राज्यशास्त्र इयत्ता अकरावी PDF

Document Details

IngeniousSerpentine353

Uploaded by IngeniousSerpentine353

Saibaba Mahavidyalay Vihiragon

2019

डॉ.श्रीकांत परांजपे

Tags

राज्यशास्त्र इयत्ता अकरावी महाराष्ट्र पाठ्यपुस्तक शिक्षण

Summary

राज्यशास्त्र विषयाचे पाठ्यपुस्तक, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाचे आहे. ते इयत्ता अकरावीसाठी उपयुक्त आहे, ज्यात राजकीय संकल्पना, तुलनात्मक शासनसंस्था, लोकप्रशासन आणि आंतरराष्ट्रीय संबंध यांचा समावेश आहे.

Full Transcript

शासन निर्णय क्रमांक : अभ्यास-2116/(प्र.क्र.43/16) एसडी-4 दिनांक 25.4.2016 अन्वये स्थापन करण्यात आलेल्या समन्वय समितीच्या दिनांक 20.6.2019 रोजीच्या बैठकीमध्ये हे पाठ्यपुस्तक सन 2019-20 या शैक्षणिक वर्षापासून निर्धारित करण्यास मान्यता देण्यात आली आहे....

शासन निर्णय क्रमांक : अभ्यास-2116/(प्र.क्र.43/16) एसडी-4 दिनांक 25.4.2016 अन्वये स्थापन करण्यात आलेल्या समन्वय समितीच्या दिनांक 20.6.2019 रोजीच्या बैठकीमध्ये हे पाठ्यपुस्तक सन 2019-20 या शैक्षणिक वर्षापासून निर्धारित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. राज्यशास्त्र इयत्ता अकरावी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे. आपल्या स्माटर्फोनवरील DIKSHA App ारे पा पुस्तकाच्या पिहल्या पृ ावरील Q.R. Code ारे िडिजटल पा पुस्तक, त्या पाठासंबंिधत अध्ययन- अध्यापनासाठी उपयुक्त दृक्- ा य सािहत्य उपलब्ध होईल. प्रथमावृत्ती : २०१९ © महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे ४११ ००४. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाकडे या पुस्तकाचे सर्व हक्क राहतील. या पुस्तकातील कोणताही भाग संचालक, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ यांच्या लेखी परवानगीशिवाय उद्‌धृत करता येणार नाही. राज्यशास्त्र विषय समिती लेखक डॉ.श्रीकांत परांजपे, अध्यक्ष डॉ.श्रीकांत परांजपे डॉ.अभय दातार डॉ.प्रकाश पवार, सदस्य डॉ.प्रकाश पवार डॉ.संहिता जोशी डॉ.मोहन खडसे, सदस्य डॉ.अभय दातार, सदस्य मुखपृष्ठ व सजावट नकाशाकार प्रा.संगीता आहेर, सदस्य श्री.मुकीम शेख श्री.रविकिरण जाधव प्रा.अजिंक्य गायकवाड, सदस्य डॉ.नीता बोकील, सदस्य भाषांतरकार श्री.मोगल जाधव, सदस्य प्रा.संगिता दीक्षित वर्षा सरोदे, सदस्य-सचिव श्रीमती मुग्धा महाबळ प्रा.वीणा केंची अक्षरजुळणी : मुद्रा विभाग, राज्यशास्त्र अभ्यासगट समिती पाठ्यपुस्तक मंडळ, पुणे डॉ.प्रविण भागडीकर प्रा.दिलीप कडू कागद : ७० जी.एस.एम.क्रिमवोव्ह प्रा.संगिता दीक्षित डॉ.नंदकिशोर बोकाडे मुद्रणादेश : N/PB/2019-20/QTY.- 30,000 प्रा.राजेंद्र इंगळे डॉ.रामदास ढगे प्रा.वीणा केंची डॉ.बालाजी कतूरवार मुद्रक : M/s. Neat Prints, Ahmednagar डॉ.रोहिदास मुंढे डॉ.प्रभाकर लोंढे डॉ.व्यंकटलक्ष्मी पुरणशेट्टीवार श्री.रविंद्र जिंदे प्रा.अरुणा खामकर श्री.सुभाष राठोड निर्मिती प्रा.पीतांबर उरकुडे श्रीमती मुग्धा महाबळ श्री. सच्चितानंद आफळे, मुख्य निर्मिती अधिकारी श्री. प्रभाकर परब, संयोजक निर्मिती अधिकारी सौ. वर्षा सरोदे श्री. शशांक कणिकदळे, साहाय्यक विशेषाधिकारी, साहाय्यक निर्मिती अधिकारी इतिहास व नागरिकशास्त्र पाठ्यपुस्तक मंडळ, पुणे. प्रकाशक श्री. विवेक उत्तम गोसावी, नियंत्रक मुख्य समन्वयक पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ, प्रभादेवी, मुंबई-२५. सौ.प्राची रवींद्र साठे (B) (C) (D) प्रस्तावना विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता नववी व दहावी या इयत्तांमध्ये तुम्हांला राज्यशास्त्र या विषयाची तोंडओळख झालेली आहे. पुनर्रचित अभ्यासक्रम २०१२ नुसार अभ्यासक्रम बदलातील उद्‌दिष्टे डोळ्यांसमोर ठेवून इयत्ता ११ वी च्या पाठ्यपुस्तकाची रचना करण्यात आली आहे. इयत्ता अकरावीचे पुस्तक तुमच्या हाती देताना आम्हांला आनंद वाटतो. इयत्ता अकरावीच्या पाठ्यपुस्तकात चार विभाग केले आहेत - राजकीय संकल्पना, तुलनात्मक शासनसंस्था, लोकप्रशासन आणि आंतरराष्ट्रीय संबंध. या प्रत्येक विभागाची सुरुवात त्या संबंधित विषयाच्या प्रस्तावनेने करण्यात आलेली आहे. या क्षेत्रांतील महत्त्वाच्या संकल्पनांची तोंडओळख करून देणे हा यामागील उद्देश आहे. या सर्व संकल्पना भारताच्या संदर्भात अभ्यासायच्या आहेत. अध्ययन अधिक सुलभ, रंजक व कृतीयुक्त होण्यासाठी तुम्हांला माहितीपर चौकटी, विविध कृती, क्यू.आर.कोडवर देण्यात येणारे साहित्य याचा निश्चितच उपयोग होईल. राज्यशास्त्र या विषयाचा अभ्यास का करावा? याचे उत्तर तुम्हांला या पाठ्यपुस्तकाच्या अध्ययनाने जरूर मिळेल. जगाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन या विषयाच्या अभ्यासाने मिळेल. हा विषय भारताच्या अभ्यासाबरोबरच बाहेरच्या जगाशी देखील तुमची ओळख करून देईल. भारताची शासनसंस्था कसे काम करते, शासनसंस्थेच्या कामकाजात नागरिक म्हणून तुमची भूमिका काय असावी, तुमच्या आजूबाजूला विविध स्तरांवर घडणाऱ्या घटनांकडे पाहण्याचे, अनुभवण्याचे आणि त्या घटनांचे विश्लेषण करण्याचे साधन या विषयामुळे तुम्हांला प्राप्त होईल. हा विषय सक्षम नागरिक बनवेल ज्यामुळे तुम्ही देशासाठी चांगले काम करण्यास प्रेरित व्हाल. विद्यार्थ्यांना सक्षम होण्यासाठी पाठ्यपुस्तकातील आशय उपयुक्त आहे. विषय समिती, अभ्यासगट, लेखक आणि चित्रकार यांनी अितशय आस्थेने आणि परिश्रमपूर्वक हे पुस्तक तयार केले आहे. मंडळ या सर्वांचे मनःपूर्वक आभारी आहे. तुमच्या सूचना, अभिप्राय आम्हांस जरूर कळवा. चांगल्या सूचनांचे आम्ही निश्चितच स्वागत करू. विद्यार्थी, शिक्षक व पालक या पुस्तकाचे स्वागत करतील, अशी आशा आहे. (डॉ.