B- A- II Geog- P- 3 Soil geog Topic no 2 PDF
Document Details
Uploaded by Deleted User
Tags
Summary
This document is about soil formation and its characteristics. It focuses on the factors influencing soil formation, including climate, organisms, and parent material, and discusses the significance of the time factor in the process. The document also explores the natural and chemical properties of soil and includes a section on soil morphology. It appears to be part of a larger course, possibly a university-level geography course.
Full Transcript
## सत्र-३ : घटक-२ ## मृदा : निर्मिती व गुणधर्म ### अनुक्रमणिका - २.० उद्दिष्ट्ये - २.१ प्रास्ताविक - २.२ विषय विवेचन - २.२.१ जेनीची मृदानिर्मितीची बहुघटकीय प्रतिकृती - २.२.२ मृदा निर्मितीची प्रक्रिया : प्राकृतिक, जैविक व रासायनिक - २.२.३ मृदेचे प्राकृतिक गुणधर्म - २.२.४ मृदेचे रासा...
## सत्र-३ : घटक-२ ## मृदा : निर्मिती व गुणधर्म ### अनुक्रमणिका - २.० उद्दिष्ट्ये - २.१ प्रास्ताविक - २.२ विषय विवेचन - २.२.१ जेनीची मृदानिर्मितीची बहुघटकीय प्रतिकृती - २.२.२ मृदा निर्मितीची प्रक्रिया : प्राकृतिक, जैविक व रासायनिक - २.२.३ मृदेचे प्राकृतिक गुणधर्म - २.२.४ मृदेचे रासायनिक गुणधर्म - २.३ सारांश - २.४ पारिभाषिक शब्द, शब्दार्थ - २.५ स्वंय-अध्ययन प्रश्नांची उत्तरे - २.६ सरावासाठी स्वाध्याय - २.७ क्षेत्रीय कार्य - २.८ अधिक अभ्यासासाठी संदर्भ ग्रंथ ### २.० उद्दिष्ट्ये - जेनीची मृदा निर्मितीची बहुघटकीय प्रतिकृती समजवून घेण्यास मदत होईल. - मृदा निर्मितीची प्रक्रिया, प्राकृतिक, रासायनिक व जैविक घटक यांच्यातील परस्परसंबंधाचे आकलन होईल. - मृदेच्या प्राकृतिक व रासायनिक गुणधर्माविषयी ज्ञान मिळेल. - मृदा भूगोल अभ्यासातील वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होईल. ### २.१ प्रास्ताविक जनक खडकांवरील निरंतर प्रक्रियांचा विकास किंवा उत्क्रांतीच्या परिपाकास मृदा म्हणतात. मृदेमध्ये सेंद्रिय व असेंद्रिय द्रव्ये असतात. उत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या श्रम, भूमी, भांडवल व संयोजन यापैकी भूमी हा एक महत्त्वपूर्ण उत्पादक घटक आहे. ऊन, वारा, पाऊस इत्यादीच्या अखंड आघाताने व प्रत्याघाताने खडकापासून मृदेची निर्मिती होत असते. भूपृष्ठावर होणाऱ्या अनेक प्राकृतिक, रासायनिक व जैविक क्रिया-प्रक्रियांमुळे मृदा निर्मिती होते. मृदा निर्मिती ही एक निसर्गातील अंत्यत मंद गतीने परंतु सातत्याने चालू असलेली गुंतागुंतीची व क्लिष्ट अशी प्रक्रिया आहे. मृदा उत्क्रांत होत जाऊन परिपक्व होतात. मूळ खडकावर मृदेच्या काही सें.