Maharashtra State Textbook Class 8 Geography PDF
Document Details
Uploaded by GratefulDialect7323
Mahatma Phule Vidyalaya
2018
डॉ. सुनिल मगर
Tags
Related
- NCERT Class 8 Geography - Resources and Development PDF
- Bhugol Aru Arthonaitik Bigyan (Social Science) Class 8 Assamese Medium PDF
- NCERT Class 8 Geography Resources and Development PDF
- MSBSHSE Class 12 Geography Textbook (Marathi) 2022-2023 PDF
- CBSE Class 8 Social Science Geography Chapter 5 Industries PDF
- Maharashtra Board Class 8 Geography Textbook PDF
Summary
This is a class 8 geography textbook from Maharashtra. It covers topics including local time and standard time, Earth's interior, humidity, cloud formation, ocean floor features, ocean currents, land use, population dynamics, and industries. The text includes maps, illustrations, and activities to enhance understanding.
Full Transcript
शासन निर्णय क्रमांक : अभ्यास-२११६/(प्र.क्र.४३/१६) एसडी-४ दिनांक २५.४.२०१६ अन्वये स्थापन करण्यात आलेल्या समन्वय समितीच्या दि. २९.१२.२०१७ रोजीच्या बैठकीमध्ये हे पाठ्यपुस्तक सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून निर्धारित करण्यास मान्यता देण्यात आली आहे....
शासन निर्णय क्रमांक : अभ्यास-२११६/(प्र.क्र.४३/१६) एसडी-४ दिनांक २५.४.२०१६ अन्वये स्थापन करण्यात आलेल्या समन्वय समितीच्या दि. २९.१२.२०१७ रोजीच्या बैठकीमध्ये हे पाठ्यपुस्तक सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून निर्धारित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. इयत्ता आठवी २०१८ ‘hmamîQ´> amÁ¶ nmR>çnwñVH$ {Z{‘©Vr d Aä¶mgH«$‘ g§emoYZ ‘§S>i, nwUo. आपल्या स्मार्टफोनवरील DIKSHA APP द्वारे पाठ्यपुस्तकाच्या पहिल्या पृष्ठावरील Q. R. Code द्वारे डिजिटल पाठ्यपुस्तक व प्रत्येक पाठामध्ये असलेल्या Q. R. Code द्व ारे त्या पाठासंबधं ित अध्ययन अध्यापनासाठी उपयुक्त दृकश्राव्य साहित्य उपलब्ध होईल. (A) (C) (D) प्रस्तावना विद्यार्थी मित्रांनों, इयत्ता आठवी म्हणजे उच्च प्राथमिक शिक्षणाचे शेवटचे वर्ष. या वर्गात तुमचे स्वागत आहे. भूगोल विषय तुम्ही इयत्ता तिसरी ते पाचवी परिसर अभ्यासातून तसेच इयत्ता सहावीपासून या विषयाच्या स्वतंत्र पाठ्यपुस्तकातून शिकत आहात. इयत्ता आठवीसाठी भूगोलाचे पाठ्यपुस्तक तुमच्या हाती देताना आनंद वाटतो आहे. या पाठ्यपुस्तकातून भूगोलाच्या थोड्या उच्च श्रेणीच्या संकल्पना तुम्ही शिकणार आहात. बालपणापासून आकाशात दिसणारे ढग, पाऊस यांच्या संदर्भाने विशेष अभ्यास या पाठ्यपुस्तकात आहे. आपल्या नीलग्रहाचे अंतरंग कसे आहेत. मनुष्याने कशाच्या आधारावर अंतरंगाबाबत अनुमाने काढली याचे विवेचन या पाठ्यपुस्तकात थोडक्यात केले आहे. पृथ्वीचा सर्वांत जास्त भाग व्यापलेल्या जलावरणातील जलाची गतीशीलता, प्रवाह व त्यांमागील प्रेरक शक्ती यांचा अभ्यास या पाठ्यपुस्तकात तुम्हांला करायचा आहे. जमिनीचा वापर, उद्योग, लोकसंख्या ही मानवी जीवनाची अविभाज्य अंगे आहेत. या अंगांचा जिज्ञासावर्धक परिचय या पाठ्यपुस्तकातून तुम्हांला होईल. भविष्यातही या संकल्पना तुम्हांला उपयोगी पडणार आहेत. या अंगांची नागरी व ग्रामीण बाजू नीट समजून घ्या. मानवाचा विकास व ही अंगे यांचा सहसंबंध जोडण्याचा प्रयत्न करा. हे सर्व घटक शिकण्यासाठी पाठ्यपुस्तकात अनेक कृती, उप्रकम दिले आहेत. विचारांवर चालणारे प्रश्न जसे, जरा विचार करा, डोके चालवा, शोधा पाहू या शीर्षकांतर्गत मांडले आहेत. यांचा उपयोग विद्यार्थ्यांना नक्की होईल. पाठ्यपुस्तकात दिलेले नकाशे, चित्राकृतींचा वापर जरूर करावा, त्यामुळे भौगोलिक संकल्पना सोप्या होण्यास मदत होईल. दिलेल्या कृती स्वतः करून पहा. यापूर्वीच्या पाठ्यपुस्तकातील संबोध देखील तुम्हांला उपयोगी पडतोच, त्याचा वापर करा. आपल्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा ! (डॉ. सुनिल मगर) पुणे संचालक दिनांक : १८ एप्रिल २०१८ (अक्षय्य तृतीया) महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व भारतीय सौर : २९ चैत्र १९४० अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे. इयत्ता आठवी भूगोल अध्ययनात सुचवलेली शैक्षणिक प्रक्रिया अध्ययन निष्पत्ती अध्ययनार्थ्यांस जोडीने/गटामध्ये/वैयक्तिकरित्या अध्ययनाच्या संधी अध्ययनार्थी देणे व त्यास पुढील गोष्टींसाठी प्रवृत्त करणे. पृथ्वीगोल किंवा जगाच्या नकाशातील रेखावृत्तावरून विविध पृथ्वीगोल व नकाशावरील रेखावृत्ते वापरून स्थानिक वेळ व प्रमाणवेळ प्रदेशांमधील वेळा समजून घेणे. काढतो. मूळ रेखावृत्तापासून जगातील विविध स्थानांच्या स्थानिक रेखावृत्तीय स्थानावरून प्रमाणवेळ व स्थानिक प्रमाणवेळ यांच्यातील वेळांमधील फरक काढणे. सहसंबंधानुसार सहजतेने वापर करतो. पृथ्वीचे अंतरंग समजण्यासाठी आकृती/प्रतिकृती/दृश्य प्रतिमा/दृक् पृथ्वीच्या अंतरंगातील रचनेसंदर्भात