Maharashtra Police Training Notice for Scheduled Tribes 2024-2025 PDF
Document Details
Uploaded by Deleted User
आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था
2024
Tags
Summary
This notice provides general instructions for training institutes regarding a pre-recruitment training program for police and military recruitment for scheduled tribe candidates in the state of Maharashtra. It outlines requirements for training materials, facilities, and schedules starting 16 December 2024 and covers specific details on the program. This notice ensures that potential candidates receive proper training. The training institute is आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, located in Pune.
Full Transcript
# आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे ## महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी दि. १६ डिसेंबर, २०२४ पासून सुरू होणाऱ्या अनिवासी पोलीस व सैन्य भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम योजनेसंदर्भात प्रशिक्षण संस्थांकरीता सर्वसाधारण सूचना - **सन २०२४-२५ पासून शासनाच्या सर्वंकष धोर...
# आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे ## महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी दि. १६ डिसेंबर, २०२४ पासून सुरू होणाऱ्या अनिवासी पोलीस व सैन्य भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम योजनेसंदर्भात प्रशिक्षण संस्थांकरीता सर्वसाधारण सूचना - **सन २०२४-२५ पासून शासनाच्या सर्वंकष धोरणांतर्गत आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे मार्फत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी अनिवासी पोलीस व सैन्य भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम योजना राबविण्यात येत आहेत.** - **ई-निविदा प्रक्रीयेद्वारे खाजगी प्रशिक्षण संस्थांना नामनिर्देशित (Empanel) करण्यात आले.** - **विद्यार्थ्यांना प्रशिक्षण संस्था निवडीकरीता विकल्प पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले.** - **प्रशिक्षण संस्थांनी सदरच्या विद्यार्थ्यांच्या मूळ कागदपत्रांची तपासणी करून दि. १६ डिसेंबर, २०२४ पासून पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात येत आहे.** **प्रशिक्षण संस्थेना खालील सूचना काळजीपूर्वक वाचणे व त्याप्रमाणे करणे अनिवार्य आहे:** 1. **प्रशिक्षण कार्यक्रम संदर्भात किंवा विद्यार्थ्यांच्या बाबतीत काही शंका/अडचण असल्यास स्पर्धा परीक्षा कक्ष, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांच्याशी संपर्क साधावा.** 2. **त्यांच्याकडे प्रवेशित झालेल्या उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची व कार्यालयाकडून शारीरिक पात्रतेच्या निकषासंबंधी देण्यात आलेल्या परिशिष्ट क प्रमाणे पडताळणी करावी व त्याबाबतचा सविस्तर अहवाल कार्यालयास सादर करावा.** - **Competitive Pre-Examination Training Implementation & Monitoring या पोर्टलवर प्रवेशित विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती अचूक भरणे अनिवार्य आहे.** 3. **प्रवेशित उमेदवार हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी व अनुसूचित जमातीचे असावे.** 4. **महाराष्ट्र राज्याचे अनुसूचित जमातीचे जात प्रमाण पत्र व जमात वैधता प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे.** 5. **संपूर्ण कालावधी दरम्यान पूर्ण करण्यात येणारा अभ्यासक्रम, सराव चाचण्या व विशेष मार्गदर्शन सत्र या सर्व बाबींचा नियोजन आराखडा, प्रशिक्षकांची नियोजित वेळापत्रकानुसार विषय निहाय यादी, शारीरिक सरावाचे वेळापत्रक कार्यालयास सादर करणे बंधनकारक आहे.** 6. **प्रवेशित प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण कार्यक्रमाबाबत समुपदेशन करावे.** 7. **शारीरिक (Physical) प्रशिक्षण सह शैक्षणिक (Academic) प्रशिक्षण वर्गाचा कालावधी प्रती दिवस किमान 6 तास असणे आवश्यक आहे.** 8. **सुधारीत अभ्यासक्रमाप्रमाणे प्रशिक्षण देणे तसेच शासनाच्या नवीन व सुधारीत नियमानुसार शारीरिक पात्रतेच्या निकषांनुसार प्रशिक्षण देणे बंधनकारक असेल.** 9. **प्रवेशित झालेल्या प्रशिक्षणार्थीना मैदानी सरावासाठी खालील नमूद प्रशिक्षण साहित्यांचा नमूद प्रत्येकी 2 संच देणे बंधनकारक असेल:** - **टी-शर्ट:** - **रंग:** Grey/Navy Blue/Orange/Yellow/Black यापैकी कोणताही एक रंग असावा - **टी-शर्ट वर आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन आणि आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांचा अधिकृत लोगो असावा. (अधिकृत लोगोच्या रंगसंगती मध्ये किंवा इतर बाबींमध्ये बदल करता येणार नाही.)** - **टी-शर्ट चे कापड हे साधारण पणे Honeycomb fabric चे (Sport dress चे कापड) असावे.** - **पॅन्ट:** - **रंग:** Orange/Black यापैकी कोणताही एक रंग (टी-शर्ट च्या रंगाला साजेसा असावा.) - **मुलांकरीता हाफ व मुलींकरीता फुल पॅन्ट असावी.** - **ट्रॅक सूट:** - **रंग :** Grey/Black/Navy Blue यापैकी कोणताही एक रंग - **ट्रॅक सूट चे कापड Super poly fabric प्रकारातले असावे.** - **ट्रॅक सूट वर आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन आणि आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांचा अधिकृत लोगो असावा. (अधिकृत लोगोच्या रंगसंगती मध्ये किंवा इतर बाबींमध्ये बदल करता येणार नाही.)** - **बूट:** - **प्रकार :** उत्कृष्ट दर्जाचे व टिकाऊ पंचिंग प्रकारातले स्पोर्ट शूज असावे. जेणेकरून प्रशिक्षणार्थीना शारीरिक सरावा दरम्यान दुखापत होणार नाही. 10. **उपरोक्त नमूद सर्व साहित्य हे उत्कृष्ट दर्जाचे, चांगल्या कंपनीचे व टिकाऊ स्वरूपाचे असणे आवश्यक आहे.** 11. **प्रशिक्षणार्थीना सदरच्या पूर्व प्रशिक्षण योजनेच्या सुधारीत अभ्यासक्रमाचे पुस्तके, वह्या, पेन इ. शैक्षणिक साहित्य देणे प्रशिक्षण संस्थेस बंधनकारक असेल.** 12. **प्रशिक्षणार्थीना मैदानी सरावासाठीचे मैदान हे ई-निविदा मध्ये नमूद केलेल्या निकषांनुसार असावे. पोलीस व सैन्य भरती प्रक्रियेकरीता मैदानी सरावासाठी लागणारे सर्व साहित्य मैदानावर उपलब्ध आवश्यक आहे.** 13. **प्रशिक्षित प्रशिक्षकांच्या माध्यमातून शैक्षणिक (Academic) व शरीरिक (Physical) प्रशिक्षण देणे बंधनकारक असेल.** 14. **प्रशिक्षणार्थीना मैदानावर प्रथमोपचार सुविधा उपलब्ध करून देणे बंधनकारक असेल.** 15. **सामंजस्य करार व कार्यारंभ आदेशात नमूद केलेल्या अटी व शर्ती नुसार सर्व करांसहित प्रशिक्षण केंद्रास प्रती विद्यार्थी प्रशिक्षण शुल्क देय असेल.** 16. **टप्पानिहाय प्रशिक्षण शुल्काची मागणी करत्यावेळी मागणी पत्रासोबत तीन वेगळ्या प्रतींमध्ये वस्तू व सेवा कर (GST) सहितचे देयक (GST Invoice) या कार्यालयात सादर करणे अनिवार्य आहे.