मी. थर तयार होण्यास शेकडो वर्षे लागतात. त्यामुळे मृदा निर्मितीचा काळ महत्त्वाचा ठरतो. सदर प्रकरणात आपण मृदा निर्मितीचे घटक, मृदा निर्मितीची प्रक्रिया व मृदेचे प्राकृतिक आणि रासायनिक गुणधर्म यांचा अभ्यास करणार आहोत. ### २.२ विषय विवेचन #### २.२.१ जेनीची मृदानिर्मितीची बहुघटकीय प्रतिकृती हॅन्स जेनी यांचा जन्म ७ फेब्रुवारी १८९९ रोजी बसेल, स्वित्र्झलँड येथे झाला. स्विस फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून १९२२ मध्ये कृषी पदविका प्राप्त केल्यानंतर त्यांनी १९२७ मध्ये Exchange Reactions या विषयामध्ये संशोधन प्रबंध सादर करून D.Sc. ही सर्वोच्च पदवी संपादन केली. कॅलिफोर्निया विद्यापीठातील बर्ली येथे अध्यापनाचे कार्य करीत असताना १९४१ च्या दरम्यान त्यांनी "Factors of soil formation - A system of Quantitative Pedology" हा ग्रंथ प्रकाशित केला. ज्यामुळे त्यांना जगभर प्रसिद्धी मिळाली. या ग्रंथामध्ये त्यांनी मृदा निर्मितीसाठी कारणीभूत असणाऱ्या घटकांचे सखोल विश्लेषण केले आहे. मृदा निर्मितीसाठीचे कारक/घटक या फॉर्म्युलाद्वारे जेनी या शास्त्रज्ञाने खालील समीकरण मांडले. $S = f(cl, o, r, p, t)$ - $S$ = Soil Formation (मृदा निर्मिती) - $f$ = Factor (कारक/घटक) - $cl$ = Climate (हवामान) - $o$ = Organism (जीव) - $r$ = Relief (भूउठाव) - $p$ = Parent Material (जनक खडक) - $t$ = Time (काळ) **चित्र**: आकृती क्र २.१: मृदेचे थर **विवरण**: आकृती मृदेचे वेगवेगळे थर, 'O' थर, 'A' थर, 'B' थर, 'C' थर, 'R' थर दर्शविते. #### २. जनक खडक :- मूळ खडकात किंवा जनक खडकात अपक्षय क्रियेने जे पदार्थ संचयित होतात त्यांना मृदेचे मूळद्रव्य म्हणतात. मूळ खडकांत असलेली द्रव्ये बऱ्याच वेळा मृदेत आढळतात. तसेच मृदेला सुपीकता प्राप्त करून देणारी द्रव्येदेखील मूळ खडकापासून मिळतात. मूळ खडकांचे विदारण व अपक्षय झाल्यास त्या खडकाचे रासायनिक गुणधर्म न बदलता फक्त विखंडन क्रिया घडते आणि खडकांचे मृदेत रूपांतर होते. या अपक्षय क्रियेमुळे मूळ खनिजे, क्षार आणि अन्य घटक द्रव्यांमध्ये काहीच फरक पडत नाही. उदा. बेसॉल्टपासून निर्माण होणारी काळी रेगूर मृदा. रासायनिक अपक्षय प्रक्रियेमुळे खडकावर रासायनिक प्रक्रिया होते आणि खडकांचे विखंडन न होता विघटन होते. या क्रियेत मूळ खडकाचे गुणधर्म बदलून नवीन गुणधर्माची मृदा तयार होते. उदा. उष्ण व दमट हवामान प्रदेशातील जांभी मृदा. #### २. जैविक घटक :- मृदा निर्मितीत वनस्पतींचे योगदान महत्त्वपूर्ण तर असतेच पण ते प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष असे असते. वनस्पतींच्या विघटनातून मृदेतील सेंद्रिय द्रव्य 