आकृती/प्रतिकृती/प्रतिमा श्राव्य माध्यमे यांचा वापर करणे. इत्यादींद्वारे स्पष्टीकरण करतो. प्रयोगाद्वारे बाष्पीभवन, सांद्रीभवन ह्या प्रक्रिया समजून घेणे. बाष्पीभवन व सांद्रीभवन या नैसर्गिक घटनांविषयी माहिती सांगतो. आर्द्रतेवर परिणाम करणारे घटक समजणे. आर्द्रतेवर परिणाम करणारे घटक स्पष्ट करतो. चित्रे तसेच दृक्श्राव्य साधनांद्वारे ढगांविषयी माहिती घेणे. ढगांचे प्रकार ओळखून पर्जन्याविषयी अंदाज व्यक्त करतो. आकृती/प्रतिकृती/दृक्श्राव्य साधनांद्वारे सागरगतळ रचना समजून सागरी भूरूपे आकृतीवरून ओळखतो. घेणे. सागरी अवसादविषयी चर्चा करतो. सागर प्रवाह निर्मितीची प्रक्रिया प्रयोगाद्वारे समजणे. सागरी प्रवाह निर्मितीची कारणे स्पष्ट करतो. सागरी प्रवाहांचा हवामान, मासेमारी, जलवाहतूक यांवर होणारा सागरी प्रवाहांचा मानवी जीवनावर होणारा परिणाम उदाहरणांसह स्पष्ट परिणाम समजणे. करतोे. चित्रे, नकाशा, प्रतिमा यांवरून ग्रामीण व नागरी भागातील भूमी ग्रामीण व नागरी भूमी उपयोजनातील फरक सांगतो. उपयोजन सांगणे. नकाशातील भूमी उपयोजनावरून ग्रामीण व नागरी वस्त्यांची माहिती भूमी उपयोजनाचे आकृतिबंध ओळखणे. सादर करतो. लोकसंख्या हे एक संसाधन आहे हे समजणे. लोकसंख्या अभ्यासाचे महत्त्व सांगतो. लोकसंख्येची वयोगटांनुसार, लिंग-गुणोत्तर, जन्म-मृत्यूदर, ग्रामीण लोकसंख्येची रचना स्पष्ट करणे. व शहरी प्रमाण, व्यवसायानुसार रचना, साक्षरता या घटकांसाठीचे लोकसंख्येच्या गुणवत्तेवर परिणाम करणारे घटक सकारण सांगतो. आलेख नमुने अभ्यासणे. लोकसंख्येचे असमान वितरण समजण्यासाठी जगाच्या नकाशाचे वाचन करून स्पष्टीकरण करतो. विविध उदाहरणांवरून उद्योगांमधील फरक समजणे. विविध उद्योगांचे वर्गीकरण करतो. औद्योगिक क्षेत्रांना भेट देऊन तसेच विविध संदर्भस्त्रोतांदव् ारे माहिती उद्योगांचे महत्त्च सांगतो. मिळविणे. उद्योगाची सामाजिक बांधिलकी (C.S.R.) सांगतो. उद्योगांच्या समाजदायित्वाबाबत चर्चा करणे. औद्योगिक विकासावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करतो. नकाशाद्वारे महाराष्ट्र व भारतातील औद्योगिक विकास समजणे. उद्योग पूरक धोरणांची माहिती मिळवतो. नकाशावाचनात प्रमाणावरून निष्कर्ष काढणे. दोन ठिकाणांमधील जमिनीवरील अंतर व नकाशातील अंतर यांवरून प्रमाण ठरवितो. नकाशात दिलेल्या प्रमाणाचे दुसऱ्या प्रमाणात रूपांतर करणे. नकाशा प्रमाणासाठीच्या विविध पद्धती उदाहरणाद्वारे स्पष्ट करतो. नकाशा प्रमाणावरून नकाशांचे प्रकार ओळखतो. नकाशांचे प्रमाणावरून प्रकार समजून घेणे. नकाशा प्रमाणाचा प्रत्यक्ष वापर करतो. एखाद्या क्षेत्राची निवड करून क्षेत्रभेटीची कार्यवाही करणे, प्रश्नावली क्षेत्रभेटीचे नियोजन करतो. तयार करणे. क्षेत्रभेटीसाठी प्रश्नावली तयार करतो. माहितीचे विश्लेषण करून अर्थ निर्वचन करणे, अहवाल तयार करणे. मिळविलेल्या माहितीच्या आधारे क्षेत्रभेटीचा अहवाल सादर करतो - शिक्षकांसाठी - P पाठ्यपुस्तक प्रथम स्वतः समजून घ्यावे. ज्याद्व ारे त्यांच्यामध्ये विषयाची गोडी निर्माण होऊ P प्रत्येक पाठातील कृतीसाठी काळजीपूर्वक व स्वतंत्र शकेल. यासाठी शाळेत ‘ग्लोबी क्लब’ सुरू करावा. नियोजन करावे. नियोजनाशिवाय पाठ शिकवणे O सदर पाठ्यपुस्तक रचनात्मक पद्धतीने व कृतियुक्त अयोग्य ठरेल. अध्यापनासाठी तयार केलल े े आहे. सदर पाठ्यपुस्तकातील P अध्ययन-अध्यापनामधील ‘आंतरक्रिया’, ‘प्रक्रिया’, पाठ वर्गात वाचून शिकवू नयेत. ‘सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग’ व आपले सक्रिय मार्गदर्शन P संबोधांची क्रमवारिता लक्षात घेता, पाठ अनुक्रमणिकेनसु ार अत्यंत आवश्यक आहे. शिकवणे विषयाच्या सुयोग्य ज्ञाननिर्मितीसाठी सयुक्तिक P शाळेमध्ये असलेली भौगोलिक साधने आवश्यकतेनसु ार ठरेल. वापरणे हे विषयाच्या सुयोग्य आकलनासाठी गरजेचे P ‘माहीत आहे का तुम्हांला?’ हा भाग मूल्यमापनासाठी आहे. त्या अनुषगं ाने शाळेतील पृथ्वीगोल, जग, भारत, विचारात घेऊ नये. राज्य हे नकाशे, नकाशासंग्रह पुस्तिका, इत्यादींचा वापर P पाठ्यपुस्तकाच्या शेवटी परिशिष्ट दिले आहे. पाठांतील अनिवार्य आहे, हे लक्षात घ्या. महत्त्वाच्या भौगोलिक शब्दांची/संकल्पनांची विस्तृत P पाठांची संख्या मर्यादित ठेवली असली तरीही प्रत्येक माहिती या परिशिष्टात दिली आहे. परिशिष्टातील शब्द पाठासाठी किती तासिका लागतील याचा विचार वर्णानुक्रमे दिले आहेत. या परिशिष्टात आलेले हे शब्द करण्यात आलेला आहे. अमूर्त संकल्पना अवघड व पाठांमध्ये निळ्या चौकटीने दर्शविलेले आहेत. उदा., क्लिष्ट असतात, म्हणूनच अनुक्रमणिकेत नमूद केलले ्या ‘दिनमान’ (पाठ क्र. १, पृष्ठ क्र. १) तासिकांचा पुरेपूर वापर करावा. पाठ थोडक्यात आटपू P परिशिष्टाच्या शेवटी संदर्भासाठी संकते स्थळे दिलेली नये. त्यामुळे विद्यार्थ्यांवर बौध्दीक ओझे न लादता आहेत. तसेच संदर्भासाठी वापरलेल्या साहित्यांची विषय आत्मसात करण्यास त्यांना मदत होईल. माहिती दिलेली आहे. तुम्ही स्वतः तसेच विद्यार्थ्यांनी P इतर सामाजिक शास्त्रांप्रमाणे भौगोलिक संकल्पना या