बदलते जीवन: भाग १ PDF

Summary

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा भारतीय समाजावर केलेला प्रभाव, स्वातंत्र्योत्तर कालखंडातील बदल, समाजकल्याण कार्यक्रमाचे उद्दिष्ट आणि सार्वजनिक आरोग्यातील प्रगती यांचा हा एक आढावा आहे.

Full Transcript

# बदलते जीवन : भाग १ ## इ.स. १९६१ ते इ.स. २००० पर्यंतचा कालखंड - विसाव्या आणि एकविसाव्या शतकात बदलाचा वेग प्रचंड आहे. - मानवी जीवन झपाट्याने बदलत चालले आहे. - पूर्वी आपण ज्यांची कल्पनाही करू शकलो नसतो त्या गोष्टी वास्तवात उतरल्या आहेत. ## प्राचीन व मध्ययुगीन काळात धर्म - धर्म ही माणसाची एक महत्त...

# बदलते जीवन : भाग १ ## इ.स. १९६१ ते इ.स. २००० पर्यंतचा कालखंड - विसाव्या आणि एकविसाव्या शतकात बदलाचा वेग प्रचंड आहे. - मानवी जीवन झपाट्याने बदलत चालले आहे. - पूर्वी आपण ज्यांची कल्पनाही करू शकलो नसतो त्या गोष्टी वास्तवात उतरल्या आहेत. ## प्राचीन व मध्ययुगीन काळात धर्म - धर्म ही माणसाची एक महत्त्वाची ओळख होती. - हिंदू, मुस्लिम, ख्रिस्ती, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ज्यू इत्यादी धर्मांपुढे आधुनिकीकरणाने आव्हाने उभी केली आहेत. ## डॉ. बाबासाहेब आंबेडकर - आपल्या पारंपरिक विचारसरणीत खूप मोठा बदल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घडवून आणला. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हा बदल भारतीय संविधानाच्या माध्यमातून केला आहे. ## भारतीय संविधान - आपल्या संविधानाप्रमाणे कायद्यापुढे सगळे भारतीय समान असून धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणांवरून भेदभाव करण्यास मनाई आहे. - सर्व नागरिकांस भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य, शांततेने व विनाशस्त्र एकत्र जमण्याचा व संघटित होण्याचा, भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करण्याचा, राहण्याचा व स्थायिक होण्याचा (जम्मू-काश्मीर संदर्भात अपवाद), कोणताही व्यवसाय करण्याचा हक्क आहे. - भारतातील कोणत्याही भागात राहणाऱ्या नागरिकांस आपली स्वतःची वेगळी भाषा, लिपी व संस्कृती जतन करण्याचा हक्क आहे. ## जातिव्यवस्थेच्या चौकटीला धक्का बसला - संविधानातील या तरतुदींमुळे जातिव्यवस्थेच्या चौकटीला धक्का बसला. - वंशपरंपरागत व्यवसाय ही कल्पना मोडीत निघण्यास मदत झाली. - जीवनाच्या सर्वत्र क्षेत्रांत बदल होण्यास सुरुवात झाली. - या तरतुदींचा परिणाम यंत्रावरही कसा झाला ते पुढील चौकटीतून समजून येईल. ## ब्रिटिशांच्या काळात रेल्वेत डब्यांचे चार प्रकार होते - फर्स्ट, सेकंड, इंटर आणि थर्ड क्लास असे वर्ग होते. - तिसऱ्या वर्गातील प्रवाशांसाठी नाममात्र सुविधा आणि प्रवाशांकडे बघण्याचा नकारात्मक दृष्टिकोन यांमुळे हे वर्ग जणू भारतीय समाजव्यवस्थेचे प्रतीकच झाले होते. - १९७८ च्या रेल्वे अर्थसंकल्पात मधू दंडवते यांनी तृतीय श्रेणीची व्यवस्था संपुष्टात आणली. - पुढे पुणे-मुंबई दरम्यान 'सिंहगड एक्सप्रेस', मुंबई-कोलकता दरम्यान 'गीतांजली एक्सप्रेस' या वर्गविरहित गाड्या सुरू झाल्या. ## समाजात छोटे-मोठे बदल हळुवारपणे घडून येऊ लागले - आता हॉटेलमध्ये सर्वांना मुक्त प्रवेश आहे. - धर्म, वंश, जात, लिंग या कारणांवरून प्रवेश नाकारला जाणार नाही अशा पाट्या आपण बघतो. ## पूर्वी राजसत्तेविरुद्ध मत व्यक्त करण्यास मर्यादा होत्या - आता भारतीय नागरिक