राज्यशास्त्राचा परिचय - I PDF

Summary

This document is an introduction to political science, emphasizing the study of the state, its origins, and its development. It covers various perspectives, including historical, behavioral, and feminist approaches. The document explores the relationship between political science and other disciplines like history, economics, and sociology.

Full Transcript

# राज्यशास्त्राचा परिचय - I ## अनुक्रमणिका - 1. राज्यशास्त्राचा परिचय - I (1.1 ते 1.32) - 1.1 राज्यशास्त्राच्या अभ्यासाचे दोन भाग - 1.2 राजकारण, राज्यशास्त्र व राजकीय तत्त्वज्ञान - 1.3 राज्यशास्त्राच्या अभ्यासाचे उद्देश - 1.4 राज्यशास्त्राच्या व्याख्या - 1.5 राज्यशास्त्राचा अर्थ - 1.5...

# राज्यशास्त्राचा परिचय - I ## अनुक्रमणिका - 1. राज्यशास्त्राचा परिचय - I (1.1 ते 1.32) - 1.1 राज्यशास्त्राच्या अभ्यासाचे दोन भाग - 1.2 राजकारण, राज्यशास्त्र व राजकीय तत्त्वज्ञान - 1.3 राज्यशास्त्राच्या अभ्यासाचे उद्देश - 1.4 राज्यशास्त्राच्या व्याख्या - 1.5 राज्यशास्त्राचा अर्थ - 1.5.1 शास्त्रांचे शास्त्र - 1.5.2 राज्यशास्त्राचे मर्यादित क्षेत्र - 1.5.3 प्रक्रिया (Process) या दृष्टीने राजकारणाचा अभ्यास - 1.5.4 संघर्ष निवारण आणि निर्णयनिर्मितीच्या दृष्टीने राज्यशास्त्राचा अर्थ - 1.5.5 राज्यव्यवस्थेचा अभ्यास - 1.5.6 लोकवर्तनाच्या अभ्यासातून राज्यशास्त्राचा अर्थ - 1.6 राज्यशास्त्राचे स्वरूप - 1.7 राज्यशास्त्राची व्याप्ती - 1.8 राज्यशास्त्राचा 'शास्त्र' या दृष्टीने विकास - 1.9 राज्यशास्त्राचा विकास - 1.10 राज्यशास्त्रातील आंतर-विद्याशाखीयता - 1.11 राज्यशास्त्राच्या दृष्टिकोनाचा अभ्यास - पारंपारिक आणि आधुनिक - 1.11.1 राज्यशास्त्राच्या दृष्टिकोनाचे महत्त्व - 1.11.2 राज्यशास्त्राच्या दृष्टिकोनाचे वर्गीकरण - 1.11.3 राज्यशास्त्राच्या अभ्यासाचे महत्त्वाचे दृष्टिकोन - 2. राज्य (2.1 ते 2.25) - 2.1 राज्याच्या व्याख्या आणि वैशिष्ट्ये - 2.2 राज्यांच्या विकासाचे प्रमुख टप्पे - 2.3 राज्याचे स्वरूप - 2.4 राज्याचे घटक - 2.5 बाजार - 2.6 नागरी समाज - संदर्भ ग्रंथसूची ## 1. राज्यशास्त्राचा परिचय - I - * महत्त्वाचे मुद्दे * - **प्रस्तावना:** - राज्यशास्त्र हे राजकीय तत्त्वज्ञानापासून वेगळे नाही. - सामाजिक शास्त्रांमध्ये एक महत्त्वाचे शास्त्र म्हणून राज्यशास्त्र ओळखले जाते. - नैतिक तत्त्वज्ञान, राजकीय अर्थव्यवस्था, राजकीय धर्मशास्त्र, इतिहास हे या अभ्यासाच्या पूर्णतः वेगवेगळ्या विद्याशाखा (Discipline) आहेत. - पाश्चिमात्य राजकीय अवकाशात राजकीय विचारवंत सॉक्रेटिस इ.स.पू. 470-399 पर्यंत पाठीमागे घेऊन जातात. - अॅरिस्टॉटल (इ.स.पू. 