संदर्भाचा वापर करणे अपेक्षित आहे. या संदर्भ सहजगत्या समजणाऱ्या नसतात. भूगोलाच्या बहुतेक साहित्याच्या आधारे तु म ्हांला पाठ्यपु स ्तकाबाहे र संकल्पना या शास्त्रीय आधारावर व अमूर्त बाबींवर जाण्यास नक्कीच मदत होईल. हे विषय सखोल अवलंबून असतात. गटकार्य, एकमेकांच्या मदतीने समजण्यासाठी विषयाचे अवांतरवाचन नेहमीच उपयोगी शिकणे या बाबींना प्रोत्साहन द्या. त्यासाठी वर्गरचना असते, हे लक्षात घ्या. बदला. विद्यार्थ्यनां ा शिकण्यासाठी जास्तीत जास्त वाव P मूल्यमापनासाठी कृतिप्रवण, मुक्तोत्तरी, बहुपर्यायी, मिळेल अशी वर्गरचना ठेवा. विचारप्रवर्तक प्रश्नांचा वापर करावा. पाठांच्या शेवटी P पाठातील विविध चौकटी व त्या संदर्भाने सूचना देणारे स्वाध्यायात यांचे काही नमुने दिलेले आहेत. ‘ग्लोबी’ हे पात्र विद्यार्थ्यांमध्ये प्रिय होईल असे पहा. P पाठ्यपुस्तकातील ‘क्यू आर कोड’ वापरावा. - विद्यार्थ्यांसाठी - ग्लोबीचा वापर ः या पाठ्यपुस्तकात पृथ्वीगोलाचा वापर एक पात्र म्हणून केला आहे. त्याचे नाव आहे ‘ग्लोबी’ हा ग्लोबी प्रत्येक पाठात तुमच्या सोबत असेल. पाठातील विविध अपेक्षित बाबींसाठी तो तुम्हांला मदत करेल. प्रत्येक ठिकाणी त्याने सुचविलेली गोष्ट तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. (G) अनुक्रमणिका क्र. पाठाचे नाव क्षेत्र पृष्ठक्रमांक अपेक्षित तासिका १. स्थानिक वेळ व प्रमाण वेळ सामान्य भूगोल ०१ ०९ २. पृथ्वीचे अंतरंग प्राकृतिक भूगोल ०९ १० ३. आर्द्रता व ढग प्राकृतिक भूगोल १६ १० ४. सागरतळरचना प्राकृतिक भूगोल २४ ०९ ५. सागरी प्रवाह प्राकृतिक भूगोल २९ ०९ ६. भूमी उपयोजन मानवी भूगोल ३५ १० ७. लोकसंख्या मानवी भूगोल ४२ १० ८. उद्योग मानवी भूगोल ५२ १० ९. नकाशाप्रमाण प्रात्यक्षिक भूगोल ६० ०८ १०. क्षेत्रभेट प्रात्यक्षिक भूगोल ६८ ०८ ११. परिशिष्ट -- ७० -- १२. कृतिपृष्ठ -- ७५ -- S.O.I. Note : The following foot notes are applicable : (1) © Government of India, Copyright : 2018. (2) The responsibility for the correctness of internal details rests with the publisher. (3) The territorial waters of India extend into the sea to a distance of twelve nautical miles measured from the appropriate base line. (4) The administrative headquarters of Chandigarh, Haryana and Punjab are at Chandigarh. (5) The interstate boundaries amongst Arunachal Pradesh, Assam and Meghalaya shown on this map are as interpreted from the “North-Eastern Areas (Reorganisation) Act. 1971,” but have yet to be verified. (6) The external boundaries and coastlines of India agree with the Record/Master Copy certified by Survey of India. (7) The state boundaries between Uttarakhand & Uttar Pradesh, Bihar & Jharkhand and Chattisgarh & Madhya Pradesh have not been verified by the Governments concerned. (8) The spellings of names in this map, have been taken from various sources. DISCLAIMER Note : All attempts have been made to contact copy righters (©) but we have not heard from them. We will be pleased to acknowledge the copy right holder (s) in our next edition if we learn from them. मुखपृष्ठ : B¶ËVm {VgarVbr ‘wbo AmVm AmR>drV Ambr ˶m§Mr AZw^dm§Mr {jVrOohr {dñVmaV AmhoV. AmVm Vo n¥ÏdrÀ¶m A§Va§JmMm d ^y-Mw§~{H$¶ joÌmMm à¶moJ AZw^dV AmhoV... (H$ënZm {MÌ) मलपृष्ठ : 1) gmdbrMm à¶moJ H$aVmZm ‘wbo - gm¡Oݶ, g{Ve OJXmio, lr‘§V amUr {Z‘©bmamOo H$ݶm àembm, A³H$bH$moQ> 2) ñWbm§VaMm EH$ àH$ma 3) T>J- gm¡Oݶ, Am{bem OmYd 4) Vmn‘mZ d AmЩVm ‘mnH$ ¶§Ì 5) ‘[a¶mZm JV}V gd}jUmgmR>r OmUmar N>moQ>r nmU~wS>r. १. स्थानिक वेळ व प्रमाण वेळ दिवसाचा कालावधी लागतो. सूर्योदय ज्या बाजूस होतो थोडे आठवूया. ती आपण पूर्व दिशा मानतो. या अनुषंगाने विचार करता Ø पृथ्वीवरील दिनमान व रात्रमानाचा कालावधी नेहमी पृथ्वी स्वत:भोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. पृथ्वीच्या का बदलतो? परिवलनाचे परिणाम म्हणून आपण सूर्योदय, मध्यान्ह, Ø जगाच्या नकाशात प्रत्येकी १° अंतराने काढलेली सूर्यास्त, मध्यरात्र अनुभवत असतो. परिवलनादरम्यान रेखावृत्तांची एकूण संख्या किती असते? पश्चिमेकडील रेखावृत्ते क्रमाक्रमाने सूर्यासमोर येतात Ø सूर्याचे पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना दिसणे हा तर पूर्वेकडील रेखावृत्ते क्रमाक्रमाने अंधारात जातात. जे कशाचा परिणाम आहे? रेखावृत्त सूर्यप्रकाशात येत असते तेथे सूर्योदय होत असतो. Ø पृथ्वीच्या परिवलनाची दिशा सांगा. याउलट जे रेखावृत्त अंधारात जात असते त्या रेखावृत्तावर Ø पृथ्वीच्या परिवलनादरम्यान दररोज किती रेखावृत्ते सूर्यास्त होत असतो. सूर्यासमोरून जातात? एखाद्या बसमधून प्रवास करताना खिडकीतून बाहेर Ø कोणत्या रेखावृत्तावर वार बदलतो? पाहिल्यास आपणांस झाडे, विजेचे