सुनिल मगर) पुणे संचालक दिनांक : २० जून २०१९ महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व भारतिय सौर दिनांक : ३० ज्येष्ठ १९४१ अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे. (E) - शिक्षकांसाठी - राज्यशास्त्र ११ वी विषयाच्या अध्यापनाचा दृष्टिकोन इयत्ता ११वी आणि १२वी च्या अभ्यासक्रमाबाबतचा दृष्टिकोन सर्वव्यापी आणि एकात्म आहे. इयत्ता ११वी च्या विद्यार्थ्यांना राज्यशास्त्राच्या विविध उपघटकांची तोंडओळख करून देण्यात आलेली आहे. इयत्ता १२वी चे पुस्तक समकालीन राज्यशास्त्रातील घटनांशी संबंधित असेल. राजकीय संकल्पना, तुलनात्मक शासन आणि राजकारण, लोकप्रशासन आणि आंतरराष्ट्रीय संबंध या उपघटकांचा ११वी च्या राज्यशास्त्राच्या पुस्तकात समावेश केला आहे. जरी हे सर्व उपघटक स्वतंत्र विषय असले तरी ते परस्परांशी जोडलेले आहेत. म्हणूनच हे उपघटक शिकवताना यातील परस्पर संबंध लक्षात घेऊन शिकवणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ, पहिल्या भागातील समता आणि न्याय या संकल्पना तुलनात्मक शासनाचा अभ्यास करताना महत्त्वाच्या ठरतात. तसेच या संकल्पना विकास प्रशासनाचा अभ्यास करतानाही महत्त्वाच्या ठरतात. याचप्रमाणे जेव्हा आपण शेवटच्या भागात आंतरराष्ट्रीय घटनांचा अभ्यास करतो तेव्हा तुलनात्मक शासन या भागातील विविध शासन प्रकारांच्या माहितीचा उपयोग होतो. पारंपरिक वर्ग अध्यापनाबाहेरील उपक्रम : उपक्रम : राज्य ही संकल्पना अमूर्त आहे, परंतु शासन ही मूर्त संकल्पना आहे म्हणूनच या दोन्हीतील फरक समजून घेणे महत्त्वाचे ठरते. भारतांतर्गत राष्ट्रे ओळखा. ती राज्ये का नाहीत याचा शोध घ्या. वर्ग चर्चा : भारतातील विविधतेवर चर्चा घडवून आणा. ही विविधता धर्म, प्रदेश आणि भाषा इत्यादींच्या संदर्भात स्पष्ट करा. सादरीकरण : स्वातंत्र्य, हक्क, समता आणि न्याय यांपैकी कोणतीही संकल्पना घ्या. भारतीय संदर्भात त्याचा अर्थ आणि अंमलबजावणी यांवर तक्ता तयार करा. नकाशांचा वापर : तुलनात्मक शासन आणि आंतरराष्ट्रीय संबंध या दोन्ही विभागांसाठी नकाशे हे महत्त्वाचे उपयोगी साधन आहे हे लक्षात घेऊन त्यांचा उपयोग करा. तुलनात्मक तक्ते : विद्यार्थ्यांना तीन देशांबाबत तुलनात्मक तक्ते करायला सांगणे उपयुक्त ठरेल. क्षेत्र भेट : शासनाचे प्रशासकीय कार्य समजून घेण्यासाठी कोणत्याही शासकीय कार्यालयाला भेट देणे उपयुक्त ठरेल. सांघिक उपक्रम : एखाद्या विद्यार्थी गटाचे मंत्रिमंडळ तयार करून सद्यस्थितीतील विषयांवर धोरण निर्मिती करून घेणे. अभिरूप संयुक्त राष्ट्रे : कोणतीही आंतरराष्ट्रीय समस्या घ्या. मुलांना विविध देशांचे प्रतिनिधित्व करायला सांगून त्यानुसार समस्यांवर भूमिका मांडायला सांगा. काही महत्त्वाची संकेतस्थळे या पृष्ठावर तसेच प्रत्येक पाठाच्या शेवटी पूरक माहितीसाठी websites देण्यात आल्या आहेत. भारतीय शासनसंस्था : https://www.india.gov.in/ अमेरिकन शासनसंस्था : https://www.usa.gov./ युनायटेड किंगडमची शासनसंस्था : https://www.gov.uk/ संयुक्त राष्ट्रे : https://www.un.org/en/index.html (F) क्षमता विधाने क्र. घटक क्षमता राज्य आणि आधुनिक राज्यसंस्थेचा उदय या संकल्पना स्पष्ट करता येणे. १. राजकीय संकल्पना स्वातंत्र्य, समता, हक्क व न्याय या राजकीय संकल्पना जाणून घेणे. या राजकीय संकल्पनांचा भारतातील सामाजिक विकासावर होणारा परिणाम जाणून घेणे. अमेरिका, इंग्लंड व भारताच्या राजकीय व्यवस्थेतील साम्य व फरकाचे मुद्दे स्पष्ट करता येणे. तुलनात्मक शासन आणि राजकीय पक्ष आणि दबाव गट यांची सामाजिक व राजकीय बदल २. राजकारण आणि आर्थिक विकासातील भूमिका स्पष्ट करता येणे. भारतीय न्यायमंडळाची बदलती भूमिका स्पष्ट करता येणे. भारतीय प्रशासकीय सेवेची मूळ चौकट/संरचना स्पष्ट करता येणे. विकासाच्या प्रक्रियेत लोकप्रशासनाची भूमिका स्पष्ट करता येणे. ३. लोकप्रशासन लोकांचे प्रश्न आणि प्रशासनाची बदलती भूमिका यातील परस्परसंबंध सांगता येणे. इ-शासनाचे महत्त्व सांगता येणे. आतंरराष्ट्रीय सहकार्य आणि आंतरराष्ट्रवादाचे महत्त्व स्पष्ट करता येणे. समकालीन काळातील प्रादेशिक संघटनांच्या उदयामागची ४. आंतरराष्ट्रीय संबंध कारणमीमांसा करणे. भारताच्या अलिप्ततावादाच्या धोरणातील दृष्टिकोन स्पष्ट करता येणे. (G) अनुक्रमणिका जगाचा नकाशा भाग १ : राजकीय संकल्पना प्रस्तावना.................................................................................. १. राज्य.............................................................................२ २. स्वातंत्र्य आणि हक्क..............................................................