भाषांतर, PDF
Document Details

Uploaded by UnequivocalPrehistoricArt9485
Tags
Summary
हे दस्तऐवजात भाषांतराविषयी माहिती आहे. त्यात भाषांतर काय आहे, त्याच्या विविध प्रकारांबद्दल, तसेच भाषांतर कलेचा अभ्यास करताना घ्यायच्या तयारींबद्दल आणि नमुन्याविषयी माहिती आहे.
Full Transcript
# भाषांतर ## १० भाषांतर ### १०.० प्रस्तावना भाषांतर प्रक्रियेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण जगात ३ हजारांपेक्षा अधिक भाषा बोलल्या जातात. तशाच त्या लिखित भाषाही आहे. इतर भाषेतील महत्त्वाची साहित्यकृती किंवा एखादा मजकूर दुसऱ्या भाषेत आशयानुसार व्यक्त करणे म्हणजे भाषांतर. इतर भाषेतील श्रेष्ठ साहित...
# भाषांतर ## १० भाषांतर ### १०.० प्रस्तावना भाषांतर प्रक्रियेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण जगात ३ हजारांपेक्षा अधिक भाषा बोलल्या जातात. तशाच त्या लिखित भाषाही आहे. इतर भाषेतील महत्त्वाची साहित्यकृती किंवा एखादा मजकूर दुसऱ्या भाषेत आशयानुसार व्यक्त करणे म्हणजे भाषांतर. इतर भाषेतील श्रेष्ठ साहित्यकृती किंवा मजकूर भाषांतर केल्याने साहित्यकृतीतील विचार किंवा मजकुराचा आशय विचार त्या त्या भाषेतील वाचकांना कळू शकतात. भाषांतर ही एक कला आहे. कारण भाषांतर करत असताना मजकुरामधील आशय भाव न बदलता भाषांतर करणे हे एक कौशल्य आहे. विद्यार्थ्यांना भाषांतर कलेची ओळख व्हावी आणि महत्त्व कळावे या उद्देशाने आपला अभ्यासक्रमाममध्ये भाषांतराचा समावेश केला आहे. १८१८ ते १९७४ या कालखंडाला 'भाषांतर-युग' म्हणून ओळखले जाते. इंग्रजीतील बरेच साहित्य मराठी भाषेत भाषांतरीत झाले. म्हणून या कालखंडाला भाषांतर-युग म्हणून परिचित आहे. भाषांतर या शब्दाला इंग्रजीत ढीरपीश्ररींळेप (ट्रान्सलेशन) असा पर्यायी शब्द आहे. ### १०.१ भाषांतर म्हणजे काय ? भाषांतर म्हणजे एका भाषेतील ग्रंथ, वाक्य इ.चा दुसऱ्या भाषेत केलेला अर्थ किंवा तर्जुमा होय. एका भाषेतील लिखाणाचा, भाषणाचा, मजकुराचा दुसऱ्या भाषेत केलेला अनुवाद म्हणजे भाषांतर होय. मात्र भाषांतर, रुपांतर आणि अनुवाद यात भेद आहे. 'अन्य भाषा इति भाषांतरम्' अशी भाषांतराची व्याख्या केली आहे. भाषांतर हे आरशातील प्रतिमेसारखे असावे. याचाच अर्थ भाषांतर केल्यानंतर त्यातील मूळ आशयाला बाधा पोहोचू नये असा आहे. भाषांतर करण्यासाठी भाषांतरकाराला कमीत कमी दोन भाषांचे ज्ञान असणे आवश्यक आहे. दोन भाषांच्या प्रगत ज्ञानाची नितांत गरज असते. भाषांतर म्हणजे..... 1. भाषांतर म्हणजे एका भाषेतील भाव दुसऱ्या भाषेत मांडून दाखवणे. 2. भाषांतर म्हणजे एका भाषेतील भाव दुसऱ्या भाषेत संक्रमित करणे. 3. भाषांतर म्हणजे एका भाषेतील आशय दुसऱ्या भाषेत व्यक्त करणे. 4. भाषांतर म्हणजे एका भाषेतील मजकूर दुसऱ्या भाषेत विशद करणे. ### १०.२ भाषांतर लेखनाची तयारी भाषांतर कौशल्य आत्मसात करण्यासाठी पुढील भाषिक घटकांचा अभ्यास आवश्यक आहे. भाषांतराशी संबंधित भाषांतील शब्दरचना, वाक्यरचना, विशिष्ट शैली भागा करणे गरजेचे आहे. संबंधित भाषांचे व्याकरण, शब्दसंग्रह, म्हणी व वाक्प्रचार या घटकांबद्दल आन असणे गरजेचे आहे. एका भाषेतून दुसऱ्या भाषेत भाषांतर करणे ही एक कला आहे. कारण प्रत्येक भाषेची प्रकृती वेगळीवेगळी असते. इंग्रजी-मराठी भाषेतील कर्ता-कर्म-क्रियापद यांचे क्रम ठरलेले आहेत. परंतु संस्कृत भाषेत त्याचे थोडे स्वातंत्र्य आहे. भाषेची घटना व प्रकृती कायम ठेवूनच भाषांतर करावे लागते. भाषांतरकाराला दोन्ही भाषेचे ज्ञान आणि भाषांतरावर प्रभुत्व असणे आवश्यक आहे. पत्येक भाषेच्या लकबी वेगळ्या असतात. त्यामुळे जसेच्या तसे भाषांतर करणे अवघड असते. इंग्रजी आणि मराठी या दोनही भाषांचा अभ्यास करताना वेगवेगळे इंग्रजी शब्द तुमच्या परिचयाचे होतात. ते शब्द आत्मसात केल्याने आपला शब्दसंग्रह वाढतो. शब्दसंग्रह जसा वाढत जातो तसे त्या भाषेतील आपले ज्ञान वाढते. त्यामुळे भाषांतर करणे सोपे जाते. ### १०.