Marathi Grammar Practice Questions PDF
Document Details
Uploaded by Deleted User
Tags
Summary
These are practice questions about Marathi grammar. They cover different topics and question types. Ideal for students preparing for Marathi language exams.
Full Transcript
## मराठी भाषेचा अभ्यास ### प्रशिक्षण प्रश्न **१) मराठी राजभाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?** १) २७ फेब्रवारी २) २ मार्च ३) ३० जून ४) २ मे **२) मराठी भाषेची लिपी कोणती आहे?** १) देवनागरी २) मोडी ३) खरोष्ठी ४) ब्राम्ही **३) खालीलपैकी कोणते पंचज्ञानेंद्रीयांपैकी नाही?** १) जीभ २) डोळे...
## मराठी भाषेचा अभ्यास ### प्रशिक्षण प्रश्न **१) मराठी राजभाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?** १) २७ फेब्रवारी २) २ मार्च ३) ३० जून ४) २ मे **२) मराठी भाषेची लिपी कोणती आहे?** १) देवनागरी २) मोडी ३) खरोष्ठी ४) ब्राम्ही **३) खालीलपैकी कोणते पंचज्ञानेंद्रीयांपैकी नाही?** १) जीभ २) डोळे ३) दात ४) कान **४) भाषेचे नियम म्हणजेच भाषेचे ______ होय.** १) वर्ण २) लिपी ३) वर्णमाला ४) व्याकरण **५) जावई शब्दातील 'ज' हा वर्ण ______ प्रकारचा आहे.** १) दंत्य २) ओष्ठ्य ३) दंततालव्य ४) तालव्य **६) लेखनपद्धतीनुसार जोडाक्षरांचे प्रकार दिसून येतात.** १) व्यंजनांच्या २) शुद्ध शब्दांच्या ३) अशुद्ध शब्दांच्या ४) संधी विग्रहांच्या **७) कठोर असणारे व्यंजन ओळखा.** १) ज् २) घ् ३) क् ४) ब् **८) दिलेल्या शब्दांचा अकारविल्हे क्रम लावून दुसऱ्या क्रमांकावर येणारा शब्द कोणता?** - पशुपक्षी - गुरेढोरे - भाजीपाला - झाडे १) भाजीपाला २) पशुपक्षी ३) गुरेढोरे ४) झाडे **९) 'कल्पवृक्ष' या शब्दात किती व्यंजने आहेत?** १) चार २) पाच ३) सहा ४) सात **१०) "चंद्रोदय" या शब्दाचा संधी प्रकार ______ आहे.** १) स्वरसंधी २) व्यंजन संघी ३) पूर्वरूप संधी ४) विशेष संधी **११) "यशोधन" या शब्दाचा संधी प्रकार ______ आहे.** १) विसर्ग-र्-संधी २) विशेष संधी ३) विसर्ग-उकार संघी ४) तृतीय व्यंजन संधी **१२) अधोरेखित शब्दाची जात ओळखा.** माझी मुलगी सुंदर दिसते. १) कर्ता २) विशेषण ३) कर्म ४) क्रियापद **१३) खालीलपैकी कोणते चुकीचे विधान आहे?** १) जो विकारी शब्द नामाची व्याप्ती मर्यादित करतो त्यास शब्दयोगी अव्यय म्हणतात. २) कर्ता म्हणजे क्रियापदाने दर्शविलेली क्रिया करणारा शब्द. ३) वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे क्रियापद होय. ४) ज्याच्यावर क्रिया घडते त्याला कर्म म्हणतात. **१४) त्याला खूप समजावून सांगितले, पण तो ऐकत नाही. या वाक्यातील अव्यय शोधा.** १) नाही २) पण ३) ऐकत ४) खूप **१५) "घरा ______ पिंपळाच्या झाडाला तिने फेऱ्या मारल्या." रिकाम्या जागी योग्य अव्ययाचा वापर करा.