Maharashtra Board Class 12 Marathi Question Paper 2020 PDF
Document Details
Uploaded by Deleted User
2020
Maharashtra Board
Tags
Summary
This is a Marathi language question paper for class 12 from the Maharashtra Board. The paper is dated February 22 and contains questions on essays, prose, poetry, grammar and creative writing.
Full Transcript
## Maharashtra Board Class 12 Marathi Question Paper 2020 (February 22) ### बोर्ड कृतिपत्रिकाः फ्रेबुवारी 2020 ### मराठी Time: 3 Hours Max. Marks: 80 कृतिपत्रिकेसाठी सूचनाः 1. आकलन कृती व व्याकरण यांम...
## Maharashtra Board Class 12 Marathi Question Paper 2020 (February 22) ### बोर्ड कृतिपत्रिकाः फ्रेबुवारी 2020 ### मराठी Time: 3 Hours Max. Marks: 80 कृतिपत्रिकेसाठी सूचनाः 1. आकलन कृती व व्याकरण यांमधील आकृत्या किंवा चौकटी पेनाने अथवा पेन्सिलीने काढाव्यात. 2. स्वच्छता, नीटनेटकेपणा व लेखन नियमांनुसार लेखन यांकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे. ### विभाग १ – निबंधलेखन **कृती 1.** खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर सुमारे ३०० शब्दांपर्यंत निबंध लिहा. 1. लोकशाहीत प्रसारमाध्यमांचे महत्त्व 2. जगातील इंधन संपले तर 3. माझ्या महाविद्यालयातील स्नेहसंमेलन 4. मी गंगा नदी बोलतेय ### विभाग २ – गद्य **कृती 2.** (अ) खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 1. 'भर' प्रत्यय लागलेले दोन शब्द लिहा. i. ii. 2. जमेदार मानसिंग यांचे एका ओळीत वर्णन करा. मी त्या खडकाच्या आडून हळूहळू बाहेर यायची तयारी करू लागलो. छातीभर पाण्यातून खडकाला चिकटूनच मी ढोपरभर पाण्यात आलो व तिथूनच दूर किनाऱ्यावर एक खडक हेरून ठेवला. किनाऱ्यावर आल्याबरोबर मी जीव घेऊन वाकडा तिकडा त्या खडकाकडे पळू लागलो. पुलावरून येणाऱ्या चिनी शिपायांनी ते पाहिलं व त्यांनी माझ्यावर गोळ्या मारायला सुरुवात केली. आता येणाऱ्या गोळ्या माझ्या पाठीमागून येऊन सूंऽ सूंऽऽ करीत बाजूने जात होत्या. गोळी लागेपर्यंत पळत जायचं असं मी ठरवलं होतं. शेवटी एकदा त्या हेरलेल्या खडकाजवळ मी पोहचलो. माझा धीर आणखी चेपला! क्षणाचाही विलंब न लावता मी एका खडकामागून दुसऱ्या खडकाकडे नागमोडी रेषेत धावत जाऊ लागलो. अशाच एका खडकाजवळ आमचे जमेदार मानसिंग लपलेले होते. त्यांच्या पोळलेल्या हाताचे बँडेज तसेच होते. त्यांच्या बळकट शरीराकडे पाहून मी म्हटले, 'चलो साहब, यहाँसे भाग निकलते हैं। पीछे कॅ. जिंदलसाहब के पास जाएंगे और उनको लेकर निकल जाएंगे !' मी पाहिलं – त्यांच्या चेहऱ्यावर जावं की नाही या विचाराचे भाव दिसले. मी पुन्हा म्हटलं, 'चलो साहब, सोचने का वक्त नहीं है !' या माझ्या बोलण्यावर ते उठले व म्हणाले, 'चलो'! 3. 