'ह्यूमस'ची निर्मिती होते. वनस्पतींची पाने, फुले, फांद्या, फळे, बिया, जमिनीवर पडतात व सुकतात. उबदार, आर्द्र हवामानात हे पदार्थ कुजतात, मृदेतील काही सूक्ष्म जिवाणू या कुजलेल्या पदार्थांचे विघटन करतात. वनस्पतीतील पेशीजन्य संरचना भेदली गेल्याने सुलभ रासायनिक संरचना असलेले सेंद्रिय पदार्थ निर्माण होतात. वनस्पतींची मुळे मृदा धरून ठेवतात व त्यामुळे त्यांची झीज रोखली जाते. वनस्पती बाष्पोर्सजन करतात म्हणून त्यांच्या भोवतालच्या हवेत बाष्प असते व बाष्पीभवनाचा वेग कमी असतो. पर्यायाने मृदाजलाचे बाष्पीभवन कमी होते व त्या आर्द्र राहण्यास साहाय्य होते. मृदा निर्मितीत वनस्पतींचा सहभाग महत्त्वपूर्ण असतो. #### ३. हवामान :- मृदा निर्मितीत वातावरण प्रक्रियांचा लक्षणीय असा सहभाग असतो. तापमान, पर्जन्य, वारे या वातावरणीय घटकांचा फार मोठा सहभाग खडकांच्या अपक्षयांत असतो. जास्त तापमान, अधिक आर्द्रता व भरपूर पाऊस यामुळे रासायनिक अपक्षय वेगाने होते. वनस्पती कुजण्याची व विघटनाची क्रियाही अशा परिस्थितीत जोमाने होते. मृदाजलाची हालचाल तापमानावर अवलंबून असते. तापमान बाष्पीभवनाचा वेग नियंत्रित करते. तापमान जास्त असेल तर बाष्पीभवन वेगाने होऊन मृदाजल जवळपास संपुष्टात आल्याने मृदा कोरड्या होतात. यामुळे मृदेतील हवेचे प्रमाण वाढते. हिवाळ्यात तापमान कमी असल्याने बाष्पीभवनाचा वेग मंदावतो व मृदाजल टिकून राहते. हवेतील मृदा जलाचे प्रमाण कमी असते, अशी स्थिती मृदेतील सूक्ष्म जिवाणूंचे कार्य क्षीण करते. मृदेतील सूक्ष्मजीव हे सेंद्रिय पदार्थांचे विघटक (Decomposers) असतात ते क्रियाशील नसतील तर सेंद्रिय पदार्थाचे विघटन होत नाही व पर्यायाने ह्यूमस निर्माण होण्यात अडथळे येतात. तापमान कमी असल्यास कार्बनडाय-ऑक्साइड पाण्यांत अधिक विरघळतो त्यामुळे सौम्य कार्बाम्ल तयार होते. रासायनिक अपक्षयातील कार्बोनेशन क्रियेस याचे साहाय्य होते. तापमान कक्षा अधिक असेल तर खडकांचे आकुंचन प्रसरण होत राहते त्यामुळे कायिक अपक्षयास चालना मिळते. एकंदरीत अशा अपक्षयामुळे खडक दुभंगतात. जोरदार वाऱ्यामुळे खडकांचे सुटे कण तसेच मृदेतील पृष्ठीय कण स्थलांतरित होत राहतात. #### ४. भूउठाव :- भूरूपांचा उतार, उंच सखलपणा यावर मृदेची खोली नियंत्रित होते. गुरूत्वशक्तीच्या प्रभावाखाली अपक्षयित कण व मृदा कण उताराला अनुसरून स्थानांतरित होत असतात. शिवाय मृदा जल व त्यात विद्राव्य स्थितीत असलेली पोषणद्रव्ये उताराच्या अनुषंगाने वाहून जात असतात. उतार तीव्र असेल तर मृदा कण वाहून जाण्याचे प्रमाण अधिक असते. अशा भागात मृदा जाडसर-भरड कणांनी बनलेल्या असतात. मूळ खडकावर मृदा थरही पातळ असतो. डोंगर व पर्वत उतारावर अशा मृदा असतात. याउलट