Maharashtra State Power Generation Company Ltd. (Mahagenco) Job Advertisement 04/2024 (PDF)

Summary

This is an advertisement for a job opening (Technician-3) with Maharashtra State Power Generation Company Limited (Mahagenco). The application deadline has been extended to January 31, 2025. Candidates are advised to check the Mahagenco website for detailed information. The advertisement includes details about age limit relaxation, educational qualifications, and other requirements for the position.

Full Transcript

## महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित **क्र.महानिर्मिती/मासं-सेप्र/** **जाहिरात क्र. ०४/२०२४ चे सुधारपत्र क्र. No 00191** **दिनांक: 7 JAN 2025** **विषयः- जाहिरात क्र. ०४/२०२४ अन्वये प्रसिध्द तंत्रज्ञ-३ पदाकरीता अर्ज करण्यासाठी कमाल वयोमर्यादा वाढविण्याबाबत, शैक्षणिक अर्हता व इतर कागदपत...

## महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित **क्र.महानिर्मिती/मासं-सेप्र/** **जाहिरात क्र. ०४/२०२४ चे सुधारपत्र क्र. No 00191** **दिनांक: 7 JAN 2025** **विषयः- जाहिरात क्र. ०४/२०२४ अन्वये प्रसिध्द तंत्रज्ञ-३ पदाकरीता अर्ज करण्यासाठी कमाल वयोमर्यादा वाढविण्याबाबत, शैक्षणिक अर्हता व इतर कागदपत्रांसाठी जाहिरातीचा अंतिम दिनांक ३१.०१.२०२५ गृहीत धरणेबाबत आणि उमेदवारांकरीता इतर सूचना.** महानिर्मिती कंपनीकडून तंत्रज्ञ-३ यांची रिक्त पदे भरण्यासाठी सरळसेवा भरतीतर्गत जाहिरात क्र.०४/२०२४ दि.२६.११.२०२४ रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. सदरील पदाच्या सरळसेवा जाहिरातीकरीता अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २६.१२.२०२४ असा नमूद केला होता. तदनंतर तंत्रज्ञ-३ पदाकरीता अर्ज करण्यास दि.१०.०१.२०२५ पर्यंत मुदत वाढ देण्यात आली होती. उमेदवारांनी महानिर्मिती कंपनीद्वारे प्रसिध्द करण्यात आलेल्या जाहिरात क्र.०४/२०२४ मध्ये वयोमर्यादेत शिथिलता देण्याबाबत निवेदने सादर केली आहेत. तसेच सदरील जाहिरातीत नमूद इतर बाबींविषयी स्पष्टता येण्याच्या दृष्टीने मा. सक्षम अधिकारी यांच्या मंजुरीनुसार पुढीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत :- * **उपरोक्त जाहिरातीनुसार अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या कमाल वयोमर्यादेत ०२ वर्षाची सूट देण्यात येत आहे. तसेच संबंधित उमेदवारांना आवश्यक प्रमाणपत्र / कागदपत्रे उपलब्ध करण्याची संधी देण्याकरीता तंत्रज्ञ-३ पदासाठी अर्ज सादर करण्याचा अंतिम दि.३१.०१.२०२५ पर्यंत वाढविण्यात येत आहे. सदरील बदल लवकरच ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या लिंकमध्ये समाविष्ट करण्यात येतील. त्यासाठी पात्र उमेदवारांनी वेळोवेळी महानिर्मिती कंपनीच्या संकेतस्थळावर भेट देऊन खात्री करुन घ्यावी.** * **उमेदवारांना अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकात, दिनांक ३१.०१.