितकाच वाटायचा. भर उन्हात मग आजीला जास्त त्रास होऊ न देता तिथंच ढाळजंत, पडवीत, सोप्यात कुठंही आम्ही बैठे खेळ खेळायचो. चिंचोके, गजगं, खापराच्या भिंगऱ्या, जिबल्या, चुळूचुळू मुंगळा, भोवरा, गोट्या असले खेळ असायचे, तर कधी घरातल्या सरपणातली लाकडं काढून विटी-दांडू, भोवरं बनवीत बसायचं. भिंगऱ्या बनवताना त्यांना गोल आकार देण्यासाठी दगडावर घासत बसायचं. मधनंच हुक्की आली, की पाटी काळी कुळकुळीत व्हावी म्हणून खापरानं घासायची. तरवाडाच्या वाळल्या शेंगांना छिद्र पाडून बाभळी काट्यात ओवायच्या. काट्याला आतून एक आणि बाहेरून एक शेळीच्या लेंड्या लावायच्या आणि भिंगऱ्या बनवायच्या. ज्वारीच्या ताटांच्या बैलगाड्या बनवायच्या. तालमीतली लाल माती आणून बैलं बनवायची. कधी गोल गोटे आणून ते घडत बसायचे आणि त्यांच्या छान छान गोल गोट्या बनवायच्या. मग सगळ्यांचा डोळा चुकवून हळूच सटकी मारायची न्गोट्या खेळायला जायचं. तिथंच कुरीचा डाव रंगायचा. ज्यांना खेळायची संधी मिळायची नाही ती पोरं माकडासारखं वडाच्या पारंब्यांना लोंबकळत राह्यची. झोका खेळायची. उतरताना पारंब्यांच्या शेंड्यांना फुटलेली पिवळी पालवी शेव-शेव म्हणून खायची. देवळात जायची. घंटी वाजवून म्हाताऱ्यांची झोपमोड करायची. एखाद्या भर दुपारी मग तिथनंच मोर्चा विहिरीकडं वळवायचा. मनसोक्त पोहायचं. शिवणापानी खेळायचं. मुटकं टाकून पाणी उडवण्याची शर्यत लागायची. कंटाळा आला, की ओल्या अंगाने तिथंच मातीवर लोळत पडायचं. चटके बसायला लागले, की पुन्हा पाण्यात उड्या. थकून घरी यायचं आणि भाकरीवर उड्या टाकायच्या. लाल डोळं आणि पांढरं पडलेलं अंग बघून आजीचं बोलणं खायचं. असल्या सगळ्या निसर्गदत्त वातावरणात बालपण आकारत होतं. गाभोळ्या चिंचा, मिठाचे खडे आणि कच्च्या कैऱ्या, बांधावरची बोरं, चिंचांचा तौर, उंबरं, ढाळं, काटाड्यावर भाजलेली कणसं, गहू-ज्वारीचा हुरडा, कच्ची वांगी, गवार, छोटी तंबाटी, शेळ्या, कलिंगडं, शेंदाडं, करडीची-पात्रंची भाजी, ज्वारीची हिरवीगार ताटं, कवटं, तुरीच्या-मटकीच्या शेंगा, त्यांची उकड, हुलग्याचं माडगं असा सगळा रानमेवा पोटात जात होता. आम्ही वाढत होतो. भांडत होतो. पुन्हा एकत्र खेळत होतो. ढाळजंत आजीच्या धाकात अभ्यास करत होतो. आजीच्या मायेच्या सावलीखाली आम्ही मोठे होत होतो. (आगळ) 6 कृती (१) पाठात आलेल्या खेळांचे वर्गीकरण करा. बैठे खेळ मैदानी खेळ (२) खालील मुदद्यां ् च्या आधारे आजीचे शब्दचित्र रेखाटा. आजी आजीचे दिसणे. आजीचे राहणीमान. आजीची शिस्त. (३) विरुद्धार्थी शब्दांच्या योग्य जोड्या जुळवा. ‘अ’ गट ‘ब’ गट (१) आळस (अ) अनास्था (२) आदर (अा) दुरावा (३) आस्था (इ) उत्साह (४) आपुलकी (ई) अनादर (४) खालील वाक्यांतील वाक्प्रचार शोधून अधोरेखित करा. (अ) सहलीच्या वेळी शिस्तभंग होऊ नये याकडे शिक्षकांचा कटाक्ष असतो. (आ) दोन व्यक्तींतील संवादाचा तिसऱ्या व्यक्तीने कानोसा घेणे अयोग्यच. (इ) कारण नसताना हुकमत गाजवणाऱ्या व्यक्ती इतरांच्या नजरेतून उतरतात. (५) कंसातील विशेषणांचा योग्य ठिकाणी वापर करून वाक्ये पुन्हा लिहा. (खूप, त्याचा, आंबट, अधिक, द्विगुणित, आमची) (अ) समुद्रकिनारी................. सहल गेली होती. (आ) खूप दिवसांनंतर मैत्रिणीला पाहून राजश्रीचा आनंद................. झाला. (इ) विजय अजयपेक्षा................. चपळ आहे. (ई) रवीला................. कैऱ्या खायला खूप आवडतात. (उ) मला गाणी ऐकण्याची................. आवड आहे. (ऊ) राजू कबड्डी छान खेळत होता; परंतु................. पाय अचानक मुरगळल्याने तो बाद झाला. (६) खालील शब्दांचे दोन स्वतंत्र अर्थ लिहून चौकटी पूर्ण करा. (अ) वर (अा) ग्रह (इ) काठ (ई) अभंग 7 (७) स्वमत. (अ) ‘आमची ढाळज म्हणजे गावाचं वर्तमानपत्र होतं’ या वाक्याचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा. (आ) तुलना करा/साम्य लिहा. आगळ - वाड्याचे कवच आजी - कुटुंबाचे संरक्षक कवच (इ) पाठात चित्रित झालेल्या एकत्र कुटुंब पद्धतीबाबतचे तुमचे विचार स्पष्ट करा. (ई) पाठाच्या शीर्षकाची समर्पकता थोडक्यात स्पष्ट करा. उपक्रम : (१) तुमच्या गावाकडे खेळल्या जाणाऱ्या खेळांची माहिती मिळवा व त्यांचा संग्रह करा. (२) गावाकडचे खेळ व आधुनिक खेळ यांच्या बदललेल्या स्वरूपाबाबत मित्रांशी चर्चा करा. (टिपा - l आगळ- वाड्याचा दिंडी दरवाजा बंद करण्यासाठी त्याला आतल्या बाजूने असलेला लाकडी अडसर. l ढाळज - वाड्यात प्रवेश केल्यानंतर उजव्या, डाव्या बाजूंना असलेली देवडी/पडवी/बसण्यासाठीची जागा.) ||| 8 ४. उत्तमलक्षण संत रामदास (१६०८ ते १६८२) : संतकवी. संत रामदासांच्या काव्याची ठळक वैशिष्ट्ये म्हणजे त्यातील सामाजिक जाणीव. समाजाच्या नैतिक आणि आध्यात्मिक उन्नतीविषयी अखंड जागरूकता आणि अतीव तळमळ संत रामदास यांच्या काव्यात आढळते. आध्यात्मिक विचारांचे प्रतिपादन करणारे टीकाग्रंथ, स्फुट प्रकरणे, आख्यानकाव्ये, करुणाष्टके, उपदेशपर रचना, अभंग, पदे, भूपाळ्या, आरत्या, स्तोत्रे असे विविध प्रकारचे वाङ्मय त्यांनी निर्माण केले. ‘दासबोध’ ही त्यांची संपर्ण ू स्वतंत्र कृती असून त्यातून त्यांचा व्यासंग, चिंतन, समाजाचे व जनरीतीचे त्यांनी केलेले सूक्ष्म अवलोकन