'त्यांच्या चेहऱ्यावर जावं की नाही या विचाराचे भाव दिसले,' या वाक्यातील आशयसौंदर्य ८ ते १० ओळींत लिहा. (ब) खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. मी म्हणालो, “मला जी पुस्तकं विशेषत्वाने आवडतात त्यांना मी माझ्या हृदयाच्या कप्यात जपून ठेवलंय. सुरुवातीला डॉक्टरकी केलेले व नंतर तत्त्वज्ञानाचा गाढ अभ्यास करून पुढे नोबेल पुरस्काराचा सन्मान लाभलेले डॉ. अॅलेक्स कॅरेल यांचं 'मॅन द अननोन' हे माझं आवडतं पुस्तक आहे. शरीर आणि मन हे दोन्ही वेगवेगळे नसून दोन्हींची सुदृढ आणि सशक्त वाढ एकत्रितपणे होणं गरजेचं आहे. या दोन्हीपैकी एकाकडे दुर्लक्ष करून चालतच नाही, हा विचार या पुस्तकात मांडला आहे. ज्यांना डॉक्टर व्हायचं आहे त्यांनी हे पुस्तक वाचायलाच हवं. त्यामुळे त्यांच्या लक्षात येईल, की मानवी शरीर हे यंत्र नसून एक अत्यंत बुद्धिमान जैवप्रणाली असून तिची उपपत्ती प्रणाली अत्यंत गुंतागुंतीची आहे. माझ्या दृष्टीनं दुसरं आदरणीय पुस्तक म्हणजे तिरुवल्लूर यांचं 'थिरूक्कुरल'! हे पुस्तक म्हणजे एक उत्कृष्ट आयुष्य संहिता आहे. तिसरं म्हणजे 'लाईट फ्रॉम मेनी लॅम्प्स'! लिलीयन इचलर वॉटसन यांनी लिहिलेल्या या पुस्तकाने मी भारावून गेलो आहे. आपल्या जगण्याचे संदर्भ कोणते असावेत हे या पुस्तकात सांगितलेलं असून गेली पन्नास वर्षे हे पुस्तक माझ्या जीवन प्रवासात एक मार्गदर्शक म्हणून उभं आहे." 'शरीर आणि मनाची सुदृढता' याविषयी १२ ते १५ ओळींत तुमचे विचार लिहा. किंवा तुम्हांला आवडलेल्या पुस्तकांविषयी १२ ते १५ ओळींत माहिती लिहा. (क) खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 1. आधुनिक संस्कृतीच्या हवाली केलेल्या गोष्टीः i. ii. 2. भावनिक अनुभव पारखा झाल्यामुळे लेखकाची निर्माण झालेली मनोवस्थाः i. ii. अनेक वर्षांपूर्वी केव्हातरी, न कळत, मी या आधुनिक संस्कृतीच्या हवाली केलं. त्यातून प्रथम शरीराचा उपयोग थांबला व त्याच्याकडे दुर्लक्ष सुरू झालं. मग अधिक काम व यशप्राप्तीच्या मागे लागून मनाची सहज अवस्था सुटली. बुद्धी व विचारांच्या वाळवंटात भावनिक अनुभव पारखा झाला; प्रसन्नता गेली. पुढे मनामध्ये 'मी व माझं' वाढत गेलं. त्यांचंच कुंपण स्वतःभोवती निर्माण झालं व विश्वाशी असलेली एकरूपता तुटली आणि आश्चर्य म्हणजे विश्वस्वरूपाशी नाळ तुटल्यावर स्वतःशी असलेला संपर्कही सुटला. माझं स्वतःशीच नातं तुटलं होतं. माझं घर हरवलं होतं. माझ्या एकसंध निरोगी जीवनाचे तुकडे तुकडे पडले होते. माझ्या आतील एक इंद्रिय, एक होकायंत्र मला या दरम्यान वारंवार इशारा देण्याचा प्रयत्न करत होतं, की काहीतरी गफलत होते आहे. पण मी त्याच्याकडे दुर्लक्ष करून रेटत गेलो. या स्वतःपासून तुटण्याचा ताण व खिन्नतेमुळे माझा हृदयरोग निर्माण झाला असावा. 3. “स्वतःपासून तुटण्याचा ताण व खिन्नतेमुळे माझा हृदयरोग निर्माण झाला'', या वाक्यातील आशय तुमच्या शब्दांत ८ ते १० ओळींत लिहा. ### विभाग ३ – पद्य **कृती ३.** (अ) खालील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. स्त्रीपुरुषं सर्व कष्टकरी व्हावें ।। कुटुंबा पोसावें ।। आनंदानें ।। ध्रु. ।। नित्य मुलीमुलां शाळेत घालावें ।। अन्नदान दयावें ।। विदयार्थ्यांस ।। २।। सार्वभौम सत्य स्वतः आचरावें ।। सुखें वागवावें ।। पंगु लोकां ।। ३ ।। अशा वर्तनानें सर्वां सुख दयाल ।। स्वतः सुखी व्हाल ।। जोती म्हणे ।। ४ ।। सर्वांचा निर्मीक आहे एक धनी ।। त्याचें भय मनीं ।। धरा सर्व ।। ध्रु. ।। न्यायानें वस्तूचा उपभोग घ्यावा ।। आनंद करावा ।। भांडू नये ।। २ ।। धर्म राज्य भेद मानवा नસાવે ।। सत्यानें वर्तावें ।। ईशासाठीं ।। ३ ।। सर्व सुखी व्हावे भिक्षा मी मागतों ।। मनुजा सांगतों ।। जोती म्हणे ।। ४ ।। 