९ ३. समता आणि न्याय............................................................. १८ भाग २ : तुलनात्मक शासन आणि राजकारण प्रस्तावना.................................................................................. ४. संविधानिक शासन.............................................................. २८ ५. प्रतिनिधित्वाची संकल्पना....................................................... ३६ ६. न्यायमंडळाची भूमिका.......................................................... ४४ भाग ३ : लोकप्रशासन प्रस्तावना.................................................................................. ७. लोकप्रशासन................................................................... ५३ ८. विकास प्रशासन................................................................ ६२ भाग ४ : आंतरराष्ट्रीय संबंध प्रस्तावना.................................................................................. ९. १९४५ नंतरचे जग – I.......................................................... ७२ १०. १९४५ नंतरचे जग – II....................................................... ८२ S.O.I. Note : The following foot notes are applicable : (1) © Government of India, Copyright : 2019. (2) The responsibility for the correctness of internal details rests with the publisher. (3) The territorial waters of India extend into the sea to a distance of twelve nautical miles measured from the appropriate base line. (4) The administrative headquarters of Chandigarh, Haryana and Punjab are at Chandigarh. (5) The interstate boundaries amongst Arunachal Pradesh, Assam and Meghalaya shown on this map are as interpreted from the “North-Eastern Areas (Reorganisation) Act. 1971,” but have yet to be verified. (6) The external boundaries and coastlines of India agree with the Record/Master Copy certified by Survey of India. (7) The state boundaries between Uttarakhand & Uttar Pradesh, Bihar & Jharkhand and Chattisgarh & Madhya Pradesh have not been verified by the Governments concerned. (8) The spellings of names in this map, have been taken from various sources. या पाठ्यपुस्तकातील राष्ट्रध्वजाचे रंग प्रमाणित रंगछटांप्रमाणे नसल्यास ते तांत्रिक मर्यादांमुळे झाले आहेत. (H) विषय प्रवेश... यावर्षी, प्रथमच आपण राज्यशास्त्र हा एक स्वतंत्र विषय म्हणून अभ्यासणार आहाेत. शाळेत तुम्ही हा विषय ‘इतिहास आणि नागरिकशास्त्र’ आणि ‘इतिहास आणि राज्यशास्त्र’ म्हणून अभ्यासला होता. नागरिकशास्त्र या विषयात तुम्ही व्यक्तीचे हक्क आणि कर्तव्य याविषयी माहिती करून घेतली आहे. राज्यशास्त्र या विषयात राजकीय व्यवस्था आणि संविधानाचा अभ्यास केला आहे. आता आपण राज्यशास्त्राचा स्वतंत्र विषय म्हणून अभ्यास करताना त्यांच्या वेगवेगळ्या मिती समजून घेण्याची गरज आहे. अकरावी आणि बारावीत याचा प्रामुख्याने विचार करायचा आहे. अकरावीच्या अभ्यासक्रमात राज्यशास्त्राच्या या घटकांचा अभ्यास केला जाईल : (i) राज्यशास्त्रातील महत्त्वाच्या संकल्पनांची ओळख, (ii) तुलनात्मक शासन आणि राजकारण, (iii) लोकप्रशासन, (iv) आंतरराष्ट्रीय संबंध. विषयाच्या व्याप्तीचा समग्र दृष्टिकोनातून अभ्यास करण्यासाठीचा पाया या पुस्तकाद्वारे तयार केला जाणार आहे. या पुस्तकात चार भाग आहेत. राज्यशास्त्राच्या पारंपरिक क्षेत्रांशी हे चार विभाग संबंधित आहेत. प्रत्येक विभागात स्वतंत्र प्रस्तावनेच्या मदतीने तुम्हांला त्या क्षेत्राची ओळख करून दिली आहे, ती जरूर अभ्यासा. यामुळे तुम्हांला विषय अधिक चांगल्या पद्धतीने समजण्यास मदत होईल. प्रत्येक पाठात तुम्हांला काही कृती करण्यास/शोध घेण्यास सुचवले आहे. या कृती जरूर करून पहा. इयत्ता बारावीत, या क्षेत्रात घडून आलेले नवीन बदल आपण अभ्यासणार आहोत. उदा., जागतिकीकरण, मानवतावादाचे आस्थेचे विषय, पर्यावरण, दारिद्र्य इत्यादींसारख्या संकल्पना अभ्यासणार आहोत. शासन आणि लोकप्रशासन या क्षेत्रांत आपण सुशासन आणि राष्ट्रीय एकात्मता यांच्याशी संबंधित बाबी अभ्यासणार आहोत. आंतरराष्ट्रीय संबंध अभ्यासताना १९९१ नंतरचे जग प्रामुख्याने अभ्यासणार आहोत. या दोन वर्षांत आपण विषयाच्या मिती व विषयाची प्राथमिक ओळख याच्याही पलीकडे जाणे अपेक्षित आहे. विषयातील काही संकल्पना तुम्ही दैनंदिन व्यवहारात वापरणे अपेक्षित आहे. यामुळे तुम्हांला उच्च शिक्षणासाठी कोणते क्षेत्र निवडावे, याचे मार्गदर्शन मिळेल. तुम्ही सेवाभावी कार्य वा सामाजिक कार्य करू इच्छिता किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करू इच्छिता, त्यासाठी तुम्हांला राज्यशास्त्राचा अभ्यास निश्चितच फायद्याचा ठरेल. तुम्ही आयुष्यात पुढे काय करू इच्छिता, हे ठरवण्यासाठी नियोजन करण्यात तुम्हांला राज्यशास्त्र विषयाची निश्चितच मदत होईल. या अभ्यासाकडे जगाला सामोरे जाण्याच्या मार्गातील एक पायरी म्हणून बघा. खूप शुभेच्छा  ! (I) विभाग १ : राजकीय संकल्पना प्रस्तावना महात्मा गांधींचे स्वराज या विचाराबाबत किंवा डॉ.