३ भाषांतराचे प्रकार 1. मूलनिष्ठ भाषांतर 2. लक्ष्यनिष्ठ भाषांतर #### १) मूलनिष्ठ भाषांतर 'या भाषांतरप्रकारात ज्या भाषेतून भाषांतर करावयाचे आहे. ती मूलभाषा केंद्रस्थानी ठेवून भाषांतर केले जाते.' मूळ भाषेतील शब्द, वाक्य आणि शैली यांचे हुबेहूब चित्र मूलनिष्ठ भाषांतरात केले जाते. #### २) लक्ष्यनिष्ठ भाषांतर लक्ष्यनिष्ठ भाषांतर करताना ज्या भाषेत भाषांतर करावयाचे ती भाषा केंद्रस्थानी ठेवून म्हणजेच महत्त्वाची मानून भाषांतर केले जाते. या भाषांतर पद्धतीतील शब्द, वाक्य, शैली यांच्यात तफावत असते. मूळ भाषेतील अर्थाप्रमाणे भाषांतर केले जाते. भाषांतर करताना लक्ष्यनिष्ठ भाषांतर करणे योग्य व सोयीचे ठरते. शब्दशः, वाक्यशः आणि मूलनिष्ठ भाषांतरात मूळ भाषेतील आशय लक्ष्य भाषेत तितक्याच परिणामकारकतेने उतरवता येत नाही. स्वैर किंवा लक्ष्यनिष्ठ भाषांतर करताना भाषांतरकाराने मूळ भाषेतील आशय लक्ष्य भाषेत आणताना ते स्वाभाविक, अकृत्रिम असे वाटेल, अशा सहजपणे करायला हवे. ### १०.४ भाषांतर नमुना #### भाषांतर नमुना १ **Translation** It is very easy to acquire bad habits, such as eathing too many sweetso too much food or drinking too much fluid of any kind, or smoking. The more we do a thing, the more we tend to like doing it; hl and if we do not continue to do it we feel unhappy. This is called the force of habit, and the force of habit should be fought against. **भाषांतर** जास्त गोड पदार्थ खाणे, खूप जेवणे, कुठलेही पेय जास्त प्रमाणावर घेणे, धूम्रपान करणे यासारख्या वाईट सवयी लावून घेणे फार सोपे आहे. एखादी गोष्ट जितकी जास्त वेळा करू तितकी ती करायला आपल्याला आवडू लागते. जर आपण ती करणे सोडून दिले तर आपण दुःखी होतो. यालाच सवयीचे दडपण म्हणतात. अशा सवयीच्या दडपणाचा प्रतिकार करायला पाहिजे. #### भाषांतर नमुना २ **Translation** Gandhiji said that the greatest lessons in life are learnt from children, not from learned men. A child will fearlessly try before giving up. As adults, fearing failure, We give up before we try. A child is inherently curious about the world, about relationship, about wantings to understand how things work. **भाषांतर** गांधीजी म्हणत असत की, जीवनातील सर्वात महान पाठ लहान मुलांकडून शिकता येतात विद्वान माणसांकडूीन नव्हे? एखादे काम सोडून देण्यापूर्वी एखादे मूल निर्भयपणे प्रयत्न करीत राहते. प्रौढ असून ही आपण अपयशाच्या भीतीने प्रय्न करण्यापूर्वीच एखादे कार्य सोडून देतो #### भाषांतर नमुना ३ **Translation** In the spring of 1972, David was winding up four a college with top marks. So far, so good. Ready for the big try, he had applied to ten medical colleges. By ear;u April, eight ahd turned him down. Then on the ofternoon of