मैदानी प्रदेशांत, पठारावर मृदा थर जाड असतो व त्या सूक्ष्म कणांनी बनलेल्या असतात. मृदेच्या विकासांत भूबाह्य व भूअंतस्थ प्रक्रियाही महत्त्वाच्या ठरतात. भूकंपामुळे व ज्वालामुखी क्रियेने नव्या मृदेची निर्मिती होते. अशा मृदा सुपीक असतात. नद्यांमुळे पूरमैदाने, त्रिभुज प्रदेश इ. भूरूपे निर्माण होतात. या भूरूपावरील मृदा शेतीस उपयुक्त असतात. हिमनद्यांच्या हिमोढांचे प्रदेश, हिम-जलोढ मैदाने येथील मृदाही सुपीक असते. वाऱ्याच्या निक्षेपण कार्यामुळे निर्माण झालेली लोएस मृदा उपयुक्त मानली जाते. #### ५. कालावधी मृदा निर्मिती अत्यंत मंद गतीने होत असते. शेकडो वर्षानंतर काही सें.मी. जाडीची मृदा तयार होते. इतक्या दीर्घ कालावधीत निर्मिती घटकात खूप बदल होतात व त्याचा परिणाम मृदा निर्मितीच्या दरावरही होतो. अनेक भौतिक, रासायनिक व जैविक क्रिया-प्रक्रिया, त्यांच्यातील साहचर्य संतुलन राखले गेल्यास मृदा निर्मितीचा काळ व त्यांचा उपयोगितेचा काळ यांच्यात फार तफावत आढळते. सातत्याने पिके घेणे, अतिरिक्त जलसिंचन, खतांचा वापर यानुसार अवनत झालेल्या मृदा पुर्नउपयोगी होण्यासाठी द्यावा लागणारा काळ दिला जात नाही व अशा मृदा अनुत्पादक होतात. ### २.२.२ मृदा निर्मितीची प्रक्रिया मृदा ही वनस्पतींना पोषकद्रव्ये पुरविण्याचे कार्य करते. साधारणपणे ही खनिजे, मुलद्रव्ये मृदेत गाळ (Clay) व सेंद्रिय द्रव्ये (Humus) यांनी धरून ठेवलेली असतात. मृदेचे मुलभूत घटक तीन प्रकारचे म्हणजे स्थायु, द्रव आणि वायु स्वरूपात असतात. यापैकी ५०% स्थायु (४५% मृदा व ५% सेद्रिय द्रव्ये) २५% हवा आणि २५% मृदेतील पाणी असते. यापैकी स्थायु घटकांचे प्रमाण स्थिर मानले जाते व साधारण परिस्थितीमध्ये मृदेतील वायुंचे प्रमाण वाढल्यास मृदाजल कमी होते व उलट परिस्थितीमध्ये मृदाजलाचे प्रमाण वाढते. * मृदा विकासाच्या दीर्घ कालावधीसाठी मृदा विकसीत होत गेली असता तिच्या उभ्या छेदामध्ये (Verticle Section) दोन ते तीन वेगवेगळ्या रंगाचे थर तयार झालेले दिसतात. * हे सर्व थर एकमेकांपासून रंग, पोत, तापमान, सच्छिद्रता, रचना, घनता इ. गुणधर्मात भिन्नता दर्शवितात. या थरांना मृदेचे थर (Soil Horizon) म्हणतात. * साधारणपणे मृदेत पुढील थर (Soil Horizon) आढळतात. - i) 'O' थर - ii) 'A' थर - iii) 'B' थर - iv) 'C' थर - v) 'R' थर. **चित्र**: आकृती २.