बाबासाहेब अांबेडकरांच्या सामाजिक न्याय यांची उदाहरणे देऊ शकतो. तसेच पाश्चिमात्य विचारवंतांमध्ये नागरिकत्वाबाबत ॲरिस्टॉटल, लॉक यांचा हक्कांबाबतचा सिद्धान्त, स्वातंत्र्याबाबतचे मिलचे विचार, कम्युनिझमबाबत मार्क्स यांची मांडणी किंवा जॉन रॉल्स यांचे न्यायाच्या सिद्धान्तावरील विश्लेषण ही उदाहरणे घेता येतील. या व इतर विचारवंतांच्या आपण आपले कुटुंब, समाज, प्रदेश, देश योगदानाच्या आधारेच आपण स्वातंत्र्य, इत्यादींबाबत बोलत असतो. त्यांतील काही समता, न्याय, लोकशाही इत्यादी संकल्पनांचा अर्थ सामाजिक, तर काही राजकीय स्वरूपाच्या संस्था समजू शकतो. राजकीय विचारांच्या विश्लेषणांच्या आहेत. राजकीय संस्था या शासनाशी संबंधित आधारेच आपल्याला राजकीय सिद्धान्तांचा आणि असतात. त्यात संसद, मंत्रिमंडळ, न्यायमंडळ संकल्पनांचा अभ्यास करता येतो. इत्यादींचा समावेश होतो. आपण एका देशाचे या विभागामध्ये आपण काही महत्त्वाच्या नागरिक म्हणून आपल्याला काही हक्क असतात राजकीय संकल्पनांचा अभ्यास करणार आहोत. आणि आपली काही कर्तव्येदेखील असतात. ती त्यात स्वातंत्र्य, समता, हक्क आणि न्याय तसेच संविधानात आणि कायद्यात नमूद केलेली असतात. राष्ट्र व राष्ट्रवाद या संकल्पना आहेत. आपण हे नियम पाळणे अपेक्षित असते. एखाद्या या भागातील तीन प्रकरणे खालीलप्रमाणे परदेशी व्यक्तीलादेखील तो ज्या देशात राहतो, आहेत : तेथील नियम पाळावे लागतात. प्रकरण १. राज्य : राष्ट्र, राष्ट्रवाद, राज्य एक नागरिक म्हणून आपण काही प्रश्नांना आणि शासन या संकल्पनांवर या प्रकरणात चर्चा सामोरे जात असतो. मी राज्याच्या नियमांचे पालन केली आहे. या संकल्पनांदरम्यानचे संबंध समजून का करावे? वैयक्तिक स्वातंत्र्याच्या कोणत्या मर्यादा घेण्याचा प्रयत्न केला आहे. असतात ? मला न्याय कुठे मिळू शकतो? अनेक प्रकरण २. स्वातंत्र्य आणि हक्क : या विचारवंतांनी यांसारख्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रकरणात स्वातंत्र्य आणि हक्क या संकल्पना प्रयत्न केला आहे. व्यक्ती आणि राज्यसंस्था सांगितल्या आहेत. या संकल्पना समाजातील (शासन) यांच्यातील संबंध समजून घेण्याचा त्यांनी व्यक्तीच्या स्थानाबाबत आहेत. प्रयत्न केला आहे. प्रकरण ३. समता आणि न्याय : हे प्रकरण समाजात आणि राज्यसंस्थेत व्यक्तीचे कार्य समता आणि न्याय यांवर लक्ष केंद्रित करते. या काय असावे हे समजण्यासाठी विचारवंतांनी आपले संकल्पनांचा संबंध सामाजिक व्यवस्थेशी येतो. विचार मांडले आहेत. आपण भारतीय विचारवंत पाहिले तर ‘कौटिल्य’ यांचे राज्यसंबंधांबाबत, या सर्व संकल्पनांची चर्चा भारताच्या संदर्भात देखील केली गेली आहे. 1 १. राज्य माहीत आहे का तुम्हांला ? आपण शाळेत नागरिकशास्त्र आणि राज्यशास्त्राचा अभ्यास केला आहे. नागरिकशास्त्राचा आपण भारत, पाकिस्तान, चीन इत्यादींचा रोख हा नागरिकांवर होता, तर राज्यशास्त्राचा राज्य, उल्लेख करताना ‘देश’ हा शब्द वापरतो. कधी सरकार आणि प्रशासन इत्यादींवर होता. या प्रकरणात कधी आपण त्यांना ‘राष्ट्र’ किंवा ‘राज्य’ आपण राज्यशास्त्राच्या काही मूलभूत संकल्पनांचा म्हणून देखील संबोधित करतो. या सगळ्या अभ्यास करणार आहोत. या संकल्पना म्हणजे राष्ट्र, शब्दांचा अर्थ जरी सारखा असला तरी राष्ट्रवाद, राज्य आणि शासनसंस्था. तांत्रिकदृष्ट्या या शब्दांमध्ये फरक आहे. खालील वाक्ये वाचा. सांस्कृतिक, वांशिक, धार्मिक, भाषिक, ऐतिहासिक पातळीवर समानता असेल तर (१) माझा एक मित्र पंजाबी तर दुसरा मणिपुरी मानसिक पातळीवर ऐक्याची भावना तयार आहे. होते. अशा वेळी त्याला ‘राष्ट्र’ म्हणून संबोधले (२) माझे दोन वर्गबंधू इराणी आहेत. जाते. एखाद्या राष्ट्राला राज्य होण्यासाठी (३) आम्ही रोज राष्ट्रगीत म्हणतो. मला आपल्या पुढील घटकांची आवश्यकता असते : राष्ट्रगीताचा अभिमान आहे. सार्वभौमत्व, स्वतंत्र शासनसंस्था, निश्चित (४) मला शासकीय कार्यालयात जाऊन माझा भूप्रदेश आणि लोकसंख्या. प्रत्यक्षात रोजच्या जन्मदाखला घ्यायचा आहे. व्यवहारात आपण सार्वभौम शासनसंस्था वरील प्रत्येक वाक्य कोणत्यातरी निश्चित असलेल्या स्वतंत्र देशाचे वर्णन करताना ‘राज्य’ घटकाशी संबंधित आहे. पहिले वाक्य त्या व्यक्तीची या शब्दाऐवजी ‘राष्ट्र’ हा शब्दप्रयोग करतो. ओळख सांगते. ही ओळख म्हणजे एखादी व्यक्ती राज्यशास्त्र या विषयाचा अभ्यास करताना मात्र ही पंजाबी, तमिळ, मराठी, तेलुगु इत्यादी असल्याची आपण सार्वभौम शासनसंस्था असलेल्या ओळख आहे. ही त्या व्यक्तीची प्रादेशिक पातळीवरची देशाला ‘राज्य’ असे संबोधतो. ओळख आहे. दुसरे वाक्य ती व्यक्ती कोणत्या देशाची आहे हे दाखवते. ती व्यक्ती इराणी, श्रीलंकन, राष्ट्र अमेरिकन इत्यादी असू शकते. त्या व्यक्तीचे ते राष्ट्र म्हणजे काय? सामाजिक, सांस्कृतिक, राष्ट्रीयत्व असते. राष्ट्रगीताबाबतचे वाक्य हे त्या राजकीय पातळीवर स्वतःची समान ओळख असणारे राज्याच्या संदर्भातील आहे. आपल्याला लोक आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याचा राष्ट्रगीताबाबत अभिमान आहे हे राष्ट्रवादाच्या प्रयत्न करतात तेव्हा त्याला ‘राष्ट्र’ असे म्हणतात. भावनेचे प्रतीक आहे. जन्माचा दाखला घेणे ही सांस्कृतिक, वांशिक, धार्मिक, भाषिक, ऐतिहासिक शासनसंस्थेच्या संदर्भातील बाब आहे. या सर्व इत्यादी पातळींवर इथे एक भावनिक एकात्मतेची संकल्पनांचा आपण या प्रकरणात अभ्यास करणार जाणीव असते. हे लोक एका निश्चित भौगोलिक आहोत. प्रदेशात राहत असतीलच असे नाही. 