** १) पुढील २) विषयी ३) वरील ४) केवळ **१६) 'शिक्षक' या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप सांगा.** १) शिक्षिका २) शिक्षा ३) शिकवण ४) शिष्या **१७) स्त्रीलिंगी शब्द ओळखा.** १) खुर्ची २) झाड ३) फळा ४) नकाशा **१८) खालील पर्यायांतून एकवचनी शब्द ओळखा.** १) भाकऱ्या २) केळी ३) नद्या ४) गाणे **१९) 'बहिणाबाईस' या शब्दाची विभक्ती ओळखा.** १) चतुर्थी २) तृतीया ३) प्रथमा ४) पंचमी **२०) 'दिल्लीहून पंतप्रधानांचे विमान आले' या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे?** १) सप्तमी २) द्वितीया ३) षष्टी ४) पंचमी **२१) 'शेतकरी शेतात राबतो' या वाक्याचा अधोरेखित शब्दाचा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे?** १) संबोधन २) प्रथमा ३) चतुर्थी ४) पंचमी **२२) गटात न बसणारा पर्याय निवडा.** १) प्रथमा, द्वितीया २) प्रथमपुरुष, व्दितीयपुरुष ३) तृतीया, चतुर्थी ४) पंचमी, संबोधन **२३) अधोरेखित शब्दाची विभक्ती सांगा.** आमची युवकशक्ती दारूत नष्ट झाली १) तृतीया २) सप्तमी ३) पंचमी ४) चतुर्थी **२४) हे आत्मवाचक सर्वनाम नामाच्या किंवा सर्वनामाच्या सोबतीशिवाय सहसा वापरले जात नाही.** १) मी २) तू ३) स्वतः ४) कोण **२५) मी स्वतः त्याला पाहिले अधोरेखित शब्द सर्वनामाच्या कोणत्या प्रकारातील आहे?** १) अनिश्चित २) संबंधी ३) दर्शक ४) आत्मवाचक **२६) खालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखा.** १) कोण २) आपण ३) ते ४) काय **२७) 'जो येईल तो पाहिल' या वाक्यातील 'जो-तो' हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे?** १) आत्मवाचक २) दर्शक सर्वनाम ३) पुरुषवाचक सर्वनाम ४) संबंधी सर्वनाम **२८) हा, ही, हे, तो, ती, ते चा र नामाऐवजी केल्यास तेथे कोणती सर्वनामे होतात ?** १) अनिश्चित सर्वनामे २) सामान्य सर्वनामे ३) संबंधी सर्वनामे ४) दर्शक सर्वनामे **२९) खालीलपैकी कोणते वाक्य आज्ञार्थी नाही.** १) तुम्ही आज नाटकाला जाऊ नका. २) तू अभ्यास करशील ना? ३) तू आज अभ्यास पूर्ण कर. ४) सकाळी लवकर उठा. **३०) नेहमी खरे बोलावे' या वाक्यातील विध्यर्थी क्रियापदावरून कोणता बोध होतो ?** १) कर्तव्य २) इच्छा ३) तर्क ४) योग्यता **३१) पुढील शब्दाचा समास ओळखा - सहकुटुंब** १) द्विगु २) नत्रतपुरुष ३) बहुव्रीही ४) द्वंद्व **३२) खालील सामासिक शब्दाचा विग्रह ओळखा.** प्रजैक्य १) प्रजाः ऐक्य २) प्रजा+ऐक्य ३) प्रजा+एक ४) प्रजः+ ऐक्य **३३) खालीलपैकी कोणते समाहार व्दंव्द समासाचे उदाहरण आहे?** १) अंथरूणपांघरूण २) खरेखोटे ३) आईवडील ४) हरिहर **३४) व्दंव्द समासाचे उदाहरण ओळखा. 'मुलांनी प्रतिदिन आईवडिलांची आज्ञा पाळावी'** १) प्रतिदिन २) मुले ३) आईवडील ४) आज्ञा