1. 'अखंडा'तील 'यमक' अलंकार असलेली एक काव्यपंक्ती लिहा. 2. स्वतः सुखी होण्याची लक्षणे i. ii. 3. 'सत्यवर्तना' विषयी तुमचे मत ८ ते १० ओळींत लिहा. (ब) खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. स्वप्नात तुझ्यामागे कुणी जल्लाद धावताहे असं दृश्य असलं की तुला धावताच येत नाही. माझाही असाच अनुभव – माझ्यावर कुणी प्राणघातक शस्त्राने हल्ला करताहे असं स्वप्न असलं की मला आक्रोशताच येत नाही. तसा प्रयत्न केला तर जागच येते. स्वप्नाचेही संदर्भ कसे रेंगाळतात आपल्याजवळ तू दळण्यासाठी जात्यावर बसलीस की तुला गाणेच येत नाही. तसेच माझेही – पुष्कळ बोलायचे ठरविले की बोलताच येत नाही. आता या विशाल औदयोगिक शहराच्या मर्यादा तुझ्याप्रमाणेच मलाही चल, आपण आपले एक छोटे नवे नगर वसवू ज्याची मानसिकता अमर्याद असेल प्रस्तुत कवितेतून व्यक्त झालेली 'अस्वस्थता' तुमच्या शब्दांत १२ ते १५ ओळींत लिहा. किंवा ‘आदर्श नगरां' विषयी तुमचे विचार १२ ते १५ ओळींत लिहा. ### विभाग ४ – व्याकरण **कृती ४.** (अ) खाली दिलेल्या पर्यायांतून निर्दोष शब्द ओळखून चौकटींत लिहा. 1. (य) सात्विक (ल) सात्वीक (र) सात्त्विक (व) सात्त्वीक 2. (य) क्रीडागंण (ल) क्रिडागंण (र) क्रिडांगण (व) क्रीडांगण (आ) खालील वाक्प्रचारांचा अचूक अर्थ वाक्प्रचारांसमोरील चौकटींत लिहा. 1. (य) लक्ष ठेवणे (ल) पाठमोरे होणे (र) गप्प राहणे (व) हाक मारणे 2. साद घालणे - 3. पाळत ठेवणे - (इ) खालील वाक्यांतील वाक्यप्रकारांचा योग्य पर्याय ओळखून चौकटींत लिहा. 1. एकदम खुबसूरत भाजी आहे ही! (य) प्रश्नार्थी ( ल) नकारार्थी (र) उद्गारार्थी (व) होकारार्थी 2. मला पैशांचा खणखणाटही नको नि सभा-संमेलनातले हारतुरेही नकोत. (य) नकारार्थी (ल) होकारार्थी (र) प्रश्नार्थी (व) उद्गारार्थी (ई) खालील वाक्यांत येणाऱ्या योग्य विरामचिन्हांचा पर्याय निवडून चौकटींत लिहा. 1. हा काय म्हणतोय रे बाबुरावांनी वाहनचालकास विचारले (य) दुहेरी अवतरणचिन्ह, प्रश्नचिन्ह (र) उद्गारचिन्ह, स्वल्पविराम (ल) पूर्णविराम, अर्धविराम (व) अपूर्णविराम, प्रश्नचिन्ह 2. बंगला रव्या रानडेचाच आहेना याची खात्री करून घेतली (य) दुहेरी अवतरणचिन्ह, स्वल्पविराम (ल) संयोगचिन्ह, अर्धविराम (र) एकेरी अवतरणचिन्ह, पूर्णविराम (व) अपसारणचिन्ह, अपूर्णविराम (उ) खालील पदयपंक्तीतील व विधानांतील रस ओळखून चौकटींत लिहा. 1. उदास हे वाळलेले पुन्हा बहरतील मळे. (य) वीररस (ल) बीभत्सरस (र) रौद्ररस (व) करुणरस 2. त्याचे सगळे रक्त उलथे पालथे झाले आणि एक किंकाळी फोडून तो विलक्षण वेगाने पळाला. (य) भयानकरस (ल) हास्यरस (र) करुणरस (व) वीररस (ऊ) खाली दिलेल्या पर्यायांतून पारिभाषिक शब्दांसाठी योग्य तो पर्याय निवडून चौकटींत लिहा. 1. Zero hour - (य) शून्य काल (ल) महानगर (र) पात्रता (व) रिक्त पद 2. Vacant post - ### विभाग ५ – विनोद : एक वाङ्मयप्रकार **कृती ५.** खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 1. मानवी जीवनातील विसंगती टिपणारे घटक: उपहास म्हणजे खिल्ली उडविणे किंवा टवाळी करणे असा सामान्यतः आपण अर्थ घेतो. उपहासातून विनोदनिर्मिती साधली जाते. शारीरिक व्यंगावर केलेला उपहास हीन दर्जाचा मानला जातो. विनोदी कलावंत. साहित्यिक हे मानवी जीवन व्यवहारातील विसंगती टिपतात. त्यातून विनोद निर्माण होतो, तसेच समाजातील वाईट प्रथा, रुढी, वृत्ती, प्रवृत्ती यांच्या विरोधात मनोभूमिका तयार होते. द. मा. मिरासदार यांनी अनेक उपहास कथा लिहिल्या. त्या सामाजिक जीवनात प्रगट होणाऱ्या विसंगतींचे दर्शन घडवितात. त्यांच्या 'विनोदी कथा' अंधश्रद्धांची खिल्ली उडवितात. उदा. 'भुताचा जन्म' या कथेतील पहिलवान धडधाकट, प्रचंड ताकदवान असूनही भुताला मात्र घाबरतो. सामाजिक विषयावर उपहासपर लेखन करणारे मुकुंद टाकसाळे यांच्या ‘दहावीची (अ) पूर्वतयारी' या पाठात बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेला अतिरेकी महत्त्व देताना पालकांना तारतम्य राहत नाही. बोर्डाच्या परीक्षेच्या काळात कोणकोणते अडथळे येऊ शकतात, त्यासाठी कोणती दक्षता घ्यावी म्हणून मुद्दाम वेगवेगळे अडथळे निर्माण करून, त्या वातावरणात मुलीला पेपर लिहिण्याचा सराव करण्यास भाग पाडतात. येथे पालकांच्या विक्षिप्त वागण्याचे आपणाला हसू येते. ‘मानवी जीवनात विनोदाचे महत्त्व' तुमच्या शब्दांत १२ ते १५ ओळींत लिहा. किंवा ‘तुमच्या दैनंदिन जीवनातील विसंगती' याबाबतचे तुमचे अनुभव १२ ते १५ ओळींत लिहा. 2. उपहासात्मक लेखन करणाऱ्या दोन विनोदी लेखकांची नावे लिहा. i. ii. 3. तुम्ही अनुभवलेला विनोदी प्रसंग ८ ते १० ओळींत लिहा. ### विभाग ६ – सर्जनशील लेखन **कृती ६.** (अ) खालील कवितेचे १५ ते २० ओळींत रसग्रहण करा. सगळ्याच झाडांच्या फळांवर सगळ्याच झाडांच्या फळांवर नसते लिहिलेले आपले नाव सगळ्याच गावांना जाण्याइतकी नसते आपल्या पायांची धाव आंबट म्हणू नयेत फळे आपल्या नावाची निशाणी नसलेली नाकारू नयेत गावे आपल्या पायांनी पालथी न घातलेली ही एवढीशी कुडी, इवलीशी ओंजळ... त्यात मावणार किती? पण हे गूढ अनाकलनीय मन ज्याला न मर्यादा न मिती आपापल्या कुवतीप्रमाणे स्वतःपुरतेच शोधत राहावे उत्तर आपल्याच अर्ध्यामुर्ध्या पाकळीतून मिळवावे निदान थेंबभर अत्तर वृंदा लिमये किंवा 1. खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर १५ ते २० ओळींत संवादलेखन करा. a. उपाहारगृहात काम करणाऱ्या कामगारांशी संवाद. b. अभ्यासाच्या नियोजनाबाबत दोन मित्र / मैत्रिणींमधील संवाद. c. स्त्री भ्रूणहत्येविषयी स्त्रीरोगतज्ज्ञांशी संवाद. 2. पुढील नामासाठी योग्य विशेषण लिहा. बंगला - (य) टुमदार (ख) रंगीत (ग) गुलाबी (घ) पाणीदार 3. खालील काव्यपंक्तीतील प्रतिमा ओळखून लिहा. काव्यपंक्ती - देहाचाच खांब करून अवघे घर तोलते ! प्रतिमा - 4. खालील वाक्यातील क्रियापदाचे स्थान बदलून उठावदार वाक्यरचना करा. वाक्य - आमच्या मैत्रीला व्यवहाराचा स्पर्श नव्हता. 