१: मृदेचे थर **विवरण**: आकृती मृदेचे वेगवेगळे थर, 'O' थर, 'A' थर, 'B' थर, 'C' थर, 'R' थर दर्शविते. - **'O' थर**: हाच भूपृष्ठीय थर म्हणून ओळखला जातो. या थरामध्ये भूपृष्ठानजीक न कुजलेल्या सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण अधिक असते. याउलट कुजलेल्या सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण 'A' थरानजीक अधिक असते. या थरात सेंद्रिय द्रव्यांचे प्रमाण अधिक (Organic Content) असते. म्हणून यास 'O' थर म्हणतात. - **'A' थर**: यालाच मृदेचा वरचा थर (Top Soil) म्हणून ओळखले जाते. या थरात सेंद्रिय द्रव्यांचे प्रमाण अधिक असते म्हणून याचा रंग इतर थरांपेक्षा गडद (Dark) असतो. या थरामध्ये जाड्याभरड्या गाळमातीचे प्रमाण अधिक असण्याचे कारण म्हणजे वाहत्या व झिरपत्या पाण्यासमवेत या थरातील मृदाकण वाहून खालच्या थरात जातात. या प्रक्रियेस अवक्षालन (Elluviation) असे म्हणतात. या मृदाथरात जैविक संसाधनांचा (गांडूळ, कवक, शैवाले इ.) क्रियांचा प्रभाव अधिक असतो त्यामुळे हा थर मृदेचा सर्वाधिक सुपिक थर असतो. - **'B' थर**: या थरास उपमृदा (Subsoil) म्हणून ओळखले जाते. हा मृदाथर 'A' थराच्या खाली असतो. मुळ खडकाच्या सर्व गुणधर्मापासून अत्यंत वेगळी मृदा या थरात आढळते. उष्णकटीबंधीय प्रदेशामध्ये या थरात आयर्न ऑक्साईड, अॅल्युमिनीअम ऑक्साईड चे प्रमाण अधिक असते. कारण 'A' थरातून वाहून आलेले खनिजे व इतर पदार्थ या थरात जमा होतात या प्रक्रियेस स्थापन थर (illuviation) म्हणतात. या थरात खनिजे जमा होतात म्हणून यास संचय विभाग (Zone of Accumulation) असेही म्हणतात. - **'C' थर**: 'B' थराखाली असणाऱ्या या थरावर मृदानिर्मिती प्रक्रियेचा फार कमी परिणाम झालेला दिसतो व मुळ खडकाप्रमाणेच या थराचे प्राकृतिक व रासायनिक गुणधर्म असतात. ही मृदा जाड्याभरड्या दगड-गोट्यांची बनलेली असते. याच्या खाली असणाऱ्या 'R' थराच्या अपक्षयाने ह्या थरातील मृदा तयार होते. शुष्क प्रदेशात या थरात कॅल्शियम कार्बोनेट (CaCO3) चे प्रमाण अधिक आढळते. या थरात कमकुवत खडकांचे प्रमाण अधिक असते व ते या थराखालील खडकापेक्षा कमकुवत असतात. - **'R' थर**: या थरात दगडगोट्यांचे (Regolith) प्रमाण अधिक असते म्हणून या थरास 'R' थर म्हणतात. मुळ खडकाच्या अपक्षयाने हा थर तयार होतो. म्हणून याच्या मृदेत मुळ खडकाचे अधिक गुणधर्म आढळतात. ### २. मृदा निर्मितीची प्रक्रिया - प्राकृतिक, जैविक व रासायनिक #### १. प्राकृतिक प्रक्रिया :- कायिक किंवा यांत्रिक पद्धतीने भूपृष्ठावरील खडकांचे तुकडे होऊन त्याचे बारीक मातीत रूपांतर होण्याच्या क्रियेलाच मृदा निर्मितीची प्राकृतिक प्रक्रिया म्हणतात. ऊन, वारा, पाऊस यासारख्या कारंकामुळे मूळ खडकांवर सातत्याने दाब व ताण पडून खडकांचे विखंडन होते आणि त्यातूनच भूपृष्ठावर मृदेचा थर निर्माण होत राहतो. जास्त तापमानाच्या कोरड्या प्रदेशात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात फार मोठी तफावत असते. दिवसा अतिउच्च तापमानामुळे खडक तापतात व प्रसरण पावतात याउलट रात्री कमी