** 17. **प्रशिक्षणाकरीता प्रवेशित झालेल्या प्रशिक्षणार्थीना प्रसिद्ध करण्यात आलेल्या ई-निविदामध्ये नमूद केल्याप्रमाणे अभ्यास साहित्य, स्पर्धा परीक्षा मासिक, स्व प्रकाशन असलेले पुस्तके / क्लास नोट्स या सर्व बाबी निःशुल्क स्वरुपात देणे बंधनकारक राहील.** 18. **विहीत कालावधीसाठी प्रशिक्षण कार्यक्रम घेणे बंधनकारक राहील.** 19. **सामंजस्य करार व कार्यारंभ आदेशात नमूद केल्याप्रमाणे विद्यार्थ्यांना सर्व सोयी-सुविधा निःशुल्क विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे बंधनकारक असेल.** 20. **प्रशिक्षण कालावधी दरम्यान विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक उपस्थित पत्रक व सीसीटीव्ही फुटेज दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कार्यालययास सादर करणे बंधनकारक राहील. प्राप्त बायोमेट्रिक उपस्थित अहवालानुसारच थेट लाभ अंतरण (DBT) द्वारे विद्यार्थ्यांनी दिलेल्या बँक खात्यावर विद्यावेतनाची रक्कम जमा केली जाईल. याची पूर्व कल्पना विद्यार्थ्यांना द्यावी.** 21. **प्रवेशित प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण कालावधीमध्ये कुठेही नोकरी करता येणार नाही. तसे आढळल्यास किंवा याबाबत कार्यालययास काही तक्रार प्राप्त झाल्यास संबधित प्रशिक्षणार्थीचा प्रवेश रद्द करण्यात येईल. तसेच प्रशिक्षण कालावधी दरम्यान किंवा तद्नंतर प्रवेशित प्रशिक्षणार्थीची सेवेत निवड झाल्यास त्याबाबतची माहिती कार्यालययास तात्काळ कळविणे बंधनकारक असेल.** 22. **कोविड-१९ सारखी किंवा तत्सम नैसर्गिक आपत्ती निर्माण झाल्यास अपवादात्मक परिस्थितीमध्ये प्रशिक्षण वर्ग ऑनलाईन स्वरुपात घेण्याची गरज भासल्यास प्रशिक्षणार्थीना ऑनलाईन प्रशिक्षण देणे बंधनकारक राहील. याकरीता यांची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक असेल.** 23. **अभ्यासक्रमामध्ये वेळोवेळी होणाऱ्या बदलानुसार प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण देणे बंधनकारक असेल.** 24. **अधिकारी कोणत्याही वेळी तपासणीसाठी भेट देतील त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना प्रशिक्षणासंबंधित सर्व अभिलेखे व दस्तावेज उपलब्ध करून देणे बंधनकारक राहील.** 25. **संपूर्ण प्रशिक्षण कालावधी दरम्यानचे सर्व सीसीटीव्ही फुटेज जतन करून ठेवणे बंधनकारक असेल. वेळोवेळी कार्यालयकडून मागणी झाल्यास ते उपलब्ध करून देण्याची जबाबदारी राहील.** 26. **ई-निविदेनमूद असल्याप्रमाणे प्रशिक्षण वर्गाची विद्यार्थी कमाल मर्यादा 50 विद्यार्थी असणे बंधनकारक राहील.** 27. **प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याचा सविस्तर अहवाल (विद्यार्थ्यांचा व प्रशिक्षकांचे अभिप्राय, प्रशिक्षण कालावधीतील छायाचित्रे, इ.) कार्यालययास सादर करणे बंधनकारक राहील.** 28. **योजनेच्या अंमलबजावणी करतांना जर काही अडचण आल्यास प्रशिक्षण संस्थांनी संबंधित योजनेकरीता प्राधिकृत केलेल्या समन्वयकांशी संपर्क साधावा.** 29. **विविध योजनांच्या लाभाच्या स्वरूपाची सविस्तर माहिती https://trti.maharashtra.gov.in या संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येते. त्यामुळे योजनांबद्दल नवीन माहिती जाणून घेण्यासाठी उपरोक्त नमूद संकेतस्थळाला वेळोवेळी भेट देऊन माहिती घ्यावी.** **डॉ. राजेंद्र भारूड, भा.प्र.से.** **आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था**