G SAT 10 - Scholastic Aptitude Test PDF
Document Details
Uploaded by HumbleJungle
Tags
Summary
This document is a past paper for a scholastic aptitude test in science, targeted at secondary school students. It contains a variety of questions related to various scientific concepts and principles, including electricity, waves, and thermodynamics.
Full Transcript
## Scholastic Aptitude Test **प्रश्नपत्रिका क्र. 10** **माध्यम : मराठी** **वेळ : 90 Min** **एकूण गुण : 90** **शालेय क्षमता चाचणी** **विषय : विज्ञान** 1. फिरणारा विजेचा पंखा बंद केल्यानंतरही काही वेळ फिरत राहतो हे ........ चे उदाहरण आहे. * विराम अवस्थेतील * गतीचे जडत्व * दिशेच...
## Scholastic Aptitude Test **प्रश्नपत्रिका क्र. 10** **माध्यम : मराठी** **वेळ : 90 Min** **एकूण गुण : 90** **शालेय क्षमता चाचणी** **विषय : विज्ञान** 1. फिरणारा विजेचा पंखा बंद केल्यानंतरही काही वेळ फिरत राहतो हे ........ चे उदाहरण आहे. * विराम अवस्थेतील * गतीचे जडत्व * दिशेचे जडत्व * दाब 2. जर प्रत्येक विद्युघटाचे विभवांतर 1.5 V इतके असेल तर खालील जोडणीत बॅटरीचे विभवांतर किती असेल ? * 6.00 V * 5.75 V * 6.25 V * 2.65 V 3. 1004 Hz वारंवारिता म्हणजे * 1004 आवर्तने / सेकंद * 1004 संपीडने / सेकंद * 1004 विरलने / सेकंद * 1004 तरंगलांबी (λ) 4. नादकाटा 20 सेकंदात 10,000 वेळा कंप पावतो तर नादकाटयाच्या कंपनामुळे निर्माण होणाऱ्या ध्वनीची वारंवारिता ........ एवढी असेल. * 2,00,000 Hz * 500 Hz * 512 Hz * 1 Hz 5. जड पाण्याच्या निर्मितीमध्ये हायड्रोजनच्या कोणत्या समस्थानिकाचा उपयोग होतो ? * हायड्रोजन * ट्रिटिअम * ड्यूटेरिअम * यापैकी नाही 6. उष्णतेच्या ........ साठी माध्यमाची आवश्यकता नसते. * अभिसरण * प्रारण * वहन * प्रसरण 7. खाली दिलेल्या पर्यायांपैकी 'एक रेषीय प्रसरण" क्रियेशी निगडित सत्य विधाने ओळखून योग्य क्रमांकाचा पर्याय निवडा. * तापमानवाढीमुळे तार किंवा सळईच्या रूपातील स्थायूची लांबी कमी होते. * सिग्मा (σ) हा पदार्थाचा प्रतलीय प्रसस्णांक आहे. * β (बीटा) हा पदार्थाचा घनीय प्रसरणांक आहे. * लॅम्बडास 'λ" स्थायू पदार्थाचा एकरेषीय प्रसरणांक म्हणतात. * a, b, c * फक्त a व c * b आणि d * फक्त a 8. कोणती रासायनिक प्रक्रिया क्षरणरोधक नाही. * गॅल्व्हनायझेशन * कल्हई करणे * पावडर कोटींग * क्षारयुक्तता 9. प्रकाशाच्या विकिरणास ........ रंगाच्या किरणांचे विकिरण सर्वाधिक होते. * लाल * निळा * हिरवा * पिवळा 10. पोषक द्रव्याच्या अभावामुळे वनस्पतींना उशिरा फुले येतात. * पोटॅशिअम * फॉस्फरस * लोह * झिंक 11. खाली दिलेल्या युरेनिअम 235 च्या विखंडनातील A आणि B ओळखा. * kr आणि Ca * Ba आणि Na * kr आणि Ba * Br आणि Sa 12. पत्र्याप्रमाणेच स्थायूच्या त्रिमितीय तुकड्याला उष्णता दिली असता त्याचे सर्व बाजूंनी प्रसरण होते व त्याचे आकारमान वाढते. त्यास स्थायूंचे ........ प्रसरण म्हणतात. * प्रतलीय प्रसरण * घनीय प्रसरण * द्वितलीय प्रसरण * एकरेषीय प्रसरण 13. भूकंपाची नोंद घेणाऱ्या यंत्राला ........ म्हणतात. * सेस्मोग्राफ * लॅक्टोमीटर * हायग्रोमीटर * थर्मामीटर 14. प्रौढ व निरोगी व्यक्तीच्या शरीराचे सुमारे ........ वजन स्नायूंचे असते. * 40% * 60% * 10% * 17% 15. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था कोणत्या शहरात आहे ? * मुंबई * नागपूर * कोलकाता * पुणे 16. CO₂ + 2NaOH → ........ + H₂O * NaCO₂ * Na₂CO₂ * Na2CO3 * NaCO3 17. जमिनीवर उभे राहिल्यास आपल्या आपल्या डोक्याच्या बरोबर वर असलेल्या खगोलावरील बिंदूला ........ म्हणतात. * ऊध्वं बिंदू * अध : बिंदू * आयनिक वृत्त * वैषुविक वृत्त 18. टेबलावर ठेवलेल्या पुस्तकाच्या तळाचे क्षेत्रफळ 0.50 m² असून त्याचे वजन 25 N तर त्या पुस्तकाने टेबलावर प्रयुक्त केलेला दाब किती ? * 5 N/m² * 0.5 N/m² * 50 N/m² * 12.5 N/m 19. राजधातू नसलेला पर्याय निवडा. * पॅलेडिअम * होडिअम * प्लॅटिनम * पोलाद 20. आगीचा प्रकार व ती आग कोणत्या अवस्थेतील पदार्थांना लागते यांच्या चुकीच्या जोडिचा पर्याय निवडा. * 'अ वर्गीय आग - घनरूप पदार्थ * 'ब' वर्गीय आग - द्रवरूप पदार्थ * 'क' वर्गीय आग - वायुरूप पदार्थ * 'ड' वर्गीय आग - इलेक्ट्रिकल 21. दिलेल्या आकृतीतील अचूक नावे दर्शवणारा पर्याय निवडा. * (A) - स्वरयंत्र (B) अन्न नलिका (C) - स्वर तंतू (D) - श्वास नलिका * (A) - अधिस्वर द्वार (B) - स्वर तंतू (C) - श्वास नलिका (D) अन्न नलिका * (A) - अधिस्वर द्वार (B) - स्वर यंत्र (C) - अन्न नलिका (D) - स्वर तंतू * (A) - स्वर यंत्र (B) श्वास नलिका (C) - स्वर तंतू (D) - अन्न नलिका 22. आदिकेंद्रकी पेशीविषयी चुकिचे विधान ओळखा. * आदिकेंद्रकी पेशी आकाराने 1-10 मायक्रो मीटर असतात. * या पेशीमध्ये एकच गुणसूत्र असते. * केंद्रकंसदृश्य केंद्रकाम असतो. * या पेशीमध्ये केवळ तंतुकाणिका व लवके असतात. 23. खालीलपैकी रक्त घटकाचे चुकीचे कार्य कोणते ? * अल्ब्युमिन - शरीरभर पाणी विभागण्याचे काम करते. * फार्याब्रनोजेन व प्राथ्रोम्बीन रक्त गोठण्याच्या क्रियेस मदत करतात. * ग्लोब्युलीन्स - क्षारांचा समतोड ठेवणे * असेंद्रिय आयने - चेता आणि स्नायू कार्याचे नियंत्रण 24. खडबडीत आंतरर्द्रव्य जालिकेचा खडबडीतपणा ........ मुळे असते. * गॉल्गीसंकुल * रायबोझोम्स * लयकारिका * लायसोसोम्स 25. पॉलीअॅक्रेलिक प्लॅस्टिकचा उपयोग ........ बनविण्यासाठी होतो. * भिंगे व कृत्रिम दात * प्रयोग शाळेतील उपकरणे * दोरखंड व चट्या * डिव्हीडीचे कव्हर 26. ........ डोळयाच्या दाह या हवा प्रदुषकामुळे होतो. * SO₂ * CO * CH₄ * CO₂ 27. द्रव व स्थायू यांच्या विषमांगी मिश्रणाला ........ म्हणतात. * कलील * द्रावण * निलंबन * संमिश्र 28. कोबाल्ट मिश्रित पाण्यामुळे ........ रोग होऊ शकतो * मतिमंद * त्वचेचा कॅन्सर * अर्धांग वायू * मधुमेह 29.. ध्वनीवर्धकात ........ कंपने असतात. * धातूंच्या भुजांची * हवेच्या स्तंभातील * तारेची * पडद्याची 30. रक्तातील ........ प्रमाण कमी झाल्यामुळे शरीरांतर्गत रक्तस्त्राव होतो. * लोहाचे (Iron) * रक्त बिंबिका * B 12 * व्हिटॅमीन डी 31. पेशीची ऊर्जा न वापरता चालणाऱ्या क्रियापैकी चुकीचा पर्याय ओळखा. * विसरण * परासरण * पेशीय भक्षण * वरील सर्व 32. रोहिणी व नीला या दोन ........ आहेत. * केशवाहिन्या * रक्ताभिसरणी * रक्तवाहिन्या * रक्ताभिसरण संस्था 33. A, B आणि O या रक्तगटाचा शोध ........ यांनी लावला. * डॉ. कार्ल लॅडस्टेनर * डिकास्टेलो आणि स्टर्ली * कार्ल तिनिअस * रॉबर्ट हार्डीग व्हिटाकर 34. रुदरफोर्डच्या केंद्रकीय अणुप्रारूपानुसार खालीलपैकी कोणत्या कणांचा मारा सोन्याचा पातळ पत्र्यावर केला जातो. * हेलीअम * बीटा * अल्फा * गॅमा 35. सापेक्ष घनतेला एकक नाही, कारण ........ * ते गुणोत्तर आहे * ते समान राशींचे गुणोत्तर प्रमाण आहे * तो पदार्थाचा स्वाभाविक गुणधर्म आहे. * त्या दोन संख्या आहेत. **विषय : इतिहास** 36. घटना व साल यांची अयोग्य जोडी ओळखा. * 1920 - लो. टिळक पंजाबमध्ये गेले. * 1915 - म. गांधी भारतात आले. * 1919 - जालियन वाला बाग हत्याकांड * 1928 - सायमन कमिशन भारतात आले. 37. घटना कालानुक्रमे लावा. * चौराचौरा घटना. * चंपारण्य सत्याग्रह * नागपूर येथे राष्ट्रीय सभा अधिवेशन * खेडा सत्याग्रह * अ, क, ब, ड * ड, क, ब, अ * अ, ड, क, ब * ब, ड, क, अ 38. पिटसचा भारताविषयक कायदा केव्हा मंजूर झाला ? * 1773. * 1813 * 1853 * 1784 39. रासबिहारी बोस यांनी ........ वर बॉम्ब फेकण्याचे धाडसी कृत्य केले ? * कििंग्ज फोर्ड * व्हाईसरॉय हार्डिग्जवरं * कमिशनर रॅड * डायर 40. भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना केव्हा झाली ? * 28 डिसेंबर 1885 * 28 डिसेंबर 1905 * 1 डिसेंबर 1900 * 1 डिसेंबर 1895 41. मुंबईतील मणिभवनला किंवा वर्धा येथील सेवाग्राम आश्रमास भेट दिल्यावर ........ इतिहासाविषयी माहिती मिळते. * मवाळ युगाच्या * गांधी युगाच्च्या * जहाल युगाच्या * स्वातंत्र्य युगाच्या 42. शेजारील चित्रातील व्यकतीने कशाची स्थापना केली ? * मुंबईतील पहिली कापड गिरणीची * रिश्रा येथे तागाची गिरणीची * जमशेदपूर येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीची * सिमेंट उद्योगाची 43. खालीलपैकी योग्य विधान ओळखा. * बिहारमध्ये मध्ययुगीन काळापासून पाइकपद्धती अस्तित्वात आली. * युद्धाचा प्रसंगात पाइकांना युद्धात भाग घेण्यास बंधन नव्हते. * राजांनी पाइकांना जमिनी मोफत करण्यास दिल्या होत्या. * इंग्रजांनी पाइकांच्या वंश परंपरागत जमिनी त्यांच्याकडे कायम ठेवल्या. 44. 'पुणे - करार' कोणामध्ये झाला ? * महात्मा गांधी - आयर्विन * महात्मा गांधी - डॉ. बाबासाहेब आंबेडकर * डॉ. बाबासाहेब आंबेडकर - आयर्विन * महात्मा गांधी - सर तेजबहादूर सप्रू 45. नोव्हेंबर 1932 मध्ये इंग्लंडमध्ये ........ परिषद भरविण्यात आली. * पहिली गोलमेज * दुसरी गोलमेज * तिसरी गोलमेज * यापैकी नाही 46. खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा. * 1936 चे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन फैजपूर येथे भरले होते. * यावेळी अखिल भारतीय किसान सभेने शेतकऱ्यांच्या हक्काचा जाहिरनामा काढला. * या अधिवेशनास हजारो सैनिक उपस्थित होते * यापैकी नाही.. 47. प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष कोण होते ? * महर्षि विठ्ठल रामजी शिंदे * दादोबा पांडूरंग तर्खडकर * राजा राममोहन रॉय * डॉ. आत्माराम पांडुरंग 48. शिवाजी महाराजांनी विविध खात्यांच्या प्रमुख पदी नामवंत व्यक्तीची निवड केली होती ? * बहिर्जी नाईक - हेर खाते * मोरेश्वर पंडितराव - न्यायाधीश * दौलतखान - आरमाराचे प्रमुख अधिकारी * हंबीरराव मोहिते - घोडदळाचे सरनोबत 49. खालीलपैकी कायदा निर्दोष होण्याच्या दृष्टीने ........ खूप महत्त्वाचे असते. * प्रश्नोत्तरे * चर्चा आणि विचार विनिमय * अविश्वासनाचा ठराव * शुन्यप्रहर 50. युद्ध व शांतता याबाबतचे निर्णय कोण घेतो ? * राष्ट्रपती * मुख्यमंत्री * प्रधानमंत्री * संरक्षण मंत्री 51. भारतातील तरुणांना 'उठा, जागे व्हा व ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका' हा संदेश कोणत्या समाजाने दिला ? * आर्य समाज * रामकृष्ण मिशन * भारत सेवक समाज * सत्यशोधक समाज 52. खालीलपैकी योग्य विधान ओळखा. * भौगोलिक परिस्थिती भिन्न-भिन्न असते. * लोकसंख्येच्या अमर्याद वाढीमुळे प्रदेशातील संसाधनावर ताण पडतो. * 60 वर्ष व त्यापेक्षा जास्त वय असलेली व्यक्ती अवलंबित गटात येत नाही. * प्रदेशात साधनसंपत्ती अमर्याद स्वरूपात असते. **विषय : गणित** 53. भूकवचाचे हे दोन थर आहेत - * बाह्य व अंतर कवच * खंडीय व महासागरीय कवच * भूपृष्ठ व महासागरीय कवच * प्रावरण व गाभा 54. भारताचे पूर्व-पश्चिम अंतर किती आहे ? * 30000 किमी * 3001 किमी * 3000 किमी * 3020 किमी. 