384 - 322) यांना 'राज्यशास्त्राचा जनक' असे म्हटले जाते. - कारण ते राज्यशास्त्राची कार्यशील व्याख्या करणाऱ्यांपैकी एक होते. - त्यांनी राज्यशास्त्राला नीतिशास्त्रापासून वेगळे केले. - 'पॉलिटिकल' या ग्रंथामध्ये त्यांनी राज्याची निर्मिती, उद्देश, स्वरूप आणि प्रकार यांचे सविस्तर वर्णन केले आहे. - “नगरराज्यांच्या शासनसंस्थांचा अभ्यास करणारे शास्त्र" अशा शब्दांत त्यांनी राज्यशास्त्राचे वर्णन केले आहे. - पुनर्जीवन (रनेसॉ) व प्रबोधनाच्या कालखंडात राज्यशास्त्राचा विकास अधिक वेगाने झाला. - नवीन राजकीय संकल्पना या याच कालखंडातून निर्माण झाल्या. - उदा., राष्ट्र-राज्य, राष्ट्रवाद, विचारप्रणाली इत्यादी. - प्रबोधनाचे व या कालखंडाचे अपत्य म्हणून ओळखले गेलेल्या निकोलो मॅकियाव्हेली (1469-1527) ने आपल्या 'प्रिन्स' (1532) या ग्रंथामध्ये वास्तववादी सिद्धान्ताची मांडणी केली. - राजकारणात आदर्शवादी विचारांना जागा नाही हे त्याने ठणकावून सांगितले. - यानंतर थॉमस हॉब्ज (1588-1679), जॉन लॉक (1632-1704), तर रूसो (1772-1778) यांनी 'सामाजिक करार' या सिद्धान्तातून 'राज्याच्या उद्या'ची मांडणी केली व हे स्पष्ट केले की, "राज्य हे दैवी शक्तीतून उदयाला आले नाही तर ती एक मानवी निर्मिती आहे." - युरोपातील नवीन शोध व यातून निर्माण झालेले नवीन पाश्चात्त्य तत्त्वज्ञान यांनी चर्च आणि राज्याच्या वेगळेपणाला प्रोत्साहन दिले. - त्यांच्यावर भौतिकशास्त्रांचा असणारा प्रभाव व यातून हे सिद्धान्त समाजाला त्यांनी लागू केले. - यातूनच सामाजिक शास्त्रांची निर्मिती झाली. - अमेरिकन राजकारणामध्ये बेंजामिन फ्रैंकलिन (1706-1790) आणि थॉमस जेफरसन (1743-1826) संयुक्त राज्य अमेरिकेचे तिसरे राष्ट्राध्यक्ष यांनी राज्यशास्त्राला एक वेगळी उंची प्राप्त करून दिली. - "इतिहास हे घडून गेलेले राजकारण आहे तर, राजकारण हे वर्तमान इतिहास आहे.” - या आदर्श वाक्याचे प्रणेते ऑक्सफर्ड येथील प्राध्यापक एडवर्ड ऑगस्ट्स फ्रिडमन हे होते. - जॉन हापकिन्स विद्यापीठामध्ये राज्यशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात वेस्टर विलॉबी, हर्बर्ट बैक्सटर अॅडम्स, जॉन बर्गेस, विल्यम डॅनिंग, वुड्रो विल्सन यांनी केली. - संयुक्त राज्य अमेरिकेमध्ये इ.स. 1890 ते 1920 च्या तीन दशकांमध्ये 'राज्यशास्त्र' विद्यापीठामध्ये केवळ अभ्यासक्रमाचाच भाग नव्हे तर शास्त्रीय पद्धतीने शासनाच्या समस्या निवारणासाठी विशेषज्ञांद्वारे उपाय शोधण्याचे स्वागत केले. - यामध्ये वुड्रो विल्सन (1856-1924) अमेरिकेचे 28 वे राष्ट्रपती, चार्ल्स बियर्ड (1874-1948) कोलंबिया - **1.1 राज्यशास्त्राच्या अभ्यासाचे दोन भाग** - पा. श्री. घारे आपल्या 'राज्यशास्त्र सिद्धान्त आणि राज्ययंत्रणा' या ग्रंथात लिहितात: - "राज्यशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे. जे शास्त्र राज्याचा अभ्यास करते ते 'राज्यशास्त्र' होय." - राज्यशास्त्राच्या