April 27, a ninth rejection came from a medical collego he had counted on the most, and dave was crushed. **भाषांतर** १९७२च्या वसंत ऋतूत डेव्हिड कॉलेजची चार वर्षे उत्कृष्ट गुण मिळवत संपवण्याच्या मार्गावर होता. येथपर्यंत पगती छान होती. मोठी झेप घेण्याच्या प्रयत्नात त्याने दहा वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अर्ज केले होते. एप्रिलच्या प्रारंभीच्या दिवसात आठ महाविद्यालयांनी त्याला प्रवेश नाकारला. नंतर २७ च्या दुपारी दांडगा भरवसा असलेल्या महाविद्यालयातून त्याला नववा नकार आला, तेव्हा डेव्हि पूर्णपणे हताश झाला. #### भाषांतर नमुना ४ **Translation** There was a beautiful and frangrant vilotet who lived pacidly amongst her friends, and swayed happily amidst the other flowers in a solitary garden. One morning, as her fron was embillished with beads of dew, she lifted her head and looded about; she saw a tall and handsome rose standing proudly and reaching high into space, like a burning torch an emerald lamp. **भाषांतर** एक सुंदर व सुगंधी व्हायोलेटचे फूल आपल्या मित्रांसह शांतपणे राहत होते आणि एका एकाकी बागेत इतर फुलांमध्ये आनंदाने डोलत होते. एका सकाळी त्याचे मस्तक दवाच्या थेंबांनी सुशोभित झाले, तेव्हा त्याने आपले डोके उंचावून आजूबाजूला पाहिले. त्याने एक उंच व देखने गुलाबाचे रोपटे गर्वाने उभे असलेले आणि पाचूच्या दिव्यावर पेटती मशाल असावी असे आकाशात उंच गेलेले पाहिले. #### भाषांतर नमुना ५ **Translation** Until she was 80 years of age, mother did morning yoga everyday, swept her own room and washed her own clothes. To me success is about the sense of independence; it is about not seeing the world but seeing the light. **भाषांतर** वयाच्या ८० व्या वर्षापर्यंत आई दरवर्षी सकाळी योगसाधना करत असत. स्वतःची खोली झाडून साफ करीत असे आणि तिचे स्वतःचे कपडे धूत असे. माझ्या मते, यश स्वावलंबनाच्या जाणवित असते, ते जग पाहण्यात नसते, तर पकाश पाहण्यात असते. #### भाषांतर नमुना ६ **Translation** Pune : While buoyancy in vehicle sales in India May be heartening fopr the industry and economy, it is also leading to a rise in fatal road accedents across the country. In fact, India witnesses the second highest number of road accedent fatalities globally, with China topping the dubious list. While 90% of road crashes globally were attributed to "human error". **भाषांतर** पुणे: उद्योग व अर्थव्यवस्थेला भारतातील वाहन विक्रीची तेजी उत्साहवर्धक असली, तरी ती देशभरातील रस्त्यावरील प्राणघातक अपघातांचे प्रमाण वाढण्यास कारणीभूत होत आहे. वास्तविक पाहता, रस्त्यांवरील अपघातांच्या सवोच्च मृत्युसंख्येच्या शंकास्पद यादीत संपूर्ण जगात चीननंतर भारताचा दुसरा क्रमांक लागतो. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जगातील ९० रस्त्यावील अपघातांचा संबंध मानवी प्रमादांशी जोडला आहे. #### भाषांतर नमुना ७ **Translation** On the terrible Tuesday, the 28th July 2006 the sky suddenly become an ocean and poured turbulent waters on Mumbai to transform all the pylanes into streams: lanes inly the tributaries of the mighty river Brahmaputra kbnows for flash floods of enormous intensity. **भाषांतर** २६ जुलै, २००७ च्या त्या भयंकर मंगळवारी आकाश अचानकपणे महासागर बनले. आणि त्याने मुंबईवर बेसुमार पाऊस ओतून गल्लीबोळांचे प्रवाहात व रस्त्याचे नद्यात रुपांतर केले आणि सर्व रस्ते अचानक येणाऱ्या झंझावाती पुराच्या प्रचंड तडाख्याकरता प्रसिद्ध असलेल्या बलाढ्य ब्रह्मपुत्रेच्या उपनद्यांसारखे झाले. #### भाषांतर नमुना ८ **Translation** It's high enough to cut across roads, rivers and high tension cables, but not so high that clouds obscure vies. People don't look like ants and one can make out that buses are read in maharashtra and yellow in Tamilnadu. We reaffirmed that India is the msot beautiful place in the world, the most colourful too. **भाषांतर** ते उड्डाण रस्ते, नद्या आणि मोठ्या विद्युतदाबाच्या तारा ओलांडून जाण्यास असते. परंतु ढगामुळे दृश्य धूसर (अंधूक) होतील एवढेही ते उंच नसत. गाणरामर लहान दिसत नाहीत आणि महाराष्ट्रातील बस लाल आहेत आणि तामिळनाफर्মান। पिवळ्या आहेत, हे एखाद्याला सहज समजू शकते. भारत हा जगातील सर्वात सुंदर आणि सर्वात रंगीबेरंगी सुद्धा देश आहे, याचा आम्ही पुनः प्रत्यय घेतला. #### भाषांतर नमुना ९ **Translation** A state of laconic disengagement from the everyday routine is vital for creativity, and of course happiness. Now, by no means is the merit of good old 'hard work' being dismissed outright. As anyone who appeared ill-prepared for an examination will testify. Only sweat cou effectively replace that uniquely bitter-sweet agony. **भाषांतर** दैनंदिन व्यापारातून अल्पकाळ मिळवणारा विसावा सृजनशिलतेकरता आणि अर्थातच आनंदाकरत खूप महत्त्वाचा असतो. म्हणून कोणत्याही परिस्थितीत पुरातन काळापासून मान्यता पावलेले परिश्रमाचे महत्त्व, पूर्णपणे फेटाळून लावता येणार नाही. जसे जो कोणी अपूर्ण तयारी करून परीक्षेला बसेल. त्याला खात्री पटेल की, फक्त घामच त्या विलक्षण प्रकारच्या कडू-गोड व्यथेची जागा घेऊ शकतो. #### भाषांतर नमुना १० **Translation** No so long ago, the dada of mass culture, Marshall McLuhan, said ::"We become what we hehold." In the era of wireless, we become what we hold. Flaunt a mobile phone and you become a symbol of the neo-nomadic tribe; speak SMS and you add status to the symbol. You bring grandeur to the gadget. **भाषांतर** अलीकडच्या काळात सामान्य जनतेच्या मानसिकतेचे जाणकार (दादा) समजले जाणारे मार्शल मॅकलुहान म्हणाले, "आम्ही जे पाहतो त्यानुसार आम्ही घडत असतो." वायरलेसच्या या कालखंडात जे आपण स्वीकारतो तसे आपण होतो. सेलफोनचे प्रदर्शन करता आणि तुम्ही नव्या भटक्या जमातीचे प्रतीक बनता, एसएमएसच्या भाषेत बलता आणि त्या प्रतीकांची प्रतिष्ठा वाढवता. अशा प्रकारे तुम्ही त्या साधनाला महानता (महत्त्व) मिळवून देता. #### भाषांतर नमुना ११ **Translation** "55-6 reports that it is presently between the orbits of Earth and Mars and is heading towards us. I will arrange to display the orbit and it parameters on your TV screen," the chairman said while punching a few buttons on his terminal. #### भाषांतर नमुना १२ **Translation** And so the Trojan horse was prevented from