खांब, इमारती, इत्यादी आपल्या विरुद्ध दिशेने सरकत असल्याचे जाणवते. Ø पूर्वीच्या काळी कालमापन कसे केले जात असावे? वास्तविक त्या बाबी स्थिर असतात आणि आपली बस Ø सध्याच्या काळात कालमापनासाठी कोणती साधने पुढे जात असते. अशाच प्रकारे पृथ्वीच्या स्वत:भोवती वापरतात? फिरण्यामुळे सूर्याचे स्थान पूर्वेकडून पश्चिमेकडे बदलल्याचे भौगोलिक स्पष्टीकरण आपण दररोज अनुभवतो. आपण सकाळी लवकर उठून दात घासतो, अंघोळ करून पहा. करतो. न्याहारी करून शाळेला जातो. वर्गात अध्ययन करतो. घरी परत येतो. संध्याकाळी खेळण्यासाठी मैदानावर स्वच्छ सूर्यप्रकाश असणाऱ्या दिवशी खो-खोच्या मैदानावर जाऊन पुढील कृती करा. त्यासाठी खालील मुद्दे जातो. रात्री जेवण करतो आणि दात घासून झोपी जातो. वापरा. दिवसभरात आपण अशा विविध कृती करत असतो. ü खो-खोच्या मैदानावरील रोवलेल्या खांबांपक ै ी दिवसभर आपल्या दिनचर्येचा विचार करता प्रत्येक कृतीची वेळ उन्हात राहील असा एक खांब या कृतीसाठी निवडा. ठरविण्याची गरज असते. ü दिवसभरात वेगवेगळ्या वेळी या खांबाची सावली प्राचीन काळी कालमापन करण्यासाठी लोक विविध नैसर्गिक घटनांची तसेच साधनांची मदत घेत असत. निरीक्षण व अनुभव यांच्या आधारे ते दिवसाचे पुढील प्रकारे विभाग करत असत. सूर्याेदयापासून सूर्यास्तापर्यंतचा कालावधी म्हणजे दिनमान , तर सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंतचा कालावधी म्हणजे रात्रमान. एका सूर्योदयापासून दुसऱ्या पूर्व सूर्योदयापर्यंतचा कालावधी म्हणजे एक संपूर्ण दिवस होय. संध्या पूर्वी नैसर्गिक घटनांच्या संदर्भाने तसेच घटिकापात्र, वाळूचे सकाळी ४ वा. ८ वा. सकाळी दुपारी दुपारी घड्याळ, इत्यादी साधने वापरून वेळ सांगितली जात असे. १० वा. १२ वा. २ वा. पृथ्वीचे परिवलन होण्यासाठी २४ तास म्हणजे एक आकृती १.१ : दिवसभरात सूर्याचे स्थान व सावलीत होणारा बदल 1 कोणत्या दिशेला पडते, याचे निरीक्षण करा. ॠतुमानाप्रमाणे दिनमान २४ तासापेक्षा अिधक असू ü सावलीची लांबी मोजा व ती वहीत नोंदवा. शकते. त्यामुळे या भागात सूर्योदय, मध्यान्ह व सूर्यास्त ü सावली आणि सूर्य यांच्या सापेक्ष दिशा वहीत नोंदवा. तसेच मध्यरात्र या वेळा समजून घेणे आवश्यक ठरते. (आकृती १.१ पहा.) ध्रुवावर मात्र ६ महिन्यांपर्यंत दिनमान असते आणि ü सावली सर्वांत आखूड असेल तेव्हा सूर्य आकाशात ६ महिने रात्रमान असते. ध्रुवावर सूर्योदय किंवा सूर्यास्त कोठे असतो ते सांगा. यांची वेळ सांगताना तारीख सांगावी लागते व सूर्य ü सावली दिवसभरात कोणकोणत्या वेळी लांब पडली आकाशात विशिष्ट तारखेला उगवल्यानंतर तो सातत्याने ते सांगा. क्षितिजावर घिरट्या घालत असल्यासारखा फिरतो भौगोलिक स्पष्टीकरण त्यामुळे येथे सावली व सावलीची लांबी यांचा विचार अगदी सकाळी व संध्याकाळी सावलीची लांबी मध्यान्ह वेळेसाठी करता येत नाही. जास्त असते, तर दुपारी सर्वांत आखूड सावली नोंदवल्याचे जरा विचार करा. तुम्हांला निरीक्षणाद्वारे समजले असेल. खांबाच्या संदर्भात सूर्याचे आकाशातील स्थान बदलल्याने खांबाच्या Ø ध्रुवावरती एका विषुवदिनाला सूर्योदय होतो सावलीची दिशा व लांबीही बदलते. आकृती १.१ पहा. तर पुढच्या विषुवदिनाला सूर्यास्त होतो. या याचे कारण परिवलनादरम्यान सूर्यासमोर पृथ्वीचा विशिष्ट कालावधीत तुम्ही ध्रुवावर असलात तर सूर्याचा भाग येणे व पुढे जाणे हे आहे. आकृती १.२ पहा. आणखी आकाशातील भ्रमण मार्ग कसा दिसेल ते सांगा. एक गोष्ट आपण या अनुषंगाने अनुभवतो ती म्हणजे Ø कोणत्या दिवशी आकाशात सूर्य जास्तीत जास्त सकाळी व संध्याकाळी हवेचे तापमान कमी असते, तर उंचावर असेल? दुपारी ते जास्त असते. वेगवेगळ्या रेखावृत्तांवर सूर्योदय, मध्यान्ह व सूर्यास्त स्थानिक वेळ : वेळा वेगवेगळ्या असतात. मुंबईत जेव्हा मध्यान्हाची वेळ सूर्यास्त असेल तेव्हा कोलकाता येथे ही स्थिती असणार नाही. मध्यरात्र मध्यान्ह कोलकाता मुंबईच्या पूर्वेकडील रेखावृत्तावर असल्याने उ. ध्रुव तेथे मध्यान्ह वेळ आधीच होऊन गेली असेल. सूर्योदय पृथ्वीच्या पृष्ठावरील एखाद्या ठिकाणाची स्थानिक आकृती १.२ : परिवलन व सूर्यसापेक्ष स्थिती वेळ मध्यान्हासंदर्भाने निर्धारित केली जाते, म्हणजेच एका सूर्योदयानंतर जसजसा सूर्य आकाशात वर सरकतो रेखावृत्तावरील स्थानिक वेळ सारखीच असते. स्थानिक तसतशी आपली सावली लहान होत जाते. सर्वसाधारणपणे हे नेहमी लक्षात ठेवा. मध्यान्हाच्या वेळी सावलीची लांबी सर्वांत कमी असते. मध्यान्होत्तर काळात सूर्य क्षितिजाकडे सरकल्यामुळे l पृथ्वीला एक परिवलन (३६०°) पूर्ण करण्यासाठी सायंकाळपर्यंत पुन्हा आपली सावली लांब होत जाते. सुमारे २४ तास लागतात. पृथ्वीवर, मध्यान्ह वेळ एका रेखावृत्तावर म्हणजेच उत्तर l पृथ्वी एका तासाला ३६० अंश ÷ २४ तास = १५ ध्रुववृत्तापासून ते दक्षिण ध्रुववृत्तापर्यंत सर्वत्र सारखी अंश स्वत:भोवती फिरते. असते. एखाद्या ठिकाणच्या संदर्भात आकाशातील l पृथ्वीला एका अंशात फिरण्यास ६० मिनिटे ÷ १५ सूर्याच्या स्थानावरून ठरविण्यात आलेली वेळ म्हणजे त्या अंश = ४ मिनिटे लागतात. ठिकाणाची स्थानिक वेळ होय. l प्रत्येकी एक अंश अंतरावरील रेखावृत्तांच्या ध्रुववृत्तापासून ध्रुवापर्यंतच्या प्रदेशात मात्र स्थानिक वेळेत ४ मिनिटांचा फरक पडतो. 