अभ्यासात अर्थात राज्य व शासनसंस्था अशा विषयांचा समावेश होतो. - 'राज्यशास्त्र', 'दंडनीती', 'अर्थशास्त्र' (अर्थ म्हणजे मानवी समूह), राजनीती हे शब्द प्राचीन संस्कृत वाङ्मयात आढळून येतात. - 'Politics' हा इंग्रजी शब्द 'Polis' या मूळ ग्रीक शब्दापासून तयार झाला. - याचा अर्थ शहराच्या संरक्षणासाठी बांधलेला किल्ला असा होतो. - या किल्ल्यांमधूनच नगरराज्यांचा शासनकारभार चालत होता. - यावरून 'Politics' म्हणजे संरक्षणकर्त्यांचे शास्त्र अशी व्याख्या रूढ झाली. - अॅरिस्टॉटलने मानवाला एक सामाजिक प्राणी असे म्हटले आहे. - माणसाला समाजजीवन आवडते. - त्यासाठी तो समाजाचे नियम पाळतो. - राज्यशास्त्राच्या अभ्यासात राज्याचे मूळ स्वरूप, त्याची विविध अंगे आणि त्यांचा विकास यांचा अंतर्भाव करावा लागतो. - तरीही याबाबत विचारवंतांमध्ये एकमत नाही. - राज्यशास्त्राच्या अभ्यासात राज्याचे मूळ स्वरूप, त्याची विविध अγγε (भाग) आणि त्यांचा विकास यांचा अंतर्भाव होतो. - असे ब्लांटश्ली, गार्नर इत्यादी विचारवंत मानतात, तर लिकॉकसारखे विचारवंत राज्यशास्त्रात फक्त शासनसंस्थेचाच अंतर्भाव करतात. - या दोन टोकांचा सुवर्णमध्य लॉस्की, गेटेल इत्यादी विचारवंतांनी साधला आहे. - राज्यशास्त्राच्या अभ्यासात राज्य (State) व शासनसंस्था/सरकार (Government) या दोन्हींच्याही अभ्यासाचा अंतर्भाव त्यांनी केलेला आहे. - कारण शासनसंस्था हे राज्याचे बाह्य प्रकटीकरण होय. - म्हणून त्याचा अंतर्भाव राज्यशास्त्रात करणे योग्य ठरते. ## 1.2 राजकारण, राज्यशास्त्र व राजकीय तत्त्वज्ञान - राजकारण, राज्यशास्त्र व राजकीय तत्त्वज्ञान यांमध्ये राज्यशास्त्राचे अभ्यासक भेद स्पष्ट करतात. - अमेरिकन राज्यशास्त्रात कॅटलिन यांच्या मते राज्यशास्त्र + राजकीय राजकारण असे समीकरण आहे. - समाजातील घटना प्रत्यक्ष कशा घडतात याचे अवलोकन व त्यावर नियंत्रण कसे ठेवता येईल याचा अभ्यास या दोन्ही गोष्टींवर राज्यशास्त्राचा विषय आधारलेला असतो, परंतु राजकीय तत्त्वज्ञान हे राजकीय मूल्य निश्चित करण्याचे व त्यांची चर्चा करण्याचे कार्य करते. - राज्यशास्त्र हे वस्तुस्थितीचे विश्लेषण किंवा पृथक्करण करून राजकीय घटना कशा व का घडल्या हे विशद करते, तर राजकीय तत्त्वज्ञान राज्यसंस्थेचे ध्येय व उद्दिष्ट काय असावे व कोणती राजकीय मूल्ये जोपासण्यायोग्य आहेत याचे अध्ययन करते. ## 1.3 राज्यशास्त्राच्या अभ्यासाचे उद्देश - दि.