वृत्तपत्र किंवा भाषण आणि अन्य माध्यमांद्वारा सरकारविरुद्ध मतप्रदर्शन करू शकतात. - आपणांस न पटणाऱ्या गोष्टी आपण बोलून दाखवू शकतो. - हा फार मोठा बदल स्वातंत्र्योत्तर कालखंडात झाला आहे. ## कुटुंबसंस्था - स्वातंत्र्यपूर्व कालखंडात कुटुंबसंस्था ही भारतीय समाजाची एक प्रमुख ओळख होती. - भारत हा 'एकत्र कटंब पद्धतीचा देश' म्हणून जगभर ओळखला जायचा. - जागतिकीकरणाच्या लाटेत विभक्त कुटुंबद्धतीला चालना मिळाली आहे. ## समाजकल्याण - कल्याणकारी राज्य स्थापन करण्याचे उद्दिष्ट भारताच्या संविधानातच नमूद करण्यात आलेले आहे. - असे नमूद करणारा भारत हा जगातील पहिला देश आहे. - भारतीय नागरिकांना पूर्ण रोजगार, आरोग्यसुविधा, शिक्षण व विकासाची संधी उपलब्ध करून देणे हे समाजकल्याण कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. - भारतीय समाजात आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक विषमता मोठ्या प्रमाणावर आहे. - स्त्रिया, मुले, दिव्यांग, अनुसूचित जाती व जमाती, अल्पसंख्याक यांच्यापर्यंत विकासाच्या संधी पोहचणे आवश्यक आहे. - स्वातंत्र्योत्तर कालखंडात सरकारसमोरील ते सगळ्यांत मोठे आव्हान होते. - यासाठी भारत सरकारने समाजकल्याण खाते १४ जून १९६४ साली स्थापन केले. - या मंत्रालयाअंतर्गत पोषण आणि बालविकास, सामाजिक सुरक्षा व सामाजिक संरक्षण, स्त्री कल्याण व विकास हे कार्यक्रम राबवले जातात. - अशाच प्रकारची व्यवस्था घटकराज्य पातळीवर करण्यात आली आहे. ## अनुसूचित जाती व जमाती - १९७१ च्या जनगणनेनुसार देशात २२% लोक अनुसूचित जाती-जमातींचे होते. - या सर्वांसाठी कायदे करून शैक्षणिक शिष्यवृत्ती व प्रतिनिधित्व देऊन संसदेत व राज्य विधिमंडळात आणि शासकीय सेवेत काही राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. ## सार्वजनिक आरोग्य - भारतीय संविधानात शासनाचे प्राथमिक कर्तव्य म्हणून भारतीय जनतेचे राहणीमान वाढवावे, सुपोषण साधावे व सार्वजनिक आरोग्यही सुधारावे असे नमूद केले आहे. - केंद्रशासनाचे आरोग्य व समाजकल्याण मंत्रालय या संदर्भात राज्यशासनास मदत करते. - सहाव्या पंचवार्षिक योजनेत प्राथमिक स्वरूपाची आरोग्यसेवा तसेच वैद्यकीय सेवा ग्रामीण भागातील लोक, आदिवासी व गरीब लोकांना उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट होते. ## आरोग्याच्या क्षेत्रातील बदलांमुळे भारतीयांचे जीवन अधिकाधिक चिंतारहित होण्यास मदत झाली. - १९६२ मध्ये तमिळनाडूमधील वेल्लूर येथील ख्रिश्चन मेडिकल कॉलेजच्या इस्पितळात डॉ. एन. गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतात 'ओपन हार्ट शस्त्रक्रिया' यशस्वी करण्यात आली. - त्यामुळे अशा उपचारांसाठी परदेशी जाण्याची गरज राहिली नाही. - १९६८ पूर्वी एखाद्या व्यक्तीला अपघात झाला आणि त्यात पाय जायबंदी झाला तर उर्वरित आयुष्य अडचणीत काढावे लागे. - 'जयपूर फूट'च्या शोधाने भारतातील दिव्यांगांचे आयुष्य बदलून गेले. - डॉ. प्रमोद सेठी यांनी कुशल कारागीर रामचंद्र शर्मा यांच्या मदतीने कृत्रिम हात, पाय, नाक, कान तयार केले. - जयपूर फूट तंत्रज्ञान वापरून तयार केलेल्या कृत्रिम अवयवांमुळे दिव्यांग रुग्ण अनवाणी व खडबडीत जमिनीवरून चालणे, पळणे, सायकल चालवणे, शेतातील कामे करणे, झाडावर चढणे व गिर्यारोहण करणे अशी कामे सहजपणे करू शकतात. - या कृत्रिम पायांवर बूट घालण्याची गरज नसल्याने बुटांचा खर्च