2 वेळ मर्यादित क्षेत्रात वापरताना अडचण येत नाही. जेव्हा रेखावृत्तांच्या अनुषंगाने विस्तीर्ण क्षेत्रातील लोकांचा सांगा पाहू ! एकमेकांशी संबंध येतो त्या वेळी स्थानिक वेळ वापरल्याने पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागांत स्थानिक वेळ गोंधळ निर्माण होऊ शकतो त्यामुळे अशा वेळी स्थानिक निरनिराळी असते हे आपण अभ्यासले. त्या ठिकाणी वेळ वापरणे सोयीचे नसते. लोकांचे दैनंदिन व्यवहार तेथील स्थानिक वेळेप्रमाणेच चालतात. आकृती १.३ मध्ये वेगवेगळ्या रेखावृत्तांवरील करून पहा. स्थानिक वेळा दिलेल्या आहेत. या नकाशाचे निरीक्षण करा मूळ रेखावृत्तावरील वेळेच्या संदर्भाने विविध व पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यासाठी अंशात्मक अंतर रेखरवृत्तांच्या स्थानिक वेळा शोधता येऊ शकतात. व वेळ यांची सांगड घाला. यासाठी पुढील उदाहरणे अभ्यासा. Ø दिलेल्या नकाशात दिनमान अनुभवणारा प्रदेश उदा.१ कोणत्या रेखावृत्तांदरम्यान आहे ते सांगा. इराणमधील मशाद हे शहर साधारणपणे ६०० पूर्व Ø नकाशातील कोणत्या रेखावृत्तावर मध्यान्ह व कोणत्या रेखावृत्तावर आहे. जेव्हा ग्रीनीचला दुपारचे १२ वाजले रेखावृत्तावर मध्यरात्र आहे? असतील तेव्हा मशाद या शहराची स्थानिक वेळ सांगा. Ø न्यू आॅर्लिन्स येथील एडवर्ड हा कोणत्या रेखावृत्तावर विधान : मूळ रेखावृत्ताच्या पूर्वेकडे प्रत्येक आहे? रेखावृत्तावर स्थानिक वेळ ४ मिनिटांनी वाढते. Ø अक्रा शहरात किती वाजले आहेत? ग्रीनीच व मशाद या ठिकाणांच्या रेखावृत्तातील फरक Ø त्याच वेळी पाटण्यातील शरद व टोकियोतील याकोईटो = ६०० काय करत आहेत? या शहरांत कोणती वेळ असेल? एकूण वेळेतील फरक = ६० Î ४ Ø कोणतेही एक रेखावृत्त निवडा. त्या रेखावृत्ताच्या = २४० मिनिटे शेजारील १ अंश पूर्व व पश्चिम रेखावृत्तांवरील = २४० ÷ ६० मिनिटे स्थानिक वेळ सांगा. = ४ तास म्हणजे मशाद येथे......चे...... वाजले असतील. जरा विचार करा. उदा.२ ब्राझील देशातील मॅनाॅस हे शहर ६०० पश्चिम Ø जगात जास्तीत जास्त किती स्थानिक वेळा असू रेखावृत्तावर आहे. ग्रीनीच येथे मध्यान्हीचे १२ वाजले शकतात ? असता मॅनाॅस येथील स्थानिक वेळ काढा. Ø एका तासात किती रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात? विधान : --------------------- ----------------------------- माहीत आहे का तुम्हांला ? ग्रीनीच व मॅनाॅस या ठिकाणांच्या रेखावृत्तातील फरक पृथ्वीवरील एखाद्या ठिकाणी सूर्य जेव्हा डोक्यावर = येतो तेव्हा त्या ठिकाणी मध्यान्ह झालेली असते. एकूण वेळेतील फरक = Î मध्यरात्रीपासून मध्यान्हापर्यंतची वेळ इंग्रजीत सांगताना = मिनिटे अंकापुढे a.m. असे लिहितात. याचा अर्थ ante = ÷ ६० मिनिटे meridiem असा आहे. जेव्हा परिवलनामुळे एखादे = तास रेखावृत्त मध्यान्ह वेळेच्या पुढे सरकते तेव्हा त्या वेळेस मॅनॉस शहर ग्रीनीचच्या........ असल्याने या मध्यान्होत्तर वेळ/काळ असे म्हटले जाते. मध्यान्हापासून ठिकाणची स्थानिक वेळ ग्रीनीच येथील वेळेपेक्षा.... ते मध्यरात्रीपर्यंतची वेळ इंग्रजीत सांगताना अंकापुढे p.m. तासांनी..... अाहे. म्हणून जेव्हा ग्रीनीचला मध्यान्ह असेल अशी दर्शवितात, म्हणजेच post meridiem होय. तेव्हा मॅनॉसला.......... चे.... वाजले असतील. 3 नकाशाशी मैत्री 4 आकृती १.३ स्थानिक वेळेनुसार व्यवहार केल्यास वेळेची विसंगती जरा डोके चालवा. निर्माण होऊन दैनंदिन व्यवहारात गैरसोय होईल. म्हणून Ø घड्याळ न वापरता खालीलपैकी कोणकोणत्या देशाच्या सर्वसाधारण मध्यवर्ती ठिकाणाहून जाणाऱ्या वेळा तुम्ही ठामपणे सांगू शकाल ते पुढील चौकटींत रेखावृत्ताची स्थानिक वेळ ही प्रमाणभूत मानण्यात येते. ü करून नोंदवा. ती त्या देशाची प्रमाण वेळ म्हणून निवडली जाते. देशातील l सूर्योदय l सूर्यास्त सर्व ठिकाणी व्यवहारामध्ये ही प्रमाण वेळ वापरली जाते. l मध्यान्ह l मध्यरात्र जागतिक व्यवहाराच्या दृष्टीनेदेखील निरनिराळ्या देशातील प्रमाण वेळेत सुसंगती असणे आवश्यक असते. भौगोलिक स्पष्टीकरण यासाठी जगाचे २४ कालविभाग करण्यात आले आहेत. या कालविभागांची रचना मूळ रेखावृत्तावरून म्हणजेच शून्य l कोणत्याही रेखावृत्ताच्या पूर्वेकडील रेखावृत्तांवरील रेखावृत्तासंदर्भाने केलेली आहे. वेळ पुढे असते, तर पश्चिमेकडील रेखावृत्तांवरील वेळ मागे असते. सर्वसाधारणपणे तास-दोन तासाच्या फरकापेक्षा l जसजसे दोन रेखावृत्तांतील अंतर वाढत जाते, तसतसा जास्त रेखावृत्तीय विस्तार असलेल्या देशासाठी एक प्रमाण त्यांच्या स्थानिक वेळेतील फरकही वाढत जातो. वेळ मानली जाते. परंतु त्यापेक्षा जास्त रेखावृत्तीय (पूर्व- l दोन ठिकाणच्या रेखावृत्तांवरील अंशात्मक फरकास पश्चिम) विस्तार असल्यास तेथे एकच प्रमाण वेळ मानणे ४ मिनिटांनी गुणले, तर त्या ठिकाणाच्या स्थानिक सोयीचे नसते, त्यामुळे अशा प्रदेशांत एकापेक्षा