achieving its objective. The anti-PIONEER-10 was pushed further away from the Earth and destroyed. The gigantic Explosion was visible to the naked eye, even in board daylight. Fortunately there were no repercussions felt on the Earth. **भाषांतर** ते वस्तूविरोधक यान पृथ्वीच्या सर्वनाशाला कारणीभूत होणार होते. त्यातून निर्माण होणाऱ्या उर्जेने विध्वंस व नरसंहार होणार होता. ते ताबडतोब नष्ट करण्याचा निर्णय झाला. त्या यानाला पृथ्वीपासून दूर ढकलून ते नष्ट करण्यात आले. प्रचंड स्फोट झाला. परंतु त्याचे कोणतेही दुष्परिणाम पृथ्वीवर झाले नाहीत. #### भाषांतर नमुना १३ **Translation** President Kalam has often proclaimed the goal of becoming a developed country by 2020. This is in itself an ambitious and laudatory goal, but we may want to look even beyond this. These desires of military might and Economic clout are probably reactions to our history of prowerlessness and poverty. **भाषांतर** आपले भूतपूर्व राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी २०२० सालापर्यंत भारत पूर्ण विकसित होम्यान्चे राष्ट्र होण्याचे ध्येय वारंवार घोषित केले आहे. हे मूळातच एक महत्त्वाकांक्षी आणि स्तुत्य ध्येय आहे. परंतु आपल्याला याही पलिकडे दृष्टिक्षेप टाकण्याची गरज आहे. लष्करी सामर्थ्य आणि आर्थिक प्रभाव यांची अभिलाषा या बहुधा आपल्या ऐतिहासिक निर्बलता (दुबळेपणा) आणि दारिद्र्याविरुद्ध असलेल्या प्रतिक्रिया आहेत. #### भाषांतर नमुना १४ **Translation** India carries a historical boggage of caste discrimination and illiteracy, and more recent ills like communal probles, crime and corruption. For such a society, mere economic development at a micro-level will not be adequate, if anything, it may intensify some of its woes, particularly crime. We, therefore, need a more holistic goal: a definition of development that is very broad and multidimensional, or a vision that goes beyond development. **भाषांतर** गारत वर्णभेद आणि निरक्षरतेचे ऐतिहासिक ओडा समाजातील समस्या, गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार यांसारख्या ओ दुष्टिकोनातून पाहता, अशा समाजाकरता केवळ आर्थिक घडेल तर त्या समाजातील काही संकटे, विशेषतः गुन्हा॥ करतील. म्हणून आपल्याला अधिक सर्वकष (व्यापक) ध्येयाची गरज बहुउद्देशिय व्याख्येची किंवा विकासाच्याही पलिकडे पोहचणाऱ्या दूरची #### भाषांतर नमुना १५ **Translation** As a step down from my overnight jonurney on the Mahalaxmi Express, I am at one of the oldest reilway buildings still surviving. And I am to stay at the circuit House, which is a heritage structure too. **भाषांतर** महालक्ष्मी एक्स्प्रेसचा रात्रभरचा प्रवास करून खाली उतरले. तेव्हा मी अजून टिकून असलेल्या रेल्वेच्या सर्वात पुरातन इमारतीपैकी एका इमारतीत उभी होते. आणि मला सांस्कृतिक वारसा म्हणून जपलेल्या सर्किट हाऊस या इमारतीतच मुक्काम करायचा होता. #### भाषांतर नमुना १६ **Translation** My mother began developing a contaract in her eyes when I was very small. At that time, the eldest among my brothers got a teaching job at the University in Bhubaneshwar and also had to prepare