प्रत्ययाला येते. ‘मनाचे श्लोक’ हे त्यांचे अत्यंत लोकप्रिय आणि सर्वतोमुखी असणारे काव्य आहे. संत रामदास यांनी या रचनेत आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगितली आहेत. आदर्शत्वाची संकल्पना स्पष्ट करताना त्यांनी ‘काय करावे’ आणि ‘काय करू नये’ याबाबत मार्गदर्शन केले आहे. सत्याचा मार्ग स्वीकारावा, विवेकाने वागावे, कीर्ती वाढवावी असा संदेश या रचनेतून संत रामदास देतात. श्रोतीं व्हावें सावधान । आतां सांगतों उत्तम गुण । जेणें करितां बाणे खुण । सर्वज्ञपणाची ।।१।। वाट पुसल्याविण जाऊं नये । फळ ओळखिल्याविण खाऊं नये । पडिली वस्तु घेऊं नये । येकायेकीं ।।२।। जनीं आर्जव तोडूं नये । पापद्रव्य जोडूं नये । पुण्यमार्ग सोडूं नये । कदाकाळीं ।।३।। तोंडाळासीं भांडों नये । वाचाळासीं तंडों नये । संतसंग खंडूं नये । अंतर्यामीं ।।४।। आळसें सुख मानूं नये । चाहाडी मनास आणूं नये । शोधिल्याविण करूं नये । कार्य कांही ।।५।। सभेमध्यें लाजों नये । बाष्कळपणें बोलों नये । पैज होड घालूं नये । कांहीं केल्या ।।६।। कोणाचा उपकार घेऊं नये । घेतला तरी राखों नये । परपीडा करूं नये । विश्वासघात ।।७।। व्यापकपण सांडूं नये । पराधेन होऊं नये । आपलें वोझें घालूं नये । कोणीयेकासी ।।८।। सत्यमार्ग सांडूं नये । असत्य पंथें जाऊं नये । कदा अभिमान घेऊं नये । असत्याचा ।।९।। अपकीर्ति ते सांडावी । सत्कीर्ति वाडवावी । विवेकें दृढ धरावी । वाट सत्याची ।।१०।। (श्रीदासबोध-दशक द्वितीय, समास दुसरा, ‘उत्तमलक्षण’) 9 कृती (१) आकृत्या पूर्ण करा. (अ) संत रामदास यांनी विचार करून (अा) कधीही करू नयेत अशा गोष्टी करायला सांगितलेल्या गोष्टी (इ) तुमच्यातील प्रत्येकी तीन गुण व तीन दोष शोधून लिहा. गुण दोष (२) खालील व्यक्तींशी कसे वागावे असे संत रामदास म्हणतात. (अ) तोंडाळ (आ) संत (३) खालील गोष्टींबाबत कोणती दक्षता घ्यावी ते लिहा. गोष्टी दक्षता (१) आळस (२) परपीडा (३) सत्यमार्ग (४) काव्यसौंदर्य. (अ) खालील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दांत लिहा. ‘जनीं आर्जव तोडूं नये । पापद्रव्य जोडूं नये । पुण्यमार्ग सोडूं नये । कदाकाळीं ।।’ (अा) ‘सभेमध्यें लाजों नये । बाष्कळपणें बोलों नये ।’