5. खालील विधानातील पूर्णाभ्यस्त शब्द शोधून लिहा. वाक्य - त्याचे काळीज पुन्हा लुटुलुटु उडू लागले. पूर्णाभ्यस्त शब्द - ### विभाग ७ – उपयोजित लेखन **कृती ७.(अ)** खालीलपैकी कोणत्याही दोन कृती दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सोडवा. 1. वृत्तपत्रीय लेखांचे प्रकार a. वृत्तलेख - हलके-फुलके - गंमतीशीर लेख - लोकरुची वार्ता - परिपाकाची कथा - व्यक्तिचित्रणात्मक लेख - प्रासंगिक लेख b. दुर्घटनेतल्या लोकरुची वार्ता - 2. आकाशवाणी बातमीपत्राचे स्वरूप - a. आकाशवाणी केंद्राचे नाव - वृत्तनिवेदकाचे नाव - बातम्यांचे स्वरूप - ठळक बातम्या - क्रीडा व हवामानविषयक अंदाज - ठळक बातम्यांचे विवेचन - समारोप. 3. दूरचित्रवाणीवरील जाहिरातीचे संहितालेखन - a. कॅमेऱ्याची भाषा - कलांचा वापर - ग्राहक केंद्रबिंदू - कमी शब्दांत - परिणामकारक - समर्पक - इ. (ब) खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर मुलाखतपूर्व प्रश्नावली तयार करा. (१० ते १२ प्रश्न अपेक्षित) a. तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षांची मुलाखत. b. राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळविलेल्या विद्यार्थ्याची मुलाखत. c. प्लॅस्टिक निर्मूलनाबाबत कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याची मुलाखत. (क) खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 1. संकेतस्थळ तयार करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी. 2. संकेतस्थळावरील माहितीच्या आदानप्रदानासाठीची एक भाषा. 3. खालील मराठी शब्दांसाठी योग्य इंग्रजी प्रतिशब्द लिहा. i. विशेष खुणा - ii. दुवे - संकेतस्थळांवरील माहितीच्या आदानप्रदानासाठी एका प्रमाणित भाषेची गरज होती. त्यामुळे १९९० मध्ये 'हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज' (HTML) या भाषेची प्रमाणित संहिता तयार करण्यात आली. या भाषेवर कुणाचीही मालकी नाही. या भाषेचे जुजबी ज्ञान असणाऱ्या कुणालाही स्वतःचे संकेतस्थळ स्वतःच तयार करता येते. त्यासाठी वर्ड प्रोसेसरमध्ये मजकूर देवनागरीत लिहायचा. हा मजकूर लिहिण्यासाठी 'युनिकोड' किंवा 'बराहा' वापरता येईल. त्या मजकुरात विशिष्ट ठिकाणी या भाषेच्या विशेष खुणा (tags) नोंदवायच्या. मजकूर तयार झाला, की एचटीएमएल एडिटर वापरून या विशेष खुणा नोंदवता येतात. या विशेष खुणांना 'मार्कअप' म्हणतात. या खुणा दिसत नाहीत, पण त्यांच्यामुळे मजकूर शिस्तबद्ध पद्धतीने संकेतस्थळावर दिसतो. त्यानंतर 'htm' असा त्या धारिकेला (file) विस्तार दयायचा व धारिका सेव्ह करायची, की संकेतस्थळ तयार झाले. वर्ड प्रोसेसरमध्ये मजकूर तयार करून एचटीएमएल भाषेचे रूपांतर करणारे कन्व्हर्टर प्रोग्रॅम्सही उपलब्ध आहेत. पण आपले संकेतस्थळ आकर्षक करण्यासाठी आपणच आरेखन करून त्यानुसार खुणा नोंदवणे अधिक चांगले असते. अक्षरनिवड, मजकूर, त्याचे योग्य परिच्छेद, चित्रांच्या धारिका, हायपर टेक्स्टसाठी दुवे (links) या गोष्टी लक्षात ठेवून आपण आपले संकेतस्थळ तयार करू शकतो. पुढील टप्प्यासाठी Java.php किंवा Flash ही पॅकेज वापरता येतील. 4. उत्तम संकेतस्थळाची लक्षणे तुमच्या शब्दांत ८ ते १० ओळींत लिहा.