अधिक वेळेतील फरक किती मिनिटे आहे ते समजते. प्रमाण वेळा मानल्या जातात. l रेखावृत्तांतील अंतर आपण नकाशा किंवा पृथ्वीगोल यांच्या साहाय्याने ठरवू शकतो. पहा बरे जमते का ? पृष्ठ क्र. ७५ व ७६ वरील कृती करून विविध जागतिक काल विभागांचा नकाशा, ठिकाणच्या वेळा समजून घ्या. या खेळातून दोन विरुद्ध संदर्भ साहित्यातून शोधा व भारत देश कोणत्या रेखावृत्तांवरील प्रमाण वेळा ओळखता येतात का ते पहा? कालविभागात येतो ते पहा. प्रमाण वेळ : सांगा पाहू ! शोधा पाहू ! नकाशा संग्रहाचा वापर करून कोणकोणत्या Ø मुंबई हे शहर ७३° पूर्व रेखावृत्तावर आहे. कोलकाता देशात एकापेक्षा जास्त प्रमाण वेळ असणे आवश्यक हे शहर ८८° पूर्व रेखावृत्तावर आहे. या दोन्ही आहे ते शोधा. शहरांच्या रेखावृत्तांमधील फरक सांगा. Ø मुंबईमध्ये स्थानिक वेळेप्रमाणे दुपारचे ३ वाजले असता भारतीय प्रमाण वेळ : कोलकाता येथील स्थानिक वेळ काय असेल? भारताची प्रमाण वेळ मिर्झापूर शहरावरून भौगोलिक स्पष्टीकरण (अलाहाबाद, उत्तर प्रदेश) जाणाऱ्या ८२° ३०' पूर्व या रेखावृत्तावरील वेळेनुसार ठरवली जाते. हे रेखावृत्त मुंबई व कोलकाता ही दोन्ही ठिकाणे भारतातच भारताच्या रेखावृत्तीय विस्ताराच्या संदर्भाने देशाच्या आहेत पण भिन्न रेखावृत्तांवर आहेत. त्यांच्या स्थानिक मध्यभागी आहे. या रेखावृत्ताची स्थानिक वेळ भारताची वेळेत एक तासाचा फरक अाहे. प्रमाण वेळ म्हणून निवडली गेली आहे. या रेखावृत्तावर एखाद्या देशात रेखावृत्तानुसार भिन्न स्थानिक सूर्य मध्यान्ह स्थितीत आला म्हणजे भारतातील सर्व वेळा विचारात घेतल्यास देशभरातील दैनंदिन व्यवहारात ठिकाणी दुपारचे १२ वाजले असे मानले जाते. ८२°३०' सुसंवाद राहणार नाही. देशात प्रत्येक ठिकाणाच्या पूर्व रेखावृत्तावरील स्थानिक वेळेत आणि भारतातील इतर 5 नकाशाशी मैत्री आकृती १.४ कोणत्याही ठिकाणच्या स्थानिक वेळेत एक तासापेक्षा मिनिटांचा फरक असतो? अधिक फरक पडत नाही. Ø मिर्झापूर येथील रेखावृत्ताचे अंशात्मक मूल्य किती आहे? सांगा पाहू ! Ø ८२° ३०' पूर्व रेखावृत्तावर प्रमाण वेळेनुसार सकाळचे आकृती १.४ चे निरीक्षण करा व प्रश्नांची उत्तरे ८ वाजले असता पुढील ठिकाणी तेथील लोकांच्या सांगा. घड्याळात किती वाजले असतील? Ø भारताचा रेखावृत्तीय विस्तार लक्षात घेता १° फरकाने l जम्मू l मदुरै l जैसलमेर l गुवाहाटी नकाशावर एकूण किती रेखावृत्ते काढता येतील? Ø या ठिकाणांदरम्यानचे अंतर अधिक असूनही प्रमाण Ø दोन लगतच्या १° अंतरावरील रेखावृत्तांमध्ये किती वेळेत का बदल नाही? 6 जागतिक प्रमाण वेळ : जागतिक व्यवहारासाठी जागतिक प्रमाण वेळ माहीत आहे का तुम्हांला ? (०° रेखावृत्त) म्हणून इंग्लंडमधील ग्रीनीच येथील स्थानिक जंतर-मंतर : खगोलशास्त्रीय वेधशाळा वेळ (GMT-Greenwich Mean Time) विचारात घेतली राजस्थानमधील जयपूरचे महाराजा सवाई जयसिंह जाते. इतर देशांच्या प्रमाण वेळांतील फरक ग्रीनीच वेळेच्या (द्वितीय) हे खगोलशास्त्रज्ञ, गणितज्ञ आणि संदर्भाने सांगितला जाताे. भारताची प्रमाण वेळ ही ग्रीनीच वास्तुविशारद होते. त्यांनी अठराव्या शतकात उज्जैन, येथील वेळेपेक्षा ५ तास ३० मिनिटांनी पुढे आहे. ग्रीनीच वाराणसी, जयपूर, दिल्ली आणि मथुरा या पाच येथे संध्याकाळचे ५ वाजले असतील तर भारतात रात्रीचे १०.३० वाजलेले असतात. ठिकाणी जंतर-मंतर (खगोलीय वेधशाळा) बांधले. आज मथुरा येथील जंतर-मंतर अस्तित्वात नाही पहा बरे जमते का ? परंतु उर्वरित चारही ठिकाणी असलेल्या वेधशाळांना Ø भारतात सकाळी ८ वाजले असतील, तर ग्रीनीच आपण भेट देऊ शकतो. आजही जंतर-मंतरमध्ये येथे किती वाजले असतील? सावलीद्वारे सेकंदापर्यंत अगदी अचूक वेळ मिळते. Ø भारतात दुपारचे २ वाजले असतील तेव्हा इतर जंतर-मंतर केवळ सूर्याच्या प्रकाशामुळे पडणाऱ्या कोणकोणत्या देशांत दुपारचे २ वाजले असतील? सावलीवरून वेळ दाखविणारे घड्याळ नव्हे तर त्या Ø भारतात सकाळचे नऊ वाजले असतील तेव्हा खगोलशास्त्रीय वेधशाळा आहेत. या ठिकाणाहून ८२°३०' पश्चिम रेखावृत्तावर किती वाजले खगोलांच्या निरीक्षणाची सोयही उत्तम आहे. असतील? Ø मूळ रेखावृत्तावर किती वाजले असता १८०० रेखावृत्तावर नवीन दिवसाची सुरुवात होईल? माहीत आहे का तुम्हांला ? अमेरिकेची संयुक्त संस्थाने या देशातील National Institute of Standards and Technology (NIST) या संस्थेने अचूक वेळ दर्शवणारे घड्याळ विकसित केले आहे. या घड्याळात वेळेची दुरुस्ती (वाढ किंवा घट) ही फक्त १ सेकदं ाची करावी लागते; जंतर-मंतरमधील यंत्रांच्या साहाय्याने आजही तीदेखील २० कोटी वर्षातून एकदा. खगोलीय वेध घेणे शक्य आहे. अत्याधुनिक उपकरणांचा भारतातील वेळेच्या अचूकते संदर्भातील सेवा शोध लागल्यानंतर आता मात्र ही यंत्रे ‘सांस्कृतिक वारसा’ National Physical Laboratory, नवी दिल्ली ही म्हणूनच महत्त्वाची ठरली आहेत. संस्था पुरवते. या ठिकाणी वापरात असणाऱ्या घड्याळात वेळेतील अंतर हे सेकंदाच्या १ लाखापर्यंतचा भाग अचूकता राखते. जरा विचार करा. अंतराळ संशोधन, कृत्रिम उपग्रह प्रक्षेपण, इत्यादी कामांत वेळेची अचूकता लागते. तेथे ही घड्याळे वापरली Ø पुढीलपैकी कोणकोणत्या देशांत एकच प्रमाण वेळ जातात. अाहे? l मेक्सिको l श्रीलंका l न्यूझीलंड l चीन Ø एखाद्या देशाचा अक्षवृत्तीय विस्तार मोठा असूनही प्रमाण वेळ एकच का असू शकते? 