2 व्हावे ही भावना निर्माण होते. माहीत आहे का तुम्हांला ? स्वयंनिर्णयाच्या जाणिवेतून हे विचार पुढे राष्ट्र या शब्दाला इंग्रजीत Nation असे येतात. यातूनच राजकीय पातळीवरील म्हणतात. Nation या शब्दाचे मूळ लॅटिनमधील स्वशासनाची मागणी निर्माण होऊ शकते. Nasci या शब्दात आहे. Nasci चा अर्थ राष्ट्रवाद ‘जन्माला येणे’ असा आहे. म्हणूनच असे भारताला ब्रिटिश वसाहतवादापासून स्वातंत्र्य हवे मानले जाते की एखाद्या राष्ट्राच्या लोकांमध्ये होते. हा राजकीय स्वयंनिर्णयाचा लढा होता. वांशिक आणि संास्कृतिक संबंध आहेत. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातून भारतीय राष्ट्रवादाची भावना व्यक्त होत होती. राष्ट्रवाद ही एक प्रकारची राजकीय अस्मिता अर्नेस्ट बार्कर यांनी राष्ट्राची केलेली असते. ते आपल्या राष्ट्रावरचे प्रेम असते. लोक व्याख्या पुढीलप्रमाणे : आपल्या राष्ट्राशी भावनिक पातळीवर जोडलेले एका निश्चित प्रदेशात, जरी वेगवेगळ्या असतात. या बंधनातून त्यांच्यात स्वत:ची ओळख वंशांचे लोक असले तरी ऐतिहासिक परंपरेद्वारे आणि अभिमान निर्माण होतो आणि आपल्या समान विचार आणि भावना, समान धर्म आणि राष्ट्रासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा निर्माण होते. भाषा असलेले लोक म्हणजे राष्ट्र. या भावनांचे प्रदर्शन आपल्याला अनेक प्रसंगांतून दिसून येते. उदा., आपल्या राष्ट्राच्या क्रिकेट टीमचा राष्ट्राची वैशिष्ट्ये काय आहेत ? जयजयकार करताना, राष्ट्रगीताच्या वेळी उभे राहताना (i) लोकसंख्या : राष्ट्राला लोकसंख्या असणे किंवा युद्धादरम्यान आपल्या सेनादलाला पाठिंबा आवश्यक आहे. या लोकांमध्ये आपापसात देताना. राष्ट्रवाद हा लोकांना देशाशी राजकीय काही साम्य असते. हे साम्य भाषिक, वांशिक, पातळीवर एकनिष्ठ करणारी शक्ती आहे. धार्मिक तसेच समान ऐतिहासिक किंवा सांस्कृतिक पातळीवरील अनुभवातून येऊ शकते. या वांशिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ऐक्याच्या दृष्टिकोनातून आपण एक राष्ट्र आहोत, हा समज निर्माण होतो. (ii) सामुदायिक ऐक्याची भावना : लोकांमधील सांस्कृतिक समानतेतून, आपण एक असल्याची मानसिकता निर्माण होते. हा भावनिक पातळीवरचा विचार आहे. त्या समुदायाचा हा राष्ट्रवाद दृष्टिकोन आहे. (iii) राजकीय वेगळेपण : सामाजिक, सांस्कृतिक, राष्ट्रवादाची काही वैशिष्ट्ये : धार्मिक किंवा भाषिक समानता असलेले लोक (i) राष्ट्रवाद ही एक अशी शक्ती आहे की जी जेव्हा एका निश्चित भूप्रदेशात राहतात तेव्हा एकता निर्माण करू शकते. तसेच ती एखाद्या त्यांच्यात आपण राजकीय पातळीवर वेगळे गोष्टीचा नाश देखील करू शकते. त्याचे 3 प्रागतिक राष्ट्रवाद आणि आक्रमक राष्ट्रवाद असे वर्णन केले जाते. समाजाला एकत्रित माहीत आहे का तुम्हांला ? करून विकास साध्य करण्याची क्षमता प्रागतिक पहिल्या महायुद्धानंतर युरोप, अमेरिका राष्ट्रवादामध्ये असते, तर आक्रमक राष्ट्रवाद आणि जगात चिरकालीन शांतता आणि स्थैर्य लोकांमध्ये तेढ व दुरावा निर्माण करतो. निर्माण व्हावे यासाठी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष (ii) राष्ट्रवाद हा साम्राज्यवाद किंवा वूड्रो विल्सन यांनी चौदा मुद्‌द्यांची मांडणी वसाहतवादविरोधी असतो. कोणत्याही क्षेत्रावर केली. परकीय ताबा असण्याच्या तो विरोधात असतो. जगातील स्वातंत्र्याचे लढे या संकल्पनेतून निर्माण होताना दिसून येतात. राष्ट्रवाद हा (ii) परंपरावादी राष्ट्रवाद : हा राष्ट्रवाद समाजाला स्वयंनिर्णयाच्या हक्काचा पुरस्कार करतो. अंतर्मुख करणारा आहे. राष्ट्र आणि समाज यांचे संबधं अतिशय जवळचे आहेत असे तो (iii) राष्ट्रवाद विविधतेला प्रोत्साहन देऊ शकतो. मानतो. स्वदेशाभिमानाला हा राष्ट्रवाद खूप भारतात धार्मिक, वंाशिक, भाषिक, प्रादेशिक महत्त्व देतो. इत्यादींची विविधता दिसून येते. तरीही आपण भारतीय राष्ट्रवादाबाबत बोलतो. ‘विविधतेत (iii) प्रसारवादी राष्ट्रवाद : हा राष्ट्रवाद आक्रमक एकता’ हा भारताच्या राष्ट्रवादाचा गाभा आहे. स्वरूपाचा असतो. ‘राष्ट्रीय गौरवा’साठी राष्ट्रे आक्रमक होतात आणि साम्राज्य निर्माण चर्चा करा. करण्याचा प्रयत्न करतात. वसाहतवाद हे प्रसारवादी राष्ट्रवादाचे एक उदाहरण आहे. जवाहरलाल नेहरू यांच्या ‘डिस्कव्हरी (iv) वसाहतवादविरोधी राष्ट्रवाद : हा राष्ट्रवाद ऑफ इंडिया’ या पुस्तकातील ‘भारतमाता’ राष्ट्राच्या स्वातंत्र्यलढ्याच्या संदर्भात बघितला आणि ‘भारतातील विविधता आणि एकता’ ही जातो. भारताच्या स्वातंत्र्यादरम्यान भारताने या प्रकरणे वाचा. नेहरूंच्या लिखाणाच्या संदर्भात राष्ट्रवादाचा अनुभव घेतला आहे. भारतीय राष्ट्रवादावर चर्चा करा. राज्य राष्ट्रवादाकडे जेव्हा आपण राजकीय दृष्टिकोनातून भारताच्या संविधानाच्या सरनाम्यात ‘सार्वभौम, बघतो तेव्हा त्याचे वेगवेगळे प्रकार दिसून येतात. लोकशाही, प्रजासत्ताक’ असे शब्दप्रयोग आहेत. इथे (i) उदारमतवादी राष्ट्रवाद : उदारमतवादी सार्वभौमत्व म्हणजे राष्ट्राला स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचा राष्ट्रवादाचा उगम हा फ्रेंच राज्यक्रांतीत झाला. अधिकार आहे, हे अभिप्रेत आहे. म्हणजेच, हे राष्ट्र राष्ट्राध्यक्ष वूड्रो विल्सन यांच्या ‘चौदा कोणत्याही इतर राष्ट्रांवर निर्णय घेण्याबाबत अवलंबून मुद्‌द्यां’मध्ये देखील हा दिसून येतो. राष्ट्र नाही. हे राष्ट्र स्वतःचे निर्णय स्वतंत्रपणे घेऊ शकते आणि सार्वभौमत्वाची सांगड राष्ट्रवाद घालून तसेच त्याला आपले कायदे करण्याचा आणि राज्य देतो. प्रत्येक राष्ट्राला स्वातंत्र्य आणि करण्याचा अधिकार आहे. जेव्हा एखादे राष्ट्र सार्वभौमत्वाचा अधिकार आहे, हे उदारमतवादी सार्वभौम होण्याची इच्छा दर्शवते तेव्हा ते राष्ट्रवाद मानतो. स्वयंनिर्णयाच्या हक्काची मागणी करत असते. 