55. खालीलपैकी कोणते क्षेत्र सार्वजनिक सेवा गटात येत नाहीत ? * इमारती, घरे * रुग्णालय * टपाल कार्यालय * शाळा 56. योग्य जोड्या लावा. * ढगांचे प्रकार * ढगांची साधारण उंची * सिरस * विस्तार कमी जास्त असू शकतो. * अल्टोस्ट्रॅटस * 2000 पेक्षा कमी मीटर * निम्बोस्ट्रॅटस * 7000 ते 14000 मीटर * क्युम्युलस * 2000 ते 7000 मीटर * 1-c, 2d, 3 - b, 4 - a * 1 - d, 2 - b, 3 - а, 4 - с * 1. -c, 2 - d, 3 - a, 4 - b * 1 - b, 2-c, 3 - d, 4 -a 57. निम्न प्रावरणाची घनता ........ आहे. * 2.90 ग्रॅम / घ सेमी * 3.3 ग्रॅम / घ सेमी * 5.7 ग्रॅम / घ सेमी * 9.8 ग्रॅम / घ सेमी 58. आपल्या पृथ्वीची निर्मिती सुमारे ........ कोटी वर्षापूर्वी झाली.. * 560 * 260 * 360 * 460 59. लोकहितासाठी शासनाला एखादी कृती करण्यासाठी दिला जाणारा न्यायालयाचा आदेश म्हणजे ........ * परमादेश * अधिकारपृच्छा * मनाई हुकूम * बंदी प्रत्यक्षीकरण 60. अयोग्य पर्याय ओळखा. * रेषाप्रमाण * भाषाप्रमाण * अंकप्रमाण * शब्दप्रमाण 61. महाराष्ट्राच्या कार्यकारी मंडळात पुढीलपैकी कोणाचा सामावेश होत नाही. * राज्यपाल * मुख्यमंत्री * मंत्रिमंडळ * उच्च न्यायालयाचे न्यायाधीश 62. खालीलपैकी कोणता प्रवाह पॅसिफिक महासागरात आहे ? * ब्राझील प्रवाह * दक्षिण ध्रुवीय प्रवाह * पेरू प्रवाह * कॅनरी प्रवाह 63. खालीलपैकी कोणत्या घटकात शेती, कारखानदारी, बाजारपेठ यांचा समावेश होतो ? * सामाजिक घटक * आर्थिक घटक * राजकीय घटक * प्राकृतिक घटक 64. मंत्रिमंडळाचे नेतृत्व ........ करतात. * पक्षप्रमुख * प्रधानमंत्री * राष्ट्रपती * सभापती 65. भारताचे ........ हे राज्यसभेने पदसिद्ध सभापती असतात. * राष्ट्रपती * उपराष्ट्रपती * प्रधानमंत्री * सरन्यायाधीश 66. मुंबई हाय हे ........ समुद्रातील खनिज व नैसर्गिक वायू मिळविणारे भुखंमंचावरील एक क्षेत्र आहे. * अरबी * बंगालचा उपसागर * पॅसिफिक * हिंदी महासागर 67. कोणत्याही दोन लगतच्या रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत ........ चा फरक असतो. * 15 मि. * 04 मि * 30 मि. * 60 मि. 68. अमेरिकेची संयुक्त संस्थाने या देशात कोणत्या संस्थेने अचूक वेळ दर्शविणारे घड्याळ विकसित केलेले आहे. * NIST * NASA * ISRO * USSA 69. भारताची प्रमाणवेळ ........ या शहारातून ठरविली जाते. * दिल्ली * पुणे * मिर्झापूर * मुंबई 70. मुख्य माहिती तंत्रज्ञान केंद्रे कोणत्या नावाने ओळखली जातात ? * आय. टी. सायबर * आय.आय.टी * आय.टी.आय. * आय.टी.