का. गर्दे राज्यशास्त्राचे उद्देश पुढीलप्रमाणे सांगतात: - राज्यशास्त्राच्या अध्ययनाचे / अभ्यासाचे कोणते उद्देश असावे याबाबत दोन मते प्रचलित आहेत व ती जवळजवळ परस्परविरोधी आहेत. - एका विचारसरणीनुसार भौतिकशास्त्राप्रमाणे राज्यशास्त्रांच्या घटनांचे अवलोकन, पृथक्करण व विशदीकरण करावे. - परंतु त्याला बरे-वाईट अशा स्वरूपात मत देण्याचे कारण नाही. - घटना या वास्तव आहेत व त्यांच्यामधील कार्यकारणभाव स्पष्ट करणे हेच राज्यशास्त्राचे उद्दिष्ट आहे. - याबाबत दिलेली मते ही आंतरिक व वैयक्तिक असू शकतील म्हणून सामान्य निष्कर्ष काढणे व मूल्यमापनाचा प्रयत्न करणे त्यांच्या मते राज्यशास्त्राच्या कक्षेत येत नाही. - या विचारसरणीस 'अनुभववाद' (Empiricism) असे म्हणतात. - दुसऱ्या विचारसरणीनुसार वास्तव घटनांचा जोपर्यंत अर्थ लावला जात नाही व निष्कर्षाच्या स्वरूपात व्यक्त होत नाही तोपर्यंत तो प्रयत्न निरुपयोगी ठरतो. - या विचारसरणीनुसार राज्यसंस्थेने कोणती मूल्ये निश्चित केली पाहिजेत व योग्य ठरवून जतन केली पाहिजेत याचा अभ्यास होणे आवश्यक आहे. - एखाद्या राजकीय घटनेचा किंवा व्यवहाराचा दूरवर काय परिणाम होऊ शकेल व एखाद्या ध्येयाला किती उपायकारक ठरेल याचाही विचार त्यांच्या मते राज्यशास्त्राने केला पाहिजे. - कोणत्या राजकीय संस्था - अस्तित्वात होत्या याबरोबरच कोणत्या राजकीय संस्था असणे आवश्यक होते याचेही अध्ययन व्हायला पाहिजे. ## 1.4 राज्यशास्त्राच्या व्याख्या - नगरराज्यांचा ऱ्हास होऊन राज्यांचे स्वरूप बदलले तरीही राज्यशास्त्र हे नाव कायम राहिले. - त्याचा विचार करून अनेक राज्यशास्त्रज्ञांनी आपापल्या विचारांप्रमाणे राज्यशास्त्राच्या व्याख्या केल्या आहेत. - “राज्य, शासनसंस्था आणि कायदा यांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे 'राज्यशास्त्र' होय." - प्रा. लास्की हेरॉल्ड - "राज्य आणि सरकारच्या सामान्य समस्या यांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे 'राज्यशास्त्र' होय." - गिलख्रिस्त - "राज्याची उत्पत्ती, राज्याचा उद्देश, विकास आणि सर्व प्रकारच्या राजकीय समस्यांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे 'राज्यशास्त्र' होय." - जर्मन राज्यशास्त्रज्ञ गेरीसन - "सरकारशी संबंधित असणारे शास्त्र म्हणजे 'राज्यशास्त्र' होय."- डॉ. लिकॉक - "राज्याची प्रकृती, राज्याची वेगवेगळी रूपे, त्यांचा विकास आणि स्थिती यांचे वर्णन करणारे शास्त्र म्हणजे 'राज्यशास्त्र' होय." - ब्लंटश्ली - "राज्यशास्त्र म्हणजे समाजविज्ञानाचे एक अंग आहे. या शास्त्रामध्ये राज्याचा मूळ आधार आणि शासनसंस्थेची तत्त्वे यांचा विचार केला जातो. - फ्रेंच शास्त्रज्ञ पॉल जेनेट - मानवी समूहाचे राजकीय गट, त्यांच्या शासनसंस्था, राज्य आणि व्यक्तींचे परस्परसंबंध, राज्याची उत्पत्ती व विकास, राज्याची कार्ये, आंतरराष्ट्रीय संघटना आणि त्यांच्याद्वारे राज्याराज्यांचे संबंध नियंत्रित करणारे कायदे इत्यादींचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे 'राज्यशास्त्र' होय. - राज्यशास्त्र हे राजकीयदृष्ट्या संघटित समाजाने स्वतःला बंधनात्मक करण्याच्या प्रयत्नाच्या प्रक्रियेचा अभ्यास करणारे शास्त्र होय. - राज्यशास्त्र म्हणजे राज्याविषयीचे शास्त्र, ज्यात राज्य हा