4 राज्याच्या काही व्याख्या ॲरिस्टॉटल : राज्य हा परिपूर्ण आणि स्वावलंबी आयुष्य असलेल्या कुटुंबांचा आणि खेड्यांचा संघ असतो. यात आनंदी आणि प्रतिष्ठित आयुष्य असणे अपेक्षित आहे. जाँ बोडीन : राज्य हे कुटुंबांचे असे संघटन आहे, की ज्यात कुटुंबे आणि त्यांच्या मालकीची साधने सर्वोच्च शक्तीने तसेच तर्काने शासित असते. वूड्रो विल्सन : एका विशिष्ट भूप्रदेशात कायद्यासाठी सुसंघटित केलेले लोक म्हणजे राज्य होय. हॅरॉल्ड लास्की : वाटून दिलेल्या भौतिक क्षेत्रात, सर्व संस्थांवर श्रेष्ठत्वाचा दावा करणारे लोक आणि शासन यांत विभागलेला भूप्रदेशात्मक समाज म्हणजे राज्य होय. ॲरिस्टॉटल जाँ बाेडीन वूड्रो विल्सन हॅरॉल्ड लास्की (३८४ BCE-३२२ BCE) (१५३०-१५९६) (१८५६-१९२४) (१८९३-१९५०) प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञ, अभ्यासक फ्रेंच कायदेपंडित अमेरिकन मुत्सद्दी आणि अभ्यासक ब्रिटिश राजकीय विचारवंत आणि विचारवंत तसेच अमेरिकेचे अठ्ठाविसावे राष्ट्राध्यक्ष राजकीय स्वयंनिर्णयाच्या हक्काचा आग्रह हा स्वातंत्र्य या शब्दाऐवजी देखील वापरला जातो. एखाद्या राष्ट्राला राज्याच्या दिशेने घेऊन जातो. सार्वभौमत्व हा कायद्याच्या चौकटीतील शब्द एखादे राष्ट्र, राज्य केव्हा होते? राष्ट्राला राज्याचा आहे, तर स्वातंत्र्य या शब्दाचे स्वरूप राजकीय दर्जा प्राप्त होण्यासाठी सार्वभौमत्व, स्वतंत्र आहे. राज्य हे कायदेशीरदृष्ट्या सार्वभौम असते शासनव्यवस्था, भूप्रदेश आणि लोकसंख्या हे घटक आणि त्याला स्वतःचे संविधान असते. उदा., आवश्यक असतात. भारत १९४७ साली राजकीयदृष्ट्या स्वतंत्र राज्याला राजकीय समुदाय म्हणून संबोधित केले झाला आणि १९५० साली संविधान अमलात जाते. राज्याचे अस्तित्व आपल्याला सातत्याने आणल्यानंतर सार्वभौम राज्य झाले. जाणवत असते. शिक्षण, समाजकल्याण, संरक्षण, (ii) शासनसंस्था : प्रत्येक सार्वभौम राज्याला कायदा आणि सुव्यवस्था यांसारखी कार्ये राज्य करत स्वतःची शासनसंस्था असणे आवश्यक असते. असते. त्याचबरोबर जन्म-मृत्यूची नांेदणी, पॅन कार्ड शासन हे सार्वभौम आणि स्वतंत्र असणे गरजेचे किंवा आधार कार्ड मिळवणे, लग्नाची नोंदणी आहे. उदा., ब्रिटिश राजवटीत भारतात यांसारखी वैयक्तिक कार्येदेखील राज्यातर्फे केली शासनव्यवस्था होती, परंतु ती स्वतंत्र व जातात. राज्य हे हक्क प्रदान करते, न्याय देते, सार्वभौम नव्हती. म्हणूनच स्वातंत्र्यप्राप्तीच्या समानता ठेवते आणि स्वातंत्र्याची हमी देते. आधी भारत हे राज्य नव्हते. राज्याचे घटक राज्याच्या संस्था या सार्वजनिक स्वरूपाच्या (i) सार्वभौमत्व : कधी कधी सार्वभौमत्व हा असतात. या सार्वजनिक संस्थांमध्ये कार्यकारी मंडळ, 5 कायदेमंडळ व न्यायमंडळ, नोकरशाही इत्यादी (iv) लोकसंख्या : राज्याच्या अस्तित्वासाठी शासनव्यवस्थेच्या घटकांचा समावेश होतो. लोक आवश्यक असतात. लोकांमध्ये कोणत्याही धोरणनिर्मिती, कायदे करणे, निर्णय घेणे आणि त्यांची प्रकारची विविधता असू शकते. ती भाषिक, धार्मिक, अंमलबजावणी ही जबाबदारी सार्वजनिक संस्थांची सांस्कृतिक, वांशिक इत्यादी स्वरूपाची असू शकते. असते. आपण सार्वजनिक संस्था आणि खासगी म्हणजेच एखाद्या राज्यात अनेक ‘राष्ट्रांचा’ समावेश संस्था यांत फरक करतो. खासगी संस्था या नागरी असू शकतो. उदाहरणार्थ, सोव्हिएट रशियात अनेक समाजाचा भाग असतात. उदा., खासगी व्यवसाय, राष्ट्रीय लोकांचा समावेश आहे. उदाहरणार्थ, रशियन मंडळ इत्यादी. त्यात सार्वजनिक संस्थांनाच राज्याच्या लिथुआनियन, लाटवियन, इस्टोनियन, युक्रेनियन नावे कार्य करण्याची अधिमान्यता असते. इत्यादी. तसेच युनायटेड किंग्डममध्ये इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स आणि उत्तर आयर्लंड या राष्ट्रांचा माहीत आहे का तुम्हांला ? समावेश होतो. सर्व नागरिक हे राज्याचे सभासद असतात. माहीत आहे का तुम्हांला ? राज्याचे निर्णय जनहिताच्या दृष्टीने होत असतात. पॅलेस्टाईन : पॅलेस्टाईनच्या जनतेचे अधिकृत निर्णय घेण्याच्या अधिकाराला अधिमान्यता असे प्रतिनिधी म्हणून पॅलेस्टाईन मुक्ती संघटनेला म्हणतात. राज्याला जनहितासाठी निर्णय (PLO) मान्यता आहे. त्यांनी गाझा आणि वेस्ट घेण्याची अधिमान्यता असते. बँक हा प्रदेश पॅलेस्टाईनचा भूप्रदेश म्हणून जाहीर केला आहे. परंतु पॅलेस्टाईनचे सार्वभौम सरकार (iii) भूप्रदेश : राज्याच्या सीमेअंतर्गत असलेला नाही. परंतु २०१२ सालापासून पॅलेस्टाईनला संयुक्त राष्ट्रांत ‘सभासद नसलेला निरीक्षक’ दर्जा भौगोलिक प्रदेश म्हणजेच भूप्रदेश होय. देण्यात आला आहे. तसेच संयुक्त राष्ट्रांच्या राज्याला निश्चित भूप्रदेश असणे आवश्यक शंभरहून अधिक राष्ट्रांनी पॅलेस्टाईनला राज्याचा आहे. ज्या भूप्रदेशावर राज्याला शासन दर्जा दिला आहे. करण्याचा अधिकार आहे