7 स्वाध्याय प्रश्न १. योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. (इ) ब्राझीलमध्ये सावो पावलो येथील फुटबॉल सामाना (अ) पृथ्वीच्या परिवलनास २४ तासांचा कालावधी भारतीय प्रमाण वेळने सु ार सकाळी ६ वाजता सुरू लागतो. एका तासात पृथ्वीवरील............... झाली. तेव्हा सावो पावलो येथील स्थानिक वेळ काय असेल ते स्पष्ट करा. (i) ०५ रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात. प्रश्न ४. मूळ रेखावृत्तावर २१ जून रोजी रात्रीचे १० वाजले तेव्हा (ii) १० रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात. अ,ब,क या ठिकाणची वेळ व दिनांक कोष्टकात लिहा. (iii) १५ रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात. (iv) २० रेखावृत्ते सूर्यासमाेरून जातात. ठिकाण रेखावृत्त दिनांक वेळ (आ) पृथ्वीवरील कोणत्याही दोन ठिकाणांच्या स्थानिक अ १२०० पूर्व वेळेतील फरक समजण्यासाठी........... (i) दोन्ही ठिकाणची मध्यान्हाची वेळ माहीत ब १६०० पश्चिम असावी लागते. क ६०० पूर्व (ii) दोन्ही ठिकाणांच्या रेखावृत्तांतील अंशात्मक प्रश्न ५. खालीलपैकी वेगवेगळ्या स्थिती ‘क’ या ठिकाणी अंतरातील फरक माहीत असावा लागतो. कोणकोणत्या आकृतींत दिसून येतात ते आकृतींखालील (iii) दोन्ही ठिकाणांच्या प्रमाण वेळेतील फरक चौकटींत लिहा. माहीत असावा लागतो. (i) सूर्योदय (ii) मध्यरात्र (iii) मध्यान्ह (iv) सूर्सया ्त (iv) आंतरराष्ट्रीय वाररेषेनुसार बदल (i) (ii) करावे लागतात. क क (इ) कोणत्याही दोन लगतच्या उ. ध्रुव उ. ध्रुव रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत.......... (iii) (iv) (i) १५ मिनिटांचा फरक असतो. (ii) ०४ मिनिटांचा फरक असतो. उ. ध्रुव क उ. ध्रुव (iii) ३० मिनिटांचा फरक असतो. क (iv) ६० मिनिटांचा फरक असतो. प्रश्न २. भौगोलिक कारणे लिहा. उपक्रम : (अ) स्थानिक वेळ मध्यान्हावरून निश्चित केली जाते. (अ) आचार्य अत्रे यांच्या ‘आजीचे घड्याळ’ या कवितेतील (आ) ग्रीनीच येथील स्थानिक वेळ जागतिक प्रमाण वेळ आजीचे घड्याळ नेमके कोणते ते शोधा. ही कविता मानली जाते. इंटरनेट किंवा ग्रंथालयातील संदर्भ साहित्यातून शोधा. (इ) भारताची प्रमाण वेळ ८२० ३०' पूर्व रेखावृत्तावरील (आ) अंतराळात पृथ्वीच्या परिवलनाचा वेग ताशी किती किमी स्थानिक वेळेनुसार निश्चित केली आहे. असतो ते शोधा. (ई) कॅनडा या देशात सहा वेगवेगळ्या प्रमाण वेळा आहेत. *** प्रश्न ३. थोडक्यात उत्तरे लिहा. (अ) ६०° पूर्व रेखावृत्तावर दुपारचे बारा वाजले असतील, तर ३०° पश्चिम रेखावृत्तावर किती वाजले असतील ते स्पष्ट करा. (आ) एखाद्या प्रदेशाची प्रमाण वेळ कशी निश्चित केली जाते? 8 २. पृथ्वीचे अंतरंग थोडे आठवूया. भौगोलिक स्पष्टीकरण दूध तापविण्यापूर्वी पूर्णपणे द्रव स्वरूपात होते. दुधाला मागील इयत्तांमध्ये तुम्ही खडकांचे प्रकार, उकळी आल्यानंतर त्यातून वाफा बाहेर पडत होत्या. काही ज्वालामुखी व भूकंप यांची ओळख करून घेतली आहे. वेळाने दुधावर साय तयार झालेली दिसते. ही साय आतील त्यावर आधारित पुढील प्रश्नांची उत्तरे सांगा. दुधापेक्षा कमी तापमानाची असते. यावरून असे म्हणता Ø भूकंप होतो म्हणजे नेमके काय होते? येईल, की पातेल्यातील सायीचा थर प्रथम थंड झाला तर Ø अग्निजन्य खडक कसे तयार होतात? त्याखालील दूध त्यामानाने गरम व द्रवरूप राहिले. असेच Ø ज्वालामुखी म्हणजे काय? काहीसे पृथ्वीच्या थंड होण्याच्या प्रक्रियेत झाले असावे. Ø ज्वालामुखी उद्रेकादरम्यान कोणकोणते पदार्थ बाहेर पृथ्वीची निर्मिती सौरमालेबरोबरच झाली याबाबत पडतात? शास्त्रज्ञांमध्ये एकमत आहे. सुरुवातीला पृथ्वी उष्ण Ø हे पदार्थ कोणत्या स्वरूपात असतात? व वायुरूप गोळ्याच्या स्वरूपात होती. स्वतःभोवती फिरता फिरता ती थंड होत गेली. पृथ्वी थंड होण्याची Ø हे पदार्थ थंड असतात की उष्ण असतात? का? क्रिया पृष्ठभागाकडून केंद्राच्या दिशेस झाल्याने पृथ्वीच्या करून पहा. बाह्यभागास (भू-कवच) थंड व घन स्वरूप प्राप्त झाले, मात्र अंतरंगातील भागात उष्णता जास्त असून भूपृष्ठाकडून अर्धा लीटर दूध तापत ठेवा. दूध तापून उकळी गाभ्याकडे जाताना ती सातत्याने वाढत जाते. तसेच विशिष्ट आल्यानंतर तापवणे बंद करा. आता दुधाच्या पातेल्यावर खोलीवर अंतरंग अर्धद्रव स्वरूपात आहे. झाकण ठेवा. प्रयोगाचा पुढचा भाग फार महत्त्वाचा आहे. पृथ्वीचे अंतरंग नेमके कसे आहे याबाबत मानवाच्या यामध्ये तुमचे निरीक्षण कौशल्य वापरायचे असून त्याद्वारे मनात आजही कुतूहल आहे. पृथ्वीच्या अंतरंगाचे प्रत्यक्ष निष्कर्षाप्रत पोहोचायचे आहे. निरीक्षण करणे अद्याप शक्य झाले नाही. त्यामुळे दहा मिनिटांनी पातेल्यावर ठेवलेले झाकण बाजूला भूगर्भशास्त्रज्ञांनी अनेक पद्धतीने अभ्यास करून काही करा व थोडे तिरपे धरा. काय होते ते पहा. दुधावर