अभ्यासाचा प्रमुख विषय असतो. - त्यात राजकीय संबंधांचा अभ्यास केला जातो. - प्लेटोपासून ते हेरॉल्ड लॉस्कीच्या वेळेपर्यंत अनेक पारंपरिक व आधुनिक राज्यशास्त्रज्ञांनी राज्यशास्त्राच्या व्याख्या दिल्या आहेत. - त्या सर्व व्याख्यांचा सारांश विचारात घेतला, तर 'व्यक्तीच्या राजकीय वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र' अशी राज्यशासनाची व्याख्या करता येईल. - त्यात राज्यसंस्था, शासनसंस्था, जनता व राजकीय नेते यांचे संबंध, प्रत्यक्ष व्यवहारात केले जाणारे राजकारण इत्यादी बाबींचा समावेश होतो. (देव, गोसावी, आपटे प्रस्तावना पा. 17) ## 1.5 राज्यशास्त्राचा अर्थ - भा.ल. भोळे यांनी आपल्या 'राजकीय विश्लेषण' - 2010 या ग्रंथामध्ये राज्यशास्त्राचा अर्थ पुढीलप्रमाणे लिहिला आहे: - "अॅरिस्टॉटलने आपल्या सुविख्यात ग्रंथाचे नाव 'पॉलिटिक्स' असे दिले तेव्हापासून 'राज्यकारभाराचे शास्त्र' म्हणून 'पॉलिटिक्स' हा शब्द प्रचलित झाला. - राजकारण आणि राज्यशास्त्र या दोन्ही अर्थांनी 'राजकारण' (पॉलिटिक्स) ही एकच संज्ञा बरीच वर्षे वापरात येत होती. - पुढे राज्यशास्त्रासाठी 'राज्यशास्त्र' (Political Science) अशी संज्ञा रूढ झाली. - मूल्यांच्या संदर्भात राजकीय प्रश्नांचे चिंतन करणारे राजकीय विचारवंत, दैनंदिन राजकारणाच्या प्रक्रियांमध्ये सहभागी होणारे राजकारणी नेते आणि राजकीय मूलतत्त्वे, घडामोडी व राजकीय वर्तन यांचा शास्त्रीय दृष्टीने विचार करणारे राज्यशास्त्राचे विद्यार्थी या तिघांच्या दृष्टिकोनात स्वाभाविकच फरक असणार हे गृहीत धरून राज्यशास्त्राच्या शाखांचा विस्तार झाला. - काळानुसार राज्यशास्त्राचा अर्थ बदलत गेला." - **1.5.1 शास्त्रांचे शास्त्र** - ज्याप्रमाणे हत्तीच्या पावलांत सर्व प्राण्यांची पावले सामावून जाऊ शकतात त्याप्रमाणे राजधर्मामध्ये सर्व धर्मांचा अंतर्भाव होतो असे शांतिपर्वात महाभारतकारांनी राज्यशास्त्राचे श्रेष्ठत्व सांगितले आहे. - 'राजधर्म हाच सर्व धर्मात श्रेष्ठ आहे, तसेच राजधर्माचे पालन झाले नाही तर सर्व विद्या नष्ट होतील, सर्व ज्ञानसाधनांचा लोप होईल आणि सर्व मानवी जीवन विस्कळीत होईल अशी उपयुक्ततादेखील सांगितली आहे. - ग्रीक विचारवंत अॅरिस्टॉटल (इ.स.पू. 384-322) राज्यशास्त्राला 'शास्त्रांचे शास्त्र' (मास्टर सायन्स) असे म्हणतो. - राज्य आणि समाज यांच्यातील भेद नगरराज्यांमध्ये केलाच जात नसल्यामुळे राज्याचे क्षेत्र संपूर्ण सामाजिक जीवनाला स्पर्श करण्याइतपत व्यापक होते. - **1.5.2 राज्यशास्त्राचे मर्यादित क्षेत्र** - ग्रीक नगरराज्यांचा ऱ्हास झाला. - मोठमोठी साम्राज्ये निर्माण झाली. - याचा परिणाम असा झाला की, 'राजकीय' व 'राज्यशास्त्र' या संज्ञांची व्याप्ती बरीच कमी झाली. - 'खासगी बाबी' आणि 'सार्वजनिक बाबी' असा फरक केला जाऊ लागला. - राजकीय, धार्मिक, आर्थिक, लष्करी, शैक्षणिक