त्याला त्याचे अधिकार क्षेत्र म्हणतात. अधिकार क्षेत्राबाबत करून पहा : राष्ट्र आणि राज्याच्या राज्याला निर्णय घेण्याचा कायदेशीर अधिकार वैशिष्ट्यांमधील समानता आणि फरक दाखवणारा असतो. तक्ता तयार करा. भूप्रदेश म्हणजे काय? राज्य आणि शासनसंस्था भूप्रदेशाचे तीन घटक असतात : (i) राष्ट्रीय आपण साधारणत: राज्य आणि सरकार या सीमांतर्गत असलेली प्रत्यक्ष भूमी शब्दांचा प्रयोग करताना त्यांतील फरक लक्षात घेतोच (ii) किनारपट्टीलगतचा सागरी प्रदेश हा असे नाही. या दोन्ही वेगवेगळ्या संकल्पना आहेत. किनारपट्टीपासून 12 नॉटिकल मैल (22.2 किमी सर्वसामान्य जनतेच्या गरजा भागवण्यासाठी निर्माण किंवा 13.8 मैल) असतो. (iii) आपल्या केलेल्या राजकीय संस्था म्हणजे राज्य होय. राज्याचा भूप्रदेशावरील आकाशाचा भाग. (आकाशात किती जो काही संकल्प आहे त्याला आकार देणे, तो उंचीपर्यंत आपला प्रदेश असेल याबाबत व्यक्त करणे आणि तो प्रत्यक्षात आणण्याचे कार्य आंतरराष्ट्रीय कायद्यात उल्लेख नाही.) त्या राज्याचा प्रतिनिधी म्हणून शासन करत असते. 6 शासनसंस्था हा राज्याचा एक मुख्य घटक असतात. कार्यकारी मंडळ, कायदेमंडळ आणि आहे. त्याचे मुख्य स्वरूप हे प्रशासकीय असते. न्यायमंडळ. शासनसंस्था या संकल्पनेबाबत अधिक कायदा आणि सुव्यवस्था राखणे, जनकल्याण इत्यादी विस्तृत माहिती या पुस्तकाच्या दुसऱ्या भागात दिली राज्याची महत्त्वाची कार्ये असतात. ही कार्ये आहे. शासनामार्फत केली जातात. शासनसंस्थांची तीन अंग राज्य आणि शासनसंस्था यांच्यातील काही फरक राज्य शासनसंस्था राज्य ही अमूर्त स्वरूपाची संकल्पना आहे. शासनसंस्था मूर्त स्वरूपाची असते. शासनसंस्थेपेक्षा राज्याचे स्वरूप अधिक शासनसंस्था हा राज्याचा एक भाग आहे. व्यापक आहे. त्यात सर्व सार्वजनिक संस्था तसेच समाजातील सर्वांचाच नागरिक म्हणून समावेश होतो. राज्य हे कायमस्वरूपी असते. शासनसंस्था ही निश्चित कालावधीसाठी असते. शासनव्यवस्थेत बदल होऊ शकतो. सरकार बदलू शकते. राज्य हे व्यक्तिनिरपेक्ष असते. ते शासनसंस्थेला विचारप्रणालीवर आधारित अजेंडा असतो. राजकीयदृष्ट्या तटस्थ असते. त्यानुसार त्यांना धोरणांची अंमलबजावणी करायची असते. राज्य हे सार्वभौम असते. शासनाला राज्याकडून अधिकार प्राप्त होतात. राज्याच्या अधिकाराची प्रत्यक्ष अंमलबजावणी शासनसंस्था करते. आपण या प्रकरणात राष्ट्र, राष्ट्रवाद, राज्य समानता आणि न्याय या संकल्पनांचा अभ्यास आणि शासनसंस्था या संकल्पनांचा अभ्यास केला. करणार आहोत. या संकल्पना राज्याच्या कार्याशी पुढील दोन प्रकरणात आपण स्वातंत्र्य, हक्क, निगडित आहेत. Please see the following websites for further information: The Discovery of India Jawaharlal Nehru The Discovery of India (Delhi : Oxford University Press, 1985 ) Chapter: 'Bharat Mata' Page: 59 Chapter: The Variety and Unity of India Page: 61 https://archive.org/stream/TheDiscoveryOfIndia-Eng-JawaharlalNehru/discovery-of-india_ djvu.txt 7 स्वाध्याय प्र.१ (अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून २. सार्वभौमत्व म्हणजे देशाला स्वतंत्रपणे निर्णय विधान पूर्ण करा. घेण्याचा अधिकार १. इंग्रजीतील Nation हा शब्द लॅटिन शब्द ३. पॅलेस्टाईन हे राज्य आहे.......... पासून निर्माण झाला आहे. ४. प्रसारवादी राष्ट्रवाद हा आक्रमक राष्ट्रवादाचा (Nasci, Natio, Natalis, Nauta) प्रकार आहे. २. उदारमतवादी राष्ट्रवादाचा उगम हा.......... प्र.३ आपले मत नोंदवा. राज्यक्रांतीत झाला. भारत एक राज्य आहे. (अमेरिकन, रशियन, फ्रेंच, ब्रिटिश) प्र.४ पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. (ब) चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. १. राष्ट्राची वैशिष्ट्ये काेणती आहेत ? १. (i) ॲरिस्टॉटल - जर्मन विचारवंत २. राष्ट्रवाद म्हणजे काय हे सांगून त्याचे विविध (ii) जाँ बोडीन - फ्रेंच विचारवंत प्रकार स्पष्ट करा. (iii) वूड्रो विल्सन - अमेरिकन विचारवंत (iv) हॅरॉल्ड लास्की - ब्रिटिश विचारवंत प्र.५ खालील प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुदद ्‌ ्यांच्या आधारे लिहा. (क) दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना राज्याचे खालील घटक स्पष्ट करा. लिहा. (अ) सार्वभौमत्व (ब) शासनसंस्था १. लोकांना देशाशी राजकीय पातळीवर एकनिष्ठ (क) लोकसंख्या (ड) भूप्रदेश करणारी शक्ती - २. ज्या भूप्रदेशावर राज्याला शासन करण्याचा उपक्रम अधिकार आहे - सर्वांत लहान भूप्रदेश व सर्वांत मोठा भूप्रदेश असलेली प्र.२ खालील विधाने चूक की बरोबर सकारण स्पष्ट करा. राज्ये जगाच्या नकाशा आराखड्यात दर्शवा. १. प्रागतिक राष्ट्रवाद लोकांमध्ये तेढ निर्माण करू *** शकतो. 