काय अनुमाने काढली आहेत. त्यासाठी ज्वालामुखीतून बाहेर दिसत आहे ते पहा. दुधावर जमलेला पदार्थ कोणत्या पडणारे पदार्थ व भूकंपलहरी यांचा अभ्यास प्रामुख्याने स्वरूपात आहे. हा पदार्थ बाजूला करा. या पदार्थाचे व केला. दुधाचे तापमान यांतील फरक समजून घ्या व पुढील प्रश्नांची ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणाऱ्या पदार्थांत उत्तरे द्या. प्रचंड उष्ण लाव्हारस, वायू, वाफ, इत्यादी घटक आढळले. Ø दूध तापत ठेवले होते तेव्हा ते कोणत्या स्वरूपात होते? लाव्हारस थंड झाल्यावर त्यापासून अग्निजन्य खडक तयार Ø दुधाला उकळी आली होती तेव्हा दुधातून काय बाहेर होतात. त्याचबरोबर तापमान, घनता, गुरूत्वाकर्षण बल, येत होते? दाब यांच्या अभ्यासातील अनुमानांवरून अंतरंगाची रचना समजून घेता आली. उदा., खाणीमध्ये खोलवर गेल्यास Ø पातेल्यावरील झाकणावर काय जमा झाले होते? तापमान वाढ झाल्याचे आढळते. तसेच ज्वालामुखी Ø दुधावर जमलेला पदार्थ द्रव की घन ते सांगा. उद्रेकातून बाहेर येणारा लाव्हारस तप्त असतो. यावरून Ø तो आतील दुधापेक्षा थंड होता की गरम होता? पृथ्वीचा अंतर्भाग उष्ण व प्रवाही असावा. असे अनुमान Ø असा प्रयोग आणखी कोणकोणत्या पदार्थांवर करता भूगर्भशास्त्रज्ञांनी काढले. पृथ्वीच्या निरनिराळ्या भागात येईल? दरवर्षी असंख्य भूकंप होतात. त्यामुळे भूकंपलहरी 9 निर्माण होतात. या भूकंपलहरी पृथ्वीच्या अंतर्गाभ्यातून घनगोल तयार करा. प्रवास करतात. त्यांची दिशा व वेग यांचा अभ्यास करून ü पृथ्वीगोलाप्रमाणे या घनगोलावर पिवळ्या रंगाने अंतरंगाच्या रचनेबाबत अनुमान केले जाते. भूकचाच्या वेगवेगळे खंड दाखवा. आता तुमचा मातीचा पृथ्वीगोल अभ्यासासाठी मानवाने विंधन छिद्रेदेखील पाडली आहेत. तयार झाला आहे. जरा विचार करा. ü पृथ्वीचे अंतरंग पाहण्यासाठी मातीचा घनगोल बरोबर मधून अर्धा कापा. आतमध्ये तुम्हांला पृथ्वीच्या पृथ्वीच्या एका बाजूने खोलवर खणत जाऊन अंतरंगाप्रमाणे विविध थर दिसतील. या थरांना नावे विरुद्ध बाजूने बाहेर येता-जाता येईल का याबाबतच्या देण्याचा प्रयत्न करा. तुमच्या कल्पना वहीत लिहा आणि त्यावर चर्चा करा. (टीप : शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कल्पना ऐकून भौगोलिक स्पष्टीकरण त्याप्रमाणे पृथ्वीच्या अंतरंगाचा विषयप्रवेश करावा.) भूपृष्ठापासून गाभ्याकडे होणाऱ्या बदलात प्रामुख्याने तापमान, घनता यांचा समावेश होतो. या दोन घटकांमधील माहीत आहे का तुम्हांला ? बदलांच्या अनुषंगाने पृथ्वीच्या अंतरंगाचे पुढील विभाग पडतात. आपल्या पृथ्वीची निर्मिती सुमारे ४६० कोटी पृथ्वीच्या अंतरंगाचे विभाग वर्षांपूर्वी झाली. प्रारंभिक अवस्थेत पृथ्वी वायुरूप होती. उष्णता उत्सर्जन प्रक्रिया होऊन हळूहळू ती थंड भूकवच प्रावरण गाभा होत गेली. पृथ्वीला प्रथम द्रवरूप अवस्था प्राप्त झाली. खंडीय महासागरीय बाह्यगाभा अंतर्गाभा कालांतराने पृथ्वीचा सर्वांत बाह्य भाग प्रथम थंड झाल्याने कवच कवच त्याभागाला घनरूप अवस्था प्राप्त झाली. पृथ्वीच्या या भागालाच भूकवच म्हणून संबोधले जाते. अजूनही उच्च प्रावरण निम्न प्रावरण सूर्यमालेतील बाह्य ग्रह वायुरूप अवस्थेत आहेत. अंतर्गाभा पृथ्वीच्या अंतरंगाची रचना : बाह्यगाभा करून पहा. प्रावरण (खालील कृती दोन विद्यार्थ्यांच्या गटात करा. संदर्भासाठी पृष्ठ ११ वरील छायाचित्रे वापरा.) ü लाल, पिवळा व निळा असे रंगांचे मातीचे गोळे घ्या. (बाजारात मिळतात तसे.) भूकवच (खंडीय कवच/ ü लाल रंगाचा गोळा थोडा मोठा असावा. महासागरीय कवच) ü पिवळ्या रंगाचा गोळा लाटून घ्या. तयार झालेल्या पोळीमध्ये ज्याप्रमाणे पुरणपोळी करताना पोळीत पुरण आकृती २.१ : पृथ्वीच्या अंतरंगाची रचना दाखवणारी प्रतिमा भरतात त्याप्रमाणे लाल रंगाचा गोळा भरा. व त्याला भूकवच : घनगोलाचा आकार द्या. पृथ्वीचा सर्वांत वरचा भाग हा घनरूप असून तो ü आता निळ्या रंगाचा गोळा वरीलप्रमाणे लाटून घ्या. भूकवच म्हणून ओळखला जातो. भूकवचाची जाडी सर्वत्र या पोळीमध्ये पिवळ्या रंगाचा गोळा भरून याचाही सारखी नाही. सरासरी जाडी ३० ते ३५ किमी मानली 10 पृथ्वीचे अंतरंग जाणून घेण्यासाठी करावयाच्या कृतीचे टप्पे १ ८ २ ९ ३ १० ४ ११ १२ ५ १३ ६ १४ ७ 11 भूकवच (सरासरी ३० किमी हा थर सिलिका व मॅग्नेशिअम यांच्या संयुगाने बनलेला शिलावरण आहे. याला पूर्वी सायमा असे नाव होते. या थराची सरासरी उच्च प्रावरण जाडी ७ ते १० किमी आहे. महासागरीय कवचाची घनता भूकवच २.९ ग्रॅम/घसेमी ते ३.३ ग्रॅम/घसेमी इतकी आहे. या थरात ) प्रावरण (२८७० किमी व प्रावरण प्रामुख्याने बेसॉल्ट व गॅब्रो हे खडक आढळून येतात. प्रावरण (घनरूप) शिलावरण (१०० किमी) निम्न प्रावरण हे नेहमी लक्षात ठेवा. पृथ्वीच्या अंतरंगातील विविध थरांमधील मूलद्रव्ये बाह्यगाभा कमी सिलिका (Si) (द्रवरूप) ॲल्युमिनिअम (Al) मी) गाभा (३४७१ कि घनता सिलिका (Si) मॅग्नेशिअम (Mg) निकेल (Ni) जास्त आयर्न (Fe) अंतर्गाभा (घनरूप) पृथ्वीचे केंद्र (६३७१ किमी) माहीत आहे का तुम्हांला ? आकृती २.२ : पृथ्वीचे अंतरंग दाखवणारी प्