तापमानामुळे ते झपाट्याने थंड होतात व त्यांचे आकुंचन होते. या सततच्या आंकुचन प्रसरणामुळे खडकातील खनिजांमध्ये तणाव निर्माण होऊन खडकांना भेगा पडतात व हळूहळू खडक फुटून त्यापासून बारीक मृदाकणांची निर्मिती होते. शीत व उंच पर्वतीय प्रदेशातसुद्धा तापमान गोठण बिंदूखाली जात असल्याने पाणी गोठण्याची क्रिया घडत असते. खडकांच्या भेगामध्ये पाणी गोठते तेव्हा पाण्याचे बर्फात रूपांतर होत असताना त्याचा दाब खडकातील भेगांमध्ये निर्माण होतो. वारंवार ही क्रिया झाल्यामुळे खडक फुटतात व त्यांचे मृदेत रूपांतरण होते. वाळवंटी प्रदेशात वारा हा कारक जास्त प्रभावी असतो. वाळवंटात वाऱ्याचा वेग जास्त असतो. वाऱ्याबरोबर वाहून येणारी वाळू मार्गातील खडकांवर सतत आघात करते. यामुळे खडक कमकुवत होतो, त्याचे पापुद्रे सुटतात व त्यापासून मृदानिर्मिती होते. जास्त पर्जन्यमान असलेल्या प्रदेशात तडकन्याच्या क्रियेद्वारे मृदेची निर्मिती होते. आर्द्र प्रदेशात पर्जन्याच्या आधी सूर्याच्या उष्णतेमुळे खडक अतिशय तापलेले असतात. अशा तप्त खडकावर पाणी पडल्यास खडकास तडे पडून कालांतराने त्याचे लहान-लहान कण अलग होतात. #### २. जैविक प्रक्रिया :- वनस्पती, प्राणी, मानव यांच्यामुळे विघटन व अपघटन क्रिया होवून खडक कमकुवत होतात आणि त्यांचे बारीक माती कणात रूपांतर होते याला मृदानिर्मितीची जैविक प्रक्रिया म्हणतात. वनस्पतीमुळे कायिक व रासायनिक अशा दोन्ही प्रकारचे विदारण होते. वनस्पतींची मुळे जमिनीत खोलवर शिरतात. लहान मुळे खडकांच्या फटीत प्रवेश करतात व कालातंराने ती मोठी होतात तेव्हा खडकांच्या भेगा रूंद होतात आणि खडक दुभंगतात. वनस्पतीमुळे रासायनिक विदारणही होते. वनस्पतीमध्ये जलयुक्त बॅक्टिरिया असतात. हे सूक्ष्म जीवाणू खडकातील खनिज द्रव्ये वेगळी करतात. यामुळे खडक कमकुवत होऊन मृदानिर्मिती प्रक्रिया घडून येते. वनस्पती प्रमाणेच प्राणीसुद्धा मृदा निर्मितीला मदत करतात. पृथ्वीवर अनेक प्रकारचे प्राणी बिळे तयार करतात. निवाऱ्यासाठी विवरे तयार करतात. त्यामध्ये किटक, उंदीर, घुशी यांचा उल्लेख करता येईल. हे प्राणी खडक पोखरून मृदानिर्मितीला साहाय्य करतात. आधुनिकीकरणामुळे मृदानिर्मितीतील मानवी वाटा वाढू लागला आहे. कृषी, जलसिंचन प्रकल्प, वाहतूकमार्ग निर्मिती, इमारत उभारणी, खडी मिळविण्यासाठी डोंगर पोखरणे अशा विविध क्रियांद्वारे मानव मृदानिर्मितीस अप्रत्यक्षपणे कारणीभूत ठरतो. #### ३. रासायनिक प्रक्रिया :- वातावरणामधील ऑक्सीजन, कार्बन डाय-ऑक्साईड, हायड्रोजन यांच्या परिणामामुळे खडकांमध्ये रासायनिक परिवर्तन घडतात. खडकातील मुलद्रव्यांच्या आकारमानात व स्वरूपात बदल झाल्याने मूळ खडकाचे विघटन होऊन मृदानिर्मितीला सुरूवात होते