8 २. स्वातंत्र्य आणि हक्क लोकशाहीमध्ये नागरिकांना काही हक्क आणि थॉमस हॉब्ज : यांच्या मते ‘स्वातंत्र्य हा कर्तव्ये असतात. जेव्हा या हक्कांचे आणि कर्तव्यांचे मनुष्याचा नैसर्गिक अधिकार आहे’. एखादी कृती रक्षण केले जाते तेव्हा लोकांना स्वातंत्र्य मिळते, असे करण्यासाठी व्यक्तीवर मानले जाते. हक्क म्हणजे लोकांना शासनामार्फत कोणतेही बंधन नसणे मिळालेले विशेषाधिकार होय. स्वातंत्र्य हे लोकशाहीचे म्हणजे स्वातंत्र्य होय. ते महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. म्हणतात की मनुष्याला स्वातंत्र्य स्वातंत्र्यप्राप्तीसाठी भीती स्वातंत्र्य आणि हक्क या पाठात आपण बंधनांचा आणि गरज या गोष्टी अभाव, निवडीचे स्वातंत्र्य, अनुकूल परिस्थितीची थॉमस हॉब्ज (१५८८-१६७९) प्रेरणा देतात. त्यांनी उपलब्धता आणि सुखप्राप्ती या संदर्भात स्वातंत्र्याचा एक ब्रिटिश तत्त्वज्ञ बंधनांचा अभाव म्हणजे अर्थ समजून घेणार आहोत. तसेच स्वातंत्र्याचे स्वातंत्र्य असा अर्थ सांगितला आहे. नकारात्मक आणि सकारात्मक हे दोन पैलू आणि जॉन लॉक : लॉक यांच्या मते, स्वातंत्र्य हा भारतीय संविधानानुसार स्वातंत्र्य आणि हक्क या मनुष्याचा नैसर्गिक अधिकार आहे. त्यांनी नैतिकतेच्या संकल्पना समजून घेऊ. आधारे स्वातंत्र्याची संकल्पना मांडली. नैतिकदृष्ट्या स्वातंत्र्य या संकल्पनेचे मुक्तता किंवा स्वराज्य व्यक्तीने इतरांच्या जीवित व स्वातंत्र्याच्या हक्कास असेही अर्थ असू शकतात. स्वतंत्र असणे म्हणजे हानी पोहचवू नये. मुक्त असणे. गुलामगिरीतून मुक्तता, जुलमी प्रत्येकाने समतेच्या राजवटीपासून सुटका, परकीय सत्तेच्या जोखडातून तत्त्वाचे उल्लंघन न मुक्तता म्हणजे स्वातंत्र्य होय. स्वातंत्र्य हे व्यक्तीचे, करता स्वातंत्र्याचा समाजाचे व राष्ट्राचे असते. व्यक्ती विकासासाठी उपभोग घ्यावा. स्वातंत्र्य आवश्यक असलेल्या सामाजिक, आर्थिक आणि हे मनुष्य जीवनाचे राजकीय हक्कांनाही स्वातंत्र्य असे म्हटले जाते. अभिन्न अंग आहे. माहीत आहे का तुम्हांला? लॉक यांनी स्वातंत्र्याला जॉन लॉक (१६३२-१७०४) जास्त महत्त्व दिले. एक ब्रिटिश तत्त्वज्ञ परकीय सत्तेपासून समाज मुक्त असणे म्हणजे त्यांच्या मते, प्रत्येक राष्ट्रीय स्वातंत्र्य होय. आपला सर्वांगीण विकास व्यक्ती विवेकी आहे. म्हणून त्यांनी घडवून आणण्यासाठी व्यक्तीला आवश्यक असलेले सदसद्‌विवेकबुद्धीने स्वातंत्र्य उपभोगण्याचे समर्थन स्वातंत्र्य म्हणजे व्यक्तिस्वातंत्र्य होय. हा राष्ट्रीय केले. मात्र त्यांना अमर्याद स्वातंत्र्याची संकल्पना स्वातंत्र्य व व्यक्तिस्वातंत्र्यातील फरक आहे. मान्य नव्हती. त्यांच्या स्वातंत्र्याच्या संकल्पनेत स्वातंत्र्याचे स्वरूप : ‘स्वातंत्र्य’ या संकल्पनेचे बंधनांचा अभाव आणि निवडीचे स्वातंत्र्य या दोन स्वरूप समजून घेताना पुढील विचारवंतांची मते तत्त्वांचा समावेश आहे. अभ्यासावी लागतील. 9 जाँ जॅकवेस रुसो : रुसो यांनी स्वातंत्र्याचा स्वातंत्र्य आणि सुख सामूहिक दृष्टिकाेनातून यांचा परस्परांशी संबंध विचार केला आहे. जोडला. सुख प्राप्त त्यांच्या मते, व्यक्तीने होण्यासाठी आणि संपूर्ण समाजाच्या दुःख टाळण्यासाठी हितासाठी स्वतःचा स्वातंत्र्य आवश्यक स्वार्थ बाजूला ठेवला आहे, असा विचार जेरेमी बेंथॅम (१७४८ -१८३२) पाहिजे. त्यांची त्यांनी मांडला. एक ब्रिटिश तत्त्वज्ञ जाँ जॅकवेस रुसो स्वातंत्र्याची संकल्पना समाजातील व्यक्तीला जेरिमी बेंथॅमच्या विचारात ‘अधिकतम (१७१२-१७७८) एक जिनीव्हन तत्त्वज्ञ वर्गव्यवस्था आणि लोकांचे अधिकतम सुख’ हा मूलमंत्र होता. यास विषमतेपासून स्वातंत्र्य देणारी आहे. त्यांच्या मते, नकारात्मक स्वातंत्र्य असे म्हटले जाते. विषमता हा स्वातंत्र्यप्राप्तीतील अडथळा आहे. तसेच, जॉन स्टूअर्ट मिल : मिल यांनी स्वातंत्र्याच्या नागरी आणि राजकीय समाजाच्या उदयामुळे निर्माण संकल्पनेत व्यक्तीच्या स्वातंत्र्याचे समर्थन केले आणि झालेल्या अडथळ्यातून व्यक्तीला मुक्तता मिळणे राज्याच्या अमर्यादित अंकुशाचा विरोध केला. त्यांनी म्हणजे स्वातंत्र्य होय. हे अडथळे पुढील दोन प्रकारांत दिलेली स्वातंत्र्याची संकल्पना म्हणजे ‘स्वतःवर मांडले आहेत. (i) व्यक्तीला सार्वजनिक हिताचा (व्यक्तिशः), स्वत:च्या विचार करण्यास रोखणारे अडथळे. (ii) समाजातील शरीरावर आणि बुद्‌धीवर विषमतेमुळे निर्माण होणारे अडथळे. (मन) व्यक्तीचा पूर्ण अधिकार आहे.’ मिलचे स्वातंत्र्यावरचे रुसो मुद्दे आजही समर्पक आहेत. ‘‘मनुष्य हा जन्मतःच स्वतंत्र आहे. परंतु ताे त्यांचा स्वातंत्र्यविषयक विचार सर्वत्र शृंखलांमध्ये बंदिस्त आहे.’’ असे रुसो यांचे जॉन स्टूअर्ट मिल ‘ऑन लिबर्टी’ (On मत आहे. रुसो यांचा जन्म जिनीव्हामध्ये झाला. (१८०६-१८७३) Liberty) या ग्रंथात त्यांना फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक मानतात. एक ब्रिटिश तत्त्वज्ञ पाहायला मिळतो. स्वातंत्र्याच्या दोन संकल्पना रुसो यांनी हॉब्ज आणि लॉकप्रमाणे स्वातंत्र्याला नैसर्गिक अधिकार मानले नाही. समाज एकत्रित इसाया बर्लिन येऊन नागरिकांच्या जीविताचे व हिताचे संरक्षण यांनी १९५८ मध्ये करतो. रुसो यांनी सामाजिक विषमतेपासून मुक्ततेच्या प्रकाशित केलेल्या स्वातंत्र्याचा विचार मांडला. त्यांच्या मते स्वातंत्र्याच्या ‘स्वातंत्र्याच्या दोन संकल्पनेत पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य आणि अनुकूल संकल्पना’ (Two परिस्थितीची उपलब्धता महत्त्वाची आहे. Concepts of Liberty) या जेरेमी बेंथॅम : जेरेमी बेंथॅम यांनी सुखप्राप्तीच्या निबंधामध्ये नकारात्मक इसाया बर्लिन (१९०९-१९९७) रशियन-ब्रिटिश तत्त्वज्ञ आणि दृष्टिकोनातून स्वातंत्र्याचा अर्थ स्पष्ट केला. त्यांनी व सकारात्मक स्वातंत्र्य इतिहासतज्ज्ञ 10 ?

Use Quizgecko on...
Browser
Browser