२०२५ पर्यंत मुदतवाढ दिली असल्याने, उमेदवारांची शैक्षणिक अर्हता आणि इतर सर्व पुर्वावश्यकता (जसे उन्नत/प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र, शिकाऊ उमेदवारी पुर्ण केल्याचे प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र/वैधता प्रमाणपत्र इ.) या दि.३१.०१.२०२५ रोजीच्या गणण्यात येतील. तसेच प्रगत कुशल प्रशिक्षणाचा आणि बाहयस्त्रोत तांत्रिक कंत्राटी कामगार यांच्या आवश्यक अनुभवाचा अंतिम दिनांक हा दि.३१.०१.२०२५ असाच गणण्यात येईल. यापूर्वीच्या प्रगत कुशल प्रशिक्षणाचा आणि बाहयस्त्रोत तांत्रिक कंत्राटी कामगार यांच्या आवश्यक अनुभवाचा अंतिम दिनांकानुसार (दि.०१.१०.२०२४) अर्ज सादर केलेल्या प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी आणि बाहयस्त्रोत तांत्रिक कंत्राटी कामगार यांनी ऑनलाईन अर्ज सादर केला असल्यास, नवीन अर्ज सादर करण्याची आवश्यकता नाही. अशा उमेदवारांच्याबाबतीत संबंधित विद्युत केंद्राकडून माहिती प्राप्त करुन घेण्यात येणार आहे.** * **महाराष्ट्र शासन, महिला व बालविकास विभाग, शासन निर्णय क्र.महिआ २०२३/प्र.क्र.१२३/कार्या-२ दि.०४.०५.२०२३ अन्वये प्रसिध्द सूचनांनुसार पात्रतेप्रमाणे आणि जाहिरातीत प्रसिध्द रिक्त पदांनुसार महिला उमेदवारांचा महिला आरक्षणातर्गत भरती प्रक्रियेवेळी विचार करण्यात येईल.** * **महानिर्मिती कंपनीकरीता तंत्रज्ञ-३ पदासाठी महानिर्मिती कंपनीतील प्रकल्पग्रस्त प्रगत कुशल प्रशिक्षणार्थीकरीता ५०% कोटयातर्गत ऑनलाईन अर्ज सादर करताना संबंधित उमेदवारांनी प्रशिक्षणाचा अंतिम दिनांक हा दि.३१.०१.२०२५ असा नमूद करणे आवश्यक आहे. यापूर्वी ऑनलाईन अर्ज सादर करताना प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी उमेदवारांनी प्रशिक्षणाचा अंतिम दिनांक ०१.१०.२०२४ असा नमूद करुन अर्ज सादर केला असल्यास, अशा उमेदवारांनी देखील नवीन अर्ज सादर करण्याची आवश्यकता नाही.** * **जाहिरात क्र.०४/२०२४ अन्वये तंत्रज्ञ-३ पदाकरीता उमेदवारांनी मोठया प्रमाणात अर्ज केले असून सदरील पदाची ऑनलाईन परीक्षा संबंधित बाहयस्त्रोत भरती संस्थेमार्फत एकापेक्षा अधिक सत्रामध्ये पार पाडण्यात येणार असल्याने संबंधित बाहयस्त्रोत भरती संस्थेकडून गुणांकन करण्यासाठी नॉर्मललायझेशन प्रक्रियेचा (Normalisation Process) अवलंब करण्यात येणार आहे.** * **महानिर्मिती कंपनीतील बिगर आय.टी.आय. सर्वसमावेशक प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी प्रकल्पग्रस्त अभियांत्रिकी पदवी / पदविकाधारक उमेदवारांना महानिर्मिती प्रशासकिय परिपत्रक क्र.५०८ दि.१६.११.२०२२ अन्वये सहाय्यक अभियंता व कनिष्ठ अभियंता या पदाच्या सरळसेवा भरतीमध्ये अतिरिक्त गुण देण्यात येत असल्याने, अभियांत्रिकी पदवी / पदविकाधारक उमेदवारांना तंत्रज्ञ-३ पदाच्या सरळसेवा भरतीमध्ये प्रकल्पग्रस्तांकरीता राखीव ५०% कोट्यातर्गत अतिरिक्त गुण देण्यात येणार नाही, याची संबंधित उमेदवारांनी विशेष नोंद घ्यावी.** **याशिवाय जाहिरातीत नमूद इतर सर्व बाबी (सर्वसाधारण अटी, आरक्षणासंबंधीच्या अटी / नियम व इतर) अबाधीत राहतील याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.** **(डॉ.नितीन वाघ)** **कार्यकारी संचालक (मासं)**

Use Quizgecko on...
Browser
Browser