यालाच मृदानिर्मितीची रासायनिक प्रक्रिया म्हणतात. पावसाचे पाणी, बर्फ विलय, वातावरणातील विविध वायू, मानवी क्रिया यामुळे रासायनिक विदारण घडून येते. प्रत्येक प्रकारच्या रासायनिक द्रव्याची खडकावर होणारी अभिक्रिया वेगवेगळ्या प्रकारची असते. हवेतील ऑक्सीजनचा दमट हवामानात लोहयुक्त खडकावर परिणाम होतो. खडकातील लोहाचे ऑक्साईडस् बनतात. ही क्रिया लोहाच्या गंजण्यासारखी असते. या क्रियेला ऑक्सिडेशन किंवा भस्मीकरण असे म्हणतात. ऑक्सिडेशनमुळे खडकाचे रासायनिक विघटन होऊन मृदानिर्मितीला मदत होते. पावसाळ्यात कार्बन डायऑक्साईड वायू पाण्यात विरघळून कार्बोनिक आम्ल तयार होते. या सौम्य कार्बोनिक आम्लाची अभिक्रिया अग्निजन्य खडकावर होऊन त्यातून कॅल्शियम कार्बोनेट, सोडियम, मॅग्नेशियम, सिलिका हे घटक वेगळे होतात. या क्रियेमुळे खडक कमकुवत होतात. चुनखडी, डोलोमाईट, संगमरवर खडकावर कार्बोनिक आम्लाची अभिक्रिया होऊन हळूहळू त्यापासून मृदाकण निर्माण होऊ लागतात. जास्त पावसाच्या प्रदेशात जलअपघटन क्रियेद्वारे खडकातील फेल्डस्पार या खनिज द्रव्यावर पाण्याची अभिक्रिया होते. पावसाचे पाणी खडकात मुरल्यावर त्याचा फेल्डस्पारशी संपर्क आला असता अशा प्रकारची अभिक्रिया घडून खनिजाचा आकार वाढतो. या क्रियेला हायड्रेशन असे म्हणतात. त्यामुळे खडक ठिसूळ होऊन त्याचे मातीत रूपांतर होते. ### मृदानिर्मितीचे स्तर (Soil formation Stages) :- खालील सहा प्रमुख प्रक्रियांद्वारे मृदा निर्मितीची प्रक्रिया चालते : - **१. अपक्षालन (Leaching)** : ही प्रक्रिया प्रामुख्याने उष्ण व दमट हवामानाच्या प्रदेशात चालते. या ठिकाणी मृदेतील विद्राव्य सिलीका, कॅल्शिअम यासारखे घटक पाण्यासोबत वाहून जातात (Leaches away) व उर्वरीत मृदेत आयर्न ऑक्साईड, अॅल्युमिनीअम ऑक्साईडचे प्रमाण वाढते. ही मृदा लॅटेराईटीक मृदा (Lateritic Soil) म्हणून ओळखली जाते. या मृदेत ह्युमसचे प्रमाण कमी असून हायड्रोजन आयनांच्या विनीमयामुळे (Exchange) मृदा आम्लधर्मी होते. - **२. अवक्षालन (Elluviation)** : अति पर्जन्य व मृदेत झिरपणाऱ्या पाण्यामुळे मृदेतील लोह अॅल्युमिनिअम ऑक्साईडचे विद्राव्य घटक मृदेच्या 'A' थरामधून वाहून जातात. या प्रक्रियेस अवक्षालन प्रक्रिया म्हणतात. - **३. स्थापन थर (Illuviation)** : या प्रक्रियेत वरच्या थरातून वाहून येणारे घटक 'B' थरामध्ये जमा होतात. या प्रक्रियेस illuviation म्हणतात. वरच्या थरातून वाहून येणारे घटक जर आर्यन ऑक्साईड आणि अॅल्युमिनीअम ऑक्साईड सारखे दिसतील तर 'B' थराचा रंग 'A' थरासारखा गडद (Dark) असू शकतो. - **४. प्रमृदाकरण (Podzolisation)** : समशितोष्ण कटीबंधीय प्रदेशात (Temperate region) सुचीपर्णी वृक्षांच्या पानांमध्ये