यांपैकी प्रत्येक क्षेत्राचा स्वतंत्रपणे लोक विचार करू लागले. - माणूस ज्या गोष्टींचा विचार करतो अशा अनेक गोष्टींपैकी फक्त एक कप्पा राजकीय बाबींचा असतो आणि माणूस ज्या संस्थांचा सदस्य असतो अशा अनेक संस्थांपैकी राज्य ही केवळ एक संस्था असते. - स्वाभाविकच राज्यकारभाराला पूर्वी असलेले सर्वोच्च व मक्तेदारी स्थान या काळात उरले नाही. - राज्यकारभाराचे प्रभाव क्षेत्र असे कमी झाल्यानंतर स्वाभाविकच राज्यशास्त्रालाही नव्या वास्तवाशी जुळणाऱ्या नव्या संकल्पना व नवे सिद्धान्त शोधावे लागले. ## 1.6 राज्यशास्त्राचा 'शास्त्र' या दृष्टीने विकास - पा. श्री. घारे हे राज्यशास्त्रातील 'शास्त्र' शब्दाची चिकित्सा पुढीलप्रमाणे करतात: - राज्यशास्त्र या शब्दामध्ये 'शास्त्र' (Science) या शब्दाचा जो अंतर्भाव केलेला आहे त्याचा विचार करणे आवश्यक आहे. - शास्त्र या शब्दामागे जी निश्चितता असते, पद्धतशीरपणा असतो, विश्वव्यापकता असते ती राज्यशास्त्राच्या ठिकाणी आहे काय ? - दोन अधिक दोन यांची बेरीज जगभर चारच होणार. - पदार्थविज्ञान शास्त्रातील 'सत्य' नियम किंवा कायदा जगभर सर्वत्र सारखा अनुभवास येणार ही बाब राज्यशास्त्रासाठी - खात्रीने सांगता येत नाही. - राज्यशास्त्र हे पदार्थविज्ञान, रसायन, गणित, स्थापत्य इत्यादी शास्त्रांप्रमाणे भौतिकशास्त्र नक्कीच नाही किंवा भविष्यकाळाची सूचनाही शास्त्राला देता येत नाही. - या सर्वांचे प्रमुख कारण एकच आणि ते म्हणजे राज्यशास्त्राचा अभ्यासविषय हा 'मानव' आहे व तो सजीव आहे. - पदार्थविज्ञान, गणितं इत्यादी शास्त्रांचा अभ्यासविषय हा जड, निर्जीव आहे. - त्यामुळे त्यांच्या सिद्धान्तामध्ये निश्चितता असते. - याशिवाय मानवी समाजाला काही विशिष्ट मूल्ये असतात. - ती सर्वत्र सारखी नसतात. - तसा प्रकार जड-शास्त्रांच्या बाबतीत नसतो. - त्यांची मूल्ये सर्वत्र सारखीच असतात. - राज्यशास्त्र हे जडशास्त्राप्रमाणे अचूक नसण्याचे कारण त्याच्या अभ्यासाचा विषय मानव हा आहे. - यामुळेच कोणतेही सामाजिक शास्त्र अचूक असू शकत नाही. - परंतु केवळ एवढ्याच एका कारणामुळे राज्यशास्त्राला किंवा सामाजिक शास्त्रांना 'शास्त्र' न म्हणणे योग्य होणार नाही. - कारण, - “एखाद्या विषयाचा पद्धतशीरपणे अभ्यास करणे म्हणजे शास्त्र होय." - या व्याख्येप्रमाणे विचार केल्यास राज्यशास्त्रातील शास्त्र हा शब्द सार्थ ठरू शकतो. - निःपक्षपातीपणाने माहिती गोळा करणे व अचूकपणे मांडणे आणि त्याचे वर्गीकरण करणे, निरीक्षण, प्रयोग, तुलनात्मक अभ्यास इत्यादी शास्त्रीय पद्धतींचा उपयोग करून चिकित्सक रीतीने एखादा सिद्धान्त मांडणे हे राज्यशास्त्रांत शंक्य आहे आणि केवळ याच अर्थाने त्याला शास्त्र असे म्हणता येते. ## 1.7 राज्यशास्त्राची व्याप्ती - आपण पाहिले आहे की, ग्रीक विचारवंत अॅरिस्टॉटल राज्यशास्त्राला सर्वश्रेष्ठ समजतो. - 'सर्व