Maharashtra Public Health Notice PDF
Document Details
Uploaded by Deleted User
2003
Tags
Summary
This document is a notice from the Maharashtra government's Public Health Department, regarding the appointment of health service employees (male). It details the qualifications and procedures for appointments.
Full Transcript
# अधिसुचना ## भारताचे संविधान - क्र.सैप्रति १०१०००/प्र.क्र.४२/सेवा-१ - दिनांक १९ मार्च २००३ ## सार्वजनिक आरोग्य विभाग - मंत्रालय, मुंबई ४०००३२ ## भारताच्या संविधात्ताच्या अनुच्छेद ३०९ - परंतुकान्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन आणि - अस्तित्वात असलेले संबंधीत सर्व विद्यमान नियम, आदेश...
# अधिसुचना ## भारताचे संविधान - क्र.सैप्रति १०१०००/प्र.क्र.४२/सेवा-१ - दिनांक १९ मार्च २००३ ## सार्वजनिक आरोग्य विभाग - मंत्रालय, मुंबई ४०००३२ ## भारताच्या संविधात्ताच्या अनुच्छेद ३०९ - परंतुकान्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन आणि - अस्तित्वात असलेले संबंधीत सर्व विद्यमान नियम, आदेश किंवा अनुदेश अधिक्रमित करुन - महाराष्ट्राचे राज्यपाल याद्वारे - महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीमधील - आरोग्य सेवा संचालनालयातील आरोग्य सेवक (पुरुष) गट-क या पदाच्या सेवा भरतीचे विनियमन करणारे पुढील निमय करीत आहेत, जसे :- ### १. - या नियमांना आरोग्य सेवा संचालनालयातील "आरोग्य सेवता (पुरुष) गहन्याच्या (सेवाप्रवेश नियम, २०० रासे संबोधण्यात यावे. ### २. - या नियमामध्ये संदर्भानुसार दुसरा अर्थ अभिप्रेत नसेल तर, - (अ) "बहुउदेशिय आरोग्य कर्मचारी (पुरुष) साठी मुलभुत प्रशिक्षण अभ्यासक्रम" म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या विभागीय आरोग्य आणि कुटूंब कल्याण प्रशिक्षण केंद्र आणि सार्वजनिक आरोग्य संस्था, नागपूर यांच्याकडुन घेण्यात येणारा अभ्यासक्रम किंवा शासनाने समकक्ष ठरविलेल्या इतर संस्थेतील अभ्यासक्रम. - (ब) "विभाग" म्हणजे महाराष्ट्र शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभाग. - (क) "संचालनालय" म्हणजे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखाली आरोग्य सेवा संचालनालय. - (ड) "क्षेत्र कर्मचारी" म्हणजे नियमित गट "ड" मधील राष्ट्रीय हिवताप प्रतिरोध कार्यक्रमाखालील स्थानिक फवारणीसाठी कायम स्वरुपी नियुक्त केलेला कर्मचारी. - (इ) "शासन" म्हणजे महाराष्ट्र शासन. - (फ) "हंगामी फवारणी कर्मचारी” म्हणजे जो कर्मचारी गरजेनुसार हिवताप प्रतिरोध औषधांचे, किटकनाशकांची घरोघरी जाऊन वाटप करण्यासाठी किंवा फवारणी करण्यासाठी निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात नेमण्यात आलेला कर्मचारी. - (ज) "माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा" म्हणजे महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम १९६५ (महा.XLI चे १९६५) अन्वये प्रस्तावित केलेल्या विभागीय मंडळाने नियंत्रीत केलेली माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा ( यामध्ये शासनाने या परिक्षेत समकक्ष घोषित केलेल्या इतर परिक्षा अंतर्भूत आहेत) ### ३. - आरोग्य कर्मचारी (पुरुष) गट-क या पदावरील नेमणुका पुढीलपैकी कोणत्याही मार्गाने करता येतील :- - (अ) संचालनालयातील क्षेत्र कर्मचारी हे पद धारण करणाऱ्या व त्या पदावर किमान तिन वर्ष नियमित सेवा झालेल्या आणि नामनिर्देशनाने सेवा प्रवेशासाठी उपनियम ब (ii) अन्वये विहित अहर्ता धारण करणाऱ्या व्यक्तीमधुन जेष्ठता अधिन पात्रता या आधारावर पात्र ठरविलेल्या व्यक्तीच्या पदोन्नतीने. - (ब) पुढिल अटी पूर्ण करणाऱ्या उमेदवारामधुन नामनिर्देशनाने, - i) ज्याचे वय तिस वर्षापेक्षा जास्त नाही. - ii) जे "बिज्ञान" या नियमासह माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा उर्तीण आहेत. - परंतु राष्ट्रीय मलेरीया प्रतिरोध कार्यक्रमा अंतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणुन नब्बद दिवसाचा अनुभव धारकांना प्राधान्य देण्यात येईल. ### ४. - पदोन्नती व नामनिर्देशनाने नियुक्तीचे प्रमाण १०:९० असे राहील. - परंतु नामनिर्देशनाने नियुक्तीच्या कोट्यातील . पदाची हंगामी फवारणी कर्मचारी व इतर उमेदवारामध्ये ५०:४० प्रमाणात विभागणी करण्यांत येईल. ### ५. - नामनिर्देशनाने किंवा पदोन्नतीने यापैकि कोणत्याही मार्गाने नियुक्त व्यक्तीनी बहुउदेशिय आरोग्य कर्मचारी (पुरुष) पदासाठी विहीत १२ महिन्याचे मुलभुत प्रशिक्षण पूर्ण केले नसेल तर त्यांनी सदर प्रशिक्षण ३ संधित यशस्वीरित्या पुर्ण करणे आवश्यक राहील. ### ६. - पदोन्नतीने किंवा नामनिर्देशनाने यापैकी कोणत्याही मार्गाने नियुक्त व्यक्ती जर अगोदरच उत्तीर्ण झाली नसेल किंवा तिला उत्तीर्ण होण्यापासुन सुट मिळाली नसेल तर विभागीय परिक्षा आणि हिंदी व मराठी भाषा परिक्षा यासंबंधी केलेल्या नियमानुसार उत्तीर्ण व्हाव्या लागतील. ### ७. - पदोन्नतीने किंवा नामनिर्देशनाने नियुक्त व्यक्ती महाराष्ट्र राज्यात कोठेही बदलीस पात्र असेल. ### ८. - पदोन्नतीने अथवा नामनिर्देशनाने 'नियुक्त व्यक्तीने महाराष्ट्र शासनाच्या माहीती तंत्रज्ञान संचालनालयाने वेळोवेळी विहीत केलेले संगणक हाताळणी/वापराबाबतचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक राहील. ## महाराष्ट्राचे राज्यपाल याच्या आदेशानुसार व नांवानै, - शासनाचे उपसचिव.