हब **विषय : गणित** 71. दोन समांतर रेषांना दोन छेदिकेने छेदले असता संगतकोनाच्या किती जोड्या एकरूप असतात. * 16 * 4 * 8 * 12 72. आकृतीवरुन ∆ABC व ACDA हे कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत ? * बा-को-बा * कर्ण-भूजा * बा-को-को * को-बा-को 73. आयताची लांबी 20 सेंमी असून क्षेत्रफळ 200 चौसेमी आहे. तर आयताचा कर्ण किती लांबीचा असेल ? * 10√5 सेमी * 10 सेंमी * 10√2 सेमी * 20√2 सेमी 74. (2x+3y)² - (2x-3y)² = किती ? * 12xy * 24xy * 48xy * 24xy +9 y² 75. पुढीलपैकी कोणत्यां संख्येचे दशांश रूप खंडित नाही ? * 15/8 * 122/20 * 4/5 * 1/3 76. जर x = 4⁻¹ आणि y = 4⁻² तर x + y = किती ? * 5/16 * 1/8 * 1/16 * 1/20 77. (29)³ = ? * 24,289 * 24,389 * 24,489 * 24,789 78. एका वर्तुळाचा परिघ 88 मीटर असल्यास वर्तुळाचे क्षेत्रफळ किती ? * 176 चौमी * 636 चौमी * 616 चौमी * 696 चौमी 79. आकृतीमध्ये वर्तुळाचा केंद्रबिंदू 'O' आहे ∠CAB = 40° तर ∠CBA = ? * 140° * 50° * 90° * यापैकी नाही 80.. आईचे वय मुलाच्या वयापेक्षा 35 वर्षाने जास्त आहे. 5 वर्षानंतर दोघांचया वयाचे गुणोत्तर 3:10 होईल तर आईचे आजचे वय किती ? * 40 वर्षे * 30 वर्षे * 45 वर्षे * 35 वर्षे 81. एका वृत्तचित्तीची उंची 2 सेमी व त्रिज्या 4 सेंमी आहे. त्या पासून वृत्तचित्ती आकाराच्या 1 मिमी उंची व 2 मिमी त्रिज्येच्या किती चकत्या तयार होतील. * 800 * 80 * 8000 * 8 82. द.सा.द.शे 10 दराने 1,50,000 रु. मुदलाचे चक्रवाढ व्याजाने 1/2 वर्षाचे व्याज किती येईल ? * 23,250 रु. * 22,250 रु. * 24,250 रु. * 22,750 रु. 83. एका वारंवारता वितरण सारणीमध्ये ∑ fixi = 10250 आणि N = 25 तर (मध्य) = किती ? * 41 * 410 * 0.41 * 4.1 84. (x²+18x+45) ÷ (x+15) = किती ? * 3x * x+5 * x+3 * x+9 85. छापिल किंमतीवर 12% सूट देऊन एक वस्तू 1408 रुपयास एका दुकानदाराने गिऱ्हाइकास विकली तर त्या वस्तूची छापिल किंमत किती ? * 1800 रु. * 1600 रु. * 1500 रु. * 1660 रु. 86. एका समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 180 चौसेमी आहे त्याचा एक कर्ण 20 सेमी असल्यास दुसऱ्या कर्णाची लांबी किती ? * 16 * 36 * 18 * 9. 87. एक मशीन 2 मिनिटात 150 दुधाच्या पिशव्या भरते तर 300 सेकंदात ती मशिन किती पिशव्या भरेन ? * 225 * 450 * 375 * 400 88. आकृतीवरुन ABCD. चे क्षेत्रफळ किती ? * 49/3 चौ. एकक * 2(12+25√3) * 49√2 चौ. एकक * 24 + 25√3 चौ.एकक 89. x²-4/x²+6x+8 ÷ x²-7x+10/x²-x-20 = किती ? * 1 * x+2 * 1/(x-5) * 1/(x+4) 90. एका काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजू 16 सेमी व 12 सेमी आहेत तर काटकोन त्रिकोणाच्या परिवर्तुळाची त्रिज्या किती ? * 20 सेमी * 10 सेमी * 28 सेमी * 18 सेमी