शास्त्रांचे शास्त्र' या शब्दांत राज्यशास्त्राचे वर्णन केले आहे. - राज्यशास्त्राची व्याप्ती पुढीलप्रमाणे सांगता येते.' - **(1) शासनसंस्था आणि राज्याचा अभ्यास:** - शासन / सरकार राज्याचे दृश्य स्वरूप आहे. - राज्याची अभिव्यक्ती शासनाद्वारे होते. - शासनसंस्थेशिवाय राज्याची कल्पना करता येत नाही. - राज्यशास्त्रात राज्य कसे होते, कसे आहे व कसे असावे याचा अभ्यास शासनसंस्थेच्या माध्यमातून केला जातो. - **(2) समाज आणि संस्थांचा अभ्यास:** - राजकीय व्यवस्थेत राज्यसंस्थेव्यतिरिक्त सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक अशा अनेक संस्था असतात आणि या संस्था राज्यसंस्थेच्या नियंत्रणांतर्गत कार्य करतात. - असे असले तरी या संस्थांचा चांगला किंवा वाईट परिणाम राज्यसंस्थेवर होतो. - त्यामुळे या संस्था कशा आहेत आणि त्या कशा असाव्यांत यांचा अभ्यास आपणास राज्यशास्त्रात करावा लागतो. - **(3) माणसाचा राजकीय अभ्यास:** - राज्यशास्त्रात प्रबोधन कालखंडानंतर मानव केंद्रस्थानी आला. - यामुळे राज्यशास्त्रात मानवाच्या राजकीय जीवनाचा अभ्यास केला जातो. - मानवाचे राजकीय जीवन हे त्याच्या संपूर्ण जीवनाचा भाग आहे व ते मानवाच्या आर्थिक व सामाजिक जीवनाशी संबंधित आहे. - आपले जीवन सुखी-समाधानी, सुखकर व्हावे म्हणून मानवाने अनेक संस्था निर्माण केल्या आहेत. - त्या संस्थांची कार्ये, अधिकार आणि परस्परसंबंधाचे नियंत्रण करणे हा राज्याचा अधिकार आहे. - त्या दृष्टीने राज्यशास्त्रामध्ये मानवाच्या इतर संस्थांचा अभ्यास केला जातो. - **(4) राज्यशास्त्राचा भूतकाळ, वर्तमानकाळ व भविष्यकाळातील अभ्यास:** - वर्तमानकाळातील राजकीय संस्था व राजकीय विचारधारा यांची निर्मिती होण्याचे कारण भूतकाळात घडलेल्या घटना हे आहे. - आजची परिस्थिती आणि भविष्यकाळातील परिस्थिती यांचा तुलनात्मक अभ्यास करून आजच्या राजकीय संस्था व विचारप्रणाली भविष्यकाळातही उपयुक्त व आदर्श कशा ठरतील यांचा विचार राज्यशास्त्रात केला जातो, असे प्रा. गटेल म्हणतात.. - **(5) कल्याणकारी राज्याचा अभ्यास:** - मानवाचे अधिकाधिक कल्याण करणे हे राज्याचे कर्तव्य आहे. - त्यासाठी आधुनिक काळात कल्याणकारी राज्य संकल्पना मान्य करण्यात आली. - मानवी सभ्यता आणि संस्कृतीचा विकास करून युद्धाला थारा न देणे, मानवी जीवन अधिक सुखी करण्यासाठी प्रयत्न करणे, शिक्षणाच्या सुविधा, बेरोजगारांना रोजगार यांसारख्या बाबींचा विचार 'कल्याणकारी राज्य' या दृष्टीने राज्यशास्त्रात करणे आवश्यक ठरले आहे. - **(6) संविधानाची उपयुक्तता:** - संविधान म्हणजे देशाच्या शासनव्यवस्थेचे, शासक आणि शासित यांच्या संबंधांचे लिखित आणि बहुमान्य किंवा सर्वमान्य नियम - होय. - कोणते संविधान चांगले, कोणते वाईट यांचा तुलनात्मक अभ्यास करून आपणास इतर देशांच्या आणि आपल्या देशाच्या संविधानाविषयी उपयुक्त माहिती