, या ओळीतील विचार स्पष्ट करा. (इ) ‘आळसें सुख मानूं नये’, या ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा. (टीप - संत रामदास यांच्या काळातील पद्यात आलेल्या शब्दांची व्हावें, आतां, सांगतों यांसारखी रूपे आताच्या काळात व्हावे, आता, सांगतो अशी वापरली जातात.) ||| 10 ५. वसंतहृदय चैत्र दुर्गा भागवत (१९१०-२००२) : लोकसाहित्य, समाजशास्त्र, बौद्ध वाङ्मय यांच्या अभ्यासक, ललित लेखिका. गाढ व्यासंग, सूक्ष्म निरीक्षणशक्ती, भावोत्कटता, चिंतनशीलता आणि संवेदनाप्रधान भाषा ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये होत. ‘ऋतुचक्र’, ‘व्यासपर्व’ आणि साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त ‘पैस’ ही दुर्गाबाईंच्या ललित लेखनाची शिखरे होत. ‘लोकसाहित्याची रूपरेखा’ हा ‘लोकसाहित्य’ या विषयावरील ग्रंथ, ‘राजारामशास्त्री भागवत : व्यक्ति आणि वाङ्मय’, ‘केतकरी कादंबरी’ हे त्यांचे महत्त्वपूर्ण ग्रंथ आहेत. ‘सिद्धार्थजातका’च्या सात खंडांचे अनुवाद हे दुर्गाबाईंचे बहुमोल कार्य आहे. प्रत्येक ऋतूचा आपापला स्वभाव असतो. हा स्वभाव निसर्गाच्या विविध रूपांतून प्रतिबिंबित होतो. या पाठातून वसंत ऋतूतील चैत्राचे मनोज्ञ दर्शन घडते. वसंत ऋतूची चाहूलच खरी मनोहारी! त्यातून चैत्रातील निसर्ग अनुभवणे, हा सर्वार्थाने आनंदानुभव! निसर्गातील घटकांचे सूक्ष्म निरीक्षण आणि ते शब्दांत मांडण्याचे लेखिकेचे कसब यांमुळे ‘वसंतहृदय चैत्र’ हुबेहूब डोळ्यांसमोर उभा राहतो. फाल्गुन, चैत्र आणि वैशाख हे तीन महिने वसंताच्या पुष्पमुद्रेचे चिन्ह ल्यालेले असे महिने आहेत. एक दुसऱ्यात मिसळला आहे. तरी पण चैत्र हा खरा वसंतात्मा आहे, मधुमास आहे. या ऋतुराजाचे किंवा मधुमासाचे लक्षण ज्ञानेश्वरांनी सुंदर रीतीने वर्णन केले आहे : जैसे ऋतुपतीचे द्वार । वनश्री निरंतर वोळगे फळभार लावण्येसी ।। ऋतुपतीच्या द्वारी वनश्रीचे म्हणजे नवपल्लवांनी गर्द झाकलेल्या फुलांनी डवरून गेलेल्या वृक्षलतांचे दर्शन. हे दर्शन तर फाल्गुनातच घडते. मग मधुमासाचे वैशिष्ट्य कशात आहे? या महिन्यात ते सारे सौंदर्य तर आहेच; पण फळांचेही रूप दृष्ट लागेलसे असते. फुलांतून, फळांतून मधुरस वाहत असतो. चैत्रातल्या पालवीचे रूप कुठेही मोठे मनोहर; पण ही पिंपळाची झाडे पाहा, कशी गहिऱ्या गुलाबी पानांच्या रेशमी पताका नाचवत उभी आहेत ती. जुनी पाने गळता गळता नवी येत होती म्हणून शिरीषासारखी ही पालवी पहिल्याने डोळ्यांत भरत नव्हती; पण सारी नवी पाने आल्यावर खरोखरच उन्हात जेव्हा ही भडक गुलाबी पाने चमकतात, तेव्हा जणूकाही सुंदर पुष्पांचे गेंदच या झाडावर फुलले आहेत असे वाटते. इतर झाडांची पालवी फार लहान असल्याने फार हलत नाही; पण या पानांची सारखी सळसळ. त्यातल्या त्यात आमच्या घराजवळ एक पिंपळाचे झाड आहे, ते तर फारच बहारीचे दिसते. त्याच्यावर मधुमालतीची प्रचंड वेल चढली आहे. चारी