थंडीपासून व बर्फापासून बचाव करण्यासाठी संयुग सारखे घटक असतात. या पानांच्या कुजण्यानंतर हे घटक मृदेतील अॅल्युमिनीअम व आर्यन मुलद्रव्यांशी अभिक्रिया पावून अॅल्युमिनिअम व आयर्न सेक्सीऑक्साईड तयार करतात. हेसेक्विऑक्साईड पाण्यामध्ये विद्राव्य असल्यामुळे बर्फाच्या वितळल्यानंतर पाण्यासमवेत वाहून जातात. त्यामुळे मृदेत सिलिकाचे प्रमाण अधिक राहते आणि मृदा राखाडी रंगाची बनते. ही मृदा आम्लधर्मी असून ती नापिक असते. - **५. ग्लेयींग (Gleying)** : ही प्रक्रिया दलदलीच्या प्रदेशात मृदेतील आर्यन ऑक्साईड (ऑक्सिजनविरहीत) परिस्थितीमध्ये कपात प्रक्रिया करतो. यामुळे या मृदेस हिरवा रंग प्राप्त होतो. गाळाचे, दलदलीच्या प्रदेशात सेंद्रिय घटकांचे प्रमाण अधिक असते. - **६. चुनामयन (Calcification)** : या प्रक्रियेमध्ये शुष्क प्रदेशात मृदेतील CaCO, (कॅल्शियम कार्बोनेट) एकत्र येऊन त्यांचे गोटे/कंकर तयार होतात. गाळाच्या नव्या खादर मृदेत Calcification प्रक्रिया होऊन तिचे भांगर मध्ये रूपांतर होते. या भांगर मृदेत कंकरचे प्रमाण अधिक असते. तुलनेत भांगर नापिक असतो. ### मृदेचे प्राकृतिक, जैविक व रासायनिक वैशिष्ट्ये :- | क्र. | वैशिष्ट्ये | वाळू (Sand) | पोयटा (Silt) | चिकणमाती (Clay) | |---|---|---|---|---| | १. | जलधारण क्षमता | कमी | मध्यम ते जास्त | जास्त | | २. | मृदेमधील वायुंचे प्रमाण | अधिक | मध्यम | कमी | | ३. | पाणी झिरपण्याचा दर | अधिक | मध्यम | कमी | | ४. | सच्छिद्रता | कमी | मध्यम | अधिक | | ५. | मृदेतील सेंद्रियपदार्थांचे प्रमाण | कमी | मध्यम | अधिक | | ६. | सेंद्रिय पदार्थांच्या विघटनाचा दर | वेगवान | मध्यम | हळूवार | | ७. | पाण्यामुळे होणाऱ्या मृदा अवनतीचे प्रमाण | कमी | अधिक | मृदा सुटीसुटी असेल तर अधिक | | ८. | पोषणद्रव्ये साठवून ठेवण्याची क्षमता | कमी | मध्यम | अधिक | ### २. मृदा निर्मितीची प्रक्रिया - प्राकृतिक, जैविक व रासायनिक #### १. प्राकृतिक प्रक्रिया :- कायिक किंवा यांत्रिक पद्धतीने भूपृष्ठावरील खडकांचे तुकडे होऊन त्याचे बारीक मातीत रूपांतर होण्याच्या क्रियेलाच मृदा निर्मितीची प्राकृतिक प्रक्रिया म्हणतात. ऊन, वारा, पाऊस यासारख्या कारंकामुळे मूळ खडकांवर सातत्याने दाब व ताण पडून खडकांचे विखंडन होते आणि त्यातूनच भूपृष्ठावर मृदेचा थर निर्माण होत राहतो. जास्त तापमानाच्या कोरड्या प्रदेशात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात फार मोठी तफावत असते. दिवसा अतिउच्च तापमानामुळे खडक तापतात व प्रसरण पावतात याउलट रात्री कमी तापमानामुळे ते झपाट्याने थंड होतात व त्यांचे आकुंचन होते. या सततच्या आंकुचन प्रसरणामुळे खडकातील खनिजांमध्ये तण