राज्यशास्त्राच्या अभ्यासानेच मिळते. - **(7) जागतिक राजकीय समस्यांचा अभ्यास:** - आधुनिक काळात तंत्रज्ञान आणि विज्ञानाच्या प्रगतीमुळे राज्याराज्यांचे परस्परावलंबित्व वाढले आहे. - त्यामुळे राज्यात निर्माण होणाऱ्या समस्यांचा परिणाम त्या राज्यासोबतच इतर राज्यांवरही कमी-जास्त प्रमाणात होतो. - त्यामुळे राज्यात उद्भवणाऱ्या समस्यांचा अभ्यास केल्याशिवाय राज्याला आपला विकास साध्य करता येत नाही. - म्हणून राज्यातील व राज्याबाहेरील समस्यांचा अभ्यास करणे राज्यशास्त्रात अभिप्रेत आहे. - उदा., आखाती युद्धे, शीतयुद्धे, जागतिक व्यापार युद्ध इत्यादी. - **(8) मानवी अधिकारांचा अभ्यास:** - मानवाचे जीवन सुखी आणि समाधानी करण्यासाठी राज्यसंस्थेची निर्मिती झाली. - सुखी, समृद्ध आयुष्य, जीवन जगण्यासाठी मानवाला अधिकार आणि स्वातंत्र्य आवश्यक असते. - परंतु कर्तव्याच्या पूर्ततेशिवाय अधिकारांची प्राप्ती होत नसते. - म्हणून राज्यशास्त्रात मानवाचे अधिकार कोणते, ते प्राप्त करण्यासाठी व त्यांचा उपयोग घेता येण्यासाठी त्याने कोणती कर्तव्ये पार पाडली पाहिजेत याचा अभ्यास राज्यशास्त्रालाच करावा लागतो. - **(9) वेगवेगळ्या विचारसरणींचा अभ्यास:** - राज्यशास्त्रामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय प्रस्थापित करून लोककल्याणासाठी विशिष्ट प्रकारची विचारसरणी स्वीकारली जाते. - आधुनिक काळातील राज्यव्यवस्था ही कोणत्याही विचारसरणीला मानणारीच असते. - त्यामुळे विचारसरणीचे प्रकार, तिचे गुण-दोष यांचा विचार करून कोणती विचारसरणी चांगली आहे व का? याचा अभ्यास राज्यशास्त्रातच केला जातो. - **(10) शांतता व सुरक्षिततेच्या माहितीचा अभ्यास:** - राज्यांतर्गत शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित झाल्याशिवाय राज्याचा विकास होणे शक्य नाही. - आंतरराष्ट्रीय क्षेत्रात शांतता, सुरक्षितता आणि परस्पर सहकार्य निर्माण झाले तर राज्याचा सर्वांगीण विकास होतो. - म्हणून राज्यांतर्गत व राज्याबाहेरील परिस्थितीचा अभ्यास करणे हे राज्यशास्त्राचे एक वैशिष्ट्य आहे. - **(11) राजकीय संज्ञा आणि संकल्पनांचा अभ्यास:** - राज्यशास्त्रात राजकीय संज्ञा आणि संकल्पनांचा अभ्यास केला जातो. - कायदा, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या संकल्पनांचा अभ्यास केला असता राजकीय क्रिया, प्रतिक्रिया योग्य आहेत किंवा अयोग्य आहेत याविषयी मत बनविता येते. - त्याचप्रमाणे राजकीय सिद्धान्ताची माहिती मिळते. - प्रत्येक राजकीय सिद्धान्त अमूर्त आणि संदिग्ध असतात असे नाही. - काही राजकीय सिद्धान्त परिस्थिती आणि व्यवहाराशी निगडित झालेले असतात. - त्यामुळे आपले राजकीय विचार सुदृढ आणि सुस्पष्ट बनतात, हे सिद्धान्त ज्या राजकीय संज्ञा आणि संकल्पनांच्या आधारावर मांडले जातात, त्यांची माहिती

Use Quizgecko on...
Browser
Browser