बाजूंनी अगदी मध्यापर्यंत त्या झाडाला तिने वेढून टाकले आहे आणि आता ही मधुमालती गुलाबी गेंदांनी खच्चून भरली आहे. आता फुलायला आणखी जागा नाही, अशी दाटी पिंपळाच्या तांबूस पानांची आणि या गुच्छांची झाली आहे आणि नुसती पालवीच नाही तर हिरवी फळेही इतर झाडांप्रमाणे यांच्या फांदीफांदीला ओळीने चिकटून बसली आहेत. सर्व फुलांत अतिशय हिरिरीने कोणी नटले असेल तर ही उग्रगंधी घाणेरी, किती शोभिवंत आणि दुरंगी फुलांच्या गुच्छांनी ती भरली आहे. गुलाबी फुलांत एखादे पिवळे, पिवळ्यांत एखादे गुलाबी, शेंदरी व पिवळा, पिवळा आणि जांभळा, लाल आणि पांढरा, जांभळा आणि गुलाबी, शेंदरी आणि जांभळा, किती म्हणून या झाडाच्या दुरंगी फुलांच्या रंगांचे वर्णन करावे? वास्तविक हे कुठलेच दोन रंग स्वाभाविकपणे एकमेकांच्या शेजारी एरवी शोभणारे नाहीत; पण निसर्गाच्या दुनियेत कुठलेही भडक व एरवी विसंगत वाटणारे रंग विशोभित दिसत नाहीत, उलट एकमेकांची शोभा 11 वाढवतात. गुजरातेत बऱ्याच भागांत वृक्षवनस्पतींचा दुष्काळ. तिथे या झाडाला भलतेच महत्त्व आहे. आपण तुच्छतेने घाणेरी म्हणतो तिला आणि तिच्या अतुलनीय रंगसौंदर्याला उपेक्षून पुढे जातो; पण गुजरातीत ‘चुनडी’ असे सुंदर व यथार्थ नामाभिधान या झाडाला दिलेले आहे आणि या फुलाचे हे नाव ऐकल्यावर काठेवाडी व राजपुतान्यातल्या चुनड्यांच्या भडक रंगांचे रहस्य मला उमगले. भडक विशाेभित रंग म्हणून त्यांची पुष्कळदा कुचेष्टा केली जाते. जी रंगाची मिश्रणे आम्ही आमच्या वस्त्राभरणात कटाक्षाने टाळतो, तीच या लोकांनी शतकानुशतके निसर्गाच्या प्रेरणेप्रमाणे शिरोधार्य मानली. भारतीय रंगाभिरुचीचे मूळ प्रादेशिक वातावरणात आणि नैसर्गिक आविष्कारात असलेले पाहून मोठे नवल वाटते. तशीच ही माडाची आणि सुरमाडाची झाडे पाहा. माडाची झाडे बारमहा हिरवी आणि फळांनी भरलेली दिसतात. पल्लवांचा नखरा त्यांना माहीतच नाही जसा; पण फाल्गुन लागला, की त्यांच्या माथ्यावर अधिक फिक्या रंगाचे जावळ भुरभुरल्यासारखे वाटते. त्यांच्या पानांच्या गाभ्यातून वाढलेल्या नारळांच्या लंगरांच्या वर होडीच्या आकाराचे पेव फुटते आणि त्या सुक्या कळकट पेवातून वेताच्या रंगाच्या फुलांच्या लोंब्या बाहेर पडतात. चैत्राच्या मध्यापर्यंत या लोंब्या दिसतात. नारळाची फुले निर्गंध आणि टणक; पण झाडाखाली पडलेल्या फुलांच्या राशीतून चार-दोन फुले उचलून घेऊन जरा निरखून पाहा. त्यांचा तो टणकपणा तुम्हांला बोचणार नाही. पाकळ्यांच्या गुळगुळीत स्पर्शाने बोटे सुखावतात. तीन पाकळ्यांची फिक्या पिवळ्या रंगांची ही फुले. आत तशाच रंगांच्या क?