for the civil sevices - exmination. So, it was decided that my mother would move to cook for him. As her appendage, I had to move, too. **भाषांतर** मी खूप लहान असताना, माझ्या आईच्या डोळ्यात मोतीबिंदू वाढू लागला त्यावेळी माझ्या सर्वात मोठ्या भावाला भुवनेश्वर विद्यापीठात शिक्षकाची नोकरी लागली आणि त्याला मुलकी खात्यातील नोकरीसाठी परीक्षेची तयारीसुद्धा करायची होती. त्याचा स्वयपका करण्याकरता माझ्या आईला तिकडे पाठवण्याचे ठरले. तिचे शेपूट म्हणून मलासुद्धा तिकडे मुक्काम हलवावा लागला. #### भाषांतर नमुना १७ **Translation** Sometimes life hits you in the head with a brick. Don't lose faith. The only way to do great work is to love what you do. If you haven't found it yet, Keep looking. Don't settle. And most important have the courage to follow your heart and intuition. **भाषांतर** काही वेळा जीवनात बिकट परिस्थिती निर्माण होते (अशावेळी) विश्वास डळमळू देऊ नका. महान कार्य करण्याचा एकच मार्ग आहे. आणि तो म्हणजे तुम्ही जे काही कराल त्यावर प्रेम करा. तुम्हाला तो (मार्ग) सापडला नसेल, तर तो शोधत रहा. विसावू नका. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःच्या आणि अंत:पेरणेनुसार वागण्याचे धाडस करा. #### भाषांतर नमुना १८: **Translation** School friendships are laker very seriously. For man are social creatures and like to have friends. Our school friends often remain loves and trusted throughout all our life. There is no greater pleasure than to attend a gathering of old pupils of the same school. We remember that James played for the football Eleven, that Bill was our caption at cricket. What a day it was thirty years ago when he made a century against lancing! Our hearts warm still as we think of that exciting match and how we carried him shoulder - high from the field, but in hand. **भाषांतर** माणसे ही समाजप्रिय प्राणी असल्यामुळे आणि त्यांना मित्रांची आवड असल्याने शाळेतल्या ओळखी फार जपल्या जातात. आपले शाळासोबती आपल्याला आयुष्यभर प्रिय नि विश्वासू वाटत असतात. एखाद्या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांया स्नेहसंमेलनास उपस्थित राहण्यासारखा आनंद नसतो. जेम्स आपल्या फुटबॉल संघात खेळल्याचे आणि बिल क्रिकेट संघाचा कप्तान असल्याचे आपल्याला आठवते. त्याने लान्सिंगविरुद्ध शतक झळकावले तो तीस वर्षांपूर्वीचा दिवस किती अविस्मरणीय ! तो रोमहर्षक सामना आणि हातातली बॅट उंचावणाऱ्या बिलला खांद्यावर घेऊन आपण मैदानाबाहेर कसे नेले याच्या आठवणीने आजही अंतःकरण उचंबळून येते. ### १०.५ संदर्भ सूची 1. व्यावहारिक मराठी - प्रा. डॉ. सयाजीराजे मोकाशी 2. व्यावहारिक मराठी-डॉ. कल्याण काळे, निराला प्रकाशन पुणे 3. व्यावहारिक मराठी डॉ. लिला गोविलकर, डॉ. जयश्री पाटणकर, स्नेहवर्धन पब्लिकेशन हाऊस पुणे. 4. व्यावहारिक मराठी -ल.रा. नसिराबादकर, फडके बुक हाऊस, कोल्हापूर 5. व्यावहारिक मराठी भाग-२ संपादक डॉ. साहेब खंदारे, निर्मल प्रकाशन नांदेड 6. व्यावहारिक मराठी - संपा. स्नेहल तावरे, स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे. 7. सुबोध मराठी व्याकरण लेखन व वृत्तालंकार - प्रा. चंद्रहास जोशी 8. मराठी शुद्धलेखन प्रदिप मो. रा. वाळंबे.