वाचतो. - पाय दुमडणे, मांडी घालणे हे या कृत्रिम पायांमुळे शक्य झाले. - पाण्यात वा ओल्या स्थितीत काम करण्यासाठी हे पाय सोईचे आहेत. ## मूत्रपिंड प्रत्यारोपण (किडनी ट्रान्सप्लांट) - ही शस्त्रक्रिया भारतात साध्य झाल्याने रुग्णांचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना यश आले. - १९७१ पूर्वी अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया भारतात फारशा होत नव्हत्या. - तमिळनाडूमधील वेल्लूर येथील ख्रिश्चन मेडिकल कॉलेजच्या इस्पितळात ही शस्त्रक्रिया १९७१ मध्ये यशस्वी झाली. - डॉ. जॉनी व डॉ. मोहन राव यांनी जीवित व्यक्तीने दान केलेल्या मूत्रपिंडाचे रुग्णाच्या शरीरात यशस्वी प्रत्यारोपण केले. - आता अविकसित देशातील रुग्ण भारतात या शस्त्रक्रिया करवून घेण्यासाठी येतात. ## टेस्ट ट्यूब बेबी - भारतीय कुटुंबव्यवस्थेत पूर्वीपासून अपत्य होणे ही महत्त्वाची गोष्ट मानली जायची. - अपत्य पाहिजे असणाऱ्या पती-पत्नी यांना या समस्येवर मात करण्यासाठी 'टेस्ट ट्यूब बेबी' या तंत्रज्ञानाचा आधार १९७८ पासून उपलब्ध झाला. - कोलकता येथे डॉ. सुभाष मुखोपाध्याय यांच्या देखरेखीखाली टेस्ट ट्यूब बेबीचा प्रयोग यशस्वी झाला. - हा पहिला कृत्रिम गर्भधारणतंत्राचा यशस्वी प्रयोग ठरला. - या तंत्रज्ञानाद्वारे 'दुर्गा' या मुलीचा जन्म झाला. - यामुळे अपत्य हवे असलेल्या पालकांचे प्रश्न सुटण्यास मदत झाली. ## लसीकरण - १९७८ पूर्वी भारतात दरवर्षी जन्माला आलेल्या दहा मुलांपैकी सहा मुले जन्मानंतरच्या पहिल्या वर्षातच प्राणघातक संकटांना सामोरी जात होती. - पोलिओ, गोवर, धनुर्वात, क्षय, घटसर्प, डांग्या खोकला यांवर मात करण्यासाठी लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. - १९९५ मध्ये 'पल्स पोलिओ' लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली. - यामुळे पोलिओ आटोक्यात आला. ## शहरीकरण - शहरात किंवा नागरी क्षेत्रात लोकवस्ती केंद्रीत होण्याच्या प्रक्रियेस शहरीकरण म्हणतात. - नागरीकरण घडून येण्यास वाढीव लोकसंख्या हे एक महत्त्वाचे कारण आहे. - हवा, पाणी, समूहजीवनासाठी आवश्यक असणाऱ्या आर्थिक व सामाजिक संस्था हे घटक नागरीकरणावर परिणाम घडवून आणतात. ## स्वातंत्र्योत्तर भारताच्या संदर्भात नागरी लोकसंख्या वाढीची काही प्रमुख कारणे म्हणजे - मृत्युदरातील घट, औद्योगिकीकरण, ग्रामीण भागातील रोजगाराची अनुपलब्धता, शहरातील रोजगार संधी व व्यापार, स्थलांतर ही होत. ## शहरांवर येणारा हा ताण थांबवायचा असल्यास - छोट्या-छोट्या गावांमध्ये रोजगार उपलब्ध करून देणे, आर्थिक विकासाचा समतोल साधणे, आर्थिक विकासाला चालना देणे, महानगरांची वाढ नियंत्रित करणे, ग्रामीण व नागरी भागांत आवश्यक सेवा व सुविधा पुरवणे हे उपाय आहेत. ## ग्रामीण भाग - स्वतंत्ररीत्या किंवा सामूहिक रीतीने स्वतः कसत असलेल्या जमिनीजवळ राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या कायम वस्तीला गाव असे म्हणतात. - शेतीचा शोध लागला तेव्हापासून गाव अस्तित्वात आले. - भारतातील खेडेपद्धती विरळ लोकवस्ती असलेली पद्धती आहे. - भोवताली पसरलेल्या शेतजमिनी आणि मधे दाटीवाटीने वसलेली घरे हे भारतीय खेडेगावचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. - ग्रामीण समुदाय हा मोठा असला तरी तो नागरी समुदायाच्या तुलनेत कितीतरी लहान असतो. - गावापेक्षा छोटा गट म्हणजे वस्ती होय. - संपूर्ण भारतातील ग्रामरचना एकसारखी नाही. - प्रादेशिक स्वरूपाप्रमाणे आणि स्थल वैशिष्ट्यांनुसार यात फरक पडतो. ## स्वातंत्र्योत्तर कालखंड - ग्रामविकासाच्या दृष्टीने सामूहिक विकास योजना सुरू करण्यात आली. - तिच्याद्वारे शेतीतंत्र बदलणे, जलसिंचन वाढवणे, शिक्षणाचा प्रसार करणे, भूसुधारणा कायदे संमत करणे अशा योजना आखण्यात आल्या. - या योजनेनुसार शेतीचे उत्पन्न वाढवणे, ग्रामीण भागात दळणवळण, आरोग्य आणि शिक्षणाचा प्रसार करणे हे एक उद्दिष्ट होते. - गावांमधील आर्थिक विकासास प्राधान्य देण्याचे ठरले. - यासाठी सरकारने ग्रामपंचायतींच्या माध्यमातून हे कार्य सुरू केले. - ग्रामपंचायतीच्या रचनेत सर्वच जाती-जमातींमधील लोकांना सामावून घेण्यास सुरुवात झाली. - यासाठी ग्रामपंचायती, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांचे अधिकार वाढवण्यात आले. ## बदलते आर्थिक जीवन - पूर्वी गावांचे जीवन आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होते. - गावातील बहुसंख्य लोक शेतीवर अवलंबून असत. - शेतीतील उत्पादन कारागीरांना त्यांच्या कामाचा मोबदला म्हणून वाटण्यात येत असे. - आता ही परिस्थिती बदलली आहे. - ग्रामीण भाग शेती व शेतीनिगडित जोडधंद्यांशी जोडला गेला आहे, तर नागरी समाज बिगरशेती उत्पादन व सेवा व्यवसायांशी जोडला आहे. ## ग्रामीण विकास - भारतात १९६१ मध्ये ८२% लोक ग्रामीण भागात राहत होते तर १९७१ मध्ये हे प्रमाण ८०.१% होते. - अन्नधान्य व अन्य कच्चा माल यांचे उत्पादन करून शहरांची गरज भागवणे, शहरातील औद्योगिक विभागांना श्रमिक पुरवणे, नैसर्गिक साधनसंपत्तीची देखभाल करणे या गोष्टी ग्रामीण भाग आजवर करत आला आहे. - यामुळे आर्थिक व्यवसायांचा विकास करणे, सामाजिक गरजा व सुविधांचा विकास करणे, सांस्कृतिक, सामाजिक व वैचारिक दृष्टिकोनात बदल घडवून आणणे ही तीन महत्त्वाची आव्हाने ग्रामीण विकासासंदर्भात आहेत. - जमीन सुधारणा व जलसिंचन प्रकल्पास गती देणे आवश्यक आहे. ## सामाजिक गरजा व सुविधा - सार्वजनिक स्वच्छता व आरोग्याच्या सोईंकडे प्राधान्यक्रमाने लक्ष देणे गरजेचे आहे. - पिण्याच्या पाण्याची बारमाही सोय, स्वच्छतागृह, झाकलेली गटारे, अरुंद रस्ते, अपुरे विद्युतीकरण, औषधोपचारांची गैरसोय या प्रश्नांनी ग्रामीण भागाला आजही वेढले आहे. - प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंतच्या दर्जेदार सोईंची अनुपलब्धता, मनोरंजन केंद्रे व वाचनालयांची कमतरता यांमुळे ग्रामीण भागाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. ## भारत सरकारच्या पहिल्या चारही पंचवार्षिक योजनांमध्ये समूह विकास योजनेला महत्त्वाचे स्थान होते. - महाराष्ट्र राज्याने या योजनेअंतर्गत प्रभावी कामगिरी केली. - महाराष्ट्रात १९६२ मध्ये जिल्हा परिषदा स्थापन करण्यात आल्या. - १९७०-७१ मध्ये महाराष्ट्रात सकस आहार योजना सुरू करण्यात आली. - विहिरी खणणे व नळांवाटे पाणीपुरवठा करणे यासाठी 'ग्रामीण पाणीपुरवठा योजना' सुरू करण्यात आली. - १९७१ अखेर १६७७ छोट्या पाटबंधाऱ्यांची कामे पूर्ण करण्यात आली. ## ग्रामीण विद्युतीकरण - ग्रामीण भागात विकासासाठी विजेची नितांत गरज असते. - शेतीला पाण्याचा पुरवठा करण्यासाठी स्वयंचलित पंप लागतात, दूध व अंडी यांसारखे नाशवंत पदार्थ टिकवणे, फळे व भाजीपाला टिकवणे, खत प्रकल्प चालवणे, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी रात्री प्रकाश असणे, पंखा, दूरदर्शन या यंत्रांसाठी वीज लागते. - भारतात पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या काळात तीन हजार खेड्यांचे विद्युतीकरण झाले होते. - १९७३ मध्ये हा आकडा १,३८,६४६ खेड्यांपर्यंत पोहचला. - १९६६ पासून पंप व कूपनलिकांना अधिक वीज देण्याची योजना आखण्यात आली. - १९६९ मध्ये 'ग्रामीण विद्युतीकरण निगम' स्थापण्यात आले. - यातूनच आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या राज्यांत ग्रामीण विद्युतीकरण सहकारी संस्था अस्तित्वात आल्या. ## औद्योगिक विकास - ग्रामीण औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी 'ग्रामोद्योग नियोजन समिती' स्थापन करण्यात आली. - १९७२ अखेरपर्यंत या योजनेत एक लाख सहा हजार लोकांना रोजगार मिळाला. ## ग्रामीण भागात प्रतिकूल परिस्थितीत राहणाऱ्या विशेष बुद्धिमान विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सातारा, औरंगाबाद, नाशिक व चिखलदरा येथे विद्या निकेतन या वसतिगृहयुक्त माध्यमिक शाळा काढल्या. ## कोठारी आयोगाच्या शिफारशीनुसार महाराष्ट्रात राहुरी, अकोला, परभणी व दापोली येथे कृषी विद्यापीठे सुरू करण्यात आली. ## महाराष्ट्राने शिक्षण क्षेत्रात केलेल्या कार्याची नोंद घेऊन युनेस्कोने १९७२ मध्ये साक्षरता प्रसार गौरवाचे आंतरराष्ट्रीय पारितोषिक महाराष्ट्राला दिले. ## अशा रीतीने स्वातंत्र्योत्तर काळात सुरुवातीला आलेल्या अडथळ्यांवर मात करून भारताने विकास साधण्यास सुरुवात केली. ## पुढील पाठात आपण अन्य क्षेत्रातील प्रगतीचा अभ्यास करणार आहोत. ## स्वाध्याय 1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. - डॉ. एन. गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतात ............ या शहरात पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया यशस्वी झाली. - (अ) चेन्नई - (ब) वेल्लूर - (क) हैदराबाद - (ड) मुंबई - 'जयपूर फूट'चे जनक म्हणून ......... यांना ओळखले जाते. - (अ) डॉ. एन. गोपीनाथ - (ब) डॉ. प्रमोद सेठी - (क) डॉ. मोहन राव - (ड) यांपैकी नाही 2. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा. - (१) डॉ.एन. गोपीनाथ ओपन हार्ट शस्त्रक्रिया - (२) रामचंद्र शर्मा कुशल कारागीर - (३) डॉ. सुभाष मुखोपाध्याय टेस्ट ट्यूब बेबी - (४) डॉ. मोहन राव पोलिओ 3. पुढील संकल्पना स्पष्ट करा. - (१) कुटुंबसंस्था - (२) जयपूर फूट तंत्रज्ञान - (३) शहरीकरण - (४) बदलते आर्थिक जीवन 4. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. - (१) पल्स पोलिओ लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली. - (२) ग्रामीण पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली. 5. पुढील प्रश्नांची २५ ते ३० शब्दांत उत्तरे लिहा. - (१) संविधानाप्रमाणे कोणत्या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई आहे? - (२) समाजकल्याण कार्यक्रमाचे कोणते उद्दिष्ट आहे? - (३) ग्रामीण विकासासंदर्भात कोणती आव्हाने आहेत? 6. सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात भारतात झालेल्या ठळक घडामोडींचा थोडक्यात आढावा घ्या. ## उपक्रम तुमच्या परिसरातील एखादया ज्येष्ठ व्यक्तीची खालील मुद्द्यांच्या आधारे मुलाखत घ्या. - घरांच्या रचनेत झालेला बदल - शेतीच